परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शेगाव (जि. बुलडाणा) येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी रविवारी दिनांक 30 जून रोजी सायंकाळी तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथे आगमन झाले असता अ.भा. वारकरी भजनी मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ह भ प श्री रामेश्वर महाराज कोकाटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने श्रींचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व पुष्पहार अर्पण करून जोरदार स्वागत करण्यात आले.
अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह भ प श्री रामेश्वर महाराज कोकाटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आज रविवारी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे वैजनाथ नगरीच्या सिमेवर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या सर्व महिला सदस्या तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारी या पालखीचा मुक्काम औष्णिक विद्युत केंद्र येथील श्री राम मंदिर येथे असून सोमवारी पहाटे श्रींची पालखी मोंढा मार्केट येथील श्री संकट मोचन हनुमान मंदिर येथे विसावा घेऊन संत जगमित्र नागा मंदिरात मुक्कामी राहणार आहे.गणगण गणात बोते ज्ञानोबा तुकाराम अभंग म्हणत म्हणत श्रीची पालखी परळीकडे येत होती परळीच्या जवळ येताच वरूनराज्याने देखील आगमन केले अतिशय आनंदाच्या वातावरानात श्रीचीपालखी परळीकडे आगमन झाले विणेकरी पताके टाळकरी गायक वादक टाळ मृदंगाच्या आवाजाने मन प्रसन्न झाले वारकरी मंडळाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले श्रीनाथ सेवाभावी संस्थेचेअध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांच्यासह भजनी मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीचा स्वागत करण्यात आले
No comments:
Post a Comment