Monday, June 24, 2024

परळी शहरात सर्रासपणे सुरु असलेल्या बिंगो मटका बंद करा. नागरिक आक्रमक शहर संभाजी नगर पोलीसांना दिले निवेदन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  परळी शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अवैद्य धंदे यांनी जोर धरला असून शहरात विविध भागात ऑनलाइन मटका सुरू आहे. आज शहरातील समस्त मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी परळी शहर आणि संभाजी नगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे की शहरात जे बिंगो मटका जुगार बिनधास्तपणे सुरू आहे याच्यावर कारवाई करावी.
सविस्तर माहिती अशी आहे की गेल्या अनेक दिवसांपासून परळी शहरात विविध ठिकाणी ऑनलाइन बिंगो मटका जोरात सुरू आहे. या ऑनलाईन बिंगो मटका मुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त होत आहेत. या ऑनलाईन बिंगो च्या नादी लागुन अनेक लोक आर्तर्कदृष्ट्या  कंगाल झाले असुन नैराश्य पाई लोक व्यसनाधीनही झाले आहे यामुळे घराघरात पती-पत्नीमध्ये दररोज भांडणे होत आहेत. पोलिसांनी ऑनलाईन बिंगो मटका चालकावर कारवाई केली होती. मात्र ही कारवाई सर्व बिंगो मटका चालकावर झाली पाहिजे ज्यामुळे लोकांचे घर उध्वस्त होणार नाही.
बिंगो मटका हे मोबाईल मध्ये असल्यामुळे शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीही खेळत असल्याचे सांगितले जात आहे.या कडे पोलिसांनी गंभीर्याने लक्ष देऊन सर्व बिंगो मटका चालकावर कारवाई करण्यात यावी अन्यथा नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने परळी पोलीस स्टेशन समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे‌.
यावेळी मुफ्ती अश्फाक साहेब, नगरसेवक शरीफ भाई, गफ्फार बागवान,शहेरयार सय्यद,साजेद भाई,बद्दर भाई,अलीम भाई,अनवर शेख,एजाज शेख,अशफाक शेख,अझगर सय्यद,राजा खान,फेरोज जनाब,एजाज खान,जुबेर शेख व इतर नागरिक उपस्थित होते

No comments:

Post a Comment