Saturday, March 28, 2020

गर्दी टाळण्यासाठी नगर परिषदे कडुन काटेकोर नियम .

*शहरात मार्किंग;सोशल डिस्टंट पाळा ;-मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे

परळी वै..[प्रतिनिधी].
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी किराणा, मेडिकल, फ्लावर मिल, भाजी विक्रीच्या ठिकाणी नगर पालिका व पोलिसांकडुन मार्किंग करुन देण्यात येत आहे.
परळी नगर पालिका मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडेसह कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,श्रावण घाटे,शंकर साळवे अदि न.पची टिम रस्त्यावर उतरले आणी त्यांनी बाजार पेठेतील भाजी विक्रेत्याना अंतर ठेऊन मार्किंग करुन दिली.तसेच ग्राहक व विक्रेते यांच्यातील अंतर असावे अशी माहिती दिली.दरम्यान कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदी लागु करण्यात आली आहे.यामुळे जिवानावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.हि अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तसेच परळी नगर पालिकेने यावर उपाययोजना करत मार्किंग करण्यात आली.दरम्यान कोरोना आजार हा महाभयंकर आहे आणी तो संसर्ग आहे.सोशल डिस्टंट हा फार महत्त्वाचा आहे म्हणुन जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या सुचनांचे पालन प्रत्यक्षात आणण्यासाठी शहरातील चार भाग करुन भाजी विक्रेता फळ विक्रेत्यांना आखणी करुन देण्यात आली असुन किराणा व मेडिकल स्टोअर्स बाजारात ही किराणा पाच पाच फुटाच्या अंतराने आखणी करण्यात आली आहे तेव्हा ग्राहकांनी सोशल डिस्टंट ठेऊन खरेदी करणे अपेक्षित आहे.अत्यावश्यक खरेदीसाठी कुटुंबातील एकाच सदस्यांनी बाहेर पडावे आणी खरेदी झाली कि परत घरी जावे आणी स्वताची काळजी घ्यावी अस आवाहन परळी नगर परिषद करत आहे.

No comments:

Post a Comment