पत्रकारीतेतील नविन तंत्रज्ञान स्विकारून आपल्याला आपल्या उत्कर्षाच्या नविन वाटा निर्माण केल्या पाहिजेत.
*नवे विचार नवे प्रवाह व नविन तंत्रज्ञान स्विकारले पाहिजे-विलास बडे.
*आपली स्वतःची ओळख निर्माण करा-सुशील कुलकर्णी.
*जसे आहात तसेच नव्या संधी शोधून काम करा-प्रभाकर सुर्यवंशी.
केज (प्रतिनिधी) येथे सर्व पत्रकारांच्या वतीने पत्रकारीतेचे नवे पर्व या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते यावेळी मुख्य वक्ते विलास बडे , प्रभाकर सुर्यवंशी , सुशील कुलकर्णी यांनी पत्रकाराना मार्गदर्शन केले यावेळी मा आ पृथ्वीराज साठे , बजरंग सोनवणे , विजयकांत मुंडे , रमाकांत मुंडे , सिता बनसोड , संतोष हांगे , रमेश आडसकर , डॉ योगिता जायभाए , किरण वाघ आदीनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या .
पहिल्या सत्रात बोलताना विलास बडे यांनी पत्रकारीतेतील नवे प्रवाह स्विकारले पाहिजे नविन तंत्रज्ञान स्विकारून आपल्याला आपल्या उत्कर्षाच्या नविन वाटा स्विकारल्या पाहिजेत व नवनवीन वाटा शोधून आपले उत्पन्न वाढवले पाहिजे असे सांगितले.
दुसऱ्या सत्रात प्रभाकर सुर्यवंशी यांनी सांगितले की नौकरी गेली यातून आपण नविन संधी समजून युट्युबवर व्हिडीओ टाकून नवनवीन विषयाना हाताळत युट्युबवरून उत्पन्नाचे नविन साधन मिळवले यासाठी आपल्याकडे स्वतःचे थोडे विषय घेऊन अभ्यास करून विषय मांडले की नक्कीच जग आपल्या मुठीत येत अस सांगितले
सुशील कुलकर्णी यांनी नव्या प्रवाहाला हाताळून उत्पन्नाची नवी संधी शोधण्यासाठी आपल्यातला पत्रकार जागा केला पाहिजे एकमेकांना आडव जाण्या ऐवजी एकत्र येऊन काम केले पाहिजे ज्याला जे येत त्यातून नवी वाट स्विकारली पाहिजे तसेच दुसऱ्या साठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी काम करायला प्रचंड मोठ विश्व तुमच्या साठी उपलब्ध आहे सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातातला मोबाईल तुमच्या उत्पन्नाचे साधन बनत असताना आपण मागे का रहायच याचा विचार करा उगाच कोणाच्या तरी मागेपुढे करून किंवा त्यांच्या जाहिराती वरून कमिशन घेण्याऐवजी आपले स्वतःचे साधन वाढवा असे सांगितले
यावेळी मा आ पृथ्वीराज साठे , येडेश्वरी कारखान्याचे अध्यक्ष बजरंग सोनवणे , भाजपचे नेते रमेश आडसकर , जि प सदस्य संतोष हांगे , जि प सदस्य डॉ योगिता जायभाए , जि प सदस्य विजयकांत मुंडे , भाजप नेते रमाकांत मुंडे , नगर पंचायत अध्यक्ष सिता बनसोड , जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ तसेच विशेष उपस्थिती इन्फ्रंट इंडीयाचे दत्ता बारगजे व सौ संध्या बारगजे आदीनी पत्रकाराच्या नविन उपक्रमा बद्दल शुभेच्छा दिल्या
यावेळी इंन्फ्रंट इंडीयाच्या बारगजे दाम्पत्यास पत्रकार कार्यशाळेच्या निमित्ताने सर्व पत्रकारांच्या वतीने छोटीशी मदत करण्यात आली.
यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते .
No comments:
Post a Comment