Friday, July 19, 2024

एसटी भरधाव वेगात असताना चालकाला आली फिट.! ताबा सुटल्यामुळे बसपलटी सुदैवाने जीवितहानी नाही.

सोलापूर (प्रतिनिधी) सोलापुरातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असताना एसटी चालकाला अचानक फिट आल्याने हा अपघात झाला आहे.
टेंभुर्णी - कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ हा अपघात झाला. धक्कादायक म्हणजे यावेळी 30 ते 40 प्रवाशी एसटीतून प्रवास करत होते. एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतातल्या मोकळ्या जागेत बसवण्यात आले. व जखमींना कुर्डूवाडीच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात झाल्यानंतर बसमधील प्रवाशी प्रचंड घाबरले होते. ज्याला जसे सुचेल तसे त्यांनी स्वताचा बचाव केला. एसटी बसमधून ते पटापट बाहेर पडले. त्यावेळी हायवेजवळ असलेल्या काहींनी मदतीसाठी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. त्यांना शेतातील मोकळ्या जागेत बसवण्यात आले. त्यानंतर एसटीच्या चालकालाही बाहेर काढण्यात आले. त्यांना शुद्धीवर आणण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला. या अपघातात जवळपास तीस ते पस्तीस जण जखमी झाले आहेत.
एसटी चालकाना गाडी चालवत असतानाच फिट आली होती. त्यामुळं त्यांचे एसटी बस'वरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याखाली शेतात पलटी झाली. टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ हा अपघात झाला. तर सुदैवाने जीवितहानी झालेली नाही...

No comments:

Post a Comment