परळी वैजनाथ (प्रतिनीधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदू जननायक सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१४/०६/२२ मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या परळीतील विविध सामाजिक उपक्रमात अनुक्रमे सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास व सकाळी ७ वाजता प्रभु वैद्यनाथ चरणी जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांच्या हस्ते दुग्ध अभिषेक करण्यात आला तसेच त्यानंतर सकाळी ९ वाजता मराठवाडा क्लिनिक, राज फार्मा पावरलुम सोसायटी इंडस्ट्रीयल एरिया येथे मनसेचे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या संकल्पनेतून आयोजित सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन मनसे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांच्या हस्ते करण्यात आले,
तसेच उपस्थित रुग्णांना वृक्ष देऊन वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे प्रदेश चिटणीस तथा परळी तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर व मनसे जिल्हा सचिव तथा मनसे वृतांत अधिकृत फेसबुक पेजचे सचांलक मारुती दुनगे मार्गदर्शनाखाली शहर उपाध्यक्ष गणेश चव्हाण, प्रशांत कामाळे, सुमित कलशेट्टे, महेश शिवगण, ऋषिकेश बारगजे यांनी समजावून सांगितले.
सर्व रोग निदान शिबिरात परळी शहरातील एकुण २५४ रुग्णांनांची मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार करण्यात आला.
या कार्यक्रमात रुग्णांना तपासणी करण्यासाठी डॉ.पांडुरंग फड (अस्ती रोग तज्ञ), डॉ.पवन सांवत (नेत्र रोग तज्ञ) अभिषेक धायगुडे (नेत्र चिकित्सक), डॉ.स्वाती भाजीभाकरे (दंत रोग तज्ञ), डॉ.माया समशेट्टे(स्त्री रोग तज्ञ), डॉ.दिपक पाठक (जनरल फिजीशीयन), डॉ.अशोक मंत्री (जनरल फिजीशीयन), यांचे सहकार्य लाभले.
तर मनसेचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल दादा झिलमेवाड, लॅब टेक्निशियन शिध्दार्थ लांडगे, स्वाती दहीवडे, सुरज पाटील, धनराज आवाड यांनी उपस्थित डॉक्टरांना व रूग्णांना मदत केली,
या कार्यक्रमात उद्घाटक मनसे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांचे व मनसे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर भाषण झाले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनसे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी केले तसेच सुत्र संचालन शहर उपाध्यक्ष गणेश चव्हाण यांनी केले त्याच बरोबर उपस्थित डॉक्टर व रुग्ण तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार अॅड.अर्जुन सोळंके यांनी आपल्या रोखठोक भाषणात मानले.
या कार्यक्रमास मनसे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भाऊ दहीवाळ, मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुनील जगताप, मनसे जिल्हा सचिव रवी नेमाने, मनसे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार, मनविसे अंबाजोगाई तालुका अध्यक्ष नितीन परदेशी, मनविसे परळी शहर अध्यक्ष हनुमान सातपुते, रामलींग घनचेकर, कोंडीबा कुकर, माणीक लटींगे, सुहास विर, धनंजय गाडवे, सोमनाथ राजनाळे, किशोर कुरे, श्रीमंत फड, काशीनाथ कापसे, सुनील भोसले,शिवराज सोनटक्के, बालाजी चुणचुणे,आबा गित्ते, गणेश गित्ते,अनिल म्हस्के, अभिषेक नागरगोजे,नरेश नागरगोजे, प्रशांत नागरगोजे,पार्थ नागरगोजे, गणेश नागरगोजे, दिनेश फड,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment