*ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ‘ज्ञानोबा तुकाराम’चा अखंड जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर, मंदिरातील विविध रंगी फुलांच्या माळांची सजावट, रस्त्यावर काढलेल्या रांगोळीच्या पायघड्यांवरून हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये गावातून संत ज्ञानेश्वर महाराज चाकरडीकर जयघोष आज करण्यात आला. कीर्तनकारांच्या प्रबोधनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर सात दिवसांच्या अखंड हरीनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.
परळी वैजनाथ येथील मोंढा मार्केट भागातील श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथे 15 जुन पासून सुरू असलेल्या आडत व खरेदीदार व्यापारी महासंघ व अ.भा.वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 व्या शतकातील महान संत श्री ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरीनाम साप्ताह, श्रीमद् भागवत कथा व भव्य कीर्तन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.
आडत व्यापारी व खरेदीदार व्यापारी यांच्या हस्ते कलश आणि वीणा पूजन करून सप्ताहास सुरुवात करण्याताली. पहाटे संकटमोचन हनुमान मूर्तींची महापूजा करून , काकडा आरती, सकाळी शाम मंञी व सहकारी यांच्या उपस्थितीत सुंदरकांड वाचन, नंतर हरिपाठ व महिलांचे सामुक विविध महिला भजनी मंडळाचे भजने भागवताचार्य गोविंद महाराज नंदनजकर यांच्या अमृतमैयवाणीतुन कथा संपन्न झाली राञी 7ते9 या वेळेत कीर्तन विविध महाराज मंडळीचे किर्तन संपन्न झाले. पहिल्या दिवसापासून विनोदाचार्य ह.भ.प.माणिक महाराज रेंगे, विनोद सम्राट ह.भ.प.प्रकाश महाराज साठे, भागवताचार्य ह.भ.प.नामदेव महाराज फपाळ, बालकीर्तनकार ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे संगमकर, ह.भ.प.गणेशानंदजी महाराज शास्त्री भगवतीकर, विनोदाचार्य ह.भ.प.भरत महाराज जोगी यांनी कीर्तन वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष ह.भ.प.केशव महाराज उखळीकर यांनी काल्याचे किर्तन सेवा केली. कन्हैय्या अध्यात्मिक वारकरी वारकरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष भागवताचार्य ह.भ.प.गोविंद महाराज मुंडे यांनी आपल्या रसाळ व ओजस्वी वाणीतून कथा सांगितली आहे.
*दहीहंडी फोडून भाविकांना महाप्रसाद वाटप*
शुक्रवारी दुपारी फुलांनी सजविलेल्या पालखीतून संत माऊली महाराज यांच्या प्रतिमेची टाळ मृदुंगाच्या गजरात मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी महिलांनी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
तसेच दहीहंडी फोडून उपस्थित भाविकांना महाप्रसाद देवून सांगता करण्यात आली. सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन सोहळ्यास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती. महिलांनी सादर केलेल्या भजनाने भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले होते.
*कृ.उ.बा.समितीचेसभापती सूर्यभान नाना मुंडे यांच्या वतीने काल्याचा महाप्रसाद करण्यात आला*
श्री संकटमोचन हनुमान मंदिर मोंढा मार्केट येथे गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या विसाव्या शतकातील महान संत ह भ प श्री ज्ञानोबा माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् भागवत कथा व कीर्तन सोहळ्यातील महिला भजनी मंडळ अ.भा. वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प. श्री रामेश्वर महाराज कोकाटे व परळी विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
*सप्ताहास विविध महाराज मंडळीची व मान्यवरांची उपस्थिती* सर्व आडत व्यापरी व खरेदीदार व्यापा-यांचे व संकटमोचन हनुमान मंदीर कमिटीचे आभार रामेश्वर महाराज कोकाटे यांनी मानले
No comments:
Post a Comment