Tuesday, June 18, 2024

धक्कादायक : भामचंद्र डोंगरावर अश्लील चाळे करण्यापासून रोखले म्हणून साधक विद्यार्थ्यांना जबरी मारहाण!


चाकण (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे पाईक श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगरावर (ता. खेड) मुलीसोबत येऊन अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला आध्यत्मिक अभ्यास करणाऱ्या वारकरी साधकाने हटकल्याने संबंधित तरुणांने टोळक्याला बोलावून साधकास गंभीर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने भामचंद्र डोंगर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

चाकण औद्योगिक क्षेत्रा वासुली (ता.खेड) गावात असणाऱ्या भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य साधक या ठिकाणी वर्षानुवर्षे राहून संत तुकाराम महाराज यांच्यावर अभ्यास करतात. आजही या ठिकाणी जवळपास ३० ते ४० विद्यार्थी अभ्यास करतात. परंतु, रविवारी(दि. १६) एक तरुण मुलगा आणि एक मुलगी डोंगरावर आल्यानंतर त्यांचे अश्लील चाळे सुरू होते. यावरून तेथील एक साधक कुलदीप शिवगोंडा खोत या अभ्यास करणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांने त्यांच्या चुकीच्या कृत्यावर हटकले असतात्या तरुणाने अभ्यास करणाऱ्या साधकाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि संध्याकाळी पुन्हा मित्रांना बोलावून गंभीर मारहाण केली. यामध्ये साधक विद्यार्थ्याचा पाय मोडला असून त्याच्या सोबतच्या एका विद्यार्थ्याला देखील गंभीर जखमी केले आहे. या साधकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचा भामचंद्र डोंगर सप्ताह समितीने निषेध केला असून असे कृत्य करणार्‍या तरुणांच्या टोळक्यावर कडक कारवाई करावीअशी मागणी केली आहे. भामचंद्र डोंगर येथे नेहमी वायफड तळीराम आणि प्रेमी युगुल वावरत असतात. त्यांच्याकडून यापूर्वी देखील अनेक साधकांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. धार्मिक भूमीवर असे गैर आणि अश्लील कृत्य घडत असेल तर यावर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करायला हवी अशीही मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment