Friday, December 9, 2022

अ.भा.मराठी पत्रकार परिषद व उपजिल्हा रुग्णालय परळी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-  मराठी पत्रकार परिषदेचा 83 वा वर्धापन दिन 3 डिसेंबर रोजी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा आला. परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. श्री एस.एम. देशमुख यांच्या संकल्पने नुसार हा वर्धापन दिन गेल्या दहा वर्षा पासून पत्रकारांची आरोग्य तपासणी करून साजरा केला जातो. याही वर्षी सर्व जिल्हा व तालुका संघांनी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करून पत्रकारांची आरोग्य तपासणी करून हा वर्धापन दिन साजरा करावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले होते. याच अनुशंगाने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा परळी व उपजिल्हा रुग्णालय परळीच्या संयुक्त विद्यमाने परळीतील पत्रकारांचे आरोग्य तपासणी शबिर दि.12 व 13 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ सर्व पत्रकार बांधवांनी घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय आरबुने, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय ढवळे यांनी केले आहे.


 3 डिसेंबर रोजी परिषद ८४ व्या वर्षात पदार्पण  झाले. मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन दरवर्षी राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख यांचे संकल्पनेतून  साजरा केला जातो. या दिवशी राज्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते. असा उपक्रम राबविणारी मराठी पत्रकार परिषद ही देशातील पहिली आणि एकमेव पत्रकार संघटना आहे. पत्रकारांचे आपल्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. वेळीच काळजी न घेतल्यानं आणि  दुर्लक्ष केल्याने छोटे आजार नंतर बळावत जातात आणि मग हाताबाहेर जातात हे टाळण्यासाठी परिषद आरोग्य तपासणी शिबिरं घेते. या तपासणीतून कोणी गंभीर आजारी असल्याचे स्पष्ट झाल्यास मुख्यमंञी वैद्यकीय कक्षाचे प्रमूख मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखालील सरकारी आरोग्य कक्ष तसेच परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख दीपक कैतके यांच्या माध्यमातून पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरी दिनांक 12 व 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरात परळीतील जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी सहभाग नोंदवावा व आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय आरबुने, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय ढवळे यांनी केले आहे.

*नाव नोंदणीसाठी संपर्क*
पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरात 
दि.12 डिसेंबर 2022 रोजी 50 तर 13 रोजी 50 पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. हे शिबिर सकाळी 9 ते दुपारी 12.30 वा. या वेळेत होणार आहे. नाव नोंदणीसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा परळी चे तालुकाध्यक्ष बालकिशन सोनी मो.नं.(94231 68902), शहराध्यक्ष जगदीश शिंदे (मो.नं.8329322522),  डिजिटल मीडिया परिषदेचे सदस्य अभिमन्यू फड मो. न.(99708 20707), धीरज जंगले मो. नं.(7020832500) यांच्याशी संपर्क करावा.

No comments:

Post a Comment