Wednesday, November 23, 2022

बेगम शेख अफसाना यांची काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कागदी वेस येथे सत्कार.


बीड (प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाला अधिक सक्षम व मजबूत  करण्यासाठी काँग्रेस पक्ष तळागाळा पर्यंत घेऊन जाण्यासाठी  खा. रजनीताई पाटील अशोकराव पाटील व जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख  यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसला अधिक मजबूत करण्याचे काम सुरू आहे, त्या अनुषंगाने बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या  बेगम शेख आपसाना यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे या निवडीचे बीड शहरात ठीक ठिकाणी स्वागत होत आहे. काँग्रेसचे रोजगार व स्वयंरोजगार शहराध्यक्ष शेख अमीर, गफार खान गफूर खान दादा, पठाण नवीद खान  (बाबा खान ) महाराष्ट्र राज्य बांधकाम सेना संघटना  मराठवाडा अध्यक्ष, बबलू देशमुख, सय्यद सलमान आली शिवसंग्राम, अल्पसंख्याक  शहर उपाध्यक्ष, मुदसिर खान, शेख सलीम गुलाम दस्तगीर आधी  सत्काराला कागदी वेस या ठिकाणी  उपस्थित होते. पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफळ देऊन  सत्कार करण्यात आला,यावेळी भागातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment