Sunday, July 21, 2024

मराठा आरक्षणावर अमित शाह यांचे मोठे विधान भाजपने मराठ्यांना आरक्षण दिल तर पवारांनी घालवले.


पुणे (प्रतिनिधी) राज्यात ज्या ज्या वेळी भाजपचं सरकार येत त्या त्या वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळत मात्र शरद पवार यांच्या काळात आरक्षण घालवल जातं अशी टीका करत पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत अशी बोचारी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

पुणे येथे आयोजित भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मेळाव्यात ते बोलत होते,नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत 2014 ते 2024 मध्ये 10 लाख 5 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत. शरद पवार यांना यावर भरवसा नसेल तर पुण्यातील कुठल्या चौक निवडा. आमचा मुरलीधर मोहोळ हे तुम्हाला हिशोब घेऊन उभा राहिल. ते एक-एक रुपयांचा हिशोब देईल. मी दहा लाख कोटी रुपयांचा हिशोब घेऊन आलोय. त्याला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तसाच जोरदार प्रतिसाद दिला आहे. मोहोळ यांनी हात उंचावून अंगठ्याने ‘नक्कीच’ असा संदेश देत शहांच्या आव्हानाला दाद दिली आहे.

निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारांनी अनेक खोटे दावे केले. तसेच ते भ्रष्टाचारावर देखील ते बोलतात मात्र भारताच्या राजकारणातील सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा सरदार हे शरद पवार आहेत. असा जोरदार हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलाय.अमित शाह, महाराष्ट्रातील राजकारण निवडणुकांना मी तिसऱ्या व्यक्ती म्हणून पहात असताना मी निरीक्षण नोंदवला आहे. की, जेव्हा जेव्हा राज्यात भाजपच सरकार आला आहे तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळाला आहे. तर जेव्हा जेव्हा शरद पवारांचे सरकार येतं तेव्हा आरक्षण गायब होतं. कारण 2014 ला भाजपचा सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत टिकणार आरक्षण मराठा समाजाला दिले गेले. मात्र ते पुन्हा गायब झालं त्यानंतर आता पुन्हा शरद पवारांचे सरकार आलं तर मराठा आरक्षण गायब होईल. त्याचबरोबर पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, तसेच दूध पावडर आयात केल्याचा खोटा दावा निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारांनी केला भ्रष्टाचारावर देखील ते बोलतात मात्र भारताच्या राजकारणातील सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा सरदार हे शरद पवार आहेत.

No comments:

Post a Comment