बीड (प्रतिनिधी) दैनिक चंपावतीपत्र चे संपादक नामदेवराव क्षीरसागर दादा यांचे निधन झाले. राहत्या घरी सकाळी वृतपत्र वाचन सुरु असताना दादांना हृदयविकाराचा त्रास झाला अन त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षाचे होते.
गेल्या अर्ध्या शतकापासून बीड जिल्ह्याच्या वृत्तपत्र क्षेत्रावर वेगळी छाप निर्माण करणारे नामदेवराव क्षीरसागर यांचे सामाजिक, राजकीय योगदान मोठे होते. संस्कार प्रबोधिनी च्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात शैक्षणिक चळवळ मजबूत केली.
नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी त्यांनी जनआंदोलन उभारले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.कांतीकारी साथी परिवार क्षीरसागर यांच्या दु;खात सहभागी आहे. भावपूर्ण श्रध्दांजली.
No comments:
Post a Comment