Tuesday, February 28, 2023

पोदार जम्बो किड्स स्कुल येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

परळी (प्रतिनिधी)- विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटी संचलित पोदार जम्बो किड्स, प्रिया नगर येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकास होण्यासाठी स्कूल मध्ये वेगवेगळे सांस्कृतीक कार्यक्रम साजरे केले जातात. मराठी भाषेचा विकास व प्रसार व्हावा या दृष्टीकोनातून विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्याक्षा सौ. उषाताई किरण गिते यांच्या संकल्पनेतून  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोदार जम्बो किड्सच्या विद्यार्थ्यांनी मराठी नृत्य , संतांच्या व साहित्यिकांच्या वेगवेळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. कवी कुसुमाग्रज यांची जयंती आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करतो. या कार्यक्रमासाठी  शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याशी अभयकुमार ठक्कर यांची विविध विषयावर चर्चा.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शिवसेना उपनेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर या आज मंगळवार दि.28 फेब्रुवारी रोजी माजलगाव जि.बीड येथे शिव गर्जना मेळावा प्रसंगी आल्या असता त्यांची आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी भेट घेवून विविध विषयावर चर्चा केली.
आज मंगळवारी शिवसेना उपनेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर माजलगाव येथे शिव गर्जना मेळाव्यासाठी आल्या होत्या. यावेळी अभयकुमार ठक्कर व त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांची भेट घेवून त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. 
याप्रसंगी शिवसेना जेष्ठ नेते सतिशअण्णा जगताप, शहर संघटक संजय कुकडे, संजय सोमाणे किशन बुंदेले,श्रीनिवास सावजी, मनिष जोशी, अमित कचरे, लक्ष्मण मुंडे, बबन ढेंबरे,योगेश घेवारे, प्रकाश देवकर, योगेश जाधव, प्रा.जगदीश कावरे, नरेश मैड,सचिन लोढा, नवनाथ वरवटकर, बजरंग औटी  आदी शिवसैनिक उपस्थित होते.

जल जीवन मिशन भ्रष्टाचार प्रकरण जिल्हा परिषदेच्या अधिका-यांसह कर्मचा-यांना शिस्तभंगाची नाेटीस अन्य शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ.

बीड (प्रतिनिधी) दुष्काळी बीड जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेतील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी बीड जिल्हा परिषदेच्या दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरोधात शिस्तभंगाची कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत.  जल जीवनमधील अनियमितता उघडकीस आणली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित झाल्याने शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तब्बल 1300 गावांमध्ये हर घर जल, हर घर नल यानुसार जल जीवन मिशन योजना सुरू करण्यात आली. मात्र यामध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रकल्प संचालक आणि अधिकारी कर्मचारी यांनी मर्जीतील लोकांना टेंडर देत कोट्यवधी रुपयांचा अपहार आरोप होत आहे.

बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी दोन उपअभियंता, जिल्हा दक्षता प्रमुख, चार शाखा अभियंता, दोन वरिष्ठ सहायक आणि एक सहायक लेखाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत नोटीस बजावली आहे. तसेच विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

यामध्ये उपअभियंता एस. यु. खंदारे, उपअभियंता एम आर लाड, जिल्हा दक्षता प्रमुख नामदेव उबाळे, शाखा अभियंता ए. बी. तांदळे, पी. डी. शिंदे, जी. आर. खोसे, एस. एन. सारणीकर, वरिष्ठ सहायक व्ही. डी. आनेराव, एस. बी. चव्हाण आणि सहायक लेखाधिकारी बी. टी. वीर यांना शिस्तभंगाची कारवाई बाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठराविक गुत्तेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी नियमबाह्य पध्दतीने काम केले. शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. टेंडरमध्ये स्थानिक आणि नातेवाईक यांना लाभ मिळावा म्हणून बदल केले. 

आपल्याच नातेवाईक यांना शंभर ते दोनशे कोटींचे कामे वाटप केली. ठराविक गुत्तेदारांना लाभ देण्यासाठी तीन पेक्षा अधिक कामांचे वाटप केले. आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासनाचे नुकसान केले असे दोषारोप संबंधितांवर ठेवण्यात आले आहेत.

गांजा ओढायला पैसे नव्हते म्हणून खेळणाऱ्या मुलाला धमकावत पळवला आयफोन; २४ तासांत आरोपी अटकेत.


बीड (प्रतिनिधी) : गांजा, सिगारेट, दारू प्यायला पैसे नव्हते म्हणून एका आरोपीने मैदानात खेळणाऱ्या मुलांना मारहाण करून आयफोन मोबाईल चोरला. परंतू बीड शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत याचा छडा लावून चोरट्याला बेड्या ठोकल्या. ही कारवाई बीड शहरातील बार्शी नाका परिसरात सोमवारी सायंकाळी करण्यात आली.

शेख फिरोज शेख सादेख (वय २८ रा.बीड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी ज्ञानदीप बालासाहेब तोंडे (वय १५) हा मित्रांसोबत खासबाग परिसरात खेळत होता. याचवेळी फिरोज तेथे आला. आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून तो ज्ञानदीप जवळ गेला. मी पोलीस असून तुझा मोबाईल माझ्याकडे दे. उद्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून घेऊन जा, असे सांगून मोबाईल हिसकावला. परंतू ज्ञानदीपने त्याचा पाठलाग केला. यावेळी फिरोजने त्याला मारहाण केली. तसेच मागे येत असल्याने दगड फेकून मारले. त्यानंतर काही क्षणात तो दिसेनासा झाला. 

दरम्यान, ज्ञानदीपने पालकांसह शहर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी तपास यंत्रणा कामाला लावली. डीबी पथकाने या आरोपीचा शोध घेण्यासाठी आपले खबरी कामाला लावले. सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास फिरोज हा बार्शी नाका परिसरात गांजाची नशा करत असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी लगेच सापळा लावून त्याला अटक केली. ही कारवाई रवि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे बाळासाहेब सिरसाट, मनोज परजणे, अशपाक सय्यद, सुसेन पवार, अविनाश सानप आदींची आदींनी केली.

आता म्हणा ‘छत्रपती संभाजीनगर’ महा नगरपालिका. जिल्ह्याबाबत अधिसूचना, हरकती, सूचनांसाठी २७ मार्चपर्यंत मुदत.


छत्रपती संभाजी नगर :- (प्रतिनिधी) औरंगाबाद शहराचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आल्यानंतर, आता महापालिकेचेही नाव ‘छत्रपती संभाजीनगर महापालिका’ असे करण्यात आले आहे, तर जिल्हा, तालुका व मंडळाबाबत महसूल व वनविभागाने अधिसूचना काढली आहे. 

शहराचे नाव बदलले, तरी महापालिकेचे नाव जुनेच होते. प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी २४ फेब्रुवारी रोजी प्रशासकीय ठराव मंजूर करून ‘छत्रपती संभाजीनगर महापालिका’ असा बदल करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला होता. राज्याच्या नगरविकास विभागाने सोमवारी त्यास मंजुरी दिली. 

सूचना, हरकती मागवल्या.

जिल्हा, तालुका व मंडळाच्या नावाबाबत महसूल व वनविभागाने सोमवारी अधिसूचना काढली असून, हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. ‘छत्रपती संभाजीनगर’ असा बदल विभागीय आयुक्तालयापासून होणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाला तालुका, मंडळ, सज्जापर्यंत नावातील बदल करावा लागेल. सरकारी वेबसाइट्स, अभिलेखांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असा उल्लेख सुरू होईल. 

स्थगितीची मागणी हायकाेर्टाने फेटाळली. 

औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांची नावे बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशीव करण्याबाबत केंद्र सरकारने २४ फेब्रुवारीला मंजुरी दिल्यावर राज्य सरकारने अधिसूचना काढली. या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.n या शहरांची नावे बदलण्यापूर्वी सरकारने हरकती व सूचना न मागविताच परस्पर निर्णय घेतल्याने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली. प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. n राज्य स

रकारतर्फे महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी सांगितले की, शहराचे नामांतर करण्यास हरकती व सूचना मागवण्याची आवश्यकता नाही. मात्र, महसूल विभागाच्या दप्तरी शहरांची नावे बदलण्यासाठी सरकारने २७ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत.n स्थगितीला अंतरिम आदेश देण्याची मागणी मान्य करण्यास न्यायालयाने नकार दिला. सरकार दप्तरी शहराचे बदलेले नाव आणि बाहेर वेगळे नाव वापरल्यामुळे गोंधळ उडेल, असे म्हणत न्यायालयाने पुढील सुनावणी २७ मार्च रोजी ठेवली.


लग्न समारंभातून परतणाऱ्या तरुणांवर चाकू हल्ला; दोन तरुण गंभीर जखमी.

*चोरीच्या उद्देशाने फिरत असलेल्या टोळक्याला हटकल्याच्या रागातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याचा दोन तरुणावर चाकू हल्ला...

जालना (प्रतिनिधी) जालन्यातील कचेरी रोड वरील गवळी मौहल्ला परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास लग्न समारंभाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर घराकडे परतणाऱ्या दोन तरुणांवर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने धारदार चाकूच्या साह्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 
संदीप लिंगायत आणि अक्षय गवळी अशी या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. संदीप आणि अक्षय एका लग्न समारंभातून घरी परतत असताना त्यांना पाच ते सहा जणांची टोळी संशयित रित्या फिरताना आढळून आली. त्यांनी त्या टोळक्याला हटकले असता या टोळक्यातीळ पाच ते सहा संदीप आणि अक्षय या दोन्ही तरुणांना जबर मारहाण करत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. 
या हल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका तरुणांची प्रकृती चिंताजण असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकसून देण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सानवी चौंडे 7 वर्षीय चिमुकलीच्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी सरसावले मदतीचे अनेक हात.


*शहरातील नाथ चित्र मंदिर परिसरातील शिवाजीनगर भागातील सानवी शिवदीप चौंडे ही 7 वर्षीय चिमुकली दुर्धर आजाराने त्रस्त असून तिच्यावर शस्त्रक्रियेसाठी तब्बल 25 ते 30 लाख रुपये खर्च येणार आहे.


परळी वैजनाथ,(प्रतिनिधी) शहरातील नाथ चित्र मंदिर परिसरातील शिवाजीनगर भागातील सानवी शिवदीप चौंडे ही 7 वर्षीय चिमुकली दुर्धर आजाराने त्रस्त असून तिच्यावर शस्त्रक्रियेसाठी तब्बल 25 ते 30 लाख रुपये खर्च येणार आहे. सानवीचे वडील शिवदीप चौंडे यांच्या आवाक्याबाहेरचा खर्च असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सोमवार, दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी सानवीच्या मदतीसाठी परळी शहरात मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या मदत फेरीत परळी शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. व्यापारी, ग्राहक, ऑटो चालक, कामगार आदींसह नागरिकांनी सढळ हाताने भरभरून आपल्या लेकीच्या उपचारासाठी मदतीचा हात दिला. तसेच अनेक सामाजिक संस्था, शहरातील नामवंत पतसंस्था व्यापारी आदींचाही मदतीचा ओघ सुरूच आहे.

सोमवार दि.27 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मदत फेरीस प्रारंभ करण्यात आला. तदनंतर ही मदत फेरी अण्णाभाऊ साठे चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, एकमिनार चौक, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, सोनार लाईन मार्गे जावून तेथे मदत फेरीचा समारोप करण्यात आला. दरम्यान या झालेल्या मदत फेरीत परळी शहरातील नागरिकांनी तब्बल 94 हजार 440 रुपयाची मदत जमा केली. या मदत फेरीत चौंडे परिवारासह परळी शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. तसेच मदत फेरीत परळी शहरातील पत्रकार बांधव ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

*मदतीसाठी सरसावले अनेकांचे हात*

आरोग्याच्या साथीला परळीच्या लेकीला हे ब्रीदवाक्य घेऊन काढलेल्या मदत फेरीस शहरातील व्यापारी, नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आपल्या लेकीच्या उपचारार्थ अनेकांनी सढळ हाताने मदत केली. सानवीच्या उपचारार्थ काढलेल्या मदत फेरीत परळी शहरातील नागरिकांनी 94 हजार 440 त्यांची मदत केली.तसेच वडखेल ग्रामस्थांनी 7497 रुपयाचा निधी गावकऱ्यांनी मदत फेरी काढून जमा केला. परळी शहरातील पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी लि. चे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी 15 हजार,वि दा सावरकर पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी 11 हजार रुपयांचा तर अरिहंत जैन सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ.दिनेश लोढा यांनी 11 हजार रुपयांचा निधी सानवीच्या उपचारार्थ प्रशासनाकडे जमा केला आहे. त्याचबरोबर अनेकांकडून जमेल तशी मदत करण्यात येत आहे.

कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आहे की अधिकाऱ्यांना धिंगाणा घालण्यासाठी?बीडमध्ये कृषी प्रदर्शनात हिंदी मराठी गाण्यावर शासकीय अधिकाऱ्यांचा धिंगाणा.


*शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीविषयक माहितीची मेजवानी खरंतर कृषी प्रदर्शनातून मिळत असते. पण बीडमध्ये भरलेल्या प्रदर्शनाला खरंच कृषी प्रदर्शन म्हणावं की डान्सबार म्हणावं, असा सवाल आता जिल्ह्यातील शेतकरी विचारु लागले आहेत. कारण कृषी प्रदर्शनात शासकीय अधिकाऱ्यांनी डान्सबार भरवलाय.


बीड (प्रतिनिधी) : राज्यात आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख पुढे येते. मात्र त्याच बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीच्या कृषी महोत्सवात स्वर झंकार कार्यक्रमाच्या नावाने आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क लावण्या हिंदी गाण्यांवर धिंगाणा घातल्याचं पाहायला मिळालं.
अभी जिंदा हु तो जी लेने दो' या गाण्यावर गेवराईच्या तालुका कृषी अधिकाऱ्यासह इतर अधिकाऱ्यांनी डोक्यावर बॉटल घेऊन डान्स केला. तर "चंद्रा" या लावणीवर आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी चक्क तोंडात फुल घेऊन कार्यक्रमाच्या नावावर धिंगाणा घातला. खरं पाहिलं तर यांचा हा धिंगाणा पाहून, नेमका हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आहे की अधिकाऱ्यांना धिंगाणा घालण्यासाठी आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कृषी प्रदर्शन आयोजित केली जातात. या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी असणाऱ्या गोष्टी, नवनवीन यंत्रणा यासोबत शेती कशा पद्धतीने करावी, शेतीचा कस कसा वाढवावा, याची माहिती कृषी प्रदर्शनांमधून मिळत असते. मात्र बीड जिल्ह्यातलं कृषी प्रदर्शन हे धिंगाण्याने वादग्रस्त ठरतंय.
दिवसभर कृषी प्रदर्शनाला शेतकरी हजेरी लावतात मात्र संध्याकाळच्या वेळेला अधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली धिंगाणा लावलाय. त्याचेच व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतायेत. यामध्ये कृषी अधिकारी पाण्याची बॉटल डोक्यावर घेऊन 'पीले पीले ओ मेरे जाने' या गाण्यावर महिलांसमोर डान्स करतात तर कुणी लावणीवर ठेका धरतोय.
अधिकाऱ्यांच्या धिंगाण्यामुळे कार्यक्रमातील महिला अक्षरश: कार्यक्रमातून निघून गेल्या. शासकीय अधिकाऱ्यांनी कृषी प्रदर्शनांमध्ये अशा पद्धतीने वागणं आणि प्रदर्शनामध्ये असा गोंधळ घालणं कितपत योग्य आहे, असा सवाल बीडचे नागरिक विचारतायेत. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला नेमकं डान्सबार प्रदर्शन म्हणायचं की कृषी प्रदर्शन म्हणायचं? असा सवालही शेतकरी विचारतायेत.

Monday, February 27, 2023

राक्षसभुवन फाट्यावर अर्ध्यातासात दोन अपघातात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी.


गेवराई (प्रतिनिधी) : राक्षसभुवनहून फाट्याजवळ दुपारी १ वाजेच्या दरम्यान दोन अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले. उत्तरेश्वर चंद्रभान खरसाडे ( ३५, आहेर वडगांव तालुका जिल्हा बीड) असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ सोलापुर- धुळे महामार्गावर राक्षसभुवन फाट्यावर एक कार ( क्रमांक एम.एच.१२ आय.जे ८९६१) चौफुली ओलांडून गेवराईकडे येत होती. याचवेळी गेवराईहून भरधाव आलेल्या कंटेनरने ( क्रमांक एच.आर ३८ ए.ई ९०५२ ) कारला समोरून जोराची धडक दिली. यात कार दुभाजकावर जाऊन पडली. तर कंटेनरने ही उलटून रस्त्यावर पडला. यात तिघे जखमी झाले असून त्यांची नावे समजू शकली नाहीत. 

तर दुसरा अपघात याच रस्त्यावर अर्ध्या तासाच्या अंतराने झाला. गेवराईकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास ( एम.एच क्रमांक १४ जे ८७०६९ ) अज्ञात वाहनाने धडक दिली. यात उत्तरेश्वर चंद्रभान खरसाडे या युवकाचा जागीच मृत्यू झाला.  

महाशिवरात्री व शिवजन्मोत्सवा निमित्त मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबीर - डाॅ.संतोष मुंडे


*शिबीर 28 फेब्रुवारी मंगळवारी.    शिबीराला मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबीर उद्या दिनांक.28 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराला मान्यवरांची  प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डाॅ.संतोष मुंडे यांनी सांगितले आहे.
अपंगांचे कैवारी म्हणून ओळख असलेल्या व विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध आरोग्य शिबिरे व उपक्रम राबवणारे प्रसंगी दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डाॅ.संतोष मुंडे यांच्यावतीने उद्या मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी  डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हॉस्पिटल, अरुणोदय मार्केट समोर, परळी वै. येथे  मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.कमी ऐकु येणाऱ्या नागरीकांसाठी ७ ते ८ हजार रुपये किंमतीचे १०० मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप  या शिबीरात केले जाणार आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या शिबीरांचे आयोजन करुन आतापर्यंत  सुमारे 4000 डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप मोफत करण्यात आलेले आहे.
दरम्यान, गरजु नागरीकांना दि. २८ फेब्रुवारी रोजी डिजीटल यंत्राचे वाटप केले जाणार आहे. या शिबीराचे उद्घाटन स्वा.रा.ती. मेडीकल कॉलेज, अंबाजोगाई चे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा शैल्यचिकित्सक, बीड डॉ. सुरेश साबळे उपस्थित राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून भगवान महावीर विकलांग संस्था, महाराष्ट्र चे नारायण व्यास,वैराग्यमुर्ती ह.भ.प.प्रभाकर नाना झोलकर, उपजिल्हा रुग्णालय, परळीचे अधिक्षक डॉ. अरुण गुट्टे,परळी मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर्स डॉ. ज्ञानेश्वर घुगे,तालुका अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे,परळी मेडीकल असोसिएशन डॉक्टर्स चे सचिव डॉ. सतिश गुट्टे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
 तरी या शिबीराला  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व गरजुंनी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डाॅ.संतोष मुंडे यांनी केले आहे.

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी 78 शिक्षकांवर गुन्हा दाखल करा : उपायुक्तांचा आदेश.

बीड (प्रतिनिधी) : बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या बीड जिल्हा परिषदेतील 78 शिक्षकांवर सीईओ अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. याच 78 शिक्षकांवर गुन्हा दाखल करावा असा आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्तांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता बळावली आहे.

दिव्यांग कर्मचारी संघटनेने याबाबत तक्रार केल्यानंतर विभागीय आयुक्तालयाकडून गंभीर दखल घेतली असून, त्यामुळं आता जिल्हा परिषद प्रशासन कोणती कारवाई करणार ? याकडे लक्ष लागले आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या सवलती बहाल करण्यासाठी किमान 40 टक्के दिव्यांगत्व प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते.

बीड जिल्हा परिषदेत बदलीची सवलत घेणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी असल्याचे वैद्यकीय तपासणीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी अशा आधी 52 व नंतर 23 संशयास्पद दिव्यांगत्वधारक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली होती.

दरम्यान या शिक्षकांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी 13 फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे लेखी तक्रार करून केली होती. याची आता विभागीय आयुक्तांनी गंभीर दखल घेतलीय.

बीड जिल्हा परिषदेसह विभागातील औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संशयास्पद दिव्यांगत्वधारक कर्मचाऱ्यांविरुद्ध दिव्यांग आयुक्तालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्याच्या कार्यवाहीचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशावरून उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी 22 फेब्रुवारी रोजी दिले. या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे सूचित केले आहे. यामुळं आता त्या 78 शिक्षकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

बाेर्डात 35 लाख उत्तरपत्रिकांचा ढीग शिक्षकांच्या बहिष्कारामुळे बारावीच्या पेपर तपासणीचा पेच.


*या परीक्षेला १४ लाख विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम लगेचच सुरू होणे अपेक्षित होते. 

मुंबई (प्रतिनिधी) - बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच उत्तरपत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने अंदाजे ३५ लाखांहून उत्तरपत्रिकांचे गठ्ठे विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात पडून आहेत. नियामकांनीही हे गठ्ठे स्वीकारलेले नाहीत. 

या परीक्षेला १४ लाख विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम लगेचच सुरू होणे अपेक्षित होते; मात्र परीक्षा सुरू होऊन पाच दिवस झाले तरी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम आहे. 

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबत झालेल्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत त्यांच्या मागण्यांसंदर्भात अनुकूल भूमिका घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र बैठकीचे इतिवृत्त महासंघाला अद्याप प्राप्त झालेले नाही. 

या पार्श्वभूमीवर इतिवृत्त मिळाल्यानंतरच महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक होईल व आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महासंघाचे समन्वयक  प्रा. मुकुंद आंधळकर यांनी दिली. 

निकालावर परिणाम?

शनिवारी झालेल्या परीक्षांच्या  उत्तरपत्रिकांचे गठ्ठेही तपासणीसाठी गेले नाहीत. अंदाजे ३५ लाखांहून अधिक उत्तरपत्रिका पडून आहेत, असे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले. 

प्रक्रिया प्रलंबितच

 पेपरनंतर संबंधित विषयांच्या मुख्य नियामकांची बैठक होते. नंतर विभागीय पातळीवर बैठक होते. यात तपासणीच्या प्रक्रियेचे नियोजन होते. n प्रत्येक नियामकाकडे सहा ते सात उत्तरपत्रिका तपासणीस असतात. त्यांना द्यावयाची प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका यांच्या वितरणाबाबत निश्चिती होते. त्यानंतर तपासणीची प्रक्रिया सुरू होते. परंतु नियामकांची बैठकच झाली नसल्याने सर्व प्रक्रिया प्रलंबित आहे.

सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू; वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी.


मुंबई (प्रतिनिधी) : सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले जात असेल तर त्यांनाही सफाई कामगार संबोधून सर्व लाभ देण्यात येतील. डोक्यावरून मैला वाहण्याचे काम केलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत प्राधान्य दिले जाईल. वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी केल्यामुळे हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबीयांची अनेक वर्षांची मागणी मान्य झाली आहे.

सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वारसा हक्काबाबत पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून एकत्रित नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे.

नोकरीत प्राधान्य

शौचालय स्वच्छता, घाणीशी संबधित मलनि:सारण व्यवस्था, नाली गटारे, ड्रेनेज तसेच रुग्णालय आणि शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधित ठिकाणी सफाईचे काम करणारे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग तसेच सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व कामगार आणि पूर्वी डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम केलेल्यांच्या वारसांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्यात येईल. रोजंदारी, कंत्राटी तत्त्वावर बाह्य स्त्रोताद्धारे हे काम करणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही. ज्या सफाई कामगारांच्या सेवा नियमित झाल्या आहेत त्यांना या शिफारशींचा लाभ मिळेल.

वारस कोण असेल?

पती किंवा पत्नी, मुलगा किंवा मुलगी, सून किंवा जावई, विधवा मुलगी, बहीण, घटस्फोटीत मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, अविवाहित सज्ञान मुलगी किंवा अविवाहित सज्ञान बहीण, अविवाहित सफाई कर्मचाऱ्याचा सख्खा भाऊ किंवा सख्खी बहीण, नात किंवा नातू आणि यापैकी कोणीही वारस नसल्यास किंवा या वारसांपैकी कोणीही सफाईचे काम करण्यास तयार नसल्यास त्या सफाई कामगाराचा तहह्यात सांभाळ करण्याची लेखी शपथपत्राद्धारे हमी देणारी व्यक्ती यांना वारसा हक्काने नोकरीसाठी पात्र समजले जाईल. अशांचे वय किमान 18 वर्षे व कमाल 45 वर्षे असावे. सफाई कामगाराच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी किमान 15 वर्षे सेवा करणे बंधनकारक राहील.

नियुक्ती प्राधिकाऱ्याची जबाबदारी

सफाई कामगारांचे वारस म्हणून नामनिर्देशन भरून घेण्याची जबाबदारी नियुक्ती प्राधिकाऱ्याची असून त्या दृष्टीकोनातून मास्टर रजिस्टर ठेवणे तसेच सर्व माहिती ऑनलाईन ठेवणे आवश्यक आहे. वारसासाठी नामनिर्देशन 2 वर्षाच्या आत करणे आवश्यक असून अशी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस नामनिर्देशित करू शकत नाही. एखाद्या सफाई कामगाराने वारसाचे नामनिर्देशन केलेले नसल्यास एक वर्षाच्या आत वारसा हक्काने नियुक्ती करण्याची मुदत राहील. एखादा कामगार नामनिर्देशन केव्हाही बदलू शकतो. वारसा हक्काच्या तरतुदीची माहिती नियुक्ती प्राधिकाऱ्याने संबंधित कामगारास दिलेली नसल्यास सफाई कामगाराने नमूद वारसदाराना विहित मुदतीत अर्ज करण्याची अट क्षमापित करून या वारसास नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्याची तरतूद टाकण्यात आली आहे.

तर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई

सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देण्यात दिरंगाई किंवा टाळाटाळ होत असेल तर शासकीय निमशासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संबंधीतांविरुद्ध तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
वारसा हक्काची प्रकरणे संबंधीत कामगार सेवानिवृत्त किंवा मरण पावल्यापासून 30 दिवसांच्या आत निकाली संबंधीत नियुक्ती प्राधिकाऱ्यांला निकाली काढावी लागतील. एखाद्या सफाई कर्मचाऱ्यास शिक्षा म्हणून बडतर्फ केले असल्यास त्याच्या वारसाधारकांना वारसा नियुक्तीचा लाभ देण्यात येणार नाही.

वारसा नियुक्ती प्रक्रिया सोपी

वैद्यकीय कारणांमुळे कर्मचारी अपात्र किंवा अपंग झाल्यास या कामगाराची सेवा कितीही झाली असली तरी त्याच्या पात्र वारसास लाभ देण्यात येईल. सफाई कामगारास कोणीही पात्र वारस नसेल आणि त्याचा मृत्यू झाल्यास त्याचे संमतीपत्र ग्राह्य धरण्यात येईल आणि त्याने नामनिर्देशन दिले नसेल तर अशावेळी नामनिर्देशन देण्याचा अधिकार त्याची पत्नी किंवा पतीस राहील. पती आणि पत्नी दोन्ही हयात नसल्यास कुटुंबिय वारस ठरवू शकतात.

सफाई कामगाराची पदोन्नती झाली तरी वारसा हक्काच्या नियमास बाधा येणार नाही. सफाई कर्मचाऱ्यास वर्ग-3 मध्ये पदोन्नती मिळाल्यास बिंदुनामावलीप्रमाणे त्याला पदोन्नती द्यावी लागेल. मात्र, सफाई कामगार सेवेत असताना त्याला सेवेत गट-क मध्ये पदोन्नती मिळाल्यास अशा कामगाराच्या वारसास वारसा हक्काची तरतूद लागू होणार नाही.

लाड व पागे समितीने शिफारस केल्यानुसार विविध शासकीय, निमशासकीय मंडळे, महामंडळ, स्वायत्तसंस्था, महानगरपालिका, नगरपालिका, खासगी संस्था, शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच कारखाने यांच्याकडील मेहतर व वाल्मिकी सफाई कामगारांची नोकर भरती करताना त्याच्या वारसास किंवा जवळच्या नातेवाईकास प्राधान्य देणे सुरुच राहील. याबाबत आवश्यकता भासल्यास सेवाप्रवेशातील नियम व लाड पागे शिफारशींच्या तरतूदी शिथिल करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन नियुक्ती

ज्येष्ठता यादीतील सफाई कामगारांच्या वारसाची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन वर्ग-3 किंवा वर्ग-4 मध्ये नेमणूक करण्यात येईल. वर्ग-3 किंवा वर्ग-4 मधील कोणत्याही पदासाठी शैक्षणिक अर्हता असल्यास ती विचारात घेऊन त्यानुसार त्याला नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येईल. मात्र, वर्ग-3 चे पद उपलब्ध असेल ते आणि वारसाच्या इच्छेनुसार त्याला प्राधान्याने वर्ग-3 च्या पदावर नियुक्ती देण्यात येईल. मात्र पद रिक्त नसेल तर भविष्यात या रिक्त पदावर नियुक्ती मिळण्याच्या अधिन राहून वर्ग-4 मधील रिक्त पदावर वारसा हक्काने नियुक्ती देण्यात येईल. या पदावर नियुक्ती देण्यासाठी टंकलेखन व एमएससीआयटी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2 वर्षाची मुदत देण्यात येईल.

नियुक्तीसाठी पदभरतीचे निर्बंध लागू नाहीत

लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्‍याची अट सफाई कामगाराच्या वारसास देखील लागू राहील तसेच सफाई कामगारांची पदे व्यपगत होणार नाही. या नियुक्तींसाठी पदभरतीचे निर्बंध देखील लागू राहणार नाही. वारसास नियुक्ती देण्यापूर्वी त्याचे जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाला प्राप्त करुन घ्यावे लागेल तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वारसा हक्कांच्या नियुक्तीला सर्वसाधारण सभा किंवा स्थायी समितीच्या मान्यतेची आवश्यकता राहणार नाही.

मालकी हक्काची घरे देण्याबाबत निर्णय घ्यावा

सफाई कामगारांच्या जागी त्यांचा वारस नियुक्त होत असल्यामुळे अशा कामगारांना मोफत मालकी हक्काची घरे देण्याबाबत नगर विकास, ग्रामविकास, गृह निर्माण त्वरित निर्णय घेण्याचेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Sunday, February 26, 2023

दहावी-बारावीचे दोन पेपर एकाच दिवशी एकाच वेळी. बोर्डाचा गोंधळात गोंधळ बैठक व्यवस्थेच्या नियोजनाबाबत केंद्रस्तरावर संभ्रम.

पुणे (प्रतिनिधी) इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार (दि.२१) पासून तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरू होणार आहे. यंदा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांबाबत कठोर नियमावली जारी केली असल्याने त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच परीक्षेच्या वेळापत्रकात दोन दिवस दहावी - बारावीचे पेपर एकाच वेळी ठेवल्याने शाळा स्तरावर संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी याबाबत घोळ झाल्याचे मान्य करत त्यावर उपाययोजना सुरू असल्याचे सांगत प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी कोणतीही अडचण उद्भवणार नसल्याची ग्वाही दिली आहे.

दहावी - बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, मंगळवार, दि. २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवातही होत आहे. त्यानुसार शाळा व केंद्रस्तरावर त्याचे नियोजन व अंमलबजावणी सुरू असतानाच काही शाळांमध्ये बैठक व्यवस्थेबाबतचा घोळ समोर आला आहे. त्यामुळे शाळांच्या मुख्याध्यापकांसह केंद्रप्रमुख गोंधळून गेले आहेत.

दहावी व बारावीचे दोन पेपर एकाच वेळी आणि एकाच दिवशी आल्याने मोठी गडबड झाली आहे. दि. ६ मार्च रोजी दहावीचा इंग्रजी, तर बारावीचा सहकार विषयाचा पेपर सकाळी ११ ते २ या एकाच वेळी ठेवण्यात आला आहे, तर दि. १७ मार्च रोजी दहावी विज्ञान १चा, तर बारावीचा भूगोल विषयाचा पेपर एकाच दिवशी सकाळी ११ ते २ या वेळेत ठेवण्यात आला आहे.

आम्ही पोलिस आहोत’!,मादळमोही- पाथर्डी रोडवर ‘तोतया’ पोलिसांकडून वसूली.

बीड (प्रतिनिधी) :- ‘आम्ही पोलिस आहोत’, ‘वाहन कडेला घे’, ‘अवैध वाहतूक करतोस’ असे म्हणत तोतया पोलिसांकडून मादळमोही- पाथर्डी रोडवरील तिंतरवणी शिवारात अनेकांकडून वसूली केली जात आहे. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात एका उसाच्या ट्रॅक्टरचालकाने तक्रार दिली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आम्ही पोलिस आहोत असे म्हणून अनेकांना गंडविल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. मादळमोही- पाथर्डी रोडवरील तिंतरवणी शिवारातील पेट्रोलपंपाजवळ अनेक वाहने अडवून आम्ही पोलिस आहोत. असे म्हणून वाहन चालकांकडून वसूली केली जात आहे. या प्रकरणी किरण श्रीकांत उगले (वय 24 वर्षे, व्यवसाय ट्रॅक्टरचालक) यांना 24 फेब्रुवारी रोजी अर्जुन प्पासाहे मिसाळ रा. तरटगव्हाण ता. शिरुर कासार याने दुचाकीवर येवून ट्रॅक्टरला दुचाकी अडवी लावली व आम्ही चकलंबा पोलिस ठाण्यातून आलो आहोत. असे म्हणत त्याला पैशाची मागणी केली. चालकाने पैसे देण्यास नकार देताच त्याचा बळजबरीने मोबाई व खिशातील पाचशे रुपये काढून घेत त्याला मारहान करुन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात टाकून दिले. अशी फिर्याद किरण उगले यांनी चकलंबा पोलिस ठाण्यात दिल्याने अर्जुन मिसाळ याच्या विरुध्द कलम 392,170,34 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि इंगळे हे करत आहेत.

केजमध्ये चंदण तस्करी करणार्‍या टोळीला 12 किलो चंदनासह अटक.

केज (प्रतिनिधी) :- वरपगाव, भोपला शिवारात चंदण तस्करी करणार्‍या टोळीला केज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 12 किलो चंदणासह 55 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. केज पोलिसात तिघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील वरपगाव, भोपला शिवारात चंदन तस्करी होत असल्याची माहिती केज पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन 25 फेब्रुवारी रोजी वरपगाव, भोपला शिवारात चंदणाचा गाभा काढत असतांना राजेंद्र किसन काळे,फारुक पाशा ागवाण, दत्तत्रय नारायण तावरे सर्व रा. इंदिरानगर कळं जि. उस्मानाबाद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून 12 किलो चंदणासह दुचाकी आणि चंदण तस्करी करणारे साहित्य असा एकूण 55 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. केज पोलिसात कलम 379, 34 भादवि सह कलम 41,42, 26 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना गुंजाळ हे करत आहेत.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी बोर्डाने त्या प्रश्नाचे 6 गुण बहाल करण्याचा घेतला निर्णय.


मुंबई (प्रतिनिधी) : बारावीची परीक्षा सुरू झाल्या पासून परीक्षा बोर्डच्या अनेक त्रुटी पुढे येताना दिसत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या मनोबळावर परिणाम होताना दिसत आहे. मात्र आता बोर्डाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

इंग्रजीच्या पेपरमध्ये चूक आढळल्यावर आता त्या चुकीच्या प्रश्नाला सरसकट 6 मार्क देण्यात येणार आहेत. इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नांऐवजी पर्यवेक्षकांना दिलेल्य़ा सूचना छापल्या होत्या. चूक बोर्डाच्या लक्षात आल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. इंग्रजी पेपरमधील पान नंबर १०वर हा प्रकार पाहायला मिळाला. तीन प्रश्नांमध्ये पर्यवेक्षकांसाठीच्या सूचना छापल्या होत्या. प्रत्येकी 2 गुणांचे हे तीन प्रश्न होते. नक्की काय करायचं हे लक्षात न आल्याने बहुतेक विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवलाच नाही. अखेर बोर्डाने या प्रश्नाचे 6 गुण बहाल करण्याचा निर्णय घेतलाय.

व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची टाकून, रोख 9 लाख 5 हजार रुपये पळविले.! दोन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल.


लातूर (प्रतिनिधी) : देवणी शहरातील व्यापारी; बसस्थानक शेजारी असलेल्या घराकडे जात असताना.! डोळ्यात मिरचीची पावडर टाकून, हातातील बॅगेत असलेली रोख रक्कम ९ लाख ५ हजार रुपये दोन अज्ञात व्यक्तींनी पळविल्याची धक्कादायक घटना रात्री 9 च्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार.! देवणी शहरातील किराणा दुकानाचे व्यापारी उमाकांत जगदीश जीवणे  हे नेहमी प्रमाणे रात्री 9 च्या सुमारास दुकान बंद करून, रोख रक्कमेची बॅग सोबत घेऊन बसस्थानक शेजारी असलेल्या घराकडे जात असताना; अज्ञात आरोपींनी व्यापाऱ्याच्या डोळ्याला दुखापत व इजा करून, व्यापाऱ्याच्या हातातील रोख रक्कम असलेली बॅग जबरीने चोरी करून पळून नेली. या प्रकरणी व्यापारी उमाकांत जगदीश जीवणे रा. देवणी या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात रात्री 1:30 च्या सुमारास गुन्हा क्रमांक ४२/२०२३ कलम ३९२, ३४ भादवी प्रमाणे दोन अज्ञात व्यक्ती विरोधात नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी भेट देवून पाहणी करून, तपासाचे चक्रे गतिमान सुरु केलेले आहेत.

Saturday, February 25, 2023

एक चूक अन् खेळ खल्लास..! सुईचा चुकीचा वापर केल्याने ५०० हून अधिक जणांना एड्स.


*रक्त घेण्याची वेळ आली तर एचआयव्हीमुक्त रक्त व रक्तघटकांचा वापर करावा. इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरिंज आणि सुईचा वापर करावा. 

मुंबई (प्रतिनिधी) - सहसा इंजेक्शनला सर्वच जण घाबरतात, परंतु अगदीच गरज असेल तरच डॉक्टर इंजेक्शन घेण्याचा सल्ला देतात. मात्र, याच इंजेक्शनमुळे गेल्या सहा वर्षांत तब्बल ५३९ जणांना एडस्ची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंजेक्शनला लावलेली सुई आणि सिरिंज हे या घातास कारणीभूत ठरले आहेत. 
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यातही २०२२-२३ या वर्षात सर्वाधिक २६१ जणांना एड्सची बाधा झाली. 

या कारणांमुळे एड्स पसरत नाही  

एचआयव्हीबाधित व्यक्तीला स्पर्श केल्यानेत्या व्यक्तीशी हस्तांदोलन केल्यानेगळाभेट घेतल्याने किंवा एड्सबाधित व्यक्तीला चावलेला डास अबाधित व्यक्तीला चावला तरी एड्स होत नाही.बाधित व्यक्तीसोबत जेवण केल्यास किंवा त्या व्यक्तीची भांडी वापरल्याने तसेच कपडे वापरल्याने किंवा एकाच स्नानगृहात किंवा शौचालयाचा वापर केल्यानेही एड्स होत नाही.

रक्त घेण्याची वेळ आली तर एचआयव्हीमुक्त रक्त व रक्तघटकांचा वापर करावा. इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरिंज आणि सुईचा वापर करावा, गुप्तरोग झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. बरेच रुग्ण एड्स झाल्याचे निदान होताच तो लपवून ठेवतात. हे योग्य नाही. त्याने घरातील सदस्यांना याबाबत माहिती द्यावी व उपाययोजना व उपचार करण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे. - डॉ. नीरज कुमार, रक्तविकारतज्ज्ञ 

HIV ची बाधा होण्याची कारणे

एचआयव्हीचा प्रसार होण्यामागे असुरक्षित लैंगिक संबंध मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. गेल्या वर्षी आढळलेल्या रुग्णांमध्ये सुमारे ९५ टक्के रुग्णांना असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एचआयव्हीची बाधा झाली. देशभरात हे प्रमाण सुमारे ८६.२ टक्के आहे. २.४ टक्के रुग्णांमध्ये आईमार्फत बालकाला, ०.०५ टक्के जणांमध्ये बाधित रक्तामुळे तर ०.२ टक्के रुग्णांमध्ये बाधित सुई किंवा अन्य वैद्यकीय उपकरणांच्या वापरामुळे एचआयव्हीची बाधा झाली. 

२,२६,५४४ एड्सग्रस्त उपचाराधीन तर २,२६,२८७ रुग्ण अँटी रिट्रायव्हल थेरपी घेत आहेत. इंजेक्शन टोचल्यानंतर रक्त येते. सुई आणि सिरिंजचा रक्ताशी संपर्क येतो. एडस्ग्रस्तांच्या शरीरातील रक्तात एचआयव्हीचे विषाणू मोठ्या प्रमाणावर असतात. अशा संक्रमित व्यक्तीसाठी वापरलेले इंजेक्शन पुन्हा वापरले, तर साहजिकच एचआयव्हीचे विषाणू दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे अशा सुई किंवा सिरिंजच्या पुनर्वापरामुळे दुसऱ्या व्यक्तीला एचआयव्ही किंवा रक्ताशी संबंधित इतर आजारांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. तसेच अन्य वैद्यकीय उपकरणे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय वापरल्यानेही एचआयव्हीच्या प्रसाराचा धोका संभवतो. 

शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांना पितृशोक. जगदीश लालाजी परदेशी यांचे दुख:द निधन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील उपजिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता  निधन झाले. शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांचे ते वडील होत.

बसवेश्वर कॉलनी भागातील रहिवासी तथा उपजिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांचे आज शनिवारी निधन झाले. मृत्यू समयी ते 78 वर्ष वयाचे होते. जगदीश परदेशी हे अत्यंत मनमिळावू व सुस्वाभावी असल्याने सर्व परिचित होते. विविध धार्मिक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असत. शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. दरम्यान जगदीश बालाजी परदेशी यांच्या पार्थिवावर आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता बसवेश्वर कॉलनी समता नगर रेणुका माता मंदिर जवळ या त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा सार्वजनिक स्मशान भूमी येथे निघणार आहे.

गेवराई बायपासवर भरधाव कारने अचानक पेट घेतला.चालक बचावला.


गेवराई (प्रतिनिधी) : बीडहून नाशिककडे जाणाऱ्या एका कारने गेवराई बायपासवर शुक्रवारी मध्यरात्री पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालक बाहेर पडल्याने अनर्थ टळला. विलास रामदास लांडगे ( रा. सहारा काॅलनी, नाशिक) असे चालकाचे आहे. 

विलास रामदास लांडगे हा चालक कारने ( क्रमांक एम.एच १५ एफ.ई ५५८३ ) बीड येथे भाडे घेऊन आला होता. पहाटे ३ वाजेच्या सुमारास गेवराई मार्गे नाशिककडे जात असताना बायपासवर कारने अचानक पेट घेतला. चालक विलास लांडगे हा वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र यात कार जळून खाक झाली. माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवली. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर यांनी घटनेचा पंचनामा केला.

आता तारीख पे तारीख नाही इ-प्रणालीद्वारे ऑनलाइन दाखल केलेल्या दाव्याचा एकाच दिवसात फैसला !


माजलगाव (प्रतिनिधी) एक महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी यापुढे न्यायालयाचे कामकाज पेपरलेस करावे, असे सूतोवाच केले होते. त्याच्या काही दिवसांतच माजलगाव येथील दिवाणी न्यायालयात तीन आठवड्यांपूर्वी एक प्रकरण फाइल करण्यात आले होते. ही पेपरलेस फाइल बुधवारी न्यायालयासमोर आल्यानंतर त्याच दिवशी न्यायालयाने निकाल दिला.

कोर्टात एखादा दावा सुरू झाला की, निकाल केव्हा लागेल याची गॅरंटीच नसते. यामुळे अनेकजण थकून जातात; पण निकाल काही लागत नाही. यात लोकांचा वेळ वाया जाऊन खर्चही वारेमाप होतो. यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी एक महिन्यापूर्वी न्यायालयाचे कामकाज यापुढे पेपरलेस व्हावे, असे सुचवले होते.

माजलगाव येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात संमतीने घटस्फोट मिळविण्यासाठी पक्षकाराने दावा दाखल केला होता. हा दावा संबंधित वकील ॲड. एस. एस. सोळंके यांनी इ-फाइल या नवीन प्रणालीद्वारे ही फाइल ४ फेब्रुवारी रोजी दाखल केली होती. या फाइलमध्ये आवश्यक ती कागदपत्रे इ-प्रणालीद्वारे अपलोड केली. त्यानंतर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. डी. घनवट यांच्यासमोर अपलोड केलेली ही फाइल २२ फेब्रुवारी रोजी आली असता त्यांनी ही फाइल पाहून संध्याकाळी सात वाजता यावर निकाल दिला. हा देण्यात आलेला पेपरलेस निकाल मराठवाड्यातील इ-प्रणालीमधील पहिला निकाल असल्याचे येथील वकिलांकडून सांगण्यात येत होते. निकालादरम्यान दोन्ही पार्टीला कोर्टात येण्याची आवश्यकता लागली नाही. यामुळे या लागलेल्या आगळ्यावेगळ्या निकालाची चर्चा शहरात होताना दिसून आली. या संमतीने झालेल्या घटस्फोटाच्या प्रकरणात ॲड. एस. एस. सोळंके व ॲड. विक्रम कदम यांनी पाहिले.

वकील कोठूनही काम पाहू शकतात

सध्या ज्या गावातील न्यायालयात दावा दाखल केला त्याच ठिकाणचा वकील लावला जात असे. यामुळे पक्षकाराचे मोठे नुकसान होताना दिसून येत होते. परंतु यापुढे इ-प्रणालीद्वारे न्यायालय सुरू झाल्यास आता कुठल्याही न्यायालयात कुठलाही वकील काम पाहू शकेल.

सर्वसामान्यांना होणार फायदा

सर्वसामान्यांना न्यायालयात दूर दुरून यावे लागते. त्याचबरोबर त्यांना होणारा खर्च, वेळ वाचणार असून वकिलांचा खर्चदेखील कमी होणार असल्याने यापुढे सर्वसामान्यांना फायदा होऊ शकतो.

घरबसल्या दिसणार निकालइ-

प्रणालीद्वारे लागलेला निकाल तत्काळ न्यायालयाच्या वेबसाइटवर कोणालाही हा दिसणार आहे. यामध्ये न्यायालयाला कोणती कागदपत्र देण्यात आली व न्यायालयाने काय निकाल दिला हे देखील दिसणार आहे.

आता वकील घरात बसून काम करू शकतात.

सध्या इ-प्रणालीद्वारे अनेक वकिलांना अडचणी निर्माण होत आहेत; परंतु याची सर्वांनी माहिती घेऊन आपले कामकाज हळूहळू इ-प्रणालीद्वारे दाखल करावे, असे न्यायालयाने येथील सुचवले आहे. त्यामुळे वकील आता घरबसल्या दावे चालवू शकतात.

सोपी आणि सुलभ पद्धत .

सुरुवातीला हे काम कठीण वाटत असले तरी इ-प्रणाली पद्धत अत्यंत सोपी व सुलभ आहे. त्यामुळे कोणी याकडे नकारात्मकदृष्ट्या बघू नये.-ॲड. एस. एस. सोळंके

नवी प्रणाली आत्मसात करावीइ-

प्रणालीद्वारे न्यायालय चालवल्यास यापुढे पक्षकारांना दिवाणी दाव्यात न्यायालयात यायची गरज राहणार नाही, तर फौजदारी दाव्यात आरोपींना न्यायालयात हजर करावे लागेल. यापुढे या प्रणालीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने वेगवेगळ्या सुधारणा होणार आहेत. त्यामुळे सर्व वकिलांनी ही प्रणाली आत्मसात करावी.-एस. डी. घनवट, न्यायमूर्ती दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर माजलगाव.

आ.नमिता मुंदडा यांनी केज शहरासाठी आणला तब्बल 76 कोटीचा निधी. केज शहरातील रस्ते होणार चकाचक.


केज (प्रतिनिधी) केज तालुक्याच्या लोकप्रिय आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे केज विधानसभा मतदार संघातील विकासकामांसाठी शासनाकडून भरभरून निधी दिला जात आहे. आ. मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे नगरोत्थान योजनेंतर्गत केज शहरातील पाच रस्त्यांसाठी तब्बल ७६ कोटी रुपयांच्या निधीस शुक्रवारी (दि.२४) मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच केज शहरातील पाच प्रमुख रस्ते चकाचक सिमेंट कॉंक्रीटचे होणार असून नागरिकांची खड्डेमय रस्त्यांच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. केज वासियांची अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या उमरी रोड, कानडी रोड व मंगळावर पेठ रस्त्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. केज शहरातील रस्त्यांसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.

दिवसेंदिवस केज शहर चौफेर वाढ होत आहे. केजमध्ये राहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक प्राधान्य देतात. त्यामुळे नवनवीन वसाहती तयार होत आहेत, त्यासोबतच लोकसंख्याही वाढत आहे. उमरी रोडच्या आजुबाजूला व लगत तर अनेक नवीन कॉलनी अस्तित्वात आलेल्या आहेत. या वाढत्या शहरीकरणाची गरज लक्षात घेऊन आ. नमिता मुंदडा यांनी शहरासाठीच्या विकासकामांकडे विशेष लक्ष दिले आहे. रस्त्यांची वारंवार होणारी दुरावस्था लक्षात घेऊन शहरात सिमेंट कॉंक्रीटचे पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर आ.नमिता मुंदडा, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश आले असून केज शहरात सिमेंट कॉंक्रीटचे पाच रस्ते तयार करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून तब्बल ७५ कोटी ८५ लाखांचा निधीस शासनाने शुक्रवारी मंजुरी दिली. हे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असून लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत. सदरील रस्ते उत्तम दर्जाचे होणार आहेत. प्रथमच येवढ्या मोठ्या प्रमाणात केज शहरातील रस्ते कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, लोकप्रिय खासदार प्रितम ताई मुंडे, पालकमंत्री अतुल सावे व सार्वजनिक बांधकाम मंञी रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

स्व.विमलताई मुंदडा यांनी केज मतदारसंघात विकासाची गंगा आणली होती. त्यांचेच अनुकरण करत मी केज मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मतदारसंघातील इतर आवश्यक विविध विकासकामांसाठी देखील सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच त्या साठी निधी मंजूर होईल अशी अपेक्षा आहे. —– आ. नमिता मुंदडा.

सिंचन उपविभागीय अधिकाऱ्यावर लाच लुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई. साडे तीन लाखाची लाच घेताना पकडला...!


पुणे (प्रतिनिधी) : जलसंपदा विभागातील उपविभागीय अधिकाऱ्याला साडेतीन लाख रुपयांची लाच घेतली असता रंगेहाथ पकडण्यात आले. यामुळे पुणे जलसंपदा विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

खेड तालुक्यातील करंजविहिरे येथील भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे अधिकारी तुळशीदास आश्रु आंधळे, वय ५७ वर्ष उप विभागीय अधिकारी, वर्ग-१ याने एका इसमाकडून तब्बल साडेतीन लाख रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारताच पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडून अटक केली. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पुणे येथील पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अमोल तांबे ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

औरंगाबाद : नाव बदललं तरी उल्लेख 'औरंगाबादच' करावा लागेल; तांत्रिक बाजू समजून घ्या !

मुंबई (प्रतिनिधी):औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावावर आता अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव असं अखेर शिक्कामोर्तब झालं. पण असं असलं तरी नव्या नावाचा उल्लेख मर्यादित स्वरुपात करता येणार आहे. त्याला कारणीभूत आहे केंद्राचं ना हरकत पत्र. या पत्रात नक्की काय म्हटलंय पाहुयात.
केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडून यासंदर्भात ना हरकत पत्र जाहीर करण्यात आलं आहे. हे अधिकृत पत्र सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव जे. जे वाळवी यांच्या नावानं लिहिण्यात आलं आहे. यामध्ये म्हटलं की, "तुम्ही २० ऑक्टोबर २०२२ रोजी भारत सरकारकडं पाठवलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद शहराचं नाव 'छत्रपती संभाजी नगर' असं करण्यात यावं. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद शहराचं नाव 'धाराशीव' असं करण्यात यावं. या मागणी पत्राला अनुसरुन या शहरांच्या नावात बदल करण्यास आमची कुठलीही हरकत नाही"
वरील पत्रातील मजकुरानुसार हे स्पष्ट होतं आहे की, नामांतराचा निर्णय हा केवळ औरंगाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयाचं शहर असलेल्या औरंगाबादच्या नावतच 'छत्रपती संभाजीनगर' असा बदल करण्यात आला आहे. तसेच उस्मानाबादच्या मुख्यालयाचं शहर असलेल्या शहराचं नामांतर 'धाराशीव' करण्यात आलं आहे. पण औरंगाबाद जिल्ह्याला औरंगाबाद असंच संबोधलं जाईल, त्याचप्रमाणं उस्मानाबाद जिल्ह्याला उस्मानाबाद असंच संबोधलं जाणार आहे. त्यामुळं या आदेशातील ही तांत्रिक बाब समजून घेणं गरजेचं आहे.

लॉजच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय पोलिसांनी टाकली धाड. लॉज मालक, आंटीसह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल.

गेवराई (प्रतिनिधी) : बीडच्या गेवराई शहरात लॉजच्या नावाखाली खुलेआम सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला आहे. शहरात एका लॉजवर धाड टाकून लॉज मालक, आंटीसह व्यवस्थापकाला ताब्यात घेतले असून औरंगाबाद येथील एका पीडितेची सुटका करण्यात आली आहे.
गेवराईतील एका लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रमुख सुरेखा धस यांना मिळाली होती. त्यानंतर गेवराई ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मदतीने, डमी ग्राहक पाठवून छापा टाकला. यावेळी डमी ग्राहकाने दोन हजार रुपये देताच त्यास एका खोलीत पाठविले. तेथे पीडित 27 वर्षीय महिला होती. डमी ग्राहकाने इशारा करताच पथक धावत गेले.
यावेळी लॉजमालक सूरज निकम रा. निकम गल्ली, गेवराई, व्यवस्थापक राजेश चोरमले रा. रेवकी देवकी, ता. गेवराई व आंटी अरुणा राठोड रा. जयराम नाईक तांडा, हमु अहिल्यानगर, गेवराई या तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस   ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक 1965 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Friday, February 24, 2023

राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर, जुनी पेन्शन योजनेसह 8 प्रमुख मागण्यांसाठी संप.

मुंबई : (प्रतिनिधी) राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं याबाबत राज्य शासनाला नोटीस पाठवली आहे. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांची आहे. राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
शासकीय सेवेत नोव्हेंबर २००५ पासून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना रद्द करून नविन पेन्शन योजना  लागू केली आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी - शिक्षकांनी आता बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याप्रमाणे आक्रमक झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आज मंत्रालयात राज्य सरकारला १४ मार्चपासून बेमुदत संपावर जात असल्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे नागपूर शिक्षक व अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या डोक्यावर जुन्या पेन्शनचे संकट पुन्हा घोंगावत आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

>> नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा.

>> कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा.

>> सर्व रिक्त पदे तत्काळ भरा. (आरोग्य विभागास अग्रक्रम द्या) तसेच चतुर्थश्रेणी व वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस केलेला मज्जाव तत्काळ हटवा.

>> अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा. तसेच कोरोना काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वयाधिक झालेल्या पाल्यांना विहित वय मर्यादेत सूट द्या.

>> सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करा.

>> चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करु नका. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या इतर सर्व प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा.

>> शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न (सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना १०:२०:३० वर्षे व इतर) तत्काळ सोडवा.

>> निवृत्तीचे वय ६० वर्षे करा.

मोठी बातमी ! औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजना टेंडर घोटाळ्यात ईडीची एन्ट्री.



औरंगाबाद: (प्रतिनिधी) महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडर घोटाळ्याच्या तपासात आता ईडीची एन्ट्री झाली आहे. ४० हजार घरांच्या जवळपास ४ हजार कोटींच्या या प्रकल्पात अब्नेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या १९ मालक-भागीदारांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून (आयपी ॲड्रेस) टेंडर (निविदा) भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे निविदा अंतिम करणे, कंत्राटदार निश्चित करण्यात गुंतलेले मनपातील तत्कालीन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

तपासात झाली ईडीची एन्ट्री

पंतप्रधान आवास योजनेची संबंधित कागदपत्र दिल्लीच्या ईडी कार्यालयाने ताब्यात घेतले. एकाच आयपी ॲड्रेस वरून  निविदा दाखल करणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात येत आहे.  या कंपनीने राज्यात किमान सहा ते सात शहरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेची कामे घेतली आहेत.  काम मिळवण्यासाठी पुण्यातील एका इमारतीचे प्रमाणपत्र लावण्यात आले आहे.  महापालिका प्रशासन संबंधित कंपनीने खरोखरच पुण्यात इमारत बांधली का याची शहानिशा करण्यासाठी एका समितीची स्थापना केली असल्याची माहिती आज प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी दिली.

असा समोर आला प्रकार

मनपा प्रशासक डॉ. चौधरी यांनी निविदेचा बारकाईने अभ्यास केल्यावर ही निविदा सिंगल आयपी ॲड्रेसवरून भरली असल्याचे उघडकीस आले. एकदच लॅपटॉपवरून ही निविदा चारही कंपन्यांनी अपलोड केल्याचे समोर आले. हा संपूर्ण टेंडर घोटाळा उघडकीस येताच गुरुवारी रात्री मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा ई-निविदेत फसवणूक करणाऱ्या समरथ कंपनीसह तीन कंपन्यांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

आवास योजनेचा आजवरचा प्रवास..

.समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्राॅपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. ४० हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हर्सूल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची १२८ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. ३१ मार्च २०२२ पूर्वी तत्कालीन मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी निविदा अंतिम करून त्यास राज्य सरकारची मंजुरी घेत केंद्राकडे प्रस्ताव दाखल केला. केंद्र सरकारच्या समितीने ३० मार्च २२ रोजी घरकुल प्रकल्पाला मान्यता दिली होती; परंतु समरथ कन्स्ट्रक्शनने बँक गॅरंटी भरण्यास असमर्थता दर्शविली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर समरथ कंपनीने पडेगाव येथील घरकुल प्रकल्पासाठी बँक गॅरंटी भरली. चारपैकी एक कंपनी अपात्र ठरली होती.

इंग्रजी विषयाची कॉपी पूरविल्या प्रकरणी सहा शिक्षकांना न्यायालयात जामीन मंजूर.


सोनपेठ (प्रतिनिधी) - इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर विद्यार्थ्यांना  पूरविल्या प्रकरणी साेनपेठ पाेलिसांनी सहा शिक्षकांना अटक केली हाेता. या शिक्षकांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सोनपेठ येथील महालिंगेश्वर विद्यालयातील केंद्रावर विद्यार्थ्यास कॉप्या पुरवण्याच्या उद्देशाने पेपरचे फोटो काढून काही शिक्षक कॉप्या बनवताना आढळले होते. यातील सहाही शिक्षकांना न्यायालयाने जामीन दिला.

उच्च माध्यमिक परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरच्या दिवशी शहरातील एका घरामध्ये विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्याच्या उद्देशाने पेपरचे फोटो काढून त्याच्या कॉप्या बनवत असल्याची माहिती मिळाली. 

यावरून सोनपेठ पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी बालाजी बुलबुले, गणेश जयंतपाळ, भास्कर तिरमले, रमेश शिंदे, सिद्धार्थ सोनाळे, कालिदास कुलकर्णी यांच्याविरुद्ध सोनपेठ ठाण्यात गुन्हा दाखल होता. यातील सहा शिक्षकांना सोनपेठ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.


धक्कादायक ! मॅनेजरचा युजर आयडी आणी पासवर्ड वापरून लिपिकाने स्वतःच्या खात्यात वळवले ७५ लाख.


आष्टी (प्रतिनिधी) -  बँक व्यवस्थापकाचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून बँकेत कार्यरत असणाऱ्या लिपिकाने बँकेचे 75 लाख 26 हजार रुपये स्वतःच्या खात्यात वळवल्याचा प्रकार आष्टी शहरात उघडकीस आला आहे.  याप्रकरणी सदरील लिपीका विरोधात आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत अंकुश अनारसे (रा.मोरेवाडी तालुका आष्टी) असे बँकेच्या लिपिकाचे नाव आहे. तो महेश मल्टीस्टेट बँकेच्या आष्टी शाखेत लिपिक म्हणून कार्यरत होता. 11 जानेवारी 2023 ते 27 जानेवारी 2023 या काळात त्याने बँकेचे शाखा व्यवस्थापक नवनाथ पांडुरंग अनारसे (वय 46 रा.देवी निमगाव तालुका आष्टी) यांचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून बँकेचे तब्बल 75 लाख 26 हजार रुपये स्वतःच्या खात्यात वळवले. विशेष म्हणजे, लिपिकाने हे करत असताना बँकेची एसएमएस सेवा बंद केली होती. यामुळे व्यवस्थापकास याबाबत काहीच मेसेज आला नाही. दरम्यान, हा प्रकार बँक प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर व्यवस्थापक नवनाथ पांडुरंग अनारसे यांनी आष्टी पोलिसात तक्रार दिली. यावरून भरत अंकुश अनारसे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत कदम करत आहेत.

धक्कादायक! कॉपी मुक्त अभियानाच्या नावाखाली चक्क मुलींचे अंडरगार्मेट्स तपासले.

भंडारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत परिक्षेच्या पहिल्याच  दिवशी मोठा घोळ झाला होता. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले  तर, दुसरीकडे जालना येथे कॉपीमुक्त अभियानाचा धसका घेवून विद्यार्थी परीक्षेलाच आले नाहीत. फोन करून बोलावले तरीही हे विद्यार्थी परीक्षेला आले नाहीत. तर,  भंडारा येथे अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉपी मुक्त अभियानाच्या नावाखाली चक्क मुलींचे अंडरगार्मेट्स तपासले यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
 भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथिल नानाजी जोशी जुनिअर कॉलेज येथे बारावीची परीक्षा केंद्र आहे. याच नानाजी जोशी महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेसाठी आलेल्या मुलींची तपासणी ही चुकीच्या पद्धतीने केली असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी लावला आहे.

नेमका काय आहे प्रकार?

भंडारा शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शहापूर येथे नानाजी जोशी जुनिअर कॉलेज या ठिकाणी बारावी परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज व नानाजी जोशी ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मात्र, डिफेन्स सर्विस जुनिअर कॉलेज शहापूर येथील विद्यार्थ्यांची तपासणी ही चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमचे अंडर गार्मेंट्स तपासले गेले असा आरोप या मुलींना केला आहे. 

विद्यार्थिनीच्या सांगण्यावरून डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज येथील प्रिन्सिपल यांनी तशी तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. पण मुलींना परीक्षेच्या वेळेला मानसिक त्रास होऊ नये म्हणून मुलींनी कॅमेरा समोर येण्यास नकार दिला आहे.

आरोप प्रत्यारोप

याविषयी नानाजी जोशी जुनिअर कॉलेज येथे जाऊन तेथील प्रिन्सिपल व शिक्षकांची विचारपूस केली असता असं कुठलंही प्रकार या ठिकाणी घडलेले नाही असे सांगण्यात आले आहे. तर, शिक्षण विभागाच्या गाईडलाईन्स नुसार आम्ही मुलींची तपासणी केलेली आहे. आणि मुलींची तपासणी ही महिला शिक्षकांनीच केली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहे असं मतही नानाजी जोशी येथील शिक्षकाने व केंद्र संचालकांनी व्यक्त केले आहे.

नानाजी जोशी महाविद्यालयातील प्रकार आता शिक्षणाधिकारी यांच्याकडे गेला मात्र डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज येथील प्राचार्य यांनी हा प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे स्वतःच्या शाळेमध्ये बारावीचा सेंटर यावा याकरिता डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज यांची खटाटोप तर नाही ना असाही सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. मात्र चौकशी अंतिम नक्की सत्य काय हे समोर येईल.

राज्यभरात यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. यावर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.


बारावीच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थी शोधतायेत मोबाईल. 11 मोबाईल चोरीला.

नाशिक (प्रतिनिधी) : राज्यात सगळीकडे बारावीची परीक्षा सुरु आहे. विद्यार्थ्यांचे  काही पेपर सुध्दा झाले आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला गेल्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. ही घटना नाशिक  जिल्ह्यात घडली आहे. मोबाईल चोरीला गेल्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे प्रकरण विद्यार्थ्यांनी सुरुवातीला शाळा प्रशासनाच्या कानावर घातलं, त्यानंतर काहीचं उत्तर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे प्रकरण पोलिसांच्या कानावर घातलं आहे. सध्या विद्यार्थ्यांचे मोबाईल शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

11 विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला

राज्यात सर्वत्र बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे. मात्र नाशिकमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान काहीसा मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना घडली. नाशिकच्या नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूल तसेच बिटको हायस्कूल मधील बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत असताना अज्ञात व्यक्तीने 11 विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरल्याची घटना घडली. चोरीला गेलेले मोबाईल दोन हजार ते दहा हजार रुपये किमतीच्या दरम्यानचे आहेत. त्या मोबाईल चोरीमुळे आता शाळा प्रशासन आणि पोलीस यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

विद्यार्थ्यांचा मोठा खोळंबा

नाशिकमध्ये दोन परीक्षा केंद्रावरुन विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला गेल्यामुळे पालकांनी सुध्दा नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे चोरीचं प्रकरण घडल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करीत असताना काहीवेळेला माहितीसाठी मोबाईलचा उपयोग होत होता. परंतु मोबाईल चोरीला गेल्यामुळे मोठा खोळंबा झाला आहे.

पोलिस परिसरातील सीसीटीव्ही आणि शाळेच्या आवारातील सीसीटिव्हीची चौकशी करीत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ज्ञानसिंधू प्रकाशन नाशिकच्या वतीने दिला जाणारा ज्ञानसिंधू साहित्यगौरव पुरस्कार संदीप राक्षे यांना जाहीर.

 
नाशिक (प्रतिनिधी) नाशिक येथील सुप्रसिद्ध असलेली ज्ञानसिंधू प्रकाशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक साहित्यिक कला आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींना ज्ञानसिंधू पुरस्कार देण्यात येतो यावर्षी ही विजयकुमार मिठे, यशवंत पाटील, शुभांगी पाटील, शकुंतला मांकड, सुमन अरघडे, छाया सोनवणे, कल्पना ठाकरे, राजेंद्र उगले, डी टी पाटील, किरण सोनार, नंदकिशोर ठोंबरे, संदीप राक्षे, रविंद्र मालुंजकर, संजय गोराडे, साहेबराव नंदन, बाळासाहेब भगत, रमेश नंदन, संगीता भामरे, ललित साळवे, सुनिता महाजन यांना विविध पुरस्काराने शनिवार दि २५ फेब्रुवारी २०२३ रोजी जयप्रकाश जातेगावकर, पुष्पराज गावंडे, शंकर बो-हाडे, भास्कर डोके, व वेदश्री काळे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानसिंधू प्रकाशनचे प्रकाशक तान्हाजी खोडे यांनी केलेले आहे..

नायगावचे आदर्श सरपंच जितेंद्र चौधरी यांचा राष्ट्रबंधणीचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानीत.


*डॉ दीपक शिकारपूर यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार. 

पुणे (प्रतिनिधी)  रोटरी क्लब नारायणगाव हायवे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या सौजन्याने राष्ट्रबांधणीचे शिल्पकार गौरव समारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमांमध्ये आपल्या विभागातील समाजकार्यामध्ये तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना आमंत्रित केले होते तसेच नायगांव चे प्रथम नागरिक श्री जितेंद्र पांडुरंग चौधरी सरपंच यांना राष्ट्रबंधणीचे शिल्पकार हा पुरस्कार रोटरी क्लब मेंबर डॉक्टर दीपक शिकारपूर पी डी जी संगणक तज्ञ व लेखक यांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन श्री रवींद्र वाजगे व श्री अंबादास वामन संचालक जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था तसेच नारायण आरोटे नंदकुमार चिंचकर श्रीकांत फुलसुंदर शिवाजी टाकळकर गणेश गोडसे रामभाऊ सातपुते यांनी आयोजन केले होते व याप्रसंगी उपस्थित माननीय श्री राजेंद्र चौधरी पोपट चौधरी उत्तम घुले ही व मान्यवर उपस्थित होते

कांतीकारी साथी न्युज आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या.


मेष : अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. तुमच्या बरोबरचे लोक मदत करतील. धंद्यात दुर्लक्ष करू नका.


वृषभ : कठीण कामे लवकर पूर्ण करा. घरातील माणसांना समजून घ्या. धंद्यासाठी संधी मिळेल.


मिथुन : नव्या विचाराने प्रेरित व्हाल. अहंपणा सोडल्यास मोठे यश मिळवता येईल. धंद्यात जम बसेल.


कर्क : गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. ती सोडू नका. जुने स्नेही भेटतील.


सिंह : रस्त्याने चालताना वेंधळेपणा करू नका. महत्त्वाची कागदपत्रे वेळच्यावेळी जागेवर ठेवा.


कन्या : संसारातील समस्या सोडवाल. तुमच्या कामाचे वरिष्ठ कौतुक करतील. धंदा मिळेल.


तूळ : काम करताना क्षुल्लक चूकसुद्धा करू नका. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात वस्तू सांभाळा.

वृश्चिक : आजचे काम आजच करा. दुसर्‍याला मदत करावी लागेल. धंद्यात सामोपचाराने वागा.


धनु : अधिकारी वर्गाबरोबर क्षुल्लक वाद होऊ शकतो. प्रवासात कायदा मोडू नका. प्रेरणा मिळेल.


मकर : मदत केलेल्या व्यक्ती तुम्हाला प्रगतीचा नवा मार्ग दाखवतील. कला क्षेत्रात मन रमेल.


कुंभ : धंद्याला कलाटणी मिळेल. थकबाकी वसूल करा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. खरेदी कराल.


मीन : आर्थिक व्यवहार करताना गोंधळ करू नका. वाहनापासून धोका संभवतो. मन स्थिर ठेवा.

Thursday, February 23, 2023

सरपंचपद 'एससी' राखीव परंतु गावात 'एससी' सदस्यच नाही २ वर्षांपासून रिक्तपदाची नामुष्की. यामागे कारण की राजकारण.

केज (प्रतिनिधी) : तालुक्यातील 120 ग्राम पंचायत्ती पैकी चार गावात अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षित होते. परंतु या 4 गावात सन 2021 मध्ये झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या सदस्यांसाठीच आरक्षण नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या ग्रामपंचायत मधील सरपंचपद तब्बल दोन वर्षापासून रिक्त असून उपसरपंच हेच या ठिकाणी काम करीत आहेत.
सन 2021 मध्ये झालेल्या केज तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत आंधळ्याचिवाडी, घाटेवाडी, बोबडेवाडी आणि मुंडेवाडी या चार ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षित होते, असे असताना एससी सदस्य देण्यात आले नाही. एससी उमेदवारांना हक्काचे सरपंच पद घेण्यापासून कोणी रोखले याचा शोध घेणे महत्वाचे आहे.

लाखो रुपयाची बोली करून दिले संरपचपद.

आंधळ्याचीवाडी येथील हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी जो जास्तीची रक्कम देईल त्याला सरपंच पद बहाल करण्याचा निर्णय सर्व गावकऱ्यांनी पारावर बसून घेतला. त्यासाठी बोली लावून लाखो रुपयायांची बोली लागली. नामदेव भाऊसाहेब आंधळे यांनी सर्वाधिक बोली लावल्यामुळे सर्वानुमते त्यांना उपसरपंच पद देण्यात आले. तसेच सरपंचांचा कारभार करण्याची त्यांना मुभा देण्यात आली. 25 जानेवारी 2021  रोजी आंधळ्याचीवाडी  ग्राम पंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. केज तालुक्यात बोली लावून सरपंच, उपसरपंचांचे पदाची खिरापत  राजरोस पणे वाटप होत असताना पंचायत समितीचे अधिकारी, पदाधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत. 

बिडीओ राजेंद्र मोराळेनी कॉल घेतला नाही.

केजचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांच्याशी भ्रमन ध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मी घाटात प्रवासात आहे, नंतर माहिती सांगतो म्हणून त्यांनी कॉल कट केला. काही वेळानंतर पुन्हा कॉल केला असता त्यांनी कॉल घेतलाच नाही. पुन्हा गुरुवारीही कॉल केला असता हा विषय तहसील कार्यालयाचा असून माहिती घेऊन कळविण्यात येईल अशी माहिती दिली.

दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा. 

घाटेवाडी, बोबडेवाडी आणि आंधळ्यांचीवाडी या तीन ठिकाणी सहा महिने सरपंचांचे पद रिक्त राहिल्यानंतर पोटनिवडणूक व्हायला पाहिजे होती. परंतु जाणून, बुजून अनुसूचित जातीच्या नागरिकांना सरपंच पदापासून वंचित ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ही माहिती वरिष्ठाना न देता दडवून ठेवल्यामुळे या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी बहुजन वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केली आहे.

एक वर्षांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले. 

एक वर्षापूर्वीच आपण या प्रकरणी जिल्हाधिकारी बीड यांचेकडे मार्गदर्शन मागितले असून अद्याप त्यांचा निर्णय न आल्यामुळे पुढील कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची माहिती तहदीलदार डी. सी. मेंढके यांनी दिली.

युवा कार्यक्षम नेतृत्व श्री.आभिषेक बकेवाड यांची गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या जिल्हायुवा अध्यक्षपदी निवड.


*नांदेड जिल्हा कार्यकारनी चे हिमायतनगर तालुक्यातील समाज बांधवांनी तोंड भरून केले कौतुक. 

नांदेड : (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील आभिषेक बकेवाड कार्यकारी संपादक लोकतंत्र न्युज लाईव्ह  यांची सामाजिक चळवळीच्या  माध्यमातून गोल्ला गोलेवार यादव समाजाला आपल्या कार्यातून  मुख्य प्रवाहात आणण्याचे काम एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या एका समाजप्रेमी कार्यक्षम नेतृत्व गेल्या काही वर्षापासून  समाजकार्य क्षेत्रात  सातत्याने काम करत असताना समाज संघटनेने श्री .आभिषेक बकेवाड (लोकतंत्र न्युज लाईव्ह कार्यकारी संपादक महाराष्ट्र) यांची निवड गोल्ला गोलेवार यादव महासंघ या सामाजिक संघटनेच्या नांदेड युवा जिल्हा अध्यक्ष पदी तेलंगणा राज्यामधील निर्मल जिल्ह्यातील श्री ज्ञान सरस्वती देवीचे सुप्रसिद्ध मंदिर असलेल्या
बासर येथे दि.१४ फेब्रुवारी रोजी गोल्ला, गोल्लेवार, यादव महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक निवड सर्व जेष्ठ समाजसेवक व समाज बांधवांच्या उपस्थित करण्यात आली आहे.या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

*हिमायतनगर तालुक्यात भव्य सत्कारसत्कार. 

श्री.आभिषेक बकेवाड यांच्या निवडीबद्दल  हिमायतनगर तालुक्यात भव्य सत्कार श्री. क्षेत्र बोरगडी येथे करण्यात आला,यावेळी उपस्थित-ह.भ.प.माधव महाराज बोरगडीकर,माजी सभापती व जेष्ठ समाजसेवक श्री. दगडूजी काईतवाड,लोकतंत्र न्युज रिपोर्ट श्री बाबाराव जरगेवाड, शिवसेना ता.संघटक श्री संजय काईतवाड, सरपंच श्री. सुधाकर काईतवाड,लक्ष्मण भैरेवाड, बाबाराव भैरेवाड,लिगां शैनेवाड,एकनाथ काईतवाड,भानुदास पोपुलवाड अभिमन्यू काईतवाड, यावेळी उपस्थित होते, पुढील वाटचालीस,व समाजकार्य साठी ह.भ.प.माधव महाराज बोरगडीकर यांनी शुभेच्छा दिल्या.

इंग्रजीनंतर हिंदीच्या प्रश्नपत्रिकेतही चुका, विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ.


*बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी झालेल्या हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आले.

मुंबई (प्रतिनिधी)   विभागीय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी झालेल्या हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आले. दोन प्रश्नांमध्ये चुकीचे क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. यंदा कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने काटेकोर उपाययोजना केल्या. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकल्याचे समोर आले. प्रश्नपत्रिकेतील ए ३ आणि ए ५ या प्रश्नांसाठी केवळ सूचना नमूद केलेल्या होत्या, तर ए ४ या प्रश्नात प्रश्नाऐवजी थेट उत्तरच देण्यात आले होते. त्यामुळे या तीन प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. असाच प्रकार बुधवारी झालेल्या हिंदीच्या पेपरमध्ये झाला.


हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. मात्र, या शब्दांचे क्रमांक १,२,१,२ असे देण्यात आले आहेत. ते १,२,३,४ असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना १,१,१,१ असे क्रमांक देण्यात आले आहेत. हे १,२,३,४ असे असायला हवे होते. बोर्डाकडून अशी चुकी आज दुसऱ्यांदा झाल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यंदा शिक्षण मंडळाने चुकांची मालिका सुरू केली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.