*परळीत राज्यपालांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे वंदनीय असे महाराज आहेत. परंतू एकीकडे देशात शिवरायांचा प्रताप आणि त्यांना सन्मानित केले जात असताना राज्याचे राज्यपाल महोदय मात्र वेगळाच प्रताप दाखवित असून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही अशी टिका शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी केली.
परळी शिवसेनेच्या वतीने आज मंगळवार दि.22 नोव्हेंबर रोजी परळीत राज्यपालांनी व्यक्त केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या अपमानकारक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलतांना अभयकुमार ठक्कर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टिका केली. आपण मोठया पदावर आहोत याचे जराही भान राज्यपालांना नसावे याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत उठसूठ वादग्रस्त विधाने करण्यावर त्यांचा भर आहे. वास्तविक पाहता छत्रपती शिवरायांना महाराष्ट्र आणि देश किंबहुना जग सुद्धा जाणता राजा म्हणून मानतो. छत्रपतींच्या स्वराज्याच्या भुमिकेचे सर्वत्र कौतुक होत असतांना राज्यपाल मात्र आपले काम सोडून केवळ टिका करण्यावर भर देतात. आम्ही महाराष्ट्राचे कडवे मावळे आहोत, आम्हाला सुद्धा असे वेगळे काही तुमच्या विरोधात करता येवू शकते असे सांगत आम्ही तुमचा मान ठेवतोय याचा अर्थ तुम्ही काहीही बोलावे असे नाही. भविष्यात आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करण्यासोबत झालेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करा अन्यथा राज्यभरात आम्ही तीव्र आंदोलन करूत असा इशारा अभयकुमार ठक्कर यांनी दिला.
यावेळी बीड जिल्हा युवा सेनेचे जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे,मा.उप शहर प्रमुख सतिष जगताप, युवासेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी,शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, छ.शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी,बबन ढेंबरे, विद्यार्थी सेना तालुका समन्वयक अमित कचरे, युवासेनेचे मनिष जोशी, नवनाथ वरवटकर,योगेश घेवारे, संस्कार पालिमकर,श्रयश कराड, आकाश चव्हाण, प्रकाश देवकर, योगेश जाधव, बजरंग औटी,सिद्धार्थ गायकवाड, भगवान वाघमारे, बाळासाहेब सातपुते,सचिन लोढा यांच्यासह असंख्य शिवप्रेमी, शिवसैनिक, युवा सैनिक, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment