Wednesday, June 19, 2024

राज्यातील मृत दिव्यांग्याचे संपूर्ण कर्ज माफीची डॉ.संतोष मुंडेची मागणी.

मुंबई : (प्रतिनिधी) राज्यातील मृत दिव्यांग्याचे संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे प्रधान सचिव सुमंतजी भांगे यांच्याकडे 
महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी केली आहे . यावेळी विधानसभेचे उपसभापती आ.नरहरी झिरवाळ उपस्थित होते, डॉक्टर संतोष मुंडे यांच्या मागणीचा प्रस्ताव हा तात्काळ मुख्यमंत्र्याकडे सादर करणार असल्याचे प्रधान सचिव सुमंतजी भांगे यांनी सांगितले.

दिव्यांगांच्या संपूर्ण कर्जमाफी मुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक दिव्यांगांच्या कुटुंबांना मदत होणार असून त्यांच्या सातबारावरती असणारा बोजा संपून त्यांना नवीन योजनांचा लाभ मिळू शकतो.
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संतोष मुंडे हे नेहमीच दिव्यांगांची सेवा करत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे
         महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक दिव्यांग हे वेगवेगळ्या ठिकाणी मरण पावले आहेत, दिव्यांगांच्या नंतर त्यांच्या कुटुंबावर ती उपासमारीची वेळ निर्माण होते घरची परिस्थिती हलाखीची निर्माण होते, त्यांचा उदरनिर्वाह चालू शकत नाही दिव्यांगांच्या कुटुंबाला दिव्यांकांच्या शेतीवर असणाऱ्या कर्जामुळे त्यांच्या शेतीवरची कर्ज बोजा आहे, आणि यामुळे अनेक योजना पासून दिव्यांगांच्या कुटुंबांना दूर रहावे लागते. 

या सर्व बाबींचा विचार करून, राज्यातील मृत दिव्यांग्याचे संपूर्ण कर्जमाफी केली तर, त्यांच्या कुटुंबास सहाय्य मिळेल त्यांच्या शेतीवर असणारा  बोजा रद्द होऊन त्यांच्या कुटुंबांना शासनामार्फत मदत मिळून त्या सातबाराचा उपयोग इतर शासकीय योजनांसाठी त्यांचे कुटुंबीय करू शकतात, या मागणीसाठी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी या विषयीची मागणी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे प्रधान सचिव सुमंतजी भांगे, यांच्याकडे केली आहे.

_______


चौकट :

राज्यातील मृत दिव्यांग्याचे संपूर्ण कर्जमाफी करण्याचा डॉ संतोष मुंडे यांचा प्रस्ताव हा तात्काळ मुख्यमंत्र्याकडे सादर केला जाणार असल्याचे
दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे प्रधान सचिव सुमंतजी भांगे यांनी सांगतले

No comments:

Post a Comment