Tuesday, December 6, 2022

शेती पालनाचे अमिष दाखवून परळीत महिलेची लाखो रुपयांची फसवणूक.

परळी वैजनाथ - शेतीपालनाचे अमिष दाखवून परळीतील महिला व तिच्या साथीदारास लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली असून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी शहरातील रत्नप्रभा प्रमोद परळीकर या गृहिणी व त्यांच्या साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून अजीतकुमार हिरवे (रा.कोडोली परिसर सातारा), भागवत भगवान तांदळे ( रा.मुं.पो.चोरपांगरा, ता. लोणार जि. बुलढाणा),सुधाकर रत्नाकर मुंडे, (रा. गंगाखेड) बापुराव साहेबराव मुळे (रा. महातपुरी ता. गंगाखेड जि. परभणी), सुर्यकांत इंद्रजित गुट्टे (रा. गंगाखेड जि. परभणी) यांनी फिर्यादी महिला व त्यांच्या साथीदार यांच्याकडून प्रत्येकी 2 लाख 50 हजार असे  एकून १२,५०,०००/- रू घेवुन शेळीपालन व्यवसाय संबंधी १०० शेळीचे पिल्ले एका पत्राच्या शेंड,आडीच एकर जमीन,चार-दोन कामगार व रोख रूपये २५,००० /- महीना देतो असा करारनामा करून फसवनुक केली आहे. 

या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात रत्नप्रभा परळीकर यांच्या फिर्यादीवरून गुरन २६६ / २०२२ कलम ४२०, ३४ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाण्याचे सपोनि गोसावी हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment