Tuesday, February 21, 2023

सहा महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या युवतीची आत्महत्या, कुटुंबास माेठा धक्का.

माजलगांव (प्रतिनिधी) : सहा महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या एका वीस वर्षीय युवतीने रविवारी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच बीड  जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या युवतीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. माजलगांव तालुक्यातील गुंजथडी गावात ही धक्कादायक घटना घडली.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गुंजथडी गावात राहणा-या जयश्री विष्णु शहाणे (वय 20) यांचे सहा महिन्यांपूर्वी विष्णू शहाणे यांच्याशी विवाह झाला होता. रविवारी अचानक जयश्री यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. यामुळे शहाणे कुटुंबियांना माेठा धक्का बसला. 
जयश्री विष्णु शहाणे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सहाय्यक पाेलीस निरीक्षक विजयसिंह जाेनवाल अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment