Friday, March 6, 2020

धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पुर्वतपासणी शिबिराचा लाभ घ्यावा-बीडनेता पत्रकार बालाजी ढगे .

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातुन 25 हजार रुपये किंमतीच्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पुर्वतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिर संपर्क राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  6 व 7 मार्च रोजी होणाऱ्या पुर्वतपासणी शिबिराचे 2 व 6 मार्च पर्यंत नाव नोंदणी करावी व कमी ऐकू येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व कर्नबधिर नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन बीड नेताचे पत्रकार बालाजी ढगे यांनी केले आहे. 
डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल, बस स्टँड- गार्डन रोड, परळी येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जिल्हा आरोग्य विभाग, बीड, नाथ प्रतिष्ठान, परळी वैजनाथ, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्टारकी फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून प्रत्येक व्यक्तीसाठी अंदाजे 25 हजार रूपये किंमतीच्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कनाची मशीन) वाटपासाठी पुर्वितपासणी शिबीराचे आयोजन दि.06 व 07 मार्च रोजी होणाऱ्या पुर्वितपासणीची नाव नोंदणी 2 व 6 मार्च पर्यंत सकाळी 9 ते 2.वाजे पर्यंत करण्यात यावेत. या शिबिरात अमेरिकेतील तज्ञ डॉक्टर यांच्या हस्ते तपासणी होणार आहे.  या शिबीरात तपासणी झालेल्या व्यक्तींनाच मशीन मिळणार आहेत. या तपासणी झाल्यानंतर लवकरात लवकर ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहेत. तरी या शिबीरात सोबत येतांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सोबत आणावे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे (9822280568) शिबीर संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन असलेल्या व कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पूर्व तपासणी शिबिराचा मोठ्या संख्येने नाव नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन बीड नेताचे पत्रकार बालाजी ढगे  यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment