Monday, December 5, 2022

धक्कादायक : शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना.शिक्षकाकडून १४ वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण..?


खेड (प्रतिनिधी): चाकण परिसरातील एका नामांकित बोगस संस्थेच्या शाळेच्या वयाची ४० ओलांडलेल्या शिक्षकांने शाळेतीलच एका १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे.

ज्या शाळेत ही घटना घडली ही शाळा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे या अगोदरही चर्चेचा विषय बनली होती. त्यातच एका शिक्षकाकडून असे शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य घडत असेल तर ही खेड तालुक्यासाठी अपनामानाची बाब म्हणावी लागेल.

 अत्याचारी शिक्षकाचे आणि पीडित मुलीचे समाज माध्यमात फोन वरील झालेले संभाषण व्हायरल होत आहे. यातुन तो शिक्षण गयावया करून मुलीची माफी मागत असल्याचे ऐकायला मिळत आहे. असे क्रूर शिक्षक जर समाजात असतील तर, द्वितीय पालक म्हणून ज्या शिक्षकांच्याकडे आपण बघतो ते एवढे निर्दयी वागू शकतात हे कल्पनेच्या पलीकडे आहे. पीडित मुलगी बाहेरील गावची असल्याने स्थानिक संस्था चालक व काही पांढरे पोष पुढारी हे प्रकरण मिटविण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

या संस्थेत या अगोदरही असे प्रकरण घडले असल्याची चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे. यावर आम्ही संस्था अध्यक्ष यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी खरच असे प्रकरण घडले आहे का? मला तर कल्पना नाही. येवढं गंभीर घडू शकते का? असा उपरोक्त सवाल अध्यक्ष यांनी केला म्हणजे ज्या मुलीवर असा प्रसंग ओढवला असेल तिच्या मनावर त्याचा काय परिणाम झाला असेल याचे त्या मुजोर अध्यक्षला गांभीर्य नसल्याचे स्पष्ट जाणवत आहे. पण तीच मुलगी अध्यक्षाच्या स्वतःच्या घरातील किंवा नात्यातील असती तर असा तो अध्यक्ष गप्प राहिला असता का? हाही अनाकलनीय प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आता या मुजोर शिक्षकांवर हा मुजोर अध्यक्ष व पुणे माध्यमिक शिक्षण विभाग ठोस कारवाई करणार का? कि फक्त इतर संस्थांनच्या चौकशी सारखे कागदी घोडे नाचवणार हेच पहावे लागेल

No comments:

Post a Comment