गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील मोजे गडी येथील श्री सखाराम पोहिकर यांना सरपंच सेवा संघाच्यावतीने राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2024 आयोजित मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा . 'राज्यस्तरीय समान भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांच्या कार्याची दखल सरपंच सेवा संघाने घेतली असून त्यांनी केलेले कार्य असे आहे की श्री सखाराम पोहेकर हे एका गरीब कुटुंबातील असून त्यांना समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी समाजाला आपलं काहीतरी देणे लागत म्हणून त्यांनी समाजकार्य करण्यासाठी पत्रकारिता हे क्षेत्र निवडले व पत्रकारितेतून ते गोरगरीब जनतेसाठी व पीडित अनाथ वृद्ध अशा विविध समाजातील लोकांना त्यांनी त्यांच्या लेखणीतून न्याय देण्याचे काम शतक करताना दिसत आहेत त्यांनी आतापर्यंत विविध दैनिकात काम केले असून त्यांच्या कामाची पद्धत वेगळी असून त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र पत्रकार संघाचे गेवराई तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन वर्षे गेवराई तालुका अध्यक्ष पद स्वीकारून पत्रकारांना योग्य न्याय देण्याचे काम त्यांनी त्यांच्या पत्रकार संघाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केलं ते गढी ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी म्हणून काम करत आहेत कर्मचाऱ्यांना योग्य तो मार्ग दाखवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात सतत ते पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये जाऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करताना दिसत आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेव (दादा ) चव्हाण यांनी तातडीने गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांची बैठक गेवराई येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये घेऊन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या गेवराई तालुका अध्यक्षपदी त्यांची एक वर्षांपूर्वी निवड करून त्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली असून आत्तापर्यंत त्यांनी गेवराई पंचायत समितीमध्ये एक वर्षाच्या काळामध्ये तीन वेळेस आमरण उपोषण केले असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बरेचसे प्रश्न मार्गी लावले आहेत विशेषतः लोकशाही पत्रकार संघ प्रणित सरपंच ग्रामपंचायत विकास समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची गेल्या चार महिन्यापूर्वी निवड झाली असून अशा विविध माध्यमातून ते समाजाला न्याय देण्याचे काम करत आहेत सध्या ते दैनिक विदर्भ सत्यजित व साय दैनिक साई संध्या चे बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत व अशा विविध दैनिकात त्यांनी काम केले आहे विशेषतः युट्युब चैनल चे सुद्धा ते जिल्हा प्रतिनिधी आहेत म्हणून त्यांच्या कामाची दखल घेऊन सरपंच सेवा संघाच्या वतीने मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2024 यामध्ये त्यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला असून या सरपंच सेवा संघाने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करतात आपण आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत आहात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून समाजाचे कल्याण करण्यासाठी आपण सतत धडपडत धडपड करत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे संघर्षातून मिळणारे यश मोठे आहे यामुळे श्री सखाराम पोहिकर यांची आम्ही राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे तेव्हा हा पुरस्कार त्यांना एक जुलै 2024 रोजी सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच हवामान तज्ञ पंजाबराव यांच्यासह दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते व यादवराव पावशे पाटील रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा सोमवार दिनांक एक जुलै 2024 रोजी सकाळी अकरा वाजता माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहमदनगर येथे संपन्न होणार आहे तरी आपण आपल्या परिवारासह मित्र मंडळ युवा शुभचिंतक यांच्यासह उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे प्रेरणा आणि प्रस्थान मानवी जीवनासाठी शक्तीवर्धकाचे कार्य करत असते म्हणून सरपंच सेवा संघाच्या वतीने श्री सखाराम पोहिकर यांना आम्ही हा पुरस्कार देत आहोत व त्यांच्या पुढील कार्यास आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment