परळी वैजनाथ (प्रतिनिधि) दक्षिण मध्य रेल्वे झोन अंतर्गत सिकंदराबादचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक भरतेश कुमार जैन व इतर अधिकारी बुधवारी येथील रेल्वे स्थानकाच्या निरिक्षणासाठी आले होते.
यावेळी ज्येष्ठ समुपदेशक तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा रेल्वे प्रवाशी प्रकोष्ठ चे बीड जिल्हा संयोजक गणपतअप्पा सौंदळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन त्यांना रेल्वे विषयक मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी त्यांच्या सोबत अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक एम गोपालजी, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक सुरेशजी रेड्डी, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बालाजी किरण , वरिष्ठ विभागीय अभियंता वाय शशांक , रेल्वे सुरक्षा बल चे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोरजी मलकुनाईक, परळी रेल्वे स्थानक अधीक्षक तुलसीरामजी मीना, उप अधीक्षक संतोषजी सिरसाठ, वाणिज्य निरीक्षक बिरेंद्रजी कुमार, पीबब्ल्युआय राजीवजी रंजन इत्यादि अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी त्यांचे स्वागत करून औरंगाबाद-हैद्राबाद रेल्वे गुंटूर पर्यन्त विस्तारित केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. त्याच धर्तीवर बिदर रेल्वे स्थानकात अधिक काळ खोळंबून रहात असणाऱ्या मछलीपट्टनम-बिदर, हैद्राबाद-बिदर, यशवंतपूर-बिदर एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांना परळी वैजनाथ टर्मिनस पर्यंत विस्तारित कराव्यात कशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्याशिवाय नांदेड-पनवेल एक्स्प्रेसला आणखी अधिक जादा स्लीपर कोचेस आणि जनरल बोगीज वाढवाव्यात, येथील आरक्षण कक्षाची कामाची वेळ वाढवून सकाळी आठ ते रात्री आठ म्हणजे सलग १२ तास करावी, परळी वैजनाथ टर्मिनस रेल्वे स्थानकात "पीट लाईन" ची सोय करावी, घाटनांदूर ते परळी वैजनाथ दरम्यान मौजे अंबलटेक येथे एक नवीन रेल्वे स्थानक रेल्वे क्राॅसिंगसाठी बांधण्यात यावे, इत्यादि मागण्यांचाही सदर निवेदनात समावेश आहे.
या शिष्टमंडळात सर्वश्री समुपदेशक गणपतअप्पा सौंदळे गुरूजी, संपादक आत्मलिंगअप्पा शेटे, संपादक बालकिशनजी सोनी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड, उपाध्यक्ष नंदकिशोरजी बियाणी, संस्कार विद्यालयाचे अध्यक्ष कैलासजी तांदळे,ज्येष्ठ पत्रकार महादेवजी गित्ते पाटील, भाजपा रेल्वे प्रकोष्ठचे स्थानक प्रमुख आश्विनजी मोगरकर, मानद सदस्य दीपकजी वांजरखेडे, सुनीलजी जठार,गोविंदजी चांडक,हबीबभाई शेख, चिंतामणीजी खंडागळे, विकासजी हालगे,राजेशजी कौलवार,सूर्यप्रकाशजी तुसाम, सचिनजी पोखरकर, गोपालजी अघाव, श्रीरामजी लांडगे, राहूलजी घोबाळे, भगवानजी राठोड, राहूलजी रोडे, विजयजी जोशी, प्रशांतजी सौंदळे, दत्तात्रयजी लहाने,इत्यादि मान्यवर शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment