Tuesday, February 14, 2023

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आ. धनंजय मुंडें यांच्या सत्‍कार कार्यक्रम आयोजकावर गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे  हे अपघातातून बरे झाल्यानंतर रविवारी परळीत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन झाल्‍याने आयोजकावर गुन्‍हा दाखल केला आहे.
राष्‍ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या स्वागत मिरवणूक आणि सभा परळी येथे आयोजित केली होती. याकरीता सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्याची परवानगी होती. परंतु यातील आयोजकांनी सदरचा कार्यक्रम हा अकरा वाजून 55 मिनिटांपर्यंत सुरू ठेवला होता.

नियमांचे उल्लंघन

सदर कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवल्याने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक वाल्मीक कराड यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विष्णू फड यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या अनुषंगाने हा गुन्हा नोंदविण्यात आलाआला. 

No comments:

Post a Comment