Wednesday, December 7, 2022

फुलचंद कराड यांच्या नेतृत्वाखाली लिंबुटा ग्रामपंचायत बिनविरोध भगवान सेनेच्या ताब्यात.


*नवनिर्वाचित सरपंच व सदस्यासह काढण्यात आली भव्य मिरवणुक. 

परळी वैजनाथ ( प्रतिनिधी):- ग्रामपंचायत निवडणुकीत आज दि.7 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी लिंबुटा ग्रामपंचायत साठी दाखल झालेले इतर अर्ज परत घेताच लिंबुटा ग्रामपंचायत बिनविरोध निवडली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांच्या नेतृत्वाखाली सरपंच पदासह सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. मी सातत्याने गावात विकास कामे करीत आलो असून गावचा माझ्यावरचा विश्वास मी नेहमीच कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचीच पावती ग्रामस्थांनी एकत्र येत लिंबुटा ग्रामपंचायत बिनविरोध माझ्या नेतृत्वाखाली निवडली असल्याचे फुलचंद कराड यांनी सांगत गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

परळी तालुक्यातील लिंबोटा बिनविरोध निवडली गेली आहे. भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत आत्तापर्यंत पाच वेळा बिनविरोध निवडली गेली असून त्यांच्यावरील विश्वास ग्रामस्थांनी पुन्हा कायम ठेवत पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिली आहे. या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार दैवशाला सुधाकर बनसोडे यांच्यासह रवी गंगाधर कराड, सुरेखा सिद्धार्थ बनसोडे, अरुण वैजनाथराव मुंडे, छबीता जयराम मुंडे, स्वाती ऋषिकेश मुंडे, प्रकाश किसन राठोड व संगीता रमेश चव्हाण हे सर्व सात सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत.

तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया चालू असताना लिंबोटा येथील इतर सर्व अर्ज परत घेतले गेले आणि ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडली गेली आहे. फुलचंद कराड यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत पाच वेळा ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडली गेली आहे. याबाबत बोलताना फुलचंद कराड म्हणाले की मी केलेल्या व करीत असलेल्या गावातील विकास कामावर गावकऱ्यांचा विश्वास आहे. मी सगळ्यांना समान न्याय देतो. पक्षपातीपणा करीत नाही तसेच गावच्या पुनर्वसनापासून गावाच्या विकासाबाबत मी खूप कामे केली आहेत. राजकारणात मी शब्द पाळतो शब्द फिरवत नाही. यावर सर्वांचा विश्वास असून त्याचीच ही पावती गावकऱ्यांनी ग्रामपंचायत बिनविरोध काढत दिली आहे. सरपंच पदासाठी दोन अर्ज होते ते दोन्ही उमेदवार माझेच होते. परंतु मी ज्यांना शब्द दिला त्यांच्यासाठी इतर उमेदवाराला अर्ज काढण्याचा सल्ला दिला त्यांनीही मोठ्या विश्वासाने अर्ज मागे घेत माझ्यावरील विश्वास कायम ठेवला असल्याचे फुलचंद कराड म्हणाले.

दरम्यान लिंबुटा ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याचे समजताच सर्व विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक यांनी तहसील परिसरात फटाके वाजवत व गुलाल उधळत आपला आनंद व्यक्त केला तहसीलमधून सर्व विजयी उमेदवार


शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून तसेच फुलचंद कराड यांच्या निवासस्थानी सत्कार घेऊन निंबोटा म्हणजेच गोपीनाथ गडावर गेले येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीला अभिवादन करून कारखाना चौकात पुन्हा एकदाफटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावात झालेल्या कार्यक्रमात बोलताना फुलचंद कराड यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. मी माझ्या कातड्याचे जोडे करून तुम्हाला दिले तरी ही हे उपकार फिटू शकणार नाहीत. असेही फुलचंद कराड म्हणाले. आपल्या गावाचा विकास करण्याचा मी शब्द देत असून सरकारकडून मोठा निधी गावासाठी आणला जाईल. मूलभूत नागरि सुविधांसह आवश्यक असलेल्या विकास योजना ही अनुत असा शब्द फुलचंद कराड यांनी दिला.

No comments:

Post a Comment