Friday, December 2, 2022

जमीन घोटाळ्याशी संबंध नाही, हे विरोधकांचे षडयंत्र. चौकशीत यंत्रणेला सहकार्य करणार.


आष्टी/कडा (प्रतिनिधी) : देवस्थान जमीन घोटाळ्याशी आपला कुठलाही  संबंध नाही, हे विरोधकांचे षड्यंत्र असल्याचा आरोप आ. सुरेश धस यांनी  गुरुवारी केला. 

तालुक्यातील देवस्थान  जमिनीच्या बेकायदा हस्तांतरणप्रकरणी २९ नोव्हेंबरला आ. धस, पत्नी प्राजक्ता व बंधू देवीदास यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली होती. यावर आष्टी येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी खुलासा केला. ते म्हणाले, देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणातील जमिनी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर नाहीत, निराधार तक्रारातील वाक्यरचनेमुळे गुन्हे दाखल झाले आहेत. मी जुन्या पक्षात काम करत असताना राज्य व जिल्हास्तरावरील नेते दुखावले गेले असू शकतात, त्यामुळे त्यांनी हे खोटेनाटे आरोप करून यात गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.  बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे सांगून आ. धस यांनी चौकशीत यंत्रणेला सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.

No comments:

Post a Comment