Wednesday, June 29, 2022

शिरूर तालुक्यातील ३१ लाख रूपये शौचालय गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ विभागीय आयुक्तांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे

__________
बीड (प्रतिनीधी) बीड जिल्ह्य़ातील शिरूर तालुक्यातील ३१ लाख  रूपये शौचालय गैरव्यवहार प्रकरणात अपहार सिद्ध होऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन सुद्धा गुन्हे दाखल न करता फेरचौकशीच्या नावाखाली भ्रष्टाचाराची पाठराखण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार व उपमुख्य कार्यकारी आधिकारी (पा.व स्व.) जिल्हापरिषद बीड प्रदीप काकडे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी प्रधान सचिव स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्रालय तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे. 
 
सविस्तर माहीतीस्तव:-
___
बीड जिल्ह्य़ातील शिरूर तालुक्यातील ३१ लाख रूपये शौचालय गैरव्यवहार प्रकरणात अपहार सिद्ध होऊन दिड वर्ष होऊन सुद्धा जिल्हाप्रशासन जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई करत असून भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण करत असून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन सुद्धा जाणीवपूर्वक गुन्हे दाखल न करणे व फेरचौकशीसाठी 
त्रिसदस्यीय समिती स्थापन करणे म्हणजेच भ्रष्टाचार दडपण्याचा प्रकार असुन संबधित प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार आणि उपमुख्य कार्यकारी आधिकारी (पा. व.स्व. )जिल्हापरिषद बीड प्रदीप काकडे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. 
मागण्या :-
१) अपहार झाल्याचे दीड वर्षभरापुर्वीच सिद्ध होऊन सुद्धा गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल तत्कालिन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित कुंभार,  विद्यमान मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार तसेच उपमुख्य कार्यकारी आधिकारी (स्व. व.पा. )जिल्हापरिषद बीड प्रदीप काकडे, व तत्कालीन गटविकास आधिकारी पंचायत समिती शिरूर यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल व गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. 
२)दि.७ सप्टेंबर २०२१ रोजी शिरूर पंचायत समिती विस्तार आधिकारी एस. यु. शिंदे यांना तक्रार देण्यासाठी प्राधिकृत केले असतानाही अडीच महिना होऊन सुद्धा गुन्हे दाखल न केल्याबद्दल जाणीवपुर्वक भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण करत दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल तसेच वरीष्ठ आधिका-यांच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. 
३)   या गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन शिरूर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी राजेश बागडे, वरिष्ठ सहाय्यक लेखा विभाग आणि गौराई अर्बन बॅकेचे अध्यक्ष यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवल्याने त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित कुंभार यांनी दिले होते. त्यांच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल संबधित आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. 

जिल्हा परिषद शिक्षकांनो शिकवताना मोबाईल बंदच ठेवा.झेडपी सीईओंच्या सुचना.


सोलापूर (प्रतिनीधी)   शाळेत जर शिकविताना मोबाईलची गरज नसेल तर मोबाईल बंद ठेवा. विद्यार्थ्यांना मोबाईलची सवय लागल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात. याची जाणीव पालकांना करून द्यावी. मोबाईलचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर होणार नाहीत याची काळजी घेण्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उप शिक्षणाधिकारी संजय जावीर, डाएटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे, अधिव्याख्याता इमानदार प्रमुख उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ कामाचे नियोजन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. विद्यार्थ्यांना स्पर्धाक्षम बनविणे, आरोग्यवर्धक व संस्कारक्षम शिक्षण देण्याबाबत चर्चा करण्यात आली

कोरोनाचे काळात शिक्षकांनी घरी बसूनदेखील ऑनलाईन शिक्षण, पारावरची शाळा, स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रमासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. कोरोना काळात विद्यार्थी शिक्षकांपासून दूर गेले. त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. कोरोना काळात झालेली हानी आपणास भरून काढण्यासाठी दशसूत्री देण्यात आली.

शिक्षण विभागासाठी दशसूत्री

गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रदान करणे, स्पर्धाक्षम विद्यार्थी तयार करणे, आनंददायी व नावीन्यपूर्ण शिक्षण, आरोग्यवर्धक व संस्कारक्षम शिक्षण, तंत्रस्नेही/ आयटीक्षम शिक्षण, सुप्त गुण शोधून त्यास प्रोत्साहन, स्व अभिव्यक्ती प्रोत्साहन/ लेखक/ कवी निर्मिती, कौशल्य चिकित्सक विचार, सृजनशिलता सहयोग, ज्ञानातील आधुनिकता ग्रहण करण्यासाठी, शिक्षकांनी प्रयत्न करणे, स्वावलंबन प्रवृतीला चालना व देशभक्ती, मातृपितृ भक्ती वाढविणे, गुरुकुल पद्धतीला उजाळा देत शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती ही दशसूत्री देण्यात आली आहे.

राज्यातील 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. 4 ऑगस्टला मतदान 5 ऑगस्टला मतमोजणी.


मुंबई  (प्रतिनीधी)  शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे.आयोगानं याबाबतचं परिपत्रक जारी केले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3) मधील कलम 10 अ पोटकलम (4) मधील अधिकारांचा वापर करत राज्य निवडणूक आयोगानं 271 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. पाच जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. चार ऑगस्ट रोजी मतदान, तर पाच ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. यामुळे पुढील महिना या ग्रामपंचायत हद्दीत रणधुमाळी गाजणार आहे. राज्यात 28,813 ग्रामपंयायती आहेत

निवडणुका असलेल्या ग्रामपंयचायतीमध्ये, निवडणूक क्रायक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहिल, असे जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात यावी, असेही निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेय. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल.या निवडणुकीदरम्यान कोरोना नियमांचं पालन करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.

कसा आहे निवडणूक कार्यक्रम -

तहसिलदार यांनी विडणुकीचू नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक - 5 जुलै 2022 (मंगळवार ).

नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ - 12 जुलै 2022 ते 19 जुलै 2022 पर्यंत... वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.

नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक - 20 जुलै 2022.

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक - 22 जुलै 2022.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदरांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक - 22 जुलै 2022 (दुपारी तीन नंतर).

आवश्यक असल्यास मतदानाचा दिंनाक - 4 ऑगस्ट 2022.

मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक - 5 ऑगस्ट 2022.


कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायचीच्या निवडणूका -

नाशिक - 40

धुळे - 52

जळगाव - 24

अहमदनगर - 15

पुणे - 19

सोलापूर - 25

सातारा - 10

सांगली - 1

औरंगाबाद 16

जालना - 28

बीड - 13

लातूर -9

उस्मनाबाद - 11

परभणी - 3

बुलढाणा - 5

62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीमध्ये उडणार 'धुराळा'

उद्याच्या बहुमत चाचणीसाठी मनसेचा भारतीय जनता पार्टिला पाठिंबा !


मुंबई (प्रतिनीधी)  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राज्य सरकारची बहुमत चाचणी घेण्याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार आता विधानसभेचे अधिवेशन उद्या गुरुवारी बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये बहुमत चाचणीसाठी मनसेने आपला पाठिंबा भाजपला दिल्याची माहिती समोर येत आहे

अशातच मागील राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपलाच पाठींबा करणारे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत उद्या देखील भाजपला मिळणार आहे. कारण मनसेच्या पाठिंब्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला होता. तसेच, राज ठाकरे यांनी देखील आपण भाजपलाच पाठींबा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील भाजपच्या बाजूने असणार आहेत

दरम्यान, उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी सज्ज रहा अशी सूचना भाजपा कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. त्यामुळे उद्याची बहुमत चाचणी राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने निर्णायक अशी ठरणार आहे.

चौसाळा बसस्थानकावर अवैध धंदाचा सुळसुळाट. स्थानिक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.


चौसाळा  (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा येथील बसस्थानकाशेजारी अवैध धंदाचा सुळसुळाट सुरू असुन राजरोजपणे देशी दारूची विक्री होताना पाहायला मिळत आहे त्याच बरोबर हातभट्टी दारूची विक्री मोठया प्रमाणावर होत असुन या हातभट्टी दारूमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत 
बसस्थानका समोरच खुलेआमपणे हातभट्टी दारूची विक्री होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे 
दारूबंदी विभाग व स्थानिक पोलीस प्रशासन नेमके करतय काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारताना दिसत आहेत.
या हातभट्टी दारूमुळे अनेक लोकांना पोटाचे विकार झाले आहेत 
गोरगरीब लोकांच्या संसाराची राख रांगोळी होत असताना पोलीस प्रशासन फक्त बघायची भुमिका निभावत आहे 
जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणाकडे लक्ष घालणार का ? असा प्रश्न गोरगरीब जनता विचारत आहे.

बसवेश्वर काॅलनी,नवगण महाविद्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य. इमदादूल शाळेजवळील नालीचे पाणी बारा महिने रस्त्यावर.


परळी वैजनाथ ( प्रतिनिधी ) येथील इमदादूल शाळेजवळील ढाफा व्यवस्थित नसल्याने नालीचे पाणी बारा महिने रस्त्यावर वहात असते तर जवळच असलेल्या बसवेश्वर काॅलनी आणि नवगण महाविद्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 
 इमदादूल शाळेजवळील रसयावर मजबूत ढाफा नाही. येथून ग्रामीण पोलीस स्टेशन, सुभेदार रामजी आंबेडकर नगर, भक्त निवास, बसवेश्वर काॅलनी, नवगण महाविद्यालय, सरदार नगर, पाॅवर हाऊसच्या मागील वसाहतीत जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. या रस्त्यावर असलेल्या नालीचे घाण पाणी वर्षाच्या बारा महिने रस्त्यावर येत असते. ते पाणी लांबवर नवगण महाविद्यालयाची कमान, पोलीस अधिकारी क्वार्टर पर्यंत वहात जाते. त्यामुळे वाहनचालक तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. 
शेजारीच इमदादूल शाळा आहे. तसेच पाठीमागे नवगण महाविद्यालय तसेच बसवेश्वर काॅलनी आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच सध्या पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्यावर वाहन चालवणेही अवघड झालेले आहे. विद्यार्थी व नागरिकांच्या जिवितास निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

नव्या सरकारचा शपथविधी ३ जुलैला ? बंडखोर आमदार येणार गोव्यात, हॉटेलचेही बुकींग.

 

राज्यातील सत्तांतर नाट्याचा अखेरचा अध्याय चार दिवसात संपण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडी सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले असून नवीन सरकारचा येत्या ३ जुलै रोजी होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासाठी यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीला गेलेले बंडखोर आमदार तत्पूर्वी गोव्यात येणार असून त्यासाठी तेथे हॉटेलचेही बुकिंग झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर आता येत्या तीन दिवसात सत्ताबदलाच्या हालचालींना प्रचंड वेग येण्याची शक्यता आहे.  शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण गेल्या आठ दिवसापासून अस्थिर बनले आहे. वाद न्यायालापर्यंत पोहोचला आहे.

 शिंदे यांच्यासोबत पन्नास पेक्षा अधिक आमदार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याची चर्चा आहे. करोनामुक्त झालेले राज्यपाल कोश्यारी आता चांगलेच सक्रीय झाले आहे. माजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे नेतेही आता मैदानात उतरले आहेत. यामध्ये फडणवीस आघाडीवर आहेत. 

भाजप आणि शिंदे गटाची सत्ता लवकरच राज्यात येण्याची चिन्हे आहेत. तत्पूर्वी बहुमताला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन सरकार बनविण्यासाठी राज्यपाला भाजपला बोलावतील. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी अमावस्या संपताच भाजपच्या गोटातील हालचाली अधिक गतीमान होतील. शिंदे अथवा प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणार असल्याचे समजते. 

यामुळे चार दिवसात सत्तांतराच्या हालचालींना गती येणार आहे. क्लिक करा आणि वाचा- भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ३ जुलै हा ठरला आहे. यादिवशी फडणवीस व शिंदे यांना राज्यपाल भवनात शपथ देण्यात येणार आहे. त्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल. दरम्यान, या दोन तीन दिवसानंतर गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांना गोव्यात आणण्यात येणार आहे. तेथे एका हॉटेलमध्ये ४२ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोकणातील एका नेत्याने पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात त्यांना गोव्यात आणण्यात येणार आहे.

खुशखबर..! पोलिस भरतीचा ‘जीआर’ निघाला. आता तब्बल 7231 जागांसाठी होणार महाभरती..!!





मुंबई  (प्रतिनीधी) राज्याचं राजकारण तापलेलं असताना, महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.. राज्यात तब्बल 7231 जागांसाठी पोलिस भरती  होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज (ता. 28) या पोलिस भरतीला मंजुरी दिली.. तसा ‘जीआर’ (शासन निर्णय) जारी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.


राज्यात दोन टप्प्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. पहिल्या टप्प्यात 5 हजार जागांसाठी पोलिस भरती पूर्ण झालीय.. आता दुसऱ्या टप्प्यातील 7231 जागांसाठी भरती होत आहे.. दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरतीच्या नियमांत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही भरती प्रक्रिया तात्काळ राबवण्यासाठी पोलिस महासंचालकांना सूचना दिल्याचे वळसे पाटील म्हणाले..


दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा होणार आहे. शारीरिक चाचणीसाठी खालीलप्रमाणे गुण दिले जाणार आहेत.


‘पोलीस शिपाई’ पदासाठी शारीरिक चाचणी

पुरुष उमेदवार

1600 मीटर धावणे – 20 गुण

100 मीटर धावणे – 15 गुण

गोळाफेक – 15 गुण

महिला उमेदवार


800 मीटर धावणे- 20 गुण

100 मीटर धावणे- 15 गुण

गोळाफेक – 15 गुण

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलातील ‘सशस्र पोलिस शिपाई’ (पुरूष) पदासाठी 100 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे.


5 किमी धावणे- 50 गुण

100 मीटर धावणे -25 गुण

गोळाफेक – 25 गुण

शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार पदानुसार 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील. नंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे..

‘अशी’ होणार लेखी परीक्षा..!

लेखी चाचणीत अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांवर आधारित प्रश्न असतील. हे प्रश्न बहुपर्यायी प्रकारात असतील.

परीक्षा मराठी भाषेत होईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल.

उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण असल्यास उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

ही लेखी परीक्षा ‘ओएमआर’  पद्धतीने घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

कोरोना संकटामुळे गेल्या 2 वर्षांपासून पोलिस भरतीची प्रक्रिया लांबली होती. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता, मोठ्या प्रमाणावर पोलिस बळाची गरज जाणवत आहे. अखेर राज्य सरकारने ‘जीआर’ जारी केल्याने पोलिस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास ठाकरे सरकारला पाठवले पत्र !


*उद्या महाराष्ट्रात फ्लोर टेस्ट होणार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले.

मुंबई  (प्रतिनीधी) महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर ऐक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयात उद्या फ्लोर टेस्ट होणार आहे असे सांगितले जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी काही वेळापूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे असे म्हणाले की, मी उद्या फ्लोर टेस्टसाठी मुंबईला जाणार आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, कामाख्या मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहे. मी इथे महाराष्ट्राच्या शांती आणि आनंदासाठी प्रार्थना करण्यासाठी आलो आहे. मी आणि सर्व आमदार उद्या फ्लोर टेस्टसाठी मुंबईला जाणार आहोत.

राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे :

राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 7 अपक्ष आमदारांनी मला पत्र लिहून म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावले आहे, त्यामुळे फ्लोर टेस्ट आवश्यक आहे. 30 तारखेला सभागृहात फ्लोअर टेस्ट घेण्यात यावी, तसेच विधानभवनाच्या बाहेर आणि आत कडेकोट बंदोबस्त ठेवावा. सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुनिश्चित करण्यात यावे, असे या पत्रात पुढे लिहिले आहे.

महाराष्ट्र सरकार पडणे जवळपास निश्चित :

पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. भाजप सध्या सक्रिय दिसत आहे. मंगळवारी फडणवीस यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली. रात्री त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन फ्लोअर टेस्टची मागणी केली आणि आता ते मुंबईत भाजप विधिमंडळ पक्षासोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून हटवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या बैठकीत आमदारांना विधानसभा अधिवेशनासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात येणार आहे.

कुलकर्णी साहेब ! पुलाच्या बोगस कामात उद्या जीवित हानी झाली तर जबाबदार तुम्हाला की गुत्तेदाराला धरायचं ?


चौसाळा (प्रतिनीधी)  कुलकर्णी साहेब.. जनतेचे एवढं काम करा दोन वर्षापूर्वी सुलतानपूर व नांदूर रोड वरील पुलाच्या कामाच टेंडर मंजूर झालं. आतापर्यंत झोपा काढल्या पण सुरू असलेल्या या दोन्ही कामातील निकृष्ट पणामुळे उद्या जीवित हानी झाली तर याला जबाबदार तुम्हाला धरायचं की गुत्तेदार घोडके ला धरायचं हे एकदा स्पष्ट करा.


चौसाळा नांदूर राज्य महामार्गावरी लेंडी नाल्यावर 88 लक्ष रुपये किमतीच्या पुलाचे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. मात्र पावसाळा सुरू झाला तरी हे काम अद्याप पूर्ण झालच नाही. या कामाच्या टेंडरला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. गुत्तेदाराने जुन्या पुलाच्या सिमेंट नळ्या काढून पर्यायी रस्त्यासाठी वापरल्या. हे काम देखील थातूरमातूर केल्यामुळे एकाच पावसात पर्यायी रस्ता खचला तीन-चार दिवस या महामार्गावर ची वाहतूक खोळंबली. सध्या पूलाच्या बांधकामासाठी लोखंडी ताराचा वापर केला की गजाचा हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सहा एमएम पेक्षा मोठा गज वापरला गेला नाही. स्टील डिझाईन तयार केलं गेलं नाही. नुसते जग दाक्षायणी लोखंडाचा वापर केला आहे यासाठी नुसते गज पिलर मध्ये खोचले आहेत. पुलाच्या बांधकामासाठी सिमेंटच प्रमाण देखील अत्यल्प वापरला आहे. मग असा निकृष्ट दर्जाचा पूल कुठपर्यंत टिकणार? जवळपास हीच स्थिती सुलतानपूर रोडवर घोडके नावाच्या गुत्तेदारानेच केलेल्या पुलाबाबत घडली आहे. दोन कोटी 25 लाख रुपयांची ही दोन्ही काम आहेत. हा पूल सध्या रहदारीला खुला झाला असला तरी बोगस कामामुळे तो किती दिवस टिकेल हे सांगणं अवघड आहे.
बोगस काम करून जनतेच्या जिवाशी अधिकारी व गुत्तेदाराचा हा खेळ नव्हे काय? सार्वजनिक बांधकाम विभाग नुसतं झोपा काढत आहे की काय? आपल्यासारखे अभियंते मिंध्ये असल्यासारखी धृतराष्ट्रा सारखी भूमिका का घेत आहेत? भविष्यात या निकृष्ट पुलामुळे जीवित हानी झाली तर याला जबाबदार कुलकर्णी साहेब तुम्हाला धरायचं की गुत्तेदाराला धरायचं हे एकदा स्पष्ट कराच!

लिंबागणेश येथे रस्त्यावरील खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून म्हैस जागीच ठार. पशुवैद्यकीय आधिकारी,पोलीस प्रशासन व महावितरण यांच्याकडुन स्थळपंचनामा:-डाॅ.गणेश ढवळे

___
बीड (प्रतिनीधी) लिंबागणेश येथील रहिवाशी भास्कर रामभाऊ आबदार हे सायंकाळी ६ वाजता रानातुन घरी म्हैस घेऊन परतत असताना प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्यावरील खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून साधारणतः ५० हजार रूपये किंमतीची म्हैस जागीच ठार झाली त्याठीकाणी म्हैसीचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणा-या भास्कर आबदार यांना ग्रामस्थांनी सावरले. 

पशुवैद्यकीय आधिकारी, पोलीस प्रशासन,महावितरण कर्मचारी घटनास्थळी पंचनामा 
____
गावचे सरपंच स्वप्निल गलधर यांनी घटना कळताच धाव घेऊन लिंबागणेश पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय आधिकारी डाॅ.अमोल मोहोळकर,महावितरणचे कर्मचारी शेळके,युवराज नाईगडे तसेच लिंबागणेश पोलीस स्टेशनचे एएसआय निकाळजे,जमादार डिडुळ यांना फोनवरून कल्पना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देत स्थळपंचनामा केला .
पावसाळ्यात विद्युत प्रवाह उतरून अपघाताच्या घटना घडतात ग्रामस्थांनी काळजी घ्यावी:-सरपंच स्वप्निल गलधर 
____
ग्रामिण भागातील मान्सूनपूर्व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भविष्यात खबरदारी घेऊन अशा घटना घडु नयेत यासाठी प्रयत्नशील राहायला हवे त्याचबरोबर ग्रामस्थांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. भास्कर आबदार यांना मदत मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. 

Tuesday, June 28, 2022

येळंब घाट प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल १३ पदे रिक्त .केवळ ५ लोकांवरच चालतो कारभार.;- डॉ. ढवळे, काळकुटेंची पदे भरण्याची मागणी.

 

बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील येळंब घाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन वर्षांपासून तब्बल १३ पदे रिक्त आहेत. यामध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा डॉ.तांदळे यांच्या कडे गेल्या काही वर्षांपासून पदभार आहे परंतु त्यांनी कधीही रुग्णांना सेवा दिली नाही किंवा आरोग्य केंद्रात उपस्थित राहिलेले नाहीत. तर सध्या वैद्यकीय अधिकारी-१, लॅब टेक्निशियन -१ , हेल्थ असिस्टंट १, ए.एन.एम-३, एम.पी.डब्लु -३, परिचारिका-४ अशा जागा रिक्त आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून पी.एम.साठी ट्रेनिंग झालेला परिचर नसल्याने मोठी अडचण निर्माण झालेली आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत एकुण ३१ गावं आणि ४३००० लोकसंख्या आहे. याचा विचार केला तर अतिशय गंभीर परिस्थिती असुन सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे तरीसुद्धा आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.

 या सर्व रिक्त जागांवर तात्काळ नियुक्तया देण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन डॉ.गणेश ढवळे आणि राष्ट्रीय छावा संघटनेचे युवा अध्यक्ष अशोक काळकुटे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गित्ते यांना दिले आहे.
 येत्या १५ दिवसात यावर कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे आणि राष्ट्रीय छावा संघटनेचे युवा अध्यक्ष अशोक काळकुटे यांनी दिला आहे.

     ◾
बीड जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, स्त्री व कुटीर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांनी दिली आहे.
जर एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असतील तर जिल्हाभरात किती आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असेल याचा अंदाज येतो. विशेष म्हणजे या शासकीय रूग्णालयात केवळ सर्व सामान्य नागरिक उपचार घेत असतात परंतु यंत्रणा जर एवढी कमकुवत असेल तर लोकांना उपचार कसे मिळणार हा खरा प्रश्न आहे.
 तर वैद्यकीय अधिकारी डॉ.तांदळे यांना लवकरात लवकर चार्ज देऊ असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गित्ते यांनी दिले आहे. तर वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासनाशी संपर्क साधण्याचा सल्ला डॉ.ढवळे आणि अशोक काळकुटे यांना दिला आहे.
    ◾
सध्या केवळ ५ लोकांवरच कारभार.

सध्या येळंब घाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपूर्ण कारभार हा वैद्यकीय अधिकारी-१, आरोग्य सहाय्यक-२, आरोग्य सेविका-१,  आरोग्य सेवक-१ यांच्यावर अवलंबून असल्याने आणखी अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत आहे.

उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन .


मुंबई(प्रतिनीधी )शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना परत फिरण्याचं आवाहन केलं आहे. मला काळजी वाटते, अजूनही वेळ गेली नाही, समोर येऊन बोला, आपण मार्ग काढू, अशा शब्दात ठाकरेंनी आमदारांना आश्वस्त केलं आहे. त्यामुळे बंडखोर आमदार आता काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला एक आठवडा होत आला, मात्र बंडखोरांसोबत कुठलीही सकारात्मक चर्चा झाल्याचं वृत्त आलेलं नाही. त्यानंतर ठाकरे सरकारकडून त्यांचे परतीचे दोर कापण्यास सुरुवात झाली होती. काल ठाकरे सरकारकडून नऊ मंत्र्यांकडील खाती काढून घेण्यात आली. तर त्याआधीच १६ बंडखोर आमदारांना कारवाईबाबत नोटीस पाठवण्यात आली होती. एकीकडे संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी नावं घेऊन घेऊन आमदार-मंत्र्यांवर हल्ला चढवला आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी सामोपचाराने बोलत पुन्हा एकदा हात पुढे केल्याचं चित्र आहे.


उद्धव ठाकरे यांच्याकडून काय आव्हान?

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो

जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, असं उद्धव ठाकरे यांनी लिहिलं आहे.

माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

आपला नम्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे

देशातील टोल नाके होणार हद्दपार.


 देशातील विविध महामार्गांवरील टोल नाक्यांवर लागणारी वाहनांची लांबच लांब रांग टाळण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित आणली. परंतु टोलनाक्यांवरील लांबलचक रांगांमध्ये काहीच फरक पडला नाही. दरम्यान, आता त्यापूढे जाऊन सरकार एएनपीआर प्रणाली कार्यान्वित करण्याच्या विचारधीन आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर देशातील प्रमख टोल नाक्यांसह छोटे छोटे टोलनाके हद्दपार होतील असा विश्वास प्रशासकीय अधिक-यांकडून व्यक्त केला जात आहे

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून ही नवी संकल्पना घेऊन येत आहे. या अंतर्गत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राजस्थानमध्ये असा ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे बनवत आहे, जिथे एकही टोल बूथ नसेल. याचा सर्वात मोठा फायदा वाहन चालकांना होणार आहे. जितकी रक्कम महामार्गावरून जाण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे तितकीच रक्कम त्याच्याकडून घेतली जाणार आहे

सध्या महामार्गावरून प्रवास करताना वाहनावर लावलेल्या फास्टॅगमधून टोलची आकारणी केली जाते. नवीन तंत्रज्ञान लागू झाल्यानंतर तुमच्या वाहनाची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि फास्टॅगमधून पैशांची आकारणी होईल. यामध्ये किलोमीटरच्या आधारे आकारणी होणार असल्याचे मानले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, टोलवर एकाच वेळी पैसे वसूल केले जात होते. मात्र नवीन प्रणालीनूसार महामार्गावर एकच एंट्री आणि एक्झिट पॉइंट असेल. वाहन दाखल होताच नंबर प्लेट स्कॅन होईल. त्यानंतर प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या अंतरानुसार प्रवाशांच्या खात्यातून पैसे कापले जातील

या संकल्पनेची सुरुवात राजस्थानपासून होत आहे. भारत माला प्रकल्पांतर्गत राजस्थानमध्ये ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे बनवला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, राजस्थानमध्ये त्याची एकूण लांबी 637 किलो मीटर असेल. हा एक्स्प्रेस वे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमधून जाणार आहे. त्याची लांबी 1224 किलो मीटर असेल. हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे पंजाबमधील अमृतसर ते गुजरातमधील जामनगरपर्यंत सुरू होईल. ते राजस्थान या दोन शहरांना जोडेल. या एन एच वरून अरबी समुद्रातील बंदरापर्यंत कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राजस्थानला एक समर्पित एक्सप्रेस वे मिळेल.

रिक्षाची दुचाकीला धडक चार जण जखमी.

केज (प्रतिनीधी) पासून काही अंतरावर असलेल्या ढाकेफळ जवळ हा अपघात सकाळी ०९.४५ च्या दरम्यान झाला आहे. अंबाजोगाई कडून येणाऱ्या रिक्षाने दुचाकीला पाठीमागून उडवले.या अपघातात चार जण जखमी झाले आहेत.जखमीचे नावे उमेश मुळे(प.स.कर्मचारी. केज),काशीबाई मुळे दोन्ही ढाकेफळ, ता,केज तर सोहेल बागवान व सूरज सुरवसे अंबाजोगाई चे रहिवासी आहेत.हा अपघात झाल्याची माहिती रिक्षा चालक यांनी दिली, व जखमींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नैराशातुन तीस वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

केज (प्रतिनीधी)  तालुक्यातील चिंचोली माळी येथील दीपक नखाते वय ३० वर्षे या तरुणाचा विवाह झाल्यानंतर त्याला एक मुलगी झाली होती. मात्र मागील काही महिन्यापासून त्याची पत्नी ही मुलीला घेऊन तिच्या माहेरी राहत होती. तर दिपक हा त्याच्या आई-वडिलांकडे गावी रहात होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या आई वडील हे मजुरीच्या निमित्ताने बाहेरगावी होते. पत्नी नांदत नसल्याच्या कारणावरून आलेल्या निराशातून दीपक नखाते यानी टोकाची भूमिका घेतली.रविवारी दुपारी घरी कोणी नसताना घरातील कपडे व इतर वस्तू पेटवून देऊन राहत्या घरात लोखंडी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.रविवारी रात्री उशिरा या घटनेची मिळताच ठाण्याचे फौजदार राजेश पाटील,जमादार राम यादव, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, राजू गुंजाळ यांनी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. सोमवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून चिंचोलीमाळी येथे अंत्यसंस्कार आले. महादेव शिवाजी नखाते यांच्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Monday, June 27, 2022

बीड नगर पालिकेच्या प्रारूप मतदार यादीत घोळ तात्काळ चौकशी करा - सलीम जहाँगीर

बीड (प्रतिनीधी) : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. मात्र सदरील यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आहेत. एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात घुसडण्यात आली आहेत. सदरील यादी कोणाच्यातरी राजकीय सोयीसाठी तयार केल्याचा संशय असून या प्रकरणी तात्काळ चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केली आहे. या प्रकरणात प्रशासनाने लक्ष न घातल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.बीड नगरपालिका निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सदर यादीवर दिनांक 1 जुलै पर्यंत आक्षेप आणि हरकती घेता येणार आहेत. प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आहेत. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे दोन प्रभागात विभागली केली आहेत. काही नागरिक ज्या प्रभागातील रहिवासी आहेत त्या प्रभाग यादीत त्यांचे नाव न येता आजूबाजूच्या प्रभागांमध्ये त्यांची नावे आली आहेत. विधानसभा मतदार संघाच्या अनुषंगाने मतदार याद्यांचे विभाजन करण्यात आलेले असले तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आहे. विभाजन करत असताना नेमके कोणते नियम समोर ठेवले गेले ? ज्या अधिकाऱ्यांनी मतदार यादीचे प्रभाग निहाय विभाजन केले आहे त्यांनी चार भिंतीच्या आत बसून हे विभाजन केले आहे का ? याद्या तयार करत असताना निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे योग्य आणि काटेकोरपणे पालन झाले आहे का ? हे तपासणे गरजेचे आहे. मतदार यादी विषयी असलेला संभ्रम आणि घोळ मिटवण्याचा अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तातडीने मतदार याद्यांचे पुनर्विलोकन करावे आणि या सर्व प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केली आहे.

मान्सूनपूर्व नालेसफाई कागदोपत्रीच नगरपरिषद भ्रष्टाचार प्रकरणात कारवाईसाठी लक्ष्यवेधी होडी आंदोलन :- डाॅ.गणेश ढवळे

____
बीड नगरपालिकेमार्फत मान्सूनपूर्व नालेसफाईच्या  नावाखाली कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन लाखो रूपयांचा अपहार केला असून शहरातील मुख्य रस्ते, शासकीय कार्यालये,बाजारपेठा, शाळा एकंदरीतच शहरालाच तलावाचे स्वरूप आले असून चारचाकी दुचाकी इंजिनमध्ये पाणी शिरल्यामुळे बंद पडत असुन  पादचा-यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून त्याच्या निषेधार्थ बीडकरांना होडी,नाव साठी माफक दरात कर्ज उपलब्ध करून बीड नगरपरिषदेला ग्रामपंचायत दर्जा देण्यात यावा आदि.मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी होडी/नाव चालवा आंदोलन करण्यात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.

 आंदोलनात अड.संगिता धसे,किस्किंदाताई पांचाळ,संगीता सांगोळे,शेख युनुस,,रामनाथ खोड, मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन,बलभीम उबाळे आदिंनी सहभाग घेतला. 

 मान्सूनपूर्व लाखो रूपयांची नाल्यासफाई  कागदोपत्रीच; गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करा 
_____
शहरातील बहुतांश भागात नाल्याची कामेच नाहीत तसेच अपुर्ण असलेल्या नाल्याची नियमित साफसफाई नाही मान्सूनपूर्व स्वच्छतेसाठी आलेल्या लाखो रूपयांच्या निधीचा तसेच शासनाकडून प्राप्त विशेष निधीचा कागदोपत्रीच कामे दाखवुन सत्ताधारी  नगरपरिषद आधिका-यांशी संगनमत करून लाखो रूपयांचा अपहार करण्यात येतो. सत्ताधाऱ्यांकडून मात्र साफसफाईचे सोशल मिडीयावर तसेच दैनिकात बातम्याद्वारे विकासाच्या पर्वाचे पोकळ दावे केले जातात ते नुकत्याच पडलेल्या पावसाने शहराला तलावाचे स्वरूप दिसल्याने फोल ठरत आहेत. त्यामुळेच संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. 

घनकचरा व्यवस्थापनाचे महिन्याकाठी २७ लाख तर वर्षाकाठी साडे तीन कोटो पाण्यात 
____
बीड नगरपालिकेमार्फत शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी "कनक एन्ट्रप्रायजेस अमरावती "कंत्राटदाराला महिन्याकाठी २७ लाख व वर्षाकाठी साडे तीन कोटी रूपये देण्यात येतात मात्र प्रत्यक्षात कामे होतच नाहीत,नियमित घंटागाडी पाठवणे,कचरा उचलणे,गल्लोगल्ली कचरा संकलन करणे आदि कामे कागदावरच असून नगरपरिषद आधिकारी,पदाधिकारी लाभार्थी असल्याने मुग गिळुन गप्पच असतात.घनकचरा बिंदुसरा नदीपात्रात टाकुन पात्र दुषित करण्यात येते.पावसाने नाल्या तुडुंब भरून वाहु लागल्यामुळे 
सर्वत्र दुषित पाणी झाले असून रोगराई पसरून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून तातडीची उपाययोजना करणं गरजेचं आहे. 

 बिंदुसरा,करपरा नदीपात्रातील नदी,ओढे,नाली अनाधिकृत प्लाॅटींग घातक; सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा 
______
बीड शहरातील नदी,ओढे,नाले तसेच शहरातील बिंदुसरा,करपरा  नदी पात्रातील अतिक्रमण करून प्लाॅटींग करणा-या भविष्यात पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास वित्त व जिवित हानीस जबाबदार भुमाफियां तसेच नगरपरिषद ,भुमिअभिलेख,रचनाकार,जलसंपदा विभागातील संबधित आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. 


Sunday, June 26, 2022

बंडखोर आमदारांची जीवंत प्रेतं राज्यात येतील; राऊतांचे खळबळजनक वक्तव्य.


मुंबई  (प्रतिनीधी) :- शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईतील दहिसर येथे आज शिवसेनेचा मेळाव्यात खळबळजनक वक्तव्य केले. गुवाहाटीला गेलेले 40 बंडखोर आमदार जीवंत प्रेतं आहेत. त्यांची प्रेतं मुंबईत येतील तेव्हा त्यांच्यात आत्मा नसेल. हे 40 लोक जेव्हा मुंबई विमानतळावर उतरतील; तेव्हा ते आपल्या मनाने जिवंत नसतील. कारण इथे मुंबईत ज्योत आहे, हे त्यांना माहीत आहे. येथील शिवसैनिकांच्या मनात आग धुमसत असल्याचे बंडखोर आमदारांना माहीत आहे, आणि त्याचा परिणाम काय होईल? त्यामुळेच एकदा बंडखोर आमदार मुंबईत येऊन दाखवा असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राचा राजकीय संघर्ष आता कायदेशीर लढाईत अडकलेला दिसत आहे. अपात्रतेच्या नोटिसा मिळालेल्या 16 बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्याच्या निर्णयाला बंडखोर आमदारही न्यायालयात आव्हान देणार आहेत. इकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. राऊत म्हणाले- तुम्ही शिवसेना सोडली असाल तर वडिलांच्या नावाने पक्ष काढा, बाळासाहेबांच्या नावाने पक्ष का काढता.

आमचे वडील एकच, फक्त बाळासाहेब ठाकरे. हे बंडखोर 10 वेळा वडील बदलतात, कधी सुरतला जातात, कधी गुवाहाटीला जातात. तुमची संख्या पुरेशी असेल तर तुम्ही मुंबईत का येत नाही, तुम्ही मुंबईत या मी तुमचे स्वागत करायला तयार आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना बाळासाहेबांची शिवसेना नष्ट करून या आमदारांना गुलाम म्हणून ठेवायचे आहे, असे राऊत म्हणाले

......तर निवडणूका होतील - शरद पवार.


दिल्ली (प्रतिनीधी ) सभागृहामध्ये व्हीप पाळला नाही तर तो व्हीपचा भंग ठरतो आणि पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, सर्व सामान्य समज आहे. व्हीप दिल्यानंतर हाऊसमध्ये त्याचा भंग केला तरच त्यांच्यावर कारवाई होते असं आम्हालाही वाटत होतं. पण सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आला आहे. आमदार, खासदारांनी विधानसभा किंवा संसदेच्या बाहेर पक्षाच्या विरोधात स्टेटमेट दिलं किंवा वेगळं पाऊल उचलंल तर त्यांनाही व्हीप लागू होतो. मला वाटतं या लाईनवर शिवसेना जाईल, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. 

याबाबतचा निर्णय राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं होतं. असंही पवार यांनी सांगितलं. शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. शिवसेनेचा एक ग्रुप आसामला आहे. त्यांचं एक स्टेटमेंट आलंय. त्यांना सत्ता परिवर्तन हवंय. त्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. गेलेले लोक परत आले तर त्यांच्या भूमिकेत बदल होईल असं शिवसेनेला वाटतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका ही शिवसेनेला पाठिंबा मिळेल, असं शरद पवार यांनी सांगितलं. शिंदे यांना नवं सरकार हवं आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भेटले. आम्ही आघाडी सरकार स्थापन केलं. त्याला सहयोग देण्याचा निर्णय घेतला. आज आमची आघाडी आहे. आणि ती कायम राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर निवडणुका होतील

बंडखोरांना या ठिकाणी पर्यायी सरकार आणायचं आहे. एवढ्या मेहनतीने त्यांनी लोक इथून तिथे नेले. त्यात त्यांना यश कसे येईल? राष्ट्रपती राजवटीची शक्यता वाटत नाही. पण राष्ट्रपती राजवट लागली तर निवडणुका होतील, असा माझा अंदाज आहे. खात्रीशीर माहिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.


राज्यपालांकडे दावा करत नाही

ते नंबर असल्याचं सांगत आहे. त्यांच्याकडे संख्याबळ आहे तर मग ते तिकडे का बसले आहेत? याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. संख्याबळ आहे तर मुंबईत येऊन राज्यपालांकडे दावा का करत नाही?, असा सवाल त्यांनी केला. अडीच वर्ष ते आमच्यासोबत होते. राष्ट्रवादीसोबत होते. अडीच वर्षात राष्ट्रवादीचा त्रास झाला नाही. आता का झाला आहे? हे केवळ कारण आहे. स्वत:ला डिफेन्ड करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, असंही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

नगरपरिषदेचा हलगर्जीपण मान्सूनपूर्व नालेसफाई कागदोपत्रीच शहराला तलावाचे स्वरूप :-डाॅ.गणेश ढवळे .

____
बीड (प्रतिनीधी) बीड नगरपालिके मार्फत मान्सूनपूर्व नालेसफाईच्या  नावाखाली कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन लाखो रूपयांचा अपहार केला असून शहरातील मुख्य रस्ते, शासकीय कार्यालये,बाजारपेठा, शाळा परीसरांना तलावाचे स्वरूप आले असून दुचाकी,पादचा-यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून बीडकरांना होडी,नाव साठी माफक दरात कर्ज उपलब्ध करून बीड नगरपरिषदेला ग्रामपंचायत दर्जा देण्यात यावा आदि.मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी होडी/नाव चालवा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शेख युनुस,सुदाम तांदळे,रामनाथ खोड,एस.एम.युसुफ, मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन,नितिन सोनावणे यांच्यावतीने देण्यात आले आहे. 
 मान्सूनपूर्व नाल्यासफाई कागदोपत्रीच; घनकच-यासाठी महिन्याकाठी २७ लाख पाण्यात 
____
शहरातील बहुतांश भागात नाल्याची कामेच नाहीत; असलेल्या नाल्याची नियमित साफसफाई नाही मान्सूनपूर्व स्वच्छतेसाठी आलेल्या लाखो रूपयांच्या निधीचा कागदोपत्रीच स्वच्छतेची कामे दाखवुन राजकीय पुढारी नगरपरिषद आधिका-यांशी संगनमतानेच शासनाकडून प्राप्त विशेष निधीचा अपहार केला जातो. बीड नगरपालिकेमार्फत घनकचरा व्यवस्थापनासाठी "कनक एन्ट्रप्रायजेस "कंत्राटदाराला २७ लाख रूपये देण्यात येतात मात्र कागदावरच कामे दिसुन येत असून प्रत्यक्षात कामे होतच नाहीत आधिकारी,पदाधिकारी लाभार्थी असल्याने मुग गिळुन गप्पच असतात. 


विकासाचे पर्व...बीड पाण्याखाली सर्व ;दुषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका 
___
दरवर्षीच सत्ताधाऱ्यांकडून बीड शहरातील साफसफाईचे सोशल मिडीयावर तसेच दैनिकात प्रसिद्ध बातम्याद्वारे विकासाच्या पर्वाचे दावे केले जातात मात्र हे पोकळ दावे पावसाने फोल ठरवले जातात त्यामुळेच केवळ पोकळ दावे करण्यापेक्षा शहरातील नाल्याची साफसफाई करून बीडकरांना अडचणीतुन सोडवणे महत्वाचे आहे .
       पावसाने नाल्या तुडुंब भरून रस्त्यावरून वाहु लागल्यामुळे सर्वत्र दुषित पाणी झाले असून रोगराई पसरून आरोग्यास मोठ्याप्रमाणात नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे. 

महाराष्ट्रात कृषी मंत्र्याच्या सहमतीने कृषी खात्यात बोगस खते, बि बियाणे, औषधीचा सावळा गोंधळ.२०२० व २०२१ चा पिक विमा तात्काळ देण्याची शासनाकडे मागणी.- वंसत मुंडे .

 परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) खरीप पेरणी चालू झालेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे २०२० खरीप व २०२१ चा विमा तात्काळ शेतकऱ्या खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने काढावेत अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये गुजरात ,मध्यप्रदेशातून कापूस बियाणे अवैधपणे विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे,  तरीही कृषी खात्याचे मंत्री व त्यांचे सर्व कर्मचारी यांचे दुर्लक्ष असून बोंड आळी ला पायबंद घालण्यासाठी सरकार कडून विशिष्ट कालावधी मधील कपाशीची बीटी बियाणे विक्रीला महाराष्ट्रात बंदी असताना परराज्यातील बियाणे एजंटमार्फत विकले तरीही कृषी खात्याला महाराष्ट्रातले माहिती नाही असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला . जास्त भावाने खत बि बियाणे औषधी विक्री करून शेतकऱ्याचे आर्थिक लूट केली जात आहे ,या सर्वशी कृषी मंत्र्याचा कारभार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला. संपूर्ण देशात अप्रमाणित रासायनिक खताचे खूप मोठे रॉकेट असून महाराष्ट्रातील ६ कंपनीचा सहभाग असल्याचे निदर्शनास आलेले आहे, तरीही कृषी खाते कारवाई करीत नाही कारण सर्वांना दुकानदारा पासून ते कारखानदारा पर्यंत टक्केवारी मिळत असल्यामुळे कृषी खात्याकडुन जाणून-बुजून दक्षता पथका मार्फत धाडी टाकुन चौकशी केली जात नाही या सर्वस्वी कृषिमंत्री व त्यांचे सर्व हस्तक जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे. केंद्रीय खते नियंत्रण आदेश १९८५ आणि अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि  खते बी-बियाणे औषधी बोगस कंपनीवर चौकशी करून लायसन रद्द करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे  निवेदनाद्वारे केली.               
महाराष्ट्रात २०२० चा खरीप विमा अद्यापि वाटप झालेला नसून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे, तरी शासनाने त्वरित केंद्र सरकार व राज्य सरकारने विमा कंपन्यांना सक्तीचे आदेश देऊन शेतकऱ्याचा २०२०चा खरीप विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देऊन २०२१ चा तात्काळ शेतकऱ्यांना विमा देण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे प्रकाश भन्साळी नवनाथ थोटे अविनाश मोरे शहाजी हिंदोळे अँड अनंत जगतकर हरिभाऊ सोळंके जुबेर भाई चाऊस सुभानराव सोळंके गणेश राऊत परवेज कुरेशी लहुदास तांदळे सय्यद अल्ताफ जावेद कुरेशी यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे विनंती केली.
 
.

वसुंधरा महाविद्यालयत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षाला शांततेत सुरूवात.

घाटनांदुर (प्रतिनिधी) येथील वसुंधरा महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक च्या परीक्षा आरंभ झाला आहे.
विद्यापीठाच्या बी.ए. शाखेच्या परीक्षा महाविद्यालयात होत आहेत. परीक्षा केंद्राचे प्रमुख प्राचार्य डॉ.अरुण दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. गजानन सवने काम पाहत आहेत ‌.विद्यापीठाचे बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून प्रा. भगवंत पाळवदे हे कार्यरत आहेत. परीक्षेच्या नियोजनासाठी केंद्र सहाय्यक प्रा. उमेश घुले श्री. महादेव जाधव श्री सुग्रीव जाधव श्री.कुमार बिरादार श्री संभाजी खरटमोल सौ.माले कार्यरत आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षा परीक्षार्थीसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या परीक्षेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीचे मोठया प्रमाणात सहभाग लाभत आहे.

नांदेडच्या अभिनेत्री वंदना गव्हाणे क्रांतीशौर्य अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित.

नांदेड (प्रतिनीधी)  काल दिनांक 25 जुन रोजी बारामती या ठिकाणी नांदेड करांची सुन नांदेड करांची शान नांदेड करांची मान उॅचवणारी  सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम अभिनेत्री यांना  क्रांती शौर्य गाथा  अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार अतिशय मानाचा समजला जातो हा पुरस्कार सौ वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम अभिनेत्री यांना  सरपंच सौ कल्पना मॅडम  यांचे शुभम हस्ते देण्यात आला या आगोदर सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम अभिनेत्री यास ओम साई विकास प्रतिष्ठान कानडगाव आणि बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विदयामाने नुकताच साई च्या पावन भुमित शिर्डीत 12 जुन रोजी साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.सौ .वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम या चित्रपटात क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत आहे.त्यांनी आता पर्यत 10 चित्रपटात अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे तसेच नुकताच महाराष्ट्र राज्याचा युवा आयडाॅल हा पुरस्कार सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम अभिनेत्री यांना जाहीर झालेला आहे हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याची
 राजधानी मुंबई या ठिकाणी मोठया मानसन्मान पुरवक देण्यात येणार आहे..या पुरस्कारा मुळे सौ.वंदना मिलिंद गव्हाणे मॅडम यांचे अभिनंदन श्री.सुदाम संसारे सर ओम साई विकास प्रतिष्ठान कानडगाव व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन चे अध्यक्ष यांनी केले आहे त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचा खेळ सुरु असताना आता राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता.


*एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 50 आमदारांची संख्या आहे.


मुंबई :(प्रतिनिधी) राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. आमदारांच्या कार्यालय आणि घरांवर हल्ले होत आहेत. जर असं चित्र कायम राहिलं तर राष्ट्रपती राजवट लावण्याचा राज्यपाल विचार करु शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात नवा भूकंप आला आहे. महाविकासआघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 50 आमदारांची संख्या आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार धोक्यात आलं आहे

ठाकरे सरकार वाचवण्यासाठी खलबतं सुरु आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकांवर बैठका घेत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. काल रात्री ही भेट झाली. याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली. एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याबाबत राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. त्यातच आता राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवली जात आहे

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. अनेक ठिकाणी आमदारांचे बॅनरजी फाडण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी त्यांच्या फोटोला काळीमा फासण्यात आलं आहे.शिंदे गटाकडून आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी दीपक केसरकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.


Saturday, June 25, 2022

शाळेत जात असताना .ट्रॅव्हल्सच्या धडकेने विद्यार्थ्यांचा जागीच मुत्यू .

गेवराई (प्रतिनीधी)  गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी येथील ओमकार भागवत कादे वय 15 वर्षे हा विद्यार्थी खेर्डावाडी येथून मारफळा फाटा येथील शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत असताना मारफळा फाटा येथे हवेवर भरधाव वेगाने टूँव्हल्सने धडक दिल्याने त्याचा जागीच मुत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9 = 00 वाजण्याच्या सुमारास घ डली आहे या विषयी सविस्तर माहिती आशी की गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी येथील ओमकार भागवत कादे वय 15 वर्षे हा विद्यार्थी खेर्डावाडी येथून दि 25 / 6/2022 रोजी सकाळी 9 =00 वाजता मारफळा फाटा येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत होता येत असताना गढी माजलगाव रोड राष्ट्रीय महामार्गावर मारफळा फाटा येथे हायवे वर भरधाव वेगाने टूँव्हल्स एम एच 23 डब्ल्यु 76 66  या टँव्हल्सने धडक दिल्याने ओमकार भागवत कादे याचा जागीच मुत्यू झाला जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ झोडपे याच्या मार्गदर्शनाखाली डॉ पंडित यांनी शवविच्छेदन केले खेर्डावाडी येथे दुपारी ओमकार भागवत कादे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पुढील तपास तल वाडा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे याच्या नेतृत्वाखाली बीट जमादार भारत गायकवाड हे करत आहे

स्वत : च्या बापाच्या नावानं मत मागा. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे भडकले , शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 6 ठराव मंजूर , बंडखोरांवर कारवाई होणार .


मुंबई -- स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला.बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गटावर जोरदार निशाणा साधला

दरम्यान, शिवसैनिकांना सेना भवनावर जमण्याचे आदेश देण्यात आलं आहेत. मोठं शक्तिप्रदर्शन करम्याच्या तयारीत शिवसेना असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शिवसेना कार्यकारिणीत उपस्थितांनी गद्दारांना परत घेऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरेंना केली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना परत घेणारच नाही असे बोलले. शिवसेना निखारा आहे

त्यावर पाय ठेवला तर जाळून टाकू असा इशारा देखील ठाकरेंनी दिला. दरम्यान या कार्यकारिणीत महत्वाचे पाच ठराव देखील मांडण्यात आले आहेत. यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असे ठरवल्याचे असल्याचे वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठरावाला अतिशय महत्त्व आहे.

कोणते ठराव मंजूर?

निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना, पहिला ठराव पारित, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक

शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकरणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना देत आहे असा ठराव ही या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा ठराव शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडला होता

त्याशिवाय, बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या ठरावामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.

शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे

 स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला. बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गटावर जोरदार निशाणा साधला 

सत्तेचा घोडेबाजार तेजीत सुरू बंडखोरांना प्रत्येकी ५० कोटी.? ३००० कोटी स्वाहा.!


मुंबई  (प्रतिनीधी ) बंडखोर शिवसेना नेते व त्यांच्या समर्थक आमदारांवर ३००० कोटी रुपये उडविण्यात येत असून, या बंडखोरांना प्रत्येकी ५० कोटी रुपये दिले गेले असावेत, अशा स्वरुपाचे वृत्त विदर्भातील आघाडीचे दैनिक ‘देशोन्नती’ने देऊन राज्यात एकच खळबळ उडविली आहे. हे वृत्त खरे असेल तर राज्यात आतापर्यंत झाला नाही, असा आमदारांचा घोडेबाजार पहिल्यांदाच झाला असल्याने राज्यात लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासला गेल्याचे या घटनेवरून दिसून येते आहे.


विदर्भातील लोकनायक म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे हे विदर्भातील आघाडीचे दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक आहेत. हे दैनिक शेतकरी-बहुजनांचे प्रखड व सडेतोडपणे प्रतिनिधीत्व करते.


दैनिक देशोन्नतीने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी तर बंडखोरी केलीच. परंतु, शिवसेनेतून ३८ आमदारांनादेखील फोडले. त्याच प्रमाणे ९-१० अपक्ष आमदारांनाही त्यांनी मॅनेज केले. मात्र, त्यांच्यासाठी सुरत ते गुवाहाटीपर्यंत जाण्यासाठी चॅटर्ड प्लेनची सोय नेमकी कुणी केली? सुमारे ५० बंडखोर आमदारांना गुवाहाटीत आणण्यासाठी आणि तेथील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यासाठी अनेक कोटी रुपये खर्च येत आहे, हा खर्च कोण करत आहे? पुढील काही दिवस हा खर्च चालणार आहे. तेव्हा या मिशनमागे कोण आहे? सर्व साधारणपणे सर्व बंडखोर आमदारांवर ३००० कोटी रुपये खर्च होणार आहे. हिंदुत्वाचा बुरखा घातलेल्या या आमदारांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात नेमके कोण पैसा खर्च करत आहे? असे सवालही दैनिक देशोन्नतीच्या या वृत्तात उपस्थित करण्यात आले आहेत.

प्रत्येक आमदाराशी ५० कोटी रुपयांची डिल झाली असावी, असे नमूद करत हा पैसा कुणी दिला? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. या वृत्ताने गेले चार दिवस सुरु असलेल्या राज्यातील या राजकीय नाट्याचा बुरखा फाटला असून, शिंदेंच्या बंडखोरीमागे कोण आहे? याचा वास आता सर्वसामान्य नागरिकांना येऊ लागला आहे. त्याबाबत महाराष्ट्राच्या मनात कमालीची घृणा निर्माण झाली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण होत आहे. या बंडखोरीचे गंभीर परिणाम या शिवसेना बंडखोरांना भोगावे लागेल, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

वक्फ बोर्ड इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल. हिंदु देवस्थान इनाम जमिन प्रकरणात दिरंगाई का?? :-डाॅ.गणेश ढवळे

___
बीड जिल्ह्य़ातील विविध धार्मिक स्थळांच्या ईनामी जमिनी भुमाफियांनी स्थानिक राजकारणी,महसुल प्रशासनातील आधिका-यांशी संगनमतानेच बोगस दस्तावेज तयार करून बळकावल्या त्या संदर्भात वक्फ बोर्डाकडून काही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले परंतु हिंदु देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात संबधितांवर गुन्हे दाखल करण्यास जिल्हाधिकारी कार्यालय,महसुल प्रशासन व पोलीस प्रशासनातील आधिकारी जाणीवपूर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली असून संबधित प्रकरणात पराग सोमन उप आयुक्त (महसुल)विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी बीड,पोलीस अधीक्षक बीड यांना अर्जात नमुद मुद्यांबाबत नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत आदेश दिले आहेत. 

जिल्हाधिकारी यांचे उपजिल्हाधिकारी (सामान्य)भु-सुधार विभाग जि.का.बीड यांना आदेश 
___
जिल्हाधिकारी बीड यांनी डाॅ.गणेश ढवळे यांच्या तक्रारीवरून उपजिल्हाधिकारी (सामान्य)भु-सुधार विभाग जि.का.बीड यांना बीड जिल्ह्य़ातील हिंदु देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणातील संबधितांवर गुन्हे दाखल करण्यास विभागीय आयुक्त कार्यालय,महसुल प्रशासन,धर्मादाय आयुक्त व पोलीस प्रशासनातील आधिका-यांवर जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी या तक्रारीच्या अनुषंगानेच नमुद मुद्यांबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून शासन नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत आदेश दिलेले आहेत. 


वक्फ बोर्ड इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल हिंदु देवस्थान इनाम जमिन प्रकरणात दिरंगाई का?? :-डाॅ.गणेश ढवळे 
____

बीड जिल्ह्य़ातील दर्गाह मशिद ईनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत परंतु हिंदु देवस्थान इनाम जमिन बीड तालुक्यातील नामलगाव येथिल आशापुरक देवस्थान,पालवण येथिल श्रीरामचंद्र देवस्थान,नेकनुर येथील गोसावी मठ,खापरपांगरी येथिल श्रीरामचंद्र देवस्थान,बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील कालिंदेश्वर मंदिर, तसेच आष्टी तालुक्यातील खडकत येथील विठोबा देवस्थान,पांढरी येथील रामचंद्र देवस्थान,खर्डा येथिल विठोबा देवस्थान,चिंचपुर येथील श्रीरामचंद्र देवस्थान तसेच अंबाजोगाई तालुक्यातील शहरातील थोरले दत्तात्रेय देवस्थान  तसेच धारूर तालुक्यातील बालाजी देवस्थान आदि ठिकाणी बोगस दस्तावेज तयार करून बेकायदेशीर हस्तांतरण केल्याबद्दल संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी वारंवार निवेदने आंदोलनानंतर सुद्धा गुन्हा दाखल करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केली जात आहे. 

अखेर लिंबागणेश गावठाण चिखलमुक्त झाले.डाॅ.गणेश ढवळे यांच्या प्रयत्नाला यश.

___
लिंबागणेश गावामध्ये १० वर्षापुर्वी परिस्थिती वेगळी होती सिमेंट रस्ते नसल्यामुळेच भालचंद्र गणपतीला छबिना मिरवताना गुडघाभर चिखलातून जावे लागायचे. तत्कालीन जिल्हापरिषद सदस्य व विद्यमान आमदार संदिपभैय्या क्षीरसागर यांनी गावाला गणपती उत्सव दरम्यान प्रदक्षिणा घालणारा रस्ता तत्कालीन सरपंच बाळासाहेब मुळे यांनी उत्तमप्रकारे केला. 
      त्यानंतर विद्यमान सरपंच स्वप्निलभैय्या गलधर यांनी गावातील उर्वरीत गल्लीबोळातील सर्व रस्त्यांसाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांच्याकडुन मंजुर करून आणले व पुर्ण सुद्धा केले आराखड्यातील शेवटचा रस्ता पावले गुरूजी यांच्या गल्लीतील रस्ता सरकार बदलल्यानंतर निधी परत गेल्यामुळे राहीला होता. 
 अखेर शेवटचा रस्ता काल आ.संदिप क्षीरसागर यांच्या फंडातुन २५-१५ मधुन माजी सरपंच बाळासाहेब मुळे यांनी पुर्ण केला आणि गावठाण चिखलमुक्त झाले. 

आता वस्तिवरील रस्त्यासाठी प्रयत्न करणार
___
गावठाण चिखलमुक्त झाले तरी वस्त्यावर रस्ते नसल्यामुळेच त्यांना गुडघ्याभर चिखलातुन जावे लागत आहे,मातोश्री पाणंद/शेती रस्ते योजनेंतर्गत उर्वरीत रस्त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे पाठपुरावा करू.....सहजंच नाही मुद्दामहून 


नायब तहसीलदाराच्या बायकोचे पर्समधील मंगळसूत्र चोरले !


केज "प्रतिनीधी"  पतीला भेटायला निघालेल्या एक नायब तहासिलदाराच्या पत्नीचे केजच्या एसटी स्टँड वरून पर्समधील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यानी चोरून नेले आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २० जून रोजी केज येथील अहिल्यादेवी नगर येथे राहणाऱ्या सौ. सुषमा दळवी या त्यांचा मुलगा किशोर दळवी याच्या सोबत परभणी जिल्ह्यात नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेले त्यांचे पती बाबुराव दळवी यांना भेटण्यासाठी जात होते. गाडीत गर्दी असेल म्हणून सौ. सुषमा दळवी यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र त्यांच्या पर्समध्ये काढून ठेवले होते. सौ. सुषमा दळवी व त्यांचा मुलगा किशोर हे दोघे दुपारी २:०० वा केजच्या बस स्टँड वरून दरम्यान पाटोदा आगाराच्या पाटोदा-लातूर या गाडीत चढले. मात्र गाडी पुढे पिसेगाव पाटी जवळ गाडी गेली असता त्यांनी पाहिले की, त्यांच्या जवळील पर्सची चैन उघडी असून त्यातील ५ ग्रॅम वजनाचे २७ हजार रु किमतीचे मंगळसूत्र हे गर्दीचा गैरफायदा घेऊन कोणी अज्ञात इसमाने चोरून नेले.
या बाबत दि. २३ जून गुरुवार रोजी नायब तहसीलदार बाबुराव दळवी यांचा मुलगा किशोर दळवी यांनी केज पोलीस ठाण्यात या मंगळसूत्र चोरीच्या दिलेल्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. २५५/२०२२ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे शहरातील नाले साफ सफाईची कामे न झाल्याने शहरातील बाजार पेठेत पाणीच पाणी.

परळी वैजनाथ (प्रतिनीधी)  परळी वै. नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे शहरातील बाजारपेठेसह इतर भागातील रस्त्यावर पाणीच पाणी जमा झाले असून शहरातील रस्त्याने चालताना नागरीकांना कसरत करावी लागत आहे.
परळी वै. शहरातील बाजार पेठ आणि इतर परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी जमा होत असून परळी नगर परिषदेकडून पावसाळ्याच्या तोंडावर होणारे शहरातील नाले साफ सफाईची कामे पूर्ण न झाल्याने पाऊस पडला की शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी जमा होताना दिसत आहे. शहरातील काही ठिकाणी नाल्या घाणीने आणि कचऱ्याने गच्च भरल्याचे शहरातील नाल्या पावसाच्या पाण्याने गच्च भरून वाहत आहेत. यामुळे शहरात घाणीचे साम्राज निर्माण होऊ शकते. पावसाचे दिवस असल्याने शहरात अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता नाकारता येते. यामुळे शहरातील बालकांपासुन ते वयोवृध्दांना वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागते. शहरातील बाजार पेठेत आणि रत्यांवर पाणी जमा होत असल्याने आणि नाल्यातील घाण रस्त्यावर आल्याने परळी वै. नगर परिषदेच्या हलगर्जीपणाचा प्रत्यय नागरीकांना पुन्हा येत आहे. तेव्हा हलगर्जीपणाचा कळस गाठत बसण्यापेक्षा शहरातील बाजार पेठेत आणि इतर भागातील रस्त्यावर जमा होणाऱ्या पाण्याची लवकरात लवकर विलेवाट लावावी, असे मत शहरातील नागरीकांचे येत आहे

पोलीस उपनिरीक्षकाला 12 हजार लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागपथकाने रंगेहाथ पकडले.

सोलापूर "प्रतिनीधी"   सोलापूर येथील सदर बझार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षकाला 12 हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरच्या पथकाने सोलापूर रेल्वे पोलीस चौकीतच रंगेहात पकडले. प्रशांत सुर्यकांत क्षीरसागर वय ३४ वर्ष, पद- पोलीस उपनिरीक्षक नेमणूक- सदर बझार पोलीस स्टेशन अंतर्गत रेल्वे स्टेशन पोलीस चौकी असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.
यातील तक्रारदार तसेच त्यांचे ओळखीचे काही इसम यांच्या खाजगी गाडया असुन त्यांनी सदर गाडया प्रवासी वाहतुकी करिता रेल्वे स्टेशन पोलीस चौकी परिसरात उभ्या करतात. यातील आलोसे प्रशांत सुर्यकांत क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक नेमणूक सदर बझार पोलीस स्टेशन अंतर्गत रेल्वे स्टेशन पोलीस चौकी, सोलापूर शहर यांनी तक्रारदार तसेच त्यांच्या ओळखीच्या इसमाच्या गाडयांवर कोणतीही कारवाई न करण्याकरिता मासिक हप्ता स्वरुपात १३,००० रुपयांची मागणी करून

तडजोडी अंती १२,००० रुपये स्विकारण्याचे मान्य करुन सदर लाच रक्कम रेल्वे स्टेशन चौकी सोलापूर येथे स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, एसीबी सोलापूर पोलीस अंमलदार, पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना श्रीराम घुगे, पोना अतुल घाडगे, पोना प्रमोद पकाले, पोकों उमेश पवार, पोकों शाम सुरवसे सर्व नेमणूक एसीबी, सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Friday, June 24, 2022

बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. ठिपके च्या आधारावर गर्भलिंग निदान करून महिलेच्या जिवाचा होत होता खेळ!



बीड  (प्रतिनीधी) बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरणात आता नवीन खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी हे बीड येथील कारागृहात असून यातील शिकाऊ (कथित) डॉ. सतीश सोनवणे याची आरोग्य विभागाने कसून चौकशी केली असून या चौकशीत अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आल्याचे विश्वसनीय सूत्राद्वारे सांगण्यात आले आहे.

*असे होते शीतल गाडे प्रकरण..

सीताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे (वय 30, रा. बक्करवाडी, ता. बीड) या महिलेचा 5 जून रोजी मृत्यू झाला होता. शीतल यांना अगोदरच तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या; परंतु रविवारी अचानक त्यांना रक्तस्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यात संशय आल्याने शवविच्छेदन करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी पती, सासरा, भाऊ, मनिषा सानप नावाची अंगणवाडी सेविका, लॅबवाला कथित डॉ. सतीश सोनवणे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आणि या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले आहे.

*कथित डॉ. सोनवणे याचा नवा खुलासा!

आरोपी डॉ सतीश सोनवणे यांचा म्हणण्याप्रमाणे अवैध गर्भलिंग निदानाचा कार्यक्रम हा नियोजन बद्ध होता परंतु सर्व काही अंदाजानेच चालत असल्याचेही सांगण्यात आले आहे. मुळात शिकाऊ डॉ. सतीश सोनवणे यालाही सोनोग्राफी मशीन मधील फारसे समजत नव्हते, त्याला एजंट मनीषा सानपनेच शिकवले असल्याचा खुलासा करण्यात आला असून ते दोघे मिळूनच एखाद्या महिलेची सोनोग्राफी करीत असत आणि तीन ठिपके दाखवले तर मुलगी समजायचे, अन दोन ठिपके दाखवले तर मुलगा असे समजून अंदाजे हा सर्व प्रकार चालत असल्याचे आरोग्य विभागाला दिलेल्या जवाबात शिकाऊ डॉ. सतीश सोनवणे यांनी सांगितले.

या प्रकारणाबाबत आरोग्य विभागाने न्यायालयात स्वतंत्र केस दाखल करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आरोपी शिकाऊ डॉ. सतीश सोनवणे याचा जवाब घेण्यात आला, प्राधिकृत अधिकारी डॉ. महादेव चिंचोळे यांनी बीडच्या कारागृहात जाऊन जवाब घेतला आणि या जवाबात त्याने अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा केला आहे. जालन्याचे डॉ. गवारे यांच्याकडूनच हे सर्व शिकल्याचे सोनवणे याने काबुल केले, तसेच सोनवणे याने कबुली जवाबात ‘आपण गर्भलिंग निदान करीत होतो’ असे ही म्हटले आहे.

*तर ठिपक्यावरून गर्भलिंग निदान अशक्य!

शीतल गाडे प्रकरणातील आरोपी सतीश सोनवणे याने दिलेल्या जवाबात म्हटले आहे की, तीन ठिपके आले की मुलगी अन दोन ठिपके आले की मुलगा या अंदाजला चुकीचे मानले असून ठिपक्यावरून गर्भलिंग निदान करणे अशक्य आहे. उगाच काहीतरी सांगून लोकांची दिशाभूल केली जात आहे असा अंदाज बीडच्या जिल्हा रुग्णालयातील रेडिओलॉजिस्ट डॉ. संतोष जैन यांनी व्यक्त केला.

*गर्भपात करण्यासाठी शीतल कोणासोबत गेली गेवराईत?

घरच्यांच्या दबावापोटी शीतल गाडे यांना गर्भपात करण्यास भाग पाडले गेले आणि ठरल्याप्रमाणे भल्या पहाटे शीतल आणि तिचा सासरा सुंदर गाडे हे दुचाकीवरून 7 च्या अगोदर गेवराई येथे पोहोचले. गर्भलिंग तपासणीसाठी 25 हजार रुपये शुल्क ठरलेला होता शितलचा सासरा सुंदर गाडे याने हे शुल्क कमी करण्याची विनंती केली मात्र मनीषा सानपने रेट फिक्स असल्याचे सांगितले. एका खाजगी रुग्णालयाचा पत्ता त्यांना देण्यात आला आणि तेथून मनीषा सानप त्या दोघांना घेऊन तिच्या तीन मजली घरी घेऊन गेली. त्या घरी कथित डॉ. सतीश सोनवणे हा अगोदरच तयार होऊन बसला होता. अवघ्या 10 मिनिटात सुंदर गाडे कडून 25 हजार रुपये घेतले. तसेच गर्भपाताची लिंक ही मनिशाने दिल्याचे शितलचा सासरा आरोपी सुंदर गाडे याने त्याच्या जवाबात म्हटले असल्याचे समोर येत आहे.

*40 ते 50 महिलांची गर्भलिंग तपासणी केल्याचे उघड!

जालन्याचे डॉ. गवारे यांना अटक झाल्यानंतर मार्च 2022 पासून सतीश सोनवणे हा गेवराईत येऊ लागला. त्याला एका सोनोग्राफीसाठी 10 हजार रुपये मिळत होते. साधारण तीन ते साडेतीन महिन्यात त्याने जवळपास 40 ते 50 महिलांची तपासणी केली असल्याचे त्याच्या जावाबात त्याने म्हटले आहे. एवढ्या कमी कालावधीत त्याने तब्बल 5 लाख रुपये कमावले आहेत.

*शीतल गाडे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याच्या मागणीने का धरला जोर ?

मृत शितल गाडे प्रकरणातील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाची सी.आय.डी (CID) मार्फत चौकशी करावी, तपासात हलगर्जीपणा बद्दल सहपोलिसनिरीक्षक बाळासाहेब आघाव यांना निलंबित करा, संबंधित प्रकरणातील आरोपींची व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा, मृत नर्स सीमा डोंगरे हिची आत्महत्या की हत्या? याची सखोल चौकशी करा, अशा मागण्यांनी आता चांगलाच जोर धरला आहे. या प्रकरणातील तपासात विविधता आढळून येत असल्याचे आणि तसेच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

*बक्करवाडीत नेमके किती झाले अवैध गर्भपात ?

शीतल गाडे या महिलेचा अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात झाल्या कारणावरून तिचा नाहक जीव गेला आणि बीड जिल्ह्यातील छुप्या पद्धतीने सुरू असलेले गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेटच समोर आले. मात्र एकटी शीतल गाडेच या घटनेची शिकार आहे का? तर नाही अशा असंख्य महिलांना त्याच्या मनाच्या विरुद्ध जाणून त्यांचा गर्भ रिकामा करावा लागला तर काही महिलांना आपला जीवही गमवावा लागला. मात्र त्या महिलांना न्याय मिळाला नाही, त्यांच्या प्रकरणाला कोणी वाचाच फोडली नाही. एकट्या बक्करवाडी येथील झालेल्या गर्भपाताची चौकशी झाली तर पायाखालची जमीन सरकेल एवढे प्रकरण समोर येतील असा दावा येथील स्थानिक लोकांनी केला आहे. तर मग जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात खूप मोठी साखळी परत उघड होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

मात्र खरच या सर्व प्रकरणाला सी.आय.डी कडे सोपवले जाणार का? बक्करवाडी गावच्या स्थानिकांच्या म्हणण्याला गांभीर्याने घेतले जाणार का? या सर्व प्रकरणाला प्रशासन कोणत्या पद्धतीने हाताळते याकडे मात्र राज्याचे लक्ष लागले आहे.

खिशात पैसे नसले, तरी एसटी प्रवास करता येणार.. एसटी महामंडळाने केल्या या सुविधा सुरू!


एसटी प्रवासात सुट्ट्या पैशावरून प्रवासी नि कंडक्टर (वाहक) यांच्यात होणारे वाद काही नवीन नाहीत. त्यातून बऱ्याचदा मोठ्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, आता असे वाद होणार नाहीत. एसटी महामंडळाने असे प्रकार टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशात एक पैसा नसला, तरी त्यांना एसटी प्रवास करता येणार आहे..

सध्या मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट केलं जातंय. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सुमारे पाच हजार नव्या स्वाईप मशिन खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना ‘फोन पे’, ‘गुगल-पे’ अशा ‘युपीआय’द्वारे (UPI) पैसे देऊन एसटी (ST) तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे सुट्या पैशांचा प्रश्नच राहणार नसल्याचे दिसते..

एसटी महामंडळाने पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 एसटी विभागांना नवे ‘स्वाईप मशीन’ दिले आहेत. उर्वरित विभागांना जुलैमध्ये हे मशी दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता रोख रक्कमही जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही..

काही महिन्यापूर्वी एसटी प्रशासनाने ‘स्वाईप मशिन’द्वारे (Swipe mashin) तिकीटे देण्याची पद्धत सुरू केली. मात्र, त्यावेळी केवळ डेबिट व क्रेडिट कार्डद्वारेच तिकीटे दिले जात होती. त्यातही अनेकदा अडचण येत. बऱ्याचदा या मशीन बंद पडत असत. ही बाब लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने नव्या प्रणालीत आवश्यक ते बदल केले आहेत.

नव्या मशीनमध्ये ‘युपीआय’ची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना स्मार्टफोनमधील विविध पेमेंट ॲपच्या साहाय्याने एसटी तिकीट काढता येणार आहे.. पूर्वीच्या तुलनेने अद्ययावत प्रणाली सुरु केल्याने प्रवाशांची सोय होणार आहे..

एसटीच्या नव्या प्रणालीबाबत…

  • एसटी प्रशासनातर्फे पहिल्या टप्प्यात सात विभागांत सेवा दिली जाणार. त्यात लातूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, चंद्रपूर व भंडारा विभागांचा समावेश.
  • राज्यातील उर्वरित विभागांत जुलैपासून नवे मशीन उपलब्ध होतील.
  • वाहकांना ‘युपीआय’बाबत विशेष प्रशिक्षण
  • नव्या स्वाईप मशिनमध्ये ‘क्यूआर’ कोडचा समावेश असेल. तो स्कॅन केल्यानंतर प्रवाशांना तिकिटाचे पैसे देता येतील.

याबाबत एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) सुहास जाधव म्हणाले, की ‘प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने 5 हजार मशीन खरेदी केले असून, वाहकांना प्रशिक्षण दिले जात आहे. लवकरच प्रवाशांना युपीआय ॲपद्वारे तिकीट मिळण्यास सुरुवात होईल.

गुत्तेदराच्या हलगर्जी पणामुळे नागरिकांचे हाल.

वाकनाथपुर (प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील ग्रामीण भागात कोणत्या ही विकास होत नाही काही गावांना डांबरी रोड नाही आणि ज्या गावात डांबरी रोड होते त्या रोड वरती डांबर राहिले नाही. कोणतेही लोक प्रतिनिधी या कडे लक्ष देत नाही बीड तालुक्यातील मौजे वाकनाथपुर येथे आता पर्यंत कोणत्याही बाजूने डांबरी रस्ता नाही या गावातील नागरिक आतापर्यंत खुप हाल सहन करत आहेत. आता कोठे तरी तीन वर्ष पूर्वी या गावाला वाकनाथपुर ते म्हाळस जवळा हा रस्ता गेले तीन 

वर्ष पासुन मंजूर झालेला आहे. पण या रोड चे जे गुत्तेदार आहेत त्यांनी फक्त या रोड वर खडी आणि मुरुम टाकून काम बंद केले आहे. या गावातील नागरिकांनी अनेक वेळा गुत्तेदारांना सांगून देखील गुत्तेदार काही केल्या काम सुरू करत नाहीत. रोड वर मुरुम टाकल्याने पाऊस पडताच या रोड वर चिखल होतो. आणि या गावातील वाहने बाहेर ही निघत नाहीत या रस्त्यामुळे या गावातील नागरिकांना खुप ञास सहन करावा लागत आहे. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या कामाची चौकशी करून योग्य कारवाही करून रोड चे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.