लातूर (प्रतिनिधी) : देवणी शहरातील व्यापारी; बसस्थानक शेजारी असलेल्या घराकडे जात असताना.! डोळ्यात मिरचीची पावडर टाकून, हातातील बॅगेत असलेली रोख रक्कम ९ लाख ५ हजार रुपये दोन अज्ञात व्यक्तींनी पळविल्याची धक्कादायक घटना रात्री 9 च्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार.! देवणी शहरातील किराणा दुकानाचे व्यापारी उमाकांत जगदीश जीवणे हे नेहमी प्रमाणे रात्री 9 च्या सुमारास दुकान बंद करून, रोख रक्कमेची बॅग सोबत घेऊन बसस्थानक शेजारी असलेल्या घराकडे जात असताना; अज्ञात आरोपींनी व्यापाऱ्याच्या डोळ्याला दुखापत व इजा करून, व्यापाऱ्याच्या हातातील रोख रक्कम असलेली बॅग जबरीने चोरी करून पळून नेली. या प्रकरणी व्यापारी उमाकांत जगदीश जीवणे रा. देवणी या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात रात्री 1:30 च्या सुमारास गुन्हा क्रमांक ४२/२०२३ कलम ३९२, ३४ भादवी प्रमाणे दोन अज्ञात व्यक्ती विरोधात नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी भेट देवून पाहणी करून, तपासाचे चक्रे गतिमान सुरु केलेले आहेत.
No comments:
Post a Comment