बीड (प्रतिनिधी): बीड शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटकयाने जागीच मृत्यू झाला. ही घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
बीड शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटकयाने जागीच मृत्यू झाला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बाबासाहेब मिसाळ, असं मयत शिक्षकांच नाव आहे. ते बीडच्या वारोळा या आश्रम शाळेवर कर्तव्यावर होते. सकाळी बीड शहरातील नगर रोडवरील पोलीस पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता पेट्रोल भरण्याअगोदर ते खाली कोसळले. नागरिकांनी मिसाळ यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला हे सीसीटीव्हीत कैद झाले आहे, त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी ॲम्बुलन्स बोलावली. ॲम्बुलन्स बोलावून त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यावेळेस
डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
No comments:
Post a Comment