Tuesday, July 16, 2024

जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.पद्मश्री तात्याराव लहाने यांना मातृशोक माकेगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार .

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  जगप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मातोश्री अंजनाबाई पुंडलिकराव लहाने यांचे नुकतेच वृध्पकाळाने  लातूर येथे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वा.माकेगाव ,तालुका रेनापुर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. विठ्ठल लहाने लातूर यांच्या त्या मातोश्री होत्या. मातोश्री  अंजनामांई पुंडलिकराव लहाने यांचे आज दिनांक 16 रोजी दीर्घ आजाराने लातुर येथेच उपचार दरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वा. मूळ गावी माकेगाव , ता. रेणापूर. जिल्हा लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात 2 मुले, 4  मुली ,सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. जगप्रसिद्ध नेत्र तज्ञ तसेस नेत्र शस्त्रक्रिया करण्यात जागतिक विक्रम करणारे डॉ. तात्याराव लहाने यांच्या त्या मातोश्री आहेत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळद व्यक्त करण्यात येत आहे. लहाने यांच्या दुखात दैनिक कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे.

No comments:

Post a Comment