Wednesday, August 7, 2024

आई-वडिलांचा सांभाळ न करणा-यांना परमार्थात जागा नाही-कीर्तनकार शि.भ.प.नागेश स्वामी कुरूंदवाडीकर

*ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांचे तपोनुष्ठान, भाविकांचा उदंड प्रतिसाद*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अनेक ठिकाणी आई-वडिलांचा सांभाळ करण्यास मुले दुर्लक्ष करीत आहेत. अशा मुलांनी कितीही परमार्थ केला तरी त्यांना परमार्थात जागा मिळू शकत नाही, असे मत प्रसिद्ध कीर्तनकार शि.भ.प.नागेश स्वामी कुरूंदवाडीकर यांनी व्यक्त केले.
श्रावण मासाचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेले श्री शनि मंदिर  येथे  वसूंधरारत्न डाँ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने वीरशैव लिंगायत समाज व श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीच्या  वतीने   ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांंच्या श्रावणमास तपोनुष्ठानास सोमवारपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान, परमरहस्य पारायण व किर्तन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कीर्तनकार शि.भ.प.नागेश स्वामी महाराज बोलत होते.
 मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधताना  शि.भ.प.नागेश स्वामी कुरूंदवाडीकर यांनी सांगितले की, ...कितीही संपत्ती कमावली दान केली. परंतू आई वडिलांचा सांभाळ केला नाही तर काहीच अर्थ नाही. यासाठी प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करून आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 

13 दिवस चालणा-या तपोनुष्ठान सोहळ्यात श्रावणमास तपोनुष्ठान कालावधीत दररोज अन्नप्रसाद, अखंड शिवनाम सप्ताह,परमरहस्य पारायण सोहळा,कीर्तन,प्रवचन, वृक्षदान सोहळा, वृक्षारोपण,जलपुनर्भरण, आरोग्य तपासणी शिबीर, सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.यासोबतच श्रावणमास तपोनुष्ठान सोहळ्या दरम्यान दररोज प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार दि.7 अॉगस्ट रोजी माजी नगराध्यक्ष तथा  वैद्यनाथ बँकेचे माजी चेअरमन,परळी भूषण कै.अशोकशेठ सामत यांच्या जयंतीनिमित्त सामत परीवाराच्यावतीने वैद्यनाथ बँकेचे चेअरमन श्री.विनोदशेठ सामत यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच श्री.विजयशेठ व राहुलशेठ सामत यांच्या हस्ते गुरूवर्यांची आरती करण्यात आली.
कार्यक्रमास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे तरी जनकल्याणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या तपोनुष्ठान, परमरहस्य पारायण  सोहळ्याचा शहर व परिसरातील सर्व शिव भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन द्वादश पंचम् ज्योतीर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या परळी-वैजनाथ नगरीतील ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या द्वादश श्रावणमास तपोनुष्ठानाचे वीरशैव लिंगायत समाज व श्रावणमास तपोनुष्ठान समितीच्या पदाधिकार्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment