ईश्वरी रमेश भोसले वय 7 वर्षे असं मयत चिमुकलीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जालना शहरातील चौधरी नगर भागात एका घरातील बाथरूममध्ये मुलीचा गळा कापल्याची घटना घडली आहे.असा फोन पोलिसांना आला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत जखमी मुलीला संतकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. यावेळी ईश्वरीच्या हातावर व गळ्यावर जखमा असल्याचे पाहायला मिळाले. तसेच तिच्या चेहऱ्यावर देखील वार करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयात जाताच ईश्वरीचा मृत्यू झालेला होता.सोमवार दि.28नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ईश्वरी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. यावेळी तिच्या मागोमाग आलेल्या चुलत बहिणीने बाथरूमचा आतून दरवाजा लावून घेतला. त्यानंतर ईश्वरीच्या गळ्यावर आणि हातावर वार केले, यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर बाथरूममध्ये सर्वत्र रक्तच-रक्त पाहायला मिळत होते. अल्पवयीन आरोपी मुलीने ही हत्या का केली याबाबत अजूनही कोणतेही माहिती समोर आलेली नाही.दरम्यान
ईश्वरी भोसले वय 7 वर्षे ही मुलगी युकेजीच्या वर्गामध्ये खरपुडी रोडवरील एका इंग्रजी शाळेत शिक्षण घेत आहे. ईश्वरीचे आई-वडील शेतकरी असून त्यांनी तिला शिक्षणासाठी जालना येथे चौधरीनगरात राहणाऱ्या काका गणेश भोसले यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवले होते. त्यामुळे ती आपल्या चुलत्याकडेच राहत होती. ईश्वरीच्या काकाची रक्तलघवी तपासणी लॅब घनसावंगी तालुक्यात असल्याने दररोज ते जालना येथून येणे-जाणे करतात. आज सोमवारी सकाळी ईश्वरी शाळेत जाणार होती. 8 वाजेच्या सुमारास ईश्वरी ही अंघोळीसाठी करण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.ईश्वरी अंघोळीसाठी जाताच अल्पवयीन आरोपी मुलगी देखील बाथरूममध्ये घुसली. तिने आधी दरवाजा आतमधून बंद करून घेतला. त्यानंतर तिने ब्लेडने ईश्वरीच्या गळ्यावर, हातावर, मानेवर वार केले. ईश्वरीच्या किंचाळण्याच्या आवाजाने काकू आणि अन्य लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी मुलीने आधी बाथरूममधील रक्त धुवून काढलं आणि त्यानंतरच दार उघडले. पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मूलीस ताब्यात घेतले असून खूनाचा गून्हा दाखल करण्यात आला आहे.
Wednesday, November 30, 2022
राज्य सरकार करणार जि. प. च्या 30 हजार शिक्षकांची मेगा भरती, 'या' महिन्यात होणार 'टेट' परीक्षा.
काळ आला होता पण...'पुलावरून खाली कोसळला पिकअप; पोलिसांच्या सतर्कतेने चालक सुखरूप.
कडा (कांतीकारी साथी न्युज) - वेळ आज पहाटे अडीज वाजेची शेवगाववरून कांदा भरून एक पिकअप कडा येथील येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येत होता. पैठण बारामती रोडवरील कडा नजीक अचानक चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पुलावरून खाली कोसळले. याच वेळी पेट्रोलिंग करत असलेल्या कडा पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत चालकाल बाहेर काढले. यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. हा प्रसंग पाहून काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचीती आली.
शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील सोमनाथ कचरू जाधव हा मंगळवारी रात्री पिकअप ( क्रमांक एम.एच २०,डी.ई.६८९९) मध्ये कांदा गोण्या घेऊन कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पैठण बारामती रोडने येत होता. कडा नजीक येताच चालकाला झोप लागल्याने अनियंत्रित पिकअप पुलाच्या खाली गेले. यात चालक वाहनात अडकून पडला.
याचवेळी नाईट राऊड पेट्रोलिंग करत असलेले कडा पोलिस चौकीचे हवालदार बाबासाहेब राख, वाहन चालक प्रदिप घोडके यांना हे दृश्य दिसले. त्यांनी लागलीच अपघातग्रस्त वाहनाकडे धाव घेतली. प्रयत्न पूर्वक पोलिसांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले. पोलिसांच्या सतर्कतेने जाधवचे प्राण वाचले. भल्या पहाटे पोलिस देवाच्या रूपात पुढे उभा ठाकल्याने मला जिवदान मिळाल्याची प्रतिक्रिया चालक सोमनाथ जाधव याने दिली.
मोठी बातमी ! देवस्थान जमीन घोटाळ्यात भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल.
नवाब मलिकांची तुरूंगातून सुटका होणार? जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, नवाब मलिक हे सरकारमधील मंत्री होते. त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून ईडीने त्यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती. याशिवाय गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात नवाब मलिक यांनी आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोपही ईडीकडून करण्यात आला.
यापूर्वी नवाब मलिक यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणी अजून वाढणार हे पाहावे लागणार आहे. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या कचाट्यातून सुटले असून अनिल देशमुखांना देखील ईडीचा जामीन मिळाला आहे. आता मलिकांना देखील आज सकाळी 11 वाजता मुंबई सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. आता नवाब मलिक यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संतापजनक घटना.! रिपाइंच्या (आठवले) जिल्ह्याध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल महिलेला गरोदर करून, तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण...
औरंगाबाद (प्रतिनिधी) औरंगाबाद येथून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली असून, एका महिलेला गर्भवती करून.! नंतर तिला मारहाण करीत तिचं गर्भपात केल्याचं सांगण्यात येत आहे. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्यावर औरंगाबादमधील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेमुळे औरंगाबाद शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगू लगलई आहे. घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
सविस्तर माहिती अशी की, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्यावर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विवाहित महिलेसोबत बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहित महिलेच्या पतीला धमकावून तिला पतीपासून विभक्त केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. तसेच तुझ्या मुलांना सांभाळेल, तुझ्या सोबत लग्न करेल, तुला घर देईल असे आमिष दाखवून शहरातील राजनगर परिसरात रूम घेऊन वारंवार महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिंदे सरकारचा अतिक्रमणासंदर्भात मोठा निर्णय.! गायरान जमिनीवरील एकही घर पडणार नाही?
पुणे (प्रतिनिधी) मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एक-दोन नव्हे तर लाखो नागरिकांना टेंशन देणारा निर्णय म्हणजे.! कोर्टाने दिलेला गायरान आणि वन जमणीवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय. परंतु, या निर्णयावर तोडगा काढत; राज्य सरकार लवकरच महत्वाचा निर्णय घेण्याचा विचारात असून, गायरान जमिनीतील अतिक्रमणधारकांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात गायरान जमिनीवरील अतिक्रिमण हटवण्यासंदर्भात गावागावात नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, गायरान जमीनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत असा निर्णय आज घेतला आहे. त्यामुळं राज्यातील सुमारे सव्वादोन लाख कुटुंबांना याचा फायदा मिळणार असून, गायरान जमिनीतील अतिक्रमणधारकांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
तर लवकरच यासंदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करणार असल्याचे मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
औरंगाबादकरांची चिंता वाढली; राज्यातील गोवरग्रस्त 11 शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश.
कोरोनाच्या कचाट्यातून सावरत असतानाच आता राज्यामध्ये गोवर या आजार थैमान घातले आहे. सुरुवातीला मुंबईमध्ये या आजाराची रुग्ण आढळून आली होती त्यानंतर हळूहळू हा आजार इतर शहरांमधे पसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुलांसाठी शहरातील 40 आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येतीय. पालकांनी आपल्या मुलांना या आजारापासून दूर ठेवायचं असेल तर त्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
*वडाळ्यात ५ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू.
मुंबईत गोवरने 15 वा बळी घेतला आहे. वडाळा येथे राहणाऱ्या गोवर संशयित पाच महिन्यांच्या मुलाचा गोवरने मृत्यू झाला. या मुलाला सर्दी, खोकला, ताप, चेहरा तसेच छातीवर पुरळ अशी लक्षणे होती. मुंबईत गोवर रुग्णसंख्या वाढतच असून मंगळवारी दिवसभरात 118 गोवर संशयित रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईतील एकूण गोवर संशयित रुग्णांची संख्या आता 4 हजार 180 वर पोहोचली आहे. तर गोवर निदान झालेल्यांची संख्या 308 झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी गोवर संशयित मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील गोवर संशयित मृतांचा आकडा 15 झाला आहे.
*गोवर कशामुळे होतो?
गोवरचा संसर्ग हा नेमका कशामुळे होतो? हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. जेणेकरून त्यापासून बचाव करता येईल. गोवर हा आर एन ए विषाणूजन्य आजार आहे. हा पॅरामिक्सोव्हायरस प्रकारचा विषाणू मानवी शरीराबाहेर तग धरू शकत नाही. गोवराच्या एका रुग्णाकडून इतर बालकांपर्यंत त्याचा प्रसार होतो.
*गोवरची लक्षणे कोणती?
प्रत्यक्ष गोवराची लक्षण दिसून येण्याआधी आणि पुरळ उठण्याच्या सुरवातीच्या काळात हा संसर्गाचा जोर सर्वात जास्त असतो. पुरळ येण्यापूर्वी ४ दिवस व पुरळ उठल्यानंतरचे ४ दिवस संक्रमणाच्या दृष्टींने सर्वात महत्वाचे असतात. या काळात रुग्ण्याचे विलगीकरण आवश्यक ठरते. एकदा गोवर होऊन गेल्यास सहसा परत गोवर होत नाही. शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणारे द्रावकण या विषाणूच्या संसर्गास कारणीभूत असतात.
दोन दिवसांपासून घरी नसलेल्या युवकाचे धक्कादायक कृत्य.ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टर मधून घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार.
माजलगाव (कांतीकारी साथी न्युज) तालुक्यातील शृंगारवाडी फाट्याजवळ दोन ट्रॉल्या घेऊन भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या एसटी बसवर अचानक ट्रॅक्टरमधील युवकाने उडी मारली. यामुळे तो एसटीच्या डाव्या बाजूला धडकून रोडवर आदळला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. गजानन मारोती बनाईत (३२, रा. शुक्लतीर्थ लिमगाव ता.माजलगाव ) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिरसदेवीहून २ ट्रॉल्या असलेले ट्रॅक्टर कोळसा घेऊन माजलगावकडे जात होते. याच दरम्यान पाठीमागून एक बस ( कल्याण - वसमत, एम.एच.20 बी.एल.4088 ) ओव्हरटेक करत होती. बस ट्रॅक्टरच्या पुढे निघत असतानाच मागील ट्रॉलीमध्ये बसलेल्या गजानन मारोती बनाईतने अचानक बससमोर उडी मारली. एसटीच्या डाव्या बाजूला समोरील टायरच्या बाजूला तो धडकडा. त्यानंतर तो खाली आदळला. गजाननच्या ओरडण्याने आजूबाजूचे नागरिक बसकडे धावले. मात्र, खाली आदळून डोक्याला पाठीमागून जबर मार लागल्याने गजाननचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान संबंधित ट्रॅक्टर चालकाने तेथून पळ काढला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Tuesday, November 29, 2022
जागतिक एड्स दिन रॅली व जनजागृती कार्यक्रमांनी होणार साजरा.
बीडमध्ये हौशी नाट्य स्पर्धेस प्रारंभ. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते झाले उदघाटन.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मिल्लिया कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश दहा विद्यार्थ्यांची एमबीबीएस साठी निवड.
शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना बायोमेट्रिक हजेरीनुसारच वेतन आणि भत्ते.
- आरोग्य विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश.
मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना आता बायोमेट्रिक हजेरीनुसार वेतन आणि भत्ते मिळणार आहेत. आरोग्य विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतल्याने आरोग्य विभागात डॉक्टरांना चांगलाच घाम फुटला आहे.
तुकाराम मुंढे यांनी वैद्यकीय अधिका-यांसाठी एक अनोखा फतवा काढला असून, आता डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही बायोमेट्रिक हजेरीच्या नुसारच त्यांना त्यांचे वेतन आणि भत्ते देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय रुग्णालयांत नेमणूक झालेले डॉक्टर खासगी रुग्णालयात देखील सेवा देत असतात. त्यामुळे हे करत असताना शासकीय रुग्णालयांत उशिरा येणे किंवा सुट्टी घेऊन हजेरी पटावर हजर असल्याचा शेरा मारणे असे प्रकार करण्यात येतात. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बायोमेट्रिक हजेरीनुसार, डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन आणि भत्ते देण्याचा फतवा काढला आहे.
नाहीतर शिस्तभंगाची कारवाई होणार
त्याचप्रमाणे शासकीय सेवेत कार्यरत असणा-या आपल्या कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिका-यांची नावे, खासगी रुग्णालयांची नोंद, अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची तपशीलवार माहितीसह यादी सदर करावीअसे आदेश देण्यात आले आहेत.तसेच ही पद्धत अंमलात न आणल्यास अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे दांडीबहाद्दर आणि बेजबाबदार अधिकारी आणि डॉक्टरांना चांगलाच चाप बसणार आहे.
कर्तव्यनिष्ठ आय.ए.एस.अधिकारी तुकाराम मुंढें याची पुन्हा बदली.
मुंबई (प्रतिनिधी) आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मात्र अद्याप त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंढेंची बदली करण्यात आली आहे. कोणत्या विभागात बदली झाली याबाबत अजुनही स्पष्टता नाही.
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. आयुक्त, कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावरुन त्यांना पदमुक्त करण्यात आलंय. मात्र, कुठे बदली होणार हे अजून स्पष्ट नाही.
आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे हे 2005 सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. ते ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणच्या नागरिकांत त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत होतं.सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंढेची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं दिसत होतं. सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र यायचे. परिणामी तुकाराम मुंढेंची बदली व्हायची. असे असले तरी नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंढेंनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केला नाही हे विशेष.
आता मोबाईल नंबर सोबत नाव आणि फोटो कॉलिंगवर दिसणार.
मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना भूसंपादनाअभावी खीळ. विभागीय आयुक्तांनी दिले आदेश : भूसंपादन तातडीने पूर्ण करा.
माहिती अधिकारात मिळवली शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची कोरी सेवा पुस्तिका.
बीड (प्रतिनिधी) माहिती अधिकारातून केवळ शासकीय माहिती प्राप्त होते हे सर्वश्रुत आहे, मात्र त्याही पलिकडे जाऊन गेवराई येथील एका माहिती अधिकार प्रशिक्षक तथा अभ्यासकाने माहिती अधिकारातून राजपत्रित व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असणारी कोरी सेवा पुस्तिका मिळवली आहे. या कोऱ्या सेवा पुस्तिकेवर माहिती अधिकाराचे शिक्के असून शासकीय दस्त असल्याने ती प्राप्त झाली आहे. कोरी सेवा पुस्तिका मिळत असल्याने विद्यमान किंवा कार्यरत अधिकाऱ्यांची सेवा पुस्तिका मिळण्याचा मार्ग खुला झाला असल्याचे मानले जात आहे.
गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील किरण नारायण नंनवरे हे माहिती अधिकार अभ्यासक असून पुणे येथील यशदाचे प्रशिक्षण प्राप्त असलेले अभ्यासक यांनी मुंबई येथील मंत्रालयातील मुख्य सचिवांना माहिती अधिकाराच्या २००५ च्या कलम २ (त्र) किंवा अन्य कलमानुसार शासन सेवेत आल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणारी सेवा पुस्तिका कोरी स्वरुपात द्यावी अशी मागणी केली. जी माहिती संसदेला किंवा राज्य विधान मंडळाला देण्यास नकार देता येणार नाही ती माहिती कोणत्याही व्यक्तीला देण्यासही नकार देता येणार नाही अशी टीप नंनवरे यांनी सदरील माहिती अधिकारी पत्रावर टाकली होती. प्रारंभी त्यांना नकार देण्यात आला मात्र प्रथम अपिलीय अधिकारी तथा सह सचिव रा.का. धनवाडे यांच्या समोर सुनावणी झाली.नंनवरे यांनी माहिती अधिकारी अधिनियमातील कलम ६ (३) अन्वये हस्तांतरीत करणे किंवा माहिती अधिकार अधिनियमातील कलम २ त्र (३) नुसार माहिती देणे अपेक्षित असल्याचे अपिलमध्ये नमूद केले होते. सुनावनी दरम्यान झालेल्या युक्तीवादानंतर सह सचिव धनवाडे यांनी किरण नंनवरे यांना कोरी सेवा पुस्तिका निशुल्क उपलब्ध करुन देण्याबबात संबंधितांना आदेशीत केले.
काय असते सेवा पुस्तिकेत ?
शासन सेवेत असणाऱ्यांसाठी सेवा पुस्तिकेला अनन्य साधारण महत्व आहे. या पुस्तिकेचा नमूना शासनाच्या वित्त विभागामार्फत तयार करण्यात येतो. त्याची छापाई पुणे येथील शासकीय मुद्राणालयात होते. शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या राजपत्रित व अरापत्रित शासकीय कर्मचाऱ्यांकरीता एकाच दर्जाचे सेवा पुस्तक वापरण्यात येते. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येक स्वतंत्र सेवा पुस्तिका दिली जाते. त्यामध्ये संबंधित कर्मचारी यांची चौकशी, बदली, दंड यासह इतरबाबी त्यात वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी नोंदी घेतात. त्यामुळे सेवा पुस्तिकेला विशेष महत्व असते.
बालविवाह रोखण्यास गेलेल्या पोलिसांना वधूच्या आईची आत्महत्येची धमकी .पोलिस झाले हैराण.
*पोलिसांनी विचारपूस सुरू केल्यावर लग्न नव्हे तर साखरपुडा आहे, असे सांगितले गेले. मात्र, मांडवात नवीन गादी, पलंग व संसारोपयोगी वस्तू मांडलेल्या होत्या.
बीड (कांतीकारी साथी न्युज) शहरातील काळे गल्ली भागात बालविवाह रोखण्यास गेलेल्या पोलिसांना वधूमातेने आत्महत्येची धमकी दिली. त्यामुळे पोलिस हैराण झाले. अखेर तिला समजावत नियोजित विवाह रोखण्यात आला. २८ नोव्हेंबरला दुपारी हा प्रकार घडला.
बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांना शहरातील काळे गल्लीत १७ वर्षीय मुलीचा हिवरसिंगा (ता. शिरूर) येथील तरुणाशी विवाह लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून २८ रोजी ते शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. सहायक निरीक्षक महादेव ढाकणे यांनी चार अंमलदार सोबत दिले. त्यानंतर तत्त्वशील कांबळे व पोलिस अंमलदार काळे गल्लीत पोहोचले. तेथे पोलिस येणार असल्याची कुणकुण लागताच सामानाची आवराआवर करून वधू-वरांना पांगविण्यात आले. पोलिसांनी विचारपूस सुरू केल्यावर लग्न नव्हे तर साखरपुडा आहे, असे सांगितले गेले. मात्र, मांडवात नवीन गादी, पलंग व संसारोपयोगी वस्तू मांडलेल्या होत्या. त्यामुळे हा विवाहच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केल्यावर वधूमातेने गोंधळ घालत थेट आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर तिला पोलिस व नातेवाइकांनी समजावले. वधूसह मातेला बीड शहर पोलिस ठाण्यात नेऊन समुपदेशन केले. त्यानंतर अल्पवयीन वधूला बालकल्याण समितीपुढे हजर केले. समितीने मुलीला स्वाधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.
*ठाण्यात बोलावून समजावले.
बालविवाह होणार असल्याच्या माहितीवरून अंमलदार पाठवले होते. मुलीच्या आईने गोंधळ घातला; पण नंतर ठाण्यात बोलावून समजावले. शासकीय कामकाजात अडथळा व आत्महत्येचा प्रयत्न तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद होऊ शकतो, असे समजावल्यावर त्या शांत झाल्या.- महादेव ढाकणे, सहायक पोलीस निरीक्षक, बीड शहर ठाणे
माहेरहून पाच लाख रुपये दे नाही तर घटस्फोट दे .हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ..
*एका विवाहीतेला माहेरहून ५ लाख रुपये आण नाहीतर घटस्फोट देईल अशी धमकी देण्यात आली आहे.
उदगीर (प्रतिनिधी) आजही अनेक गावांमध्ये हुंडा प्रथा सुरू आहे. लग्न झाल्यावर देखील अनेक मुलींकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली जाते. आता देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहीतेला माहेरहून ५ लाख रुपये आण नाहीतर घटस्फोट देईल अशी धमकी देण्यात आली आहे. या घटनेत ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील अनुसया राहुल देवर्षे (बोडके) यांचा कर्नाटकातील खेरडा येथील राहुल सुदाम देवर्षे यांच्यासोबत २४ मे २०१० रोजी यांचा विवाह झाला. विवाहात त्यांच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना ५ लाख रुपये, दोन तोळे सोने आणि लग्नाचा सर्व खर्च करून दिला होता. लग्नाला एक महीना होत नाही तोच, सासरच्या मंडळींची वागणूक बदलली. त्यांनी अनुसया यांना त्रास द्यायला सुरुवात केली. तु खूप काळी आहेस, तुझ्या वडलांनी कमी हुंडा दिला. दुसरी असती तर जास्त हुंडा मिळाला असता असे तिला बोलू लागले.
सुरू असलेला त्रास त्यांनी माहेरी सांगितला. त्यानंतर त्यांच्या वडीलांनी गावातील काही माणसांसह मध्यस्ती करून सांगितले होते की, माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. शक्य होतं तितकं मी केलं आहे. काही दिवसांनी महिलेला पुन्हा सासरच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरूवात केली. यावेळी ५ लाख द्यायचे नसतील तर घटस्फोट दे असे त्यांना सांगितले. तसेच तिला मारहाण करण्यात आली.
त्यामुळे महिलेने लातुरमधील महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दिली गेली. त्यांनी वाढवणा पोलिस ठाण्यास पत्र पाठवून सदर घटनेची दखल घेण्यास सांगितले. यावर पीडितेच्या तक्रारीवरून पती राहुल सुदाम देवर्षे , दीर योगेश, नणंद, सासू विमलबाई यांच्यासह आणखीन दोघांविरुध्द वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाईतील कुख्यात गुंड मोहन मुंडे हर्सूल कारागृहात स्थानबध्द.
अंबाजोगाई (कांतीकारी साथी न्युज) व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागणाऱ्या अंबाजोगाईतील कुख्यात गुंडावर एमपीडीए नुसार कारवाई केली आहे. त्यास २८ नोव्हेंबरला ताब्यात घेऊन २९ रोजी पहाटे औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात स्थानबध्द करण्यात आले.
मोहन दौलत मुंडे (२९,रा.क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द केज, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात खंडीण मागणे, दिवसा व रात्री घरफोडी करणे, शिवीगाळ करुन जीेवे मारण्याच्या धमक्या देणे, दरोड्याची तयारी करणे, अवैध शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे आठ गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी चार गुन्हे न्यायप्रविष्ठ असून चार तपासावर आहेत. त्याच्याविरुध्द एमपीडीएनुसार(झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) कारवाईचा प्रस्ताव अपर अधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करुन शहर ठाण्याचे पो.नि.बाळासाहेब पवार यांनी पोलीस अधीक्षकांना पाठवला.
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी २६ नोव्हेंबरला एमपीडीए कारवाईस मान्यता दिली. त्यानंतर अंबाजोगाई शहर ठाण्याचे पो.नि.बाळासाहेब पवार, स्थानकि गुन्हे शाखेचे पो.नि. सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली २८ रोजी मोहन मुंडे यास ताब्यात घेतले. अंबाजोगाई शहर ठाण्यात हजर करुन नंतर त्याला बंदोबस्तात हर्सूल कारागृहात पाठवले. गुन्हे शाखेचे हवालदार अभिमन्यू औताडे, अंबाजोगाई शहर ठाण्याचे पो.ना.वाडकर, गोरे यांचा या कारवाईत सहभाग होता.
* प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही गुन्हे.
अंबाजोगाई शहरातील व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावल्याचे प्रकरण अलीकडेच गाजले होते. गंभीर गुन्हे करत असल्याने पोलिस त्याच्यावर वॉच ठेऊन होते. दरम्यान, २२ सप्टेंबर २०२२ रोजी त्याच्या प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली होती. मात्र, यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट गुन्हे करत सुटला होता.
भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल पदावरून हकालपट्टी करा - स्वराज्य संघटनेची मागणी.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा मुरारी रजेवर .
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुभाष देसाई यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी होणार होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा मुरारी रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणी पुन्हा कधी सुरू होईल हे अद्याप स्पष्ट नाही.
लिखित बाजू मांडण्याचे दिले होते निर्देश-
एक नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही पक्षकारांना निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, दोन्ही पक्षकार संयुक्तपणे लिखितपणे आपली बाजू न्यायालयात मांडतील. त्याशिवाय, त्याला जोड असणारे कागदपत्रे देखील जोडतील. जेणेकरून एक समान मुद्दे तयार होतील. येत्या चार आठवड्यात ही लिखित बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. घटनापीठासमोर उपस्थित होणारे अथवा निर्णय घेण्यासाठी जे मुद्दे मांडण्यात येतील ते घटनापीठासमोर संयुक्तपणे सादर करण्यात येतील.
थोडक्यात मुद्दे
* स्पीकरच्या विरोधात अविश्वास नोटीस दाखल केली असेल तर उपाध्यक्षांना आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार राहतो का? नेबम रेबिया जजमेंट नुसार.
* अपात्रता प्रलंबित असताना विधानमंडळातील कामकाज वैध आहे का? त्याचं काय स्टेट्स आहे.
* जर स्पीकरने अपात्र घोषित केले तर ज्या दिवशी आमदारांनी शिस्तभंग कारवाई केली त्या दिवशी लागू होते की ज्या दिवशी अपात्र केले त्या दिवसापासून.
* अध्यक्षाला नेता/व्हीप ठरवण्याचा अधिकार आहे का? याचा 10व्या अनुसूचीवर पक्षांतर बंदी कायद्यावर काय परिणाम होतो का?
* पक्षाच्या अंतर्गत निर्णय यात न्यायालयाने लक्ष घातले पाहीजे का?
* राज्यपालाचे एखाद्या पक्षाला सरकार स्थापन करण्यास आमंत्रित करण्याचे काय अधिकार आहेत. असे अधिकार चॅलेंज करता येतात का? निवडणूक आयोगाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 27 सप्टेंबरला निर्णय दिला आहे.
* स्प्लिटच्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोगाला काय अधिकार आहेत. निवडणूक आयोगाचे कार्यक्षेत्र किती मोठे आहे.
Monday, November 28, 2022
शाळेत जाण्यासाठी पालक रागवले म्हणून 14 वर्षीय मूलीने पाच वर्षीय चुलत बहिणीचा बाथरूममध्ये कोंडून ब्लेडने गळ्यावर वार करत केली हत्या.
परळी विधानसभा मतदारसंघातील धरणाचे पाणी शेतकऱ्यांना कधी मिळणार ;- वसंत मुंडे
परळी शहरातील भीम नगर येथील बुद्ध विहाराचं बांधकाम केव्हा होणार :- प्रेम जगतकर.
हेळंब येथे खंडोबा मंदिरात तीन दिवसशीय यात्रोत्सव आजपासून प्रारंभ.पालखी सोहळा, वाघ्या मुरळी,कुस्त्यांची दंगलीसह विविध कार्यक्रम.
वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत श्रमदान. समाज बांधवांचा पुढाकार.साप्ताहिक श्रमदानातून स्मशानभूमीचा परिसर होत आहे स्वच्छ.
पिक विमा कार्यालयात तोडफोड स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.
खुर्च्याची तोडफोड
योग्य प्रतिसाद सकारात्मक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांनी आक्रमक पवित्रा घेत पिक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्याची तोडफोड केली. यावेळी आठ दिवसात जर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम मिळाली नाही. तर पिक विमा कार्यालय पेटवून देण्याचा इशारा देण्यात आला. तर यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पिक विमा कंपनीच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पदमुक्त होण्याच्या चर्चामध्ये. तथ्य नसल्याचं राजभवनाकडून माहिती.
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी गेल्या काळापासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहेत. विरोधकांनी तर त्यांना हटवण्यासाठी आंदोलनं सुरु केली आहे. याचा पार्श्वभूमीवर राज्यपालांनी स्वत: पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. मात्र या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं राजभवनाकडून स्पष्टीकरण आलं आहे.
राज्यपाल यांच्याबाबत माध्यमांमध्ये येणारी बातमी चुकीची असल्याचे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे.
राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत होती. राज्यपालांना हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरु आहेत.
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. दरम्यान शिंदे गटानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे.
स्टेअरिंगला हिसका देऊन खुनाच्या आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न; जीप उलटून ४ पोलिस जखमी.
बीड (कांतीकारी साथी न्युज) खून प्रकरणात कोठडीत असलेल्या आरोपीने घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी नेताना धावत्या जीपमध्ये चालकाला हिसका दिला. यानंतर जीप उलटून चार पोलीस, दोन पंच व आरोपी असे सात जण जखमी झाले. पाटोदा- मांजरसुंबा महामार्गावरील ससेवाडी फाट्याजवळ २८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
रोहिदास विठ्ठल निर्मळ (रा. मुळूकवाडी ता. बीड) असे आरोपीचे नाव आहे. २६ रोजी सकाळी शेतीवादातून त्याने चुलते बळीराम मसाजी निर्मळ (७५) यांचा कोयत्याने सपासप वार करून खून केला होता. त्याने चुलती केशरबाई बळीराम निर्मळ यांच्यावरही हल्ला केला.वाद सोडविण्यासाठी आलेल्या इतर दोघांना देखील मारहाण केली होती. याप्रकरणी रोहिदाससह त्याचे वडील विठ्ठल आणि आई कौसाबाई निर्मळ यांच्यावर नेकनूर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २६ रोजीच विठ्ठल व कौसाबाई यांना तर २७ रोजी रोहिदासला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्या आई- वडिलांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती तर रोहिदासला एक दिवसाची कोठडी सुनावली होती.
दरम्यान, २८ रोजी आरोपी रोहिदास निर्मळला घेऊन नेकनूर पोलीस जीपमधून (एमएच २३ एफ-१११४) मुळूकवाडीला घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी जात होते. सोबत दोन सरकारी पंच होते. मधल्या सीटवर बसलेल्या आरोपी रोहिदास निर्मळ याचे दोन्ही हात पोलिसांनी पकडून ठेवलेले होते.दरम्यान, ससेवाडी फाट्यावर त्याने आपले डोके चालक व सहायक उपनिरीक्षक चंद्रकांत देशमुख यांच्या डोक्यावर आदळले. त्यामुळे त्यांच्या हाताला झटका बसला. यावेळी रोहिदासने स्टेअरिंगला हिसका दिल्याने जीप रस्त्याखाली उतरून उलटली.
यात सहायक निरीक्षक शेख मुस्तफा, सहायक उपनिरीक्षक चंद्रकांत देशमुख, अंमलदार सचिन मुरूमकर, बाबासाहेब खाडे, पंच म्हणून गेलेले नेकनूर ग्रामपंचायतचे कर्मचारी सय्यद फारेज सय्यद रहेबाज व संदीप काळे हे जखमी झाले. शेख मुस्तफा यांच्या खांद्याला व डोक्याला दुखापत असून आरोपी रोहिदास निर्मळ याच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. सर्व जखमींवर बीडमध्ये खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत, आरोपीला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
एसपी, एएसपींची भेट
या घटनेनंतर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी खासगी दवाखान्यात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी डॉक्टरांकडून माहिती घेत आवश्यक त्या सर्व तपासण्या व उपचार करण्यास सांगितले.
भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात राजकीय वातारवरण तापलं; शिवसेनेचा ठाकरे गट 'राज्यपाल चले जाओ' आंदोलन करणार.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच विरोधी पक्षाकडून राज्यपालांना पदावरून हटविण्याची मागणी केली जात आहे.
राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना दिल्लीतून देखील बोलावणं आलं होतं. त्यानंतर राज्यपालांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलंलं वादग्रस्त वक्तव्य भोवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान, शिवसेनेचा ठाकरे गट राज्यपालांच्या विरोधात आणखी आक्रमक होणर आहे.
राज्यात राज्यपालांकडून वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्यात त्यांच्या विरोधात आक्रमक आंदोलने झाली. त्यानंतरही राज्यपालांच्या वक्तव्यावरून झालेला वाद थांबायचा नाव घेईना. राज्यपालांच्या विरोधात आणखी आक्रमक होत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून 'राज्यपाल चले जाओ' आंदोलन करण्यात येणार आहे. 'राज्यपाल चले जाओ' आंदोलनानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पदावरून हटविण्यात येणार का, हे पाहावे लागणर आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल?
'तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.
औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डी. लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.
धक्कादायक नाशिकमधील अत्याचार पीडितांचा आकडा वाढला.! ज्ञानदीपच्या संस्थाचालकाकडून आणखी 7 मुलींच लैंगिक शोषण केल्याचे उघड...
नाशिक (प्रतिनिधी) राज्यात मागील दिवसांपासून चर्चेत असलेलं नाशिक अत्याचार प्रकरणात.! आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे याने आणखी सात मुलींवर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
म्हसरुळच्या मानेनगर येथे द किंग फाउंडेशन ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रम असून, याचे संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे याने मुलींवर अत्यचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली असतं; यात आणखी एक खुलासा पोलिसांना केला आहे. आणखी सात मुलींवर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले. यातील ५ मुली आश्रमातील असून, सटाणा येथील त्याच्या राहत्या घरी शिक्षणासाठी ठेवलेल्या २ मुलींवरही त्याने अत्याचार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर यानंतर पोक्सो कायद्यांतर्गत त्याच्यावर ५ गुन्हे दाखल केले.
आधार आश्रमातील पत्र्याच्या खोलीत रात्री बोलावून मोरेने आदिवासी अल्पवयीन मुलीला हातपाय दाबून देण्यास सांगितले. त्यानंतर पॉर्न फिल्म दाखवून ‘तू माझे काम केले नाही तर तुला होस्टेलमधून काढून टाकेल’ अशी धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर पोलिसांनी आश्रमातील १३ मुलींकडे चौकशी केल्यानंतर यातील ५ व सटाण्यातील राहत्या घरी शिक्षणासाठी ठेवलेल्या २ मुलींवर अत्याचार केल्याचे उघड झाले.
धक्कादायक बाब म्हणजे मागील 10 दहा वर्षांपासून हा नराधम शोषण करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आश्रमाची इमारतही भाडेकरारावर घेतली आहे. मालक मुंबई येथील रहिवासी असून, इमारत मालकाला जबाबासाठी बोलावण्यात आले आहे. संशयित मोरेची सासू आश्रमात मुलींची व्यवस्था सांभाळते. त्याची पत्नी मालेगाव येथे वास्तव्यास आहे. पोलिसांकडून सासूची व मदतनीस महिलेची चौकशी केल्यानंतर संशयिताकडून गेल्या १० वर्षांपासून आश्रमातील अनेक मुलींचे शोषण सुरू असल्याची धक्कादायक माहिती महिलांनी दिली. यावरून पोलीस पुढील तपास करत असून, यात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.
Sunday, November 27, 2022
सुदर्शन न्युज चॅनेल चे सर्वेसर्वा कट्टर हिंदूत्ववादी सुरेशजी चव्हाण यांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन करणार कॉरिडॉर साठी दिल्लीत पाठपुरावा.
*हिंदूवीर चव्हाण के यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन व कॉरिडॉरसाठी सोडला संकल्प.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रखर हिंदूवादी व्यक्तिमत्व तथा पत्रकार हिंदू वीर चव्हाण के यांनी आज देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले व कॉरिडॉरसाठी संकल्प सोडला. परळी येथील प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे यासाठी दिल्लीत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.
काशी विश्वनाथ, उज्जैनच्या धर्तीवर पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे यासाठी आता थेट दिल्ली दरबारी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य हिंदू वीर सुरेश चव्हाणके यांनी परळीत केले.त्यांच्यासोबत श्यामजी महाराज होते.यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री कार्यालय, सांस्कृतिक खाते, पर्यटन खाते आदी विभागात परळी वैजनाथ कॉरिडोरसाठी मदत करू. पण, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा मुद्देसूद मसुदा स्थानिक व जिल्हा प्रशासनाने त्वरित करावा असे प्रतिपादन त्यांनी केले. धार्मिक कॉरिडॉरसाठी प्रधानमंत्री हे नेहमीच आग्रही आहेत. महाराष्ट्रीयन असल्याच्या नात्याने प्रभू वैद्यनाथाचा भक्त म्हणून मी स्वतः दिल्लीत यासाठी पाठपुरावा सुरेश चव्हाणके म्हणाले.
दोन गटात तुंबळ हाणामारी.! पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल.
यशवंत आंनदराव जाधव यांच्या तक्रारी वरून गोवींद सुधीर जाधव पाटील,संदीप संजय जाधव पाटील,सुधीर चंद्रसेन जाधव पाटील सर्व रा.शिंदी यांचे विरुद्ध फिर्याद आहे केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर गोवींद सुधीर जाधव पाटील यांनी केज पोलिस ठाण्यात अशी तक्रार दिली आहे की, दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता ते गावातील चौकात सुभाष जाधव यांचे हॉटेल समोर रस्त्यावर उभा होते. त्यावेळी गावातील यशवंत अनंतराव जाधव व शशीकांत धर्मराज जाधव हे दोघेजण आले.त्यांनी गावातील ८:३० वाजता गुरव सज्जन राजेभाऊ गुरव यांचे भांडणामध्ये तुम्ही का सोडवासोडव केलीस?अशी कुरापत काढुन त्या दोघांनी मिळुन त्यांना गच्चीला धरुन चापटाबुक्याने लाथाने मारहान केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.त्यावेळी भांडणाचा आवाज ऐकुन वडील सुधीर चंद्रसेन जाधव आणि भाऊ संदीप संजय पाटील हे येवुन भांडण सोडवित असताना सुर्यकांत यशवंत जाधव, रमाकांत धर्मराज जाधव हे त्यांचे मोटारसायकलवर येवुन रमाकांतने त्यांना धरुन खाली पाडले. सुर्यकांतने त्याचे हातातील लोखंडी पाईपाने त्यांच्या पाठीत मारुन मुक्का मार दिला.चौघांनी मिळुन शिवीगाळ करुन चापटाबुक्याने लाथाने व लोखंडी पाईपाने मारहाण करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी गोविंद सुधीर जाधव पाटील यांच्या फिर्यादी वरून यशवंत अनंतराव जाधव, शशीकांत धर्मराज जाधव, सुर्यकांत यशवंत जाधव आणी रमाकांत धर्मराज जाधव सर्व रा.शिंदी ता. केज यांचे विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खाजगी ट्रॅव्हल्समध्ये लाखोंचा गुटखा. १७ लाखाचा मुद्देमाल हस्तगत.
१७ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता त्या दरम्यान संबंधित माहिती मिळालेली ट्रॅव्हल्स पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ ट्रॅव्हल्स बस अडवून तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाला पोलिसांना तपासा दरम्यान आढळून आला. या कारवाईदरम्यान जवळपास 17 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून ट्रॅव्हल्स चालक व वाहकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विधानसभा अध्यक्ष आणि मंत्र्यांना न्यायालयाचा संतप्त सवाल.! गुजरात निवडणुकीत जाणं तुमचं अधिकृत काम आहे का?
मुंबई (प्रतिनिधी) देशात सध्या गुजरात निवडणूकिंच वारं जोरात वाहत असून, देशातील विविध राज्य आणि महाराष्ट्रातील अनेक मंत्री व लोकप्रतिनिधी या निवडणुक प्रचाराच्या कामात व्यस्त आहेत. राज्यातील असेच काही मंत्री व लोकप्रतिनिधी हे महाराष्ट्राच्या कारभारला काहीसा थांबा देऊन, गुजरात निवडुकीत व्यस्त झाले आहेत. मात्र यावर मुंबई विशेष न्यायालयानं तीव्र शब्दात ताशेरे ओढले असून, कोरोना काळातील टाळेबंदीदरम्यान वाढीव वीज बिलाचा मुद्द्यावरून आंदोलन केल्याप्रकरणी महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा न्यायलायन चांगलच झापलं आहे.
न्यायालयाने म्हणटले आहे की, एखादा खटला न्यायप्रविष्ट असताना गुजरात निवडणुकीच्या कामासाठी जाणं हे तुमचं अधिकृत काम आहे का?, असा संतप्त सवाल न्यायालयानं सभापती आणि मंत्र्यांना उद्देशून केला आहे. तसेच आणखी किती दिवस अनुपस्थितीत राहणार आहात? अशी विचारणाही त्यांच्या वकिलांकडे न्यायालयानं केली आहे.
सावधान ! लम्पी स्किन रोगामुळे ५८२ पेक्ष्या जास्त जनावरांचा मृत्यू.! शेतकऱ्यांच पशुधन धोक्यात.
सोलापूर (प्रतिनिधी) लम्पी आजाराने सोलापूर जिल्ह्यात ५८२ पेक्ष्या जास्त जनावरांचा मृत्यू झाल्यानं पशुपालकांची चिंता वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यात ७ लाख ४५ हजार ३२४ गाय वर्ग जनावरे आहेत. त्यातील बाधित गावांची संख्या ७५८ इतकी आहेत. बाधित पशुधन संख्या १० हजार ३५८ असून, ४ हजार ५८ पशुधन बरे झाले आहे. मृत पशुधन संख्या ५८२ पेक्ष्या इतकी आहे.
सध्या बाधित असणारे पशुधन ५ हजार ७१८ आहे. अत्यवस्थ पशुधन २९३ आहेत. करमाळा तालुक्यातील बाधित जनावरे असणारे ईपी सेंटर वीट, राजुरी, सावडी, केडगाव, भिलारवाडी, भाळवणी, करमाळा, हिसरे, केम, गुळसडी, बोरगाव, उत्तर वडगाव, करंजे, साडे, हिंगणी, गौंडरे आणि झरे ही आहेत.
लम्पी’ जनावरांच्या आजारामुळे अफवांचा बाजारदेखील भरत आहे. त्याचा विपरीत परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला. गैरसमजुतीतून गायीच्या खुल्या दुधापासून ग्राहक दुरावा ठेवून आहेत. त्यामुळे विक्री न होणाऱ्या दुधाचे करायचे काय, असा प्रश्न पशुपालकांपुढे निर्माण झाला. अगोदरच जनावरांमधील ‘लम्पी’ आजारामुळे पशुचालक चिंतेत असताना आता अफवांमुळे दुध विक्री होत नसल्याने त्यांना दुसऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराने ५८२ पेक्ष्या जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक मृत्यू माळशिरस तालुक्यात १९९ जनावरे मृत झाली असून, त्या खालोखाल करमाळा तालुक्यातील १६८ जनावरांचा समावेश आहे. करमाळा तालुक्यात सप्टेंबर महिन्यापासून जनावरांना लम्पी स्किनचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला एक दोन असणारी बाधित जनावरांची संख्या वाढत गेली. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.