परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील श्री बजरंगबली वेताळ मंदिरात बुधवार दि.7 डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रम होणार असल्याची माहिती प.पू.विलासानंदजी महाराज यांनी दिली.
मित्ती मार्गशीर्ष शु.14 शके 1944 म्हणजेच बुधवार दि.7 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती असून यानिमित्त श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता महाआरती व 1 वाजता महाप्रसाद होणार आहे. या सर्व कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प.पू.विलासानंदजी महाराज व समस्त भक्तगणांनी केले आहे.
No comments:
Post a Comment