Wednesday, February 15, 2023

बासर येथे गोल्ला, गोल्लेवार, यादव महासंघाची महाराष्ट्र व जिल्हा कार्यकारणी जाहीर.

*प्रदेशाध्यक्षपदी भुमन्ना आक्केमवाड तर जिल्हाध्यक्ष रमेश बद्दीवार व नागनाथ नियलवाड यांची निवड.

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड दि. 14 बासर येथे गोल्ला, गोल्लेवार, यादव महासंघाची कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. व्ही.एन. नारवाड व बासर येथील श्री कृष्ण मंदिराचे पुजारी ह.भ.प. श्री भुमानंद स्वामी, म्हैशाचे उद्योजक लालुभाई यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सुकाणू समितीचे प्रमुख व्ही.एन. नारवाड, राजेन्ना आटपलवाड, रामचंद्र येईलवाड, डॉ. तुकाराम आऊलवार, गंगाधर सल्लावार, श्रीरामजी गालेवाड, नागनाथ नियलवाड, रामचंद्र चौलवाड, प्रकाश करेवाड, डॉ. लक्ष्मणराव कोमलवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी श्रीराम गालेवाड (पुणे), उपाध्यक्षपदी रमेश आंबेपवार (यवतमाळ), कोषाध्यक्षपदी पी.पी. फांजेवाड यांची निवड करण्यात आली.
नांदेड जिल्हा उत्तर कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रमेश बद्दीवार, दक्षिण विभाग नागनाथ नियलवाड, जिल्हा सचिवपदी अशोक कासराळीकर, उपाध्यक्षपदी रमेश रामपूरवार व रामभाऊ वटपलवाड, कार्याध्यक्षपदी गंगाधर शिद्देवाड, रुखमाजी मुळश, कोषाध्यक्षपदी तुकाराम कैलवाड, सहसचिवपदी प्रमोद आटपलवाड यांची तर जिल्हा संघटकपदी कैलास आक्केमवाड यांची निवड करण्यात आली.
कर्मचारी विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अनुप अन्नमवार, महासचिवपदी संदेश कमटे (मुंबई), उपाध्यक्षपदी अशोक दांडिकवार (गडचिरोली) व दत्तात्रय वाघमोडे (पुणे), सहसचिव नागनाथ रामनबैनवाड (पालघर), कोषाध्यक्ष अनिल जिड्डीवार (यवतमाळ) यांची निवड झाली. तसेच कर्मचारी संघटना नांदेड जिल्हा अध्यक्षपदी मा.ना. झंपलवाड, कार्याध्यक्षपदी अंबादास आटपलवाड, सचिवपदी रमेश राऊलवार, उपाध्यक्षपदी साईराम क्यातमवार आणि माधव बलफेवाड, कोषाध्यक्षपदी माधव वटपलवाड यांना जबाबदारी देण्यात आली.
जिल्हा युवा कार्यकारणीमध्ये नांदेड उत्तर अध्यक्ष अभिषेक बक्केवाड, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष सतीश शिंगेवाड,सचिवपदी सदाशिव पालदेवार यांची निवड झाली आहे. उमरी तालुका अध्यक्ष गणेश अनेमवार, हिमायतनगर सुभाष शिल्लेवाड, अर्धापूर गंगाधर बकेवार, हदगाव नवनाथ बद्देवार, भोकर संतोष आकेमवार, नायगाव मधुकर घोसलवाड, धर्माबाद कैलास चंदोड यांची फेरनिवड म्हणून सन्मान करण्यात आला. उर्वरित तालुका अध्यक्षांची निवड लवकरच करण्यात येणार आहे.
तसेच गोल्ला, गोल्लेवार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा हा श्रीक्षेत्र माहुरगड येथे दि. 12 मार्च रोजी होणार असल्याचे घोषित करण्यात आले. समाजभुषण पुरस्काराचे मानकरी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक राजन्ना आटपलवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment