*तमलूरकर श्री गुरू माऊलीचे 40 वे श्रावणमास तपोअनुष्ठान व रुद्र पूजा व गुरुमाऊलींचे अमृत उपदेश.
बीड (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे काल दि 12/8/2024 सोमवार रोजी श्रावण मासानिमित्त गुरूवर्य प.पु.ष.ब्र.108 तपोरत्न श्री. शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी तमलूरकर यांचे 40 वे अनुष्ठान चालू आहे. या अनुष्ठानात शिवपाठ , सामुहिक ईष्टलिंगपुजा, गाता भजन व गुरूवर्यांचे अमृत उपदेश व श्रोते यांना शिवमहिमा महाराज सांगत आहेत.
भगवान शिवशंकर हे भक्तवत्सल आहेत ज्या ज्या ठिकाणी शिवाचा पूजा पाठ, पठण, सेवा व शिव आराधना असते त्या त्या ठिकाणी भगवान शिवाचा वास आहे असे महत्त्वपूर्ण उद्धार महाराजांनी भक्त मंडळींना सांगितले.
श्रीक्षेत्र कपिलधार येथे जमलेल्या सर्व भक्तगणांना शिवचार्य महाराजांनी शिवमहिमा सांगताना रामायणातील एक उदाहरण सांगितले म्हणजे प्रभुरामचंद्र आणि सर्व वानरसेना लंकेवर विजय करण्यासाठी समुद्र तीरावर गेली होती. समुद्र तीरावर प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र आणि शिवलिंग स्थापून त्यांची आराधना केली आणि आपले कार्य पूर्ण व्हावे यासाठी शिवाला साकडे घातल आणि पुढे लंका विजय प्राप्त केला .
याबरोबरच महाराजांनी साधू संतांचे अनेक दाखले दिले
या धर्तीवर संताचा महिमा आगात आहे संतांमध्ये दया ,करुणा ,प्रेम, शांती व सहनशीलता ही ओतप्रोत भरलेली असते.
महाराज म्हणाले आपल्या जीवनामध्ये आपण या संतांना शरण गेलं की आपलं इच्छित कार्य पूर्ण होते यामध्ये शंकाच नाही.या तपोअनुष्ठान कार्क्रमाला आंध्रप्रदेश,कर्नाटक , तेलंगणा,बीड ,कपिलधारवाडी,आदी विविध राज्यातून तसेच पंचक्रोशीतील असंख्य भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment