पुणे (प्रतिनिधी) पुणे - सोलापूर महामार्गावरील मळद गावच्या हद्दीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. लक्झरी बसनं एका दुचाकीला उडवलं असून या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. पाठीमागून येणाऱ्या भरधाव बसनं दुचाकीला धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना घागरे वस्ती जवळील दुभाजकाच्या ठिकाणी रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला आहे. पाठिमागून येणाऱ्या भरधाव बसनं दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. दत्तात्रेय गंगाधर यादव व त्यांच्या पत्नी सुमन यादव असं मृत व्यक्तींची नावं आहेत.
दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीचा देखील चुराडा झाला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment