Thursday, September 21, 2023

गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा शिवसेने च्या वतीने आंदोलन- सौ अनिता कुकडे यांचा इशारा.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरा मध्ये दिवसभरात अनेक वेळा वीज गायब होत असून हा विजेचा लपंडाव होऊ नये, याची काळजी वीज वितरण कंपनीने द्यावी अन्यथा नागरिक व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन  तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मा उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेविका सौ अनिता संजय कुकडे यांनी दिला आहे.

हिंदू धर्मियांमध्ये  गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी-गणपती सणाच्या काळात विजेचा लपंडाव होऊ नये अशी गौरी व गणेश भक्तांची भावना असते. वीज गेल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान होते त्यामुळे वीज वितरण कंपनीने विजेचा लपंडाव होऊ नये यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळे सणासुदीत वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा  परळी शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा सौ अनिता कुकडे यांनी दिला आहे.
परळी शहरामध्ये सध्या वारंवार वीज पुरवठा कोणत्याही पध्दतीचे भारनियमन नसताना कोणतीही पूर्वसूचना न देता, नेहमीच वीज पुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. शहरातील छोटया-मोठया व्यवसायिकांचे या खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. आधीच वातावरणामध्ये सध्या प्रचंड उकाडा होत आहे. त्यातच रात्रीच्या वेळीही अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्या मुळे नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ येत आहे. यात आता शाळा महाविद्यालय सुरु झाल्यामुळे या खंडीत वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.विशेषतः  रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी व दरोडा अशा घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. थोडा पाऊस चालू झाला तरी सुध्दा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. वीज वितरण कंपनीच्या अशा ढिसाळ कारभारामुळे व्यापारी व नागरिक त्रस्त झाले असून गौरी गणपती सणाच्या काळात वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेविका सौ अनिता संजय कुकडे यांनी दिला आहे.

Tuesday, September 19, 2023

मांजरा धरणातील पाणीसाठा दररोज होतोय कमी भर पावसाळ्यात पाणी संकट ओढावणार?

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील मांजरा धरणातील पाणीसाठा धपाट्याने कमी होत आहे. भर पावसाळ्यात पाणीसाठा कमी होत असल्याने बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठं पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
जवळपास गेल्या २ महिन्यांपासून बीड जिल्ह्यात पाऊस नाही. यामुळे जिल्ह्यातील धरणे कोरडे पडत आहेत. तर नद्या आजही ओस पडलेल्या आहेत. यामुळे पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही तर मोठं पाणी संकट बीड जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. मुळात बीड. लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बीडच्या केज तालुक्यातील धनेगावच्या मांजरा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचं समोर आलं आहे. 

धरणात २३.९८ टक्के पाणीसाठा 

मांजरा धरणात गेल्या ३ दिवसांपूर्वी २४.४८ टक्के असणारा पाणीसाठा आज घडीला २३.९८ टक्क्यांवर आला असून अवघ्या ३ दिवसात तब्बल .५४ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे भर पावसाळ्यात पाणीसाठा कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असून बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट ओढवण्याचं चित्र निर्माण झाले आहे.

Saturday, September 16, 2023

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

परळी वैजनाथ ( प्रतिनिधी )दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. सदरील हॉलीबॉल स्पर्धेसाठी परळी तालुक्यातून तब्बल वीस संघाने सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेचे उद्घाटन दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे प्राचार्य विठ्ठल तुपे सर ,तालुका समन्वयक संजय देशमुख,मुख्याध्यापक फाउंडेशन विद्यालय जी.एस.नागझरे सर, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अजय जोशी सर,क्रीडा शिक्षिका संघमित्रा हुमणे,  आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा  सौ.उषाताई किरण गित्ते ,  प्रशालेचे प्रेरणास्थान  मा श्री किरण गिते साहेब - सचिव, नगर विकास ,सार्वजनिक बांधकाम, उद्योग पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न झाल्या.

या स्पर्धेत परळी तालुक्यातील अनेक संघानी आपली छाप पाडत विजय संपादन केला आहे. परळी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धेत पुढील संघाने विजय प्राप्त केला. यात
14 वर्ष  मुले 1)सर्व प्रथम महाराष्ट्र विद्यालय मोहा
2) सर्व  द्वितीय  दिल्ली वर्ल्ड  पब्लिक  स्कूल ,14 वर्ष  मुली 1) प्रथम  फाऊंडेशन  स्कूल ,17 वर्ष मुले 
1) प्रथम फाऊंडेशन  स्कूल ,2) द्वितीय भेल स्कूल , 17 वर्ष  मुली  1)  प्रथम महाराष्ट्र विद्यालय  मोहा, 2) द्वितीय फाऊंडेशन  स्कूल ,19 वर्ष  मुले 1)प्रथम  राजश्री शाहू महाराज कॉलेज कौडगाव 2)द्वितीय न्यू हायस्कूल कॉलेज परळी,19 वर्ष मुली 1) न्यू हायस्कूल कॉलेज परळी, जिल्हास्तरीय स्पर्धा बीड येथे 20 व 21 सप्टेंबर ला होणार  आहेत. स्पर्धेत पंच म्हणून विजय मुंडे, आरगडे, गुलाबभाई, कदम सर, संदीप यादव, आणि संघमित्रा हुमने यांनी कामगिरी बजावली. सदरील हॉलीबॉल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न्यू हायस्कूल परळी वैजनाथ चे  क्रीडा शिक्षक, वाघमारे सर, नारायण वानखेडे, विद्यावर्धिनी विद्यालय विजय मुंडे भेल सेकंडरी स्कूलचे राडकर,कांबळे सर पोद्दार लर्न स्कूलचे घोलप सर, कदम सर न्यू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक अनिल इपाते,न्यू हायस्कूल विद्यालय शिरसाळा झांबरे सर,आश्रम शाळा कवडगाव प्राचार्य जाधव सर,उपप्राचार्य ढोकणे सर, चंदू चाटे आदींनी परिश्रम घेतले.

हरिहर आत्माराम चाटे यांना पितृशोक. लाडझरीचे मा. सरपंच आत्माराम चाटे यांचे निधन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी तालुक्यातील मौजे लाडझरी येथील माजी सोसायटी चेअरमन, माजी सरपंच आत्माराम दत्तात्रय चाटे यांचे शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्यांच्या पार्थीवावर आज रविवार दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता लाडझरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
         हरिहार आत्माराम चाटे, शिवकरण आत्माराम चाटे, शामकरण आत्माराम चाटे यांचे वडील माजी सरपंच आत्माराम दत्तात्रय चाटे हे परळी तालुक्यातील मौजे लाडझरी येथील मुळ रहिवाशी असुन मृत्यु समयी त्यांची वय ६७ वर्ष होते. त्यांच्या पश्‍चात ३ मुले,१ मुलगी, सुन,जावई, नातवंडे असा परिवार असुन त्यांच्या पार्थीवावर आज परळी तालुक्यातील लाडझरी येथे सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी सरपंच आत्माराम चाटे हे लाडझरी व बीड जिल्हात सर्व परिसरात सुपरिचीत होते. सरपंचपद तसेच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य पद ही त्यांनी सांभाळले आहे.  त्यांचे व्यक्तिमत्व रूबाबदार तर होतेच शिवाय ते सोज्वळ, शांत व तितकेच शिस्तीचे कडक होते. सर्व सामान्य व तळागाळातील लोकांशी दांडगा जनसंपर्क असलेले व्यक्तीमत्व होते.  ते नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर होते.शेतीनिष्ठ प्रगतशिल शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांनी कष्टाने आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. लाडझरी व परिसरात त्यांचा नावलौकिक होता. लाडझरी गावचे सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांचे गावच्या विकासात मोलाचे योगदान राहिले आहे. आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते. मागील कांही दिवसापासुन ते आजारी होते. यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. चाटे परिवारावर कोसळलेल्या दुःखात. कांतीकारी साथी  सहभागी आहेत. 

धक्कादायक!!कार पार्क करताच साधली संधी; काच फोडून लांबविली पावणेदोन लाखाची रोकड.



पाटोदा (प्रतिनिधी) : कामानिमित्ताने व्यापारी पाटोदा शहरात आले असता त्यांनी आपली कार मार्केटच्या पार्किंगमध्ये पार्क केली. त्यांनी कारमध्ये रोकड ठेवली होती. परंतु त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या अज्ञात व्यक्तींनी कारची काच फोडून पावणेदोन लाख रुपयांची बॅग घेऊन पसार झाले.
कारची काच फोडून व्यापाऱ्याची १ लाख ८० हजार रुपयांची रोकड ठेवलेली बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना बीडच्या पाटोदा शहरात रात्रीच्या दरम्यान घडलीय. महादेव रोहिदास येवले (रा. बामदाळ वस्ती पाटोदा) असं व्यापाऱ्याचे नाव आहे. व्यापारी महादेव येवले यांचे पाटोदा येथे अडत व्यवसाय आहे. ते काही कामानिमित्त पाटोदा शहरातील कांकरिया यांच्या कृषी दुकानासमोर कारने आले होते. 

कार पार्क करताच साधली संधी 

कार पार्क करून महादेव येवले हे दुकानात गेले. ही संधी साधून चोरट्यांनी आडोसा व अंधाराचा फायदा घेत कारची काच फोडून १ लाख ८० हजार रुपयांची बॅग चोरुन नेली. याप्रकरणी महादेव येवले यांच्या फिर्यादीवरुन पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Friday, September 15, 2023

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी परळी सज्ज. विविध रूपाच्या गणपतीने बाजारपेठ सजली.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सिंहासनावर आरूढ.. कमळावर बसलेला.. बाल गणेश.. लालबागचा राजा, सिद्धिविनायक, कोकणचा राजा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई.. अशा गणरायांच्या विविध रूपांनी अवघा रंग एकच झाल्याची अनुभूती परळी बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर मिळत आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघ्या चार दिवस अवधी शिल्लक असताना बाजारपेठेत गणरायाची मूर्ती निश्चित करण्यापासून ते सजावटीचे साहित्य खरेदी करण्यापर्यंत भक्तांची गर्दी झाली आहे.  गतवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे पांडुरंग मूर्ती स्टॉलचे संचालक श्री रामेश्वर खर्डे यांनी सांगितले.
गणरायाचे आगमन होताच वातावरण आनंदी होते. बाप्पांच्या स्वागताला गणेशभक़्त सज्ज झाले आहेत. त्यासाठी उत्सवाला लागणारे सजावटीचे साहित्य, नवनवीन रंगीबेरंगी मखर, लाईटींग तसेच पुजाविधीच्या वस्तुंची दुकाने ठिकठिकाणी गणेशभक्तांनी गजबजली आहेत. परळी शहरासह राज्यात दुष्काळाचे सावट असले तरी गणेशभक्तांचा उत्साह काही कमी झाला नाही, हे विशेष. दुष्काळाचे सावट असतांना देखील मोठ़या उत्साहात गणपतीची तयारी सुरू झाली आहे. शहरातील बाजारपेठेसह प्रमुख मार्गावरील रस्त्यांवर दुकानांवर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत असल्याने शहरातील बाजारपेठेत सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.  सजावटीसाठी रंगीबेरंगी थर्माकॉलचे मखर, चमकी आदींचा समावेश आहे. व्यावसायिकांनी मोंढा मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वैद्यनाथ मंदिर, राणी लक्ष्मीबाई टावर, नेहरू चौक, गणेश पार रोड, स्टेशन रोड आदी परिसरात दुकाने थाटली आहेत.  सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गणपतीच्या देखाव्यांची तयारी अद्याप सुरू असून मंडळांचे कार्यकर्ते दंग आहेत. गणेशाच्या आगमनासाठी मोठा उत्साह संचारला आहे.  बाजारपेठेत यंदा  विविध गणेशमूर्तींना भाविकांकडून मोठी मागणी होत आहे.

माझ्याशी लग्न कर' म्हणत शिवीगाळ करत मुलीची छेड; तरुणाविरोधात गुन्हा दाखल.

आष्टी (प्रतिनिधी) : एका तरुणांकडून मुलीला सातत्याने त्रास दिला जात होता. दरम्यान माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर पळून चल, अशा धमक्या देत तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची संतापजनक घटना बीडच्या आष्टी तालुक्यात घडली. या प्रकरणी संबंधित आरोपी तरुणावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

रस्त्यात गाठून मुलींची छेड काढण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाही. असाच प्रकार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका गावात घडला. एकतर्फी प्रेमातून अनेक दिवसांपासून तरुण मुलीचा पाठलाग करत होता. याच दरम्यान मुलगी एकटी असल्याची संधी साधून आष्टी तालुक्यातील एका गावात 23 वर्षीय आरोपी तरुणाने पाठलाग करत लग्न कर नाहीतर माझ्यासोबत पळून चाल असे म्हणत मुलीला धमकी दिली. 

घडला प्रकार सांगितलं आई-वडिलांना 

दुपारच्या दरम्यान अल्पवयीन पीडित मुलीचा पाठलाग करत धमक्या देत शिवीगाळ केली होती. हा प्रकार मुलीने आई वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी आष्टी पोलिसात तक्रार दिली असून याप्रकरणी आरोपी तरुणावर बाललैंगिक अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

Thursday, September 14, 2023

..तर याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री असतील', मराठा आरक्षणासाठी तरुण चढला टॉवरवर.


बीड (प्रतिनिधी):बीडच्या वाहिरा येथील तरुण मराठा आरक्षणाच्या मागणीसह गावातील विविध मागण्यांसाठी, आष्टी तालुक्यातील कासारी गावातील जिओच्या टावरवर चढून बसलाय.

गेल्या दोन दिवसांपासून शोले स्टाईल आंदोलन सुरू असताना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, या तरुणाचं रात्री देखील हे आंदोलन सुरूच आहे. अशोक माने असं आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

वाहिरा गावातील अशोक माने यांनी मराठा आरक्षणासह वाहिरा गावातील रस्ता आणि विविध समस्या बाबत कालपासून टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. 

गेल्या एक वर्षापासून जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना विविध समस्यांचे निवेदन देऊनही त्याची कोणतीच दखल घेतली नाही. त्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मार्गी लागत नाही. यामुळे अशोक माने या तरुणाने संतप्त होत, शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनातील कोणताच अधिकारी माझ्याकडे अध्याप आला आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. मात्र त्यांनी देखील आंदोलनाची दखल घेतली नाही. यामुळे आता मी जर काही केलं, तर याला राज्याचे मुख्यमंत्री आणि बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या जबाबदार असतील. असा संतप्त आणि टोकाचा इशारा शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या अशोक माने यांनी दिला आहे.

मराठा आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार पुढार्यांना गावबंदी. चंदनसावरगावच्या ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय.


केज (प्रतिनिधी) मराठ्यांना जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार आणि पुढार्यांना गावबंदी करण्याचा एक विशेष निर्णय केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन घेतला आहे.

केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथे डिगांबय तपसे यांचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांनी उपोषण सुरू केले आहे. केजचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची मागणी केली परंतु जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण हे उपोषण सोडणार नसल्याचे डिगांबर तपसे यांनी सांगितले

चंदनसावरगावमधे सुरू असलेल्या या उपोषणाला पाठिंबा म्हणून गावातील लहानथोर महिला पुरुष व बालगोपाळांनी गावातून मोठी रॅली काढली. ढोल ताशा वाजवत गावभर फिरून एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी केली आणि शेवटी या रॅलीचे रुपांतर भल्या मोठ्या सभेत झाले. चंदनसावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात हा भव्य कार्यक्रम झाला.

यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेतली आणि जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढार्यांनाही गावबंदी करण्याचा क्रांतीकारी ठराव एकमुखाने या ग्रामसभेत घेण्यात आला असल्याची माहिती शंकरबापू तपसे , बालासाहेब तपसे, गणेश चाळक, नामदेव मगर, गणेश तपसे, संजीव तपसे इत्यादींनी दिली. गावातील राजकीय गटतट बाजूला ठेवून गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून गावाची एकी करुन गावभर रॅली काढून ग्रामसभा घेऊन त्यामध्ये घेतलेला हा ठराव गावकऱ्यांनी सरकारला आणि जरांगे पाटील यांना पाठवला आहे.

मराठा आरक्षणावर झालेली गावकऱ्यांची एकी पाहून उपोषणकर्ते डिगांबर तपसे यांनी समाधान व्यक्त केले आहे. चंदनसावरगावकरांच्या या निर्णयाचे मराठा समाजाकडून कौतुक केले जात आहे तसेच जोपर्यंत सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही तोपर्यंत हा लढा मोठ्या खंबीरपणे चालूच राहील असे गावकऱ्यांनी सांगितले.

Wednesday, September 13, 2023

आष्टीत सलग दुसरी कारवाई. कानिफनाथ दुध संकलन केंद्रातील २४८ लिटर दुध नष्ट.


आष्टी (प्रतिनिधी) - दूध भेसळ रोखण्यासाठी शासनाने धाडसत्र सुरू केले असून आष्टी तालुक्यात तीन दिवसात दुसऱ्यांदा संकलन केंद्रावर जाऊन तपासणी करण्यात आल्या आहेत. कडा येथील कानिफनाथ दूध संकलन केंद्रावर तपासणी केली असता २४८ लिटर दुध नष्ट करण्यात आले. ही कारवाई जिल्हा दुध भेसळ समिती,अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने बुधवारी सकाळी ९ वाजता करण्यात आली.

आष्टी तालुक्यातील कडा येथे बुधवारी सकाळी जिल्हा दुध भेसळ समिती, व अन्न व औषध प्रशासन बीड याच्या संयुक्त पथकाने कानिफनाथ दुध संकलन केंद्र कडा येथे तपासणी केली. यावेळी संशयास्पद २४८ लिटर दूध आढळून आल्याने ते नष्ट करण्यात आले. तपासणी दरम्यान काढलेले ३ नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून  पुढील कारवाई नमुने अहवाल प्राप्त झाल्यानंतर करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.ही कारवाई त्रिभुवन कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी बीड,  अजित मैत्रे, सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन (औरंगाबाद विभाग) व  सय्यद इम्रान हाश्मी, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी एस.बी. गायकवाड , सहायक अधिकारी मुख्तार शेख, एस.ए.वैधमापक, सोनवणे झेड.के. विस्तार अधिकारी व पोलिस भावले यांनी केली.

आमच्या पप्पानी गणपती आणला. या गाण्याचे मूळ गायक व गीतकार आज ही प्रसिद्धीपासून दूर.

(कांतीकारी साथी रिपोर्ट) आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्यातील बाल कलाकार बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे, हा या गाण्यामुळे घरोघरी पोहोचला.
मात्र, या गाण्याचे मूळ गायक व गीतकार भिवंडीतील असून हे कलाकार आजही प्रसिद्धीपासून दूर आहेत. भिवंडी शहरालगतच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील चरणी पाडा अंजूर फाटा येथे राहणारे मनोज घोरपडे हे या गाण्याचे गीतकार आहेत.
मनोज घोरपडे यांचा चिमुकला मुलगा मोहित उर्फ माऊली व मुलगी शौर्य हे दोघे या गाण्याचे गायक आहेत. घोरपडे कुटुंबीयांचा वडापावचा व्यवसाय असून गीतकार मनोज हा त्यांचे वडील अनिल घोरपडे यांच्या वडापावच्या गाडीवर वडिलांना मदत करून गाण्याचा छंद जोपासतो.
महाराष्ट्रात आमचंच गाणं गाजतंय तवा खूप मजा येतेय. मी जेव्हा शाळेत गेलो तेव्हा मॅडमने आमचं गाणं बघितंल, सेल्फी काढून १०० रुपयेही दिले, असे चिमुकला गायक माऊलीनं सांगितलं.
तसेच, मोठ-मोठे लोकं स्टेजवरती गाणी म्हणायला बोलावतात. मला ढोलकी वाजवायला आवडते, आत्ताच आम्ही गाण्याचा क्लास लावलाय, असेही त्याने सांगितले.
मागील चार वर्षांपूर्वी मनोजने आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे लिहिले होते. हे गाणं लहान मुलांच्या आवाजात चांगले वाटेल म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांकडूनच सराव करून घेत हे गाणं २०२२ मध्ये गाऊन घेतले होते.
सुरुवातीला या गाण्याला सोशल मीडियावर दोन मिलियन व्ह्यूवज मिळाले होते. परंतु, बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे याने या गाण्यावरील व्हिडिओ बनवल्यानंतर हे गाणे प्रचंड व्हायरल झाले.
सध्या या गाण्याला साडेसहा मिलियन व्हूज मिळाले असून चिमुकला कलाकार साइराज हा चांगलाच प्रसिद्धी झोतात आला आहे. मात्र या गाण्याचे गीतकार व मूळ गायक गायक मात्र प्रसिद्धीपासून दूर आहेत

झोपेतून उठताच दिसले भयानक दृश्य; अनेक ठिकाणी हळदी..कुंकू..लिंबू टाकून पूजा, गावात भीतीचे वातावरण.

केज (प्रतिनिधी) : आजही अनेक गावांमध्ये अंधश्रध्येतून पूजा केली जात असल्याचे समोर येत असते. असाच प्रकार बीडच्या  केज तालुक्यातील लाखा गावात उघडकीस आला असून गावात मोक्याच्या जागेवर तसेच घरासमोर हळदी, कुंकू व लिंबू टाकुन पूजा केल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. अंधश्रद्धेतून जादूटोण्यासारखा अघोरी प्रकार केल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनसाठी अनेकांचे जीव गेले असतांना दुसरीकडे आजही गाव खेड्यात जादूटोण्यासारखी अंधश्रद्धा दिसून येत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा अंधश्रद्धा विषय ऐरणीवर येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात देखील हा प्रकार समोर आला आहे. यामुळे असा भोंदूपणा करणाऱ्या अंधश्रद्धाळू व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशीच मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
बीड जिल्ह्यातील लाखा गावातील ग्रामस्थ आज सकाळी झोपेतून उठल्यानंतर रस्त्यावरील हा प्रकार पाहिल्यानंतर धक्काच बसला. गावात अनेक ठिकाणी पूजा केल्याप्रमाणे चौकोन काढून त्यावर हळदी, कुंकू, गुलाल सुदृश्य दिसून असल्याने खळबळ उडाली आहे. तर सदरील हा प्रकार नेमका काय आहे? रात्रीतूनच हा प्रकार कुणी केला ? हे अद्याप समजले नसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड जिल्ह्यातील लाखा गावातील ग्रामस्थ आज सकाळी झोपेतून उठल्यानंतर रस्त्यावरील हा प्रकार पाहिल्यानंतर धक्काच बसला. गावात अनेक ठिकाणी पूजा केल्याप्रमाणे चौकोन काढून त्यावर हळदी, कुंकू, गुलाल सुदृश्य दिसून असल्याने खळबळ उडाली आहे. तर सदरील हा प्रकार नेमका काय आहे? रात्रीतूनच हा प्रकार कुणी केला ? हे अद्याप समजले नसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरी ते उखर्डा रस्त्याची दयनीय अवस्था तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आमरण उपोषणाला बसणार :- अभिजित कुडे

*खड्ड्यांमुळे बस जागीच बंद पडल्याने विद्यार्थ्यांंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

वरोरा (प्रतिनिधी):- तालुक्यातील उखर्डा ते नागरी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.  मोठे मोठे खड्डे पडले आहेत याचा परिमाण वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. या मार्गाने लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.  शाळेची बस या खड्ड्यांमुळे बंद झाली पूर्ण बस, गाडी चे  टप्पर  फुटतात यामुळे लोकांमधे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.  जनता त्रस्थ झाली आहे.  अनेक निवेदन दिले.  आंदोलन केले त्या नंतर उखर्डा ते नागरी रस्ता मंजूर झाला आहे पण उखर्डा ते उखर्डा पाटी रस्त्याची पार वाट लागली आहे. 
 लोकांना प्रवास करताना नाकीनऊ येत आहे.  या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे चालक कंटाळून गेले आहे.  गाडीचे पार्ट खाली तुटून पडत आहे इतकी भयानक अवस्था रस्त्याची झाली आहे.  लोकप्रतिनिधी व प्रशासन झोपेत आहेत, मुर्दाड प्रशासनाला जाग कधी येणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. लोक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत, खड्डे आहेत की तलाव अशी अवस्था झाली आहे.या मुळे प्रामुख्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत बस अचानक बंद पडल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)युवासेना अभिजित कुडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या पालकांना संपर्क करून त्यांना गावाला पोहचवले व स्वताच्या गाडीने काही विद्यार्थ्यांंना सोडून दिले.  महाडोळी येथील विद्यार्थ्यांंना 2 शब्द प्रेमाचे येथील लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाला बोलले.  या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनानेच करायचे काय असा प्रश्न पडतो आहे.  आता यांना सडो की पडो करून सोडू व मोठे जन आक्रोश आंदोलन तसेच प्रत्येक गावात लक्षवेधी आंदोलन करू असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला.  प्रशासनाने 1 महिन्यात तालुक्यातील रस्त्याची अवस्था दुरुस्त केली नाही तर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला आहे  यावेळी साहिल पानतावणे, ऋषिकेश कुडे,पंकज डोमकावळे, प्रणय देवतळे, रोशन भोयर, राहुल डोमकावळे व विद्यार्थी उपस्थित होते. ..

BREAKING न्यूज ! लालपरी पुन्हा थांबणार? कर्मचाऱ्यांकडून बेमुदत उपोषणाचा इशारा!!

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय. एसटी कामगारांचे आर्थिक आणि महत्त्वाचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. म्हणूनच एसटी कामगार संघटनेकडून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान उदय सामंत यांच्याशी होणाऱ्या चर्चेतून मार्ग न निघाल्यास 13 सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत उपोषणाचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. महागाई भत्ता 42 टक्के करावा, महामंडळाला अर्थसहाय्य करावे, कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशा विविध मागण्या कामगार संघटनेच्या आहेत.

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये 54 दिवस संप केला होता. राज्य सरकारने मेस्मा लागू केला होता. अखेर हा संप मिटल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर आले. परंतु ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगार संघटना पुन्हा: आझाद मैदानात उपोषण करणार असल्याचे म्हंटले जात आहे.

महाराष्ट्र कामगार एसटी संघटनेच्या काही प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे; १. सन 2018 पासूनची महागाई भत्याची थकबाकी द्या. २. माहे एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 ची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्या. ३. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 42 टक्के महागाई भत्ता थकबाकीसह द्या. ४. माहे एप्रिल 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंतची घरभाडे भत्त्याची थकबाकी द्या. ५. मूळ वेतनात जाहीर केलेल्या रु.5000, रु.4000 आणि रु.2500 रुपयांमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर करा. ६. राप कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांएवढे वेतन मिळण्यासाठी 10 वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करा. ७. सन 2016-2020 च्या एकतर्फी जाहीर केलेल्या रु.4849/- कोटींमधील शिल्लक रक्कम त्वरीत द्या. ८. गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्त्यासह द्या. ९. शिस्त आणि अपील कार्यपद्धतीचा भंग करुन देण्यात येणाऱ्या नियम बाह्य शिक्षा रद्द करा. १०. अपहार प्रवण बदल्या रद्द करा. ११. सण अग्रीम रु. 12500/- मूळ वेतनाची अट न लावता द्या यासह विविध मागण्या महाराष्ट्र कामगार एसटी संघटनेने केल्या आहेत. 


धक्कादायक घटना.! अनैतिक संबंध असल्याचा संशय. पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या.



पुणे (प्रतिनिधी) अनैतिक संबंध किंवा अनैतिक संबंधाच्या संशयावरून मारहाण आणि हत्याच्या घटनेत महिल काही दिवसांपासून कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ह्यात महिलांवरील घटना आणि हत्यांचे प्रमाण अधिक आहेत. अशीच पुन्हा: एक निर्दयी घटना समोर आली असून, विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात ही घटना घडली आहे.

एका निर्दयी पतीने अनैतिक संबंधांच्या संशयावरून आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली आहे.

पुणे शहरातील येरवडा परिसरात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. तर ह्या जोडप्याचे अवघ्या दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते. तर त्यांना एक ७ महिन्याची मुलगी देखील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष भोसले असे आरोपी पतीचे नाव असून, त्याने आपली पत्नी रूपाली भोसले हिचा निर्घृण खून केला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, आशिष हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम करतो तर रूपाली धुणे-भांडी करून घर चालवत होती. अशिष हा रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये सतत भांडणे होतं असत. दरम्यान शनिवारी रात्री आशिष आणि त्याच्या पत्नीचे जोरदार भांडण झालं. यावेळी आशिषने रुपालीला शिवीगाळ केली. तसेच धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून तिला जखमी केले. त्यानंतर उपचारासाठी रुपाली भोसले हिला रुग्णालयात नेण्यात आले असता; त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाई चा यावर्षीचा भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार ख्यातनाम साहित्यिक भास्कर चंदनशिव यांना जाहीर


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा यावर्षीचा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव ( कळंब ) यांना जाहीर झाल्याची माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली. प्रा. चंदनशिव हे ग्रामीण कथा, कादंबरीकार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्यपूर्ण लिखाणासाठी ख्यातनाम आहेत. 

यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्यावतीने स्व. भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी साहित्य, संगीत, पत्रकारिता, सुसंस्कृत राजकारणी, क्रीडा, सिनेमा - नाट्य, शिक्षण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या एका मान्यवरास पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे अकरावे वर्ष असून यावर्षी प्रा. भास्कर चंदनशिव यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

पुरस्कार वितरण सोहळा रविवारी ( दि. १७ ) सकाळी ११ वाजता वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, अंबाजोगाई येथे होणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे, सहसचिव प्रा. सुधीर वैद्य, कोषाध्यक्ष सतीश लोमटे, प्रा. प्रकाश प्रयाग, प्रा. भगवान शिंदे, प्रा. शर्मिष्ठा लोमटे व मार्गदर्शक भगवानराव शिंदे  आणि राजपाल लोमटे यांनी केले आहे.

प्रा. चंदनशिव यांचा परिचय.

प्रा. भास्कर चंदनशिव यांचे शिक्षण व जडणघडण अंबाजोगाई येथेच झाली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गंगापूर, बीड येथील महाविद्यालयात त्यांनी मराठी अध्यापनाचे कार्य केले. त्याच बरोबर त्यांनी मराठी साहित्यात  ग्रामीण कथा, कांदबरी, ललित असे वैविध्यपूर्ण लिखाण करून ग्रामीण साहित्यात नवा आयाम दिला आहे. त्यांच्या अनेक कथा व कांदबरी महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात अभ्यासक्रमाला लागलेल्या आहेत. त्यांची लाल चिखल ही कथा अनेक रूपाने वाचक व साहित्याचे अभ्यासक यांच्या मनात कायम कोरली गेली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचे अनेक नामांकित पुरस्कार, त्याच बरोबर साहित्य संस्थांचे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या साहित्य सेवेची दखल घेवून मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद येथे पार पडलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार, रोख पंचवीस हजार रुपये असे आहे. 

यापूर्वीचे पुरस्कार प्राप्त मान्यवर. 

यापूर्वी हा पुरस्कार, यशवंतराव गडाख पाटील, विजय कुवळेकर, पद्मश्री ना. धों. महानोर, रामदास फुटाणे, पं. नाथराव नेरळकर, विजय कोलते, मधुकर भावे, उल्हास दादा पवार, प्राचार्य रा. रं. बोराडे व पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. 

भेसळीच्या संशयातून २ हजार ७९४ लिटर दुध नष्ट.जिल्हा दुग्ध व्यवसाय विभागाच्या पथकाची दोन संकलन केंद्रावर कारवाई.


आष्टी (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील हाजीपूर व ब्रम्हगांव येथील केंद्रावर भेसळयुक्त दूध असल्याच्या संशयातून जिल्हा दुग्ध व्यवसाय विभागाच्या पथकाने सोमवारी सकाळी धाड टाकली. या कारवाईत पथकाने २ हजार ७९४ लिटर दूध जप्त करून नष्ट केले. ही कारवाई तब्बल ९ तास चालली.

हाजीपूर येथील कानिफनाथ दूध संकलन केंद्रात २५८ लिटर, ब्रम्हगांव येथील संत वामनभाऊ दूध संकलन केंद्रात १७९८ लिटर तर जय हनुमान दूध संकलन केंद्रातील ७३८ लिटर दूध असे एकूण २ हजार ७९४ लिटर दूध भेसळयुक्त असल्याच्या संशयातून नष्ट करण्यात आले. दोन्ही केंद्रावरील दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी एस.एम.केदार यांनी दिली.

ही कारवाई जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस.एम.केदार, दूध संकलन पर्यवेक्षक झेड.के.सोनवणे,  दुग्ध शाळा रसायन तज्ञ टी.एस भोसले, अन्न सुरक्षा अधिकारी एस.बी.गायकवाड, जोगदड पोलीस कर्मचारी, वनवे, वैघ मापन शास्त्र आदी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

नागरिकांनी तक्रार करावी.

दूध व दूग्धजन्य पदार्था पॅकेट्सवर अथवा डब्यांवर तारीख स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. मुदतबाह्यपदार्थ विक्रीसाठी ठेवू नये. भेसळ आढळल्यास नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन समिती सदस्यांनी केले आहे.

जेवणानंतर बिनसलं घरगुती वादातून पती-पत्नीने सोबत जीवन संपवलं.


गेवराई (प्रतिनिधी) : गावभर चक्कर मारल्यानंतर सकाळी १० वाजता साेबत जेवण केले. त्यानंतर दोघा नवरा बायकोमध्ये टोकाचे भांडण झाले. यात दोघांनीही राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात उघडकीस आली.

राजू बंडू चव्हाण (वय ३१) व सोनाली राजू चव्हाण (वय २८, रा. जातेगाव, ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. राजू हे नाशिकला असतात. मागील आठवड्यात ते सोनालीचा वाढदिवस असल्याने गावी आले होते. मंगळवारी सकाळीही राजू घराबाहेर पडले. घराच्या बाहेरच असलेल्या मराठा आंदोलनस्थळी त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते घरी गेले. घरी पती-पत्नीसह दोन मुलींनी सोबत जेवणही केले; परंतु त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यातूनच दाेघांनीही राहत्या घरातच आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाल्यानंतरही आई-पप्पा बाहेर येत नसल्याने मुलांनी दरवाजा वाजविला; परंतु आतून काहीच आवाज न आल्याने मुले ओरडली. त्यानंतर गावातील लोकांनी धाव घेतली. घरावरील पत्रे काढून आत प्रवेश केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह खाली उतरवून तलवाडा पोलिसांना संपर्क केला. जातेगाव आराेग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात याची नोंद झालेली नव्हती.

वादातून टोकाचे पाऊल.

पती-पत्नीने आत्महत्या केली आहे. प्रथमदर्शनी दोघांमध्येच झालेल्या वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. अधिक तपास सुरू आहे.- शंकर वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक, तलवाडा

Tuesday, September 12, 2023

वीरशैव समाज परळीच्या वतीने 19 सप्टेंबर पासून श्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन.

*श्री सदगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांची लाभणार उपस्थिती
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वीरशैव समाज परळीच्या वतीने श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी यांचा 122 वा पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहास 19 सप्टेंबरपासून उत्सवाला सुरूवात होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे अखंड शिवनाम सप्ताह, पालखी सोहळा, भंडारा असे सर्व पारंपारिक कार्यक्रम दिनांक 19 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार असून श्री सदगुरू 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत सर्व कार्यक्रम होणार आहेत.
श्री संतश्रेष्ठ गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सव यावर्षी विविध सामाजिक, धार्मीक उपक्रम व पारंपारिक भंडारा कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. बेलवाडी येथे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी व समस्त विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात होणार आहे. सप्ताहात अखंड शिवनाम, श्री गुरूलिंग स्वामींचा पालखी महोत्सव, कीर्तन, प्रवचन आदी धार्मीक कार्यक्रम श्री सदगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 
सोमवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी मंदिरात आरती व महाप्रसाद होईल त्याच दिवशी रात्री ठीक आठ वाजता श्रींची पालखी मिरवणूक निघेल, रात्री 9वाजता पालखी वैद्यनाथ मंदिरात थांबणार असून दुसऱ्या दिवशी 26 सप्टेंबर मंगळवार रोजी श्रींची पालखी सकाळी  7 वाजता श्री वैद्यनाथ मंदिरातून निघून श्री वक्रेश्वर मंदिर समोर थांबेन तेथून सकाळी 9 वाजता पालखी मिरवणूक परळी शहरातील प्रमुख रस्त्यावरून निघणार असून पालखीसोबत व पारायणासाठी समाजातील प्रत्येक घरातून किमान एका व्यक्तीने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सायंकाळी 5वाजता या पालखी मिरवणुकीचे विसर्जन श्री संत श्रेष्ठ गुरुलिंग स्वामी मंदिरात होणार असून तदनंतर आरती व महाप्रसाद होणार आहे. दैनिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे दररोज सकाळी 7  ते 8  शिव सहस्त्रनामावली, सकाळी 9 ते 11 परमरहस्य व श्री पलसिद्ध महात्म्य पारायण श्री गुरु ष.ब्र108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेड्रेकर सकाळी 11 ते 12 पर्यंत श्री मन्मथ स्वामी गाथावरील भजन दुपारी 3 ते 5 व शिव पाठ आरती सायंकाळी  5.30 ते 6.30 वाजेपर्यंत होणार आहे श्री गुरु 108 वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेडेकर यांचे प्रवचन व रात्री  8 ते 10 किर्तन होणार असून तदनंतर जागर कार्यक्रम होणार आहे परम रहस्याचे पारायण प्रमुख शि.भ.प. व्यंकट मारुतीआप्पा होनशेटे हे करणार आहे.
या कार्यक्रमास वीरशैव समाजातील सर्व महिला पुरुष व सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गुरुलिंग स्वामी देवस्थान चे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरूजी,सचिव अ‍ॅड.गिरीषअप्पा चौधरी, सदस्य प्रा.रामलिंगप्पा काटकर, सोमनाथअप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे, शिवकुमारअप्पा व्यवहारे, शंकरअप्पा उदरगीरकर, शिवशंकरअप्पा निर्मळे, अक्षय मेनकुदळे, अ‍ॅड.मंदार नरवणे सौ मीरा धनंजय कोरे व समस्त वीरशैव समाज परळी यांनी केले आहे.

Monday, September 11, 2023

दुर्दैवी घटना!अंबाजोगाई- लातूर महामार्गा वर मध्यरात्री पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात. एकाचा दुर्देवी मृत्यू.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) : बीडमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बीडच्या अंबाजोगाई- लातूर महामार्गावर मालवाहू पीकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या अंबाजोगाई- लातूर महामार्गावर मध्यरात्री पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. महामार्गावरील लोखंडी सावरगाव परिसरात झालेल्या या दुर्घटनेत दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ धाव घेत अपघातातील जखमींना रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली.हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातातील दोघांची ओळख अद्याप पटलेली नसून अंबाजोगाई पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, रविवार(९ सप्टेंबर) ला बीड जिल्ह्यात दुसरी एक भीषण अपघाताची घटना घडली होती. बीड -परळी राष्ट्रीय महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. 

Sunday, September 10, 2023

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाने अंगावर ओतले डिझेल, वेळीच केले परावृत्त.बीड तालुक्यातील कुटेवाडीतील घटना.


बीड (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील कुटेवाडी फाटा येथे उपोषण सुरू होते. रविवारी ११ वाजेच्या सुमारास घोषणाबाजी सुरू असतानाच एका युवकाने स्वत:च्या खिशातून बाटली काढत डिझेल अंगावर ओतले. दरम्यान प्रसंगावधान राखत ग्रामस्थ आणि पोलिसांनी धाव घेत वेळीच या युवकाला ताब्यात घेत त्याला आत्मदहनापासून परावृत्त केले. 

दादा वरपे असे डिझेल अंगावर ओतून घेणाऱ्या तरूणाचे नाव आहे. कुटेवाडी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नंदकुमार कुटे हे चार दिवसांपासून उपोषण करीत आहेत. रविवारी दादा वरपे याने डिझेल आतल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी कुटे यांनीही धाव घेतल्याने त्यांना चक्कर आली. त्यामुळे उपचारासाठी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या दादा वरपे यास पोलिसांनी नोटीस जारी करून कारवाईचा इशारा दिला आहे.

Saturday, September 9, 2023

बीड पाेलिसांना कडक सॅल्यूट ! गुन्हेगारांची कुंडली ऑनलाईन ठेवण्यात राज्यात अव्वल.


बीड (प्रतिनिधी) : गुन्हेगारांची कुंडली ऑनलाईन करण्यात बीड पोलिस राज्यात अव्वल राहिले आहेत. पुण्यात पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि सीसीटीएनएस विभागाच्या पथकाचा पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते पदक देऊन शनिवारी सन्मान करण्यात आला. या कामगिरीमुळे बीड पोलिसांची मान उंचावली असून त्यांना सर्वस्तरातून कडक सॅल्यूट केला जात आहे.

मागील काही महिन्यांपासून सर्वच विभागातील कारभार ऑनलाईन झाला आहे. पोलिसांकडूनही गुन्हेगारांची माहिती अपडेट ठेवली जाते. तसेच सर्व एफआयआर व इतर घडामोडींची एका क्लिकवर माहिती मिळत आहे. यासाठी स्वतंत्र सीसीटीएनएस विभाग आहे. या विभागाने मागील सहा महिन्यात सलग पाचव्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. केवळ एकवेळा दुसऱ्या स्थानी बीड पोलिस आले होते. बीड पोलिसांपाठोपाठ दुसऱ्या स्थानी नांदेड तर तिसऱ्या क्रमांकावर रायगड पोलिस आहेत. शनिवारी सायंकाळी पुण्यातील एसआरपीएफच्या मैदानावर बीड पोलिसांना पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सीसीटीएनएस विभागाचे निलेश ठाकूर, मच्छिंद्र बीडकर, चंद्रसेन राऊत या टीमचा पोलिस महासंचाल रजनीश शेठ, सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक बोरडे यांच्या हस्ते सन्मान झाला. यामुळे बीड पोलिसांची मान उंचावली आहे.

जावयाला मारहाण करून माय-लेकीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना एलसीबीने ठोकल्या बेड्या.


गेवराई (प्रतिनिधी) : गेवराई तालुक्यातील नागझरी वस्तीवर राहणाऱ्या सालगड्याला मारहाण करून त्यांची पत्नी व सासूच्या अंगावरील दागिने लंपास केले होते. ही घटना २३ ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तिघांपैकी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त केले असून सोन्याचा तपास सुरू आहे. या दोन्ही चोरट्यांना गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

परमेश्वर नानाभाऊ गायकवाड (रा.टेंभी तांडा राजपिंप्री) व नाना विनायक माळी (रा.संजयनगर गेवराई) अशी पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत. गेवराई तालुक्यातील नागझरी येथै डॉ.दैववान बांगर यांच्या शेतात गणेश भिमराव मोरे हे सालगडी आहेत. २३ ऑगस्ट रोजी रात्री पत्नी व सासूसोबत त्यांनी जेवण केले. त्यांची सासू बाहेर हात धुण्यासाठी गेल्या असता त्यांना बाहेर कोणी तरी असल्याचे दिसले. मोरे यांनी बाहेर येताच त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांची पत्नी व सासूच्या अंगावरील सोने व मोबाईल घेऊन तीन चोरट्यांनी धूम ठोकली. जवळपास १ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला होता.

याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेच स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेत शनिवारी दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्या. अजूनही एक फरार आहे. ही कारवाई गेवराई बसस्थानकावर करण्यात आली. त्यांना गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, अश्विनकुमार सुरवसे, सचिन आंधळे, नारायण कोरडे, चालक अशोक कदम आदींनी केली.

मुख्यमंत्री.उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचे प्रतीकात्मक फलक रेड्यावर लावून गाव भर धिंड!आरक्षण मिळेपर्यंत गावातील शाळा बंद ग्रामस्थांचा निर्णय.



आष्टी (प्रतिनिधी)मराठा आरक्षण देण्यात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप चोभानिमगाव येथे आंदोलन सुरु आहेत. आज सरकारचा निषेध म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावांचे प्रतीकात्मक फलक रेड्यावर लावत चोभानिमगाव येथे धिंड काढण्यात आली. तसेच आरक्षण मिळेपर्यंत गावातील शाळा बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

जालना येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून आष्टी तालुक्यातील चोभानिमगांव येथे तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. सरकारचा दशक्रिया विधी, मुंडण, त्यानंतर आज शनिवारी सकाळी रेड्याच्या गळ्यात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री नावाचे फलक गुंतवून गावभर धिंड काढत सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच  जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत गावातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक ठिकाणी चक्काजाम, बेमुदत उपोषण केली जात आहेत. तरी देखील सरकार ठोस निर्णय घेत नसल्याचा निषेध ग्रामस्थांनी यावेळी केला.

मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी नागपूरच्या वाण धरणात जल आंदोलन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी): मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने नागापूरच्या वाण धरणाच्या पाण्यात उतरून जल आंदोलन केले. मराठा समाजास आरक्षण द्यावे, जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आंदोलकावर करणाऱ्या लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी गुरुवारपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने नागापूरच्या वाण धरणावर धरणे आंदोलन सुरू आहे. 

परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणाच्या काठावर गुरुवारपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. एक मराठा लाख मराठा, मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे,  आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजास आरक्षण जाहीर न  केल्यास सामूहिक जलसमाधी घेण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा चे सद्स्य अमित घाडगे यांनी यावेळी दिला आहे. मराठा समाजास आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्ते संतोष शिंदे, सेवकराम जाधव यांनी केला आहे.  यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असून धरण्याच्या पाण्यात बोटी ही  सोडण्यात आल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना साठी बुद्धिजीवी शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पाठिंबा.भर पावसात लाक्षणिक उपोषण

बीड (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरंगे पाटील हे गेल्या चौदा दिवसापासून उपोषणासाठी बसले आहेत यासाठी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले मात्र आता बुद्धिजीवी वर्ग म्हणून ओळखल्या जाणारा शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी आता मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनात भर पावसात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसले आहेत यावेळेस या प्राध्यापक पक शिक्षकांनी सरकारला इशारा दिला आहे. 
आत्तापर्यंत सगळ्यांनी आंदोलन केले मात्र आता शिक्षक प्राध्यापक हे बुद्धिजीवी व्यक्ती मैदानात उतरली आहे जर आता ही आरक्षणाबाबत निर्णय नाही घेतला तर भविष्यातील संकटांना सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा या वेळेस आंदोलकांनी दिला आहे. अनेक पक्ष संघटना व ग्रामपंचायतीने दिला जाहीर पाठिंबा.

मराठा आरक्षणासाठी २८८ तरूणांचे मुंडण; सरकारचा केला प्रतीकात्मक दशक्रिया विधी!


आष्टी (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार ठोस भुमीका घेत नसल्याने चोभानिमगावात  आक्रमक आंदोलन करण्यात आले.  यावेळी गावातील २८८ तरूणांनी मुंडण करत सरकारचा प्रतीकात्मक दशक्रिया विधी केला. तसेच आंदोलकांनी जरांगे यांना पाठिंबा देत गावातील मंदिरात बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील अकरा दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनास राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक ठिकाणी समाज बांधवांनी उपोषण, इतर आंदोलन सुरू केले आहेत. तरी देखील सरकार ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथील आंदोलकांनी केला. तसेच आज सकाळी गावातील तब्बल २८८ तरुण आंदोलकांनी मुंडण करत सरकारचा प्रतिकात्मकरित्या दशक्रिया विधी पार पाडत निषेध व्यक्त केला. त्यानंतर आंदोलकांनी गावातील मंदिरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

बीड जिल्हा परिषदेत ५६८ पदासाठी २१ हजार १३१ अर्ज रिक्त पदांच्या तुलनेत ३८ पट अर्ज.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्हा परिषदेतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ५६८ पदांसाठी होत. असलेली मेगाभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्या परिषदेकडे ५६८ पदांसाठी तब्बल २१ हजार १३१ अर्ज दखल झाले आहेत.
बीड जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. या भरतीसाठी परीक्षा व इतर सर्व जबाबदारी आयबीपीएस या कंपनीकडे दिली आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त पदांबाबत शासनाला माहिती कळविल्यानंतर या मेगा भरतीचा निर्णय झाला असून २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानुसार रिक्त जागांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. 

रिक्त पदांच्या तुलनेत ३८ पट अर्ज 

सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या ५६८ पदांसाठी सुमारे २१ हजार १३१ इच्छुक तरुणांनी नोकरीच्या आशेने अर्ज केले आहेत. जागांच्या तुलनेत प्राप्त अर्जाची संख्या पाहता हे प्रमाण जवळपास ३८ पट इतके आहे. दरम्यान यावरून बेरोजगारीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

नाईटड्यूटीवर असताना आपल्या मुली समान सहकारी नर्सला पाठविले अश्लिल मेसेज, शिपाई निलंबीत.


वडवणी (प्रतिनिधी) : वडवणी तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५५ वर्षीय शिपायाने कंत्राटी नर्सला व्हॉट्सअपवर अश्लिल मेसेज पाठविले. या नर्सने तक्रार केल्यावर वैद्यकीय व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल दिला. त्यावरून या शिपायाला निलंबीत करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी शक्रवारी ही कारवाई केली.

सय्यद अतिक सय्यद रफिक असे या शिपायाचे नाव आहे. चार महिन्यापूर्वी हा शिपाई वडवणी तालुक्यातील एका आरोग्य केंद्रात बदलून गेला होता. ५ ऑगस्ट रोजी त्याची रात्रपाळीची ड्यूटी आरोग्य केंद्रात होती. याच दिवशी एक कंत्राटी परिचारीकाही कर्तव्यावर होत्या. त्याने एकटी असल्याचा गैरफायदा घेत नर्सला व्हाटस्अपवर अश्लिल मेसेज पाठविले. हा प्रकार नर्सने वैद्यकीय अधिकारी व तालुका आराेग्य अधिकारी यांना सांगितला. त्यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ यांच्या मार्फत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांना दिला. पाठक यांनी सर्व बाजू तपासून घेत या शिपायावर शुक्रवारी निलंबणाची कारवाई केली. या कारवाईने नर्स व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शिपायाच्या मुलीही डॉक्टर.

सय्यद अतिक यांच्या दोन्ही मुली डॉक्टर आहे. त्या देखील रूग्णसेवा करत आहेत. परंतू आपल्या मुलीसमान असलेल्या नर्सलाच या शिपायाने रात्रीच्यावेळी अश्लिल मेसेज पाठविल्याचे समोर आले. हा प्रकार समजल्यावर नातेवाईकांनीही त्याला चांगलाच चोप दिला होता. दरम्यान, यात निलंबणाची कारवाई झाली असली तरी अद्यापही पोलिस ठाण्यात याची नोंद झालेली नाही. तसेच याच शिपायाची विभागीय चौकशीही प्रस्ताविक करण्यात आली असून तोपर्यंत त्याला आष्टी पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे. यापूर्वीही त्याच्यावर एकेवळा निलंबणाची कारवाई झाली होती, असे सूत्रांनी सांगितले.

Tuesday, September 5, 2023

अंबाजोगाईत महाविकास आघाडीचा जनअक्रोश मोर्चा.कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परंतु शासनाकडून कोणताही निर्णय होत नाही. या विरोधात  बीडच्या अंबेजोगाईत महाविकास आघाडीतर्फे जणआक्रोश मोर्चा काढत सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर, करा अन्यथा कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही; असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून महाविकास आघाडीकडून जणआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा मुख्य मार्गाने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात बैलगाडी देखील होती. या मोर्च्याच्या माध्यमातून दुष्काळ जाहिर करून शेतकर्‍यांना सरसकट १ लाख रूपये मदत करावी. १०० टक्के पिक विमा मंजुर करावा. २५ टक्के पीकविमा अग्रीम देण्यात यावे. विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क व शेतकर्‍यांचे वीज बील माफ करावे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून जनावरांना चारा व जनतेला मोफत स्वस्त धान्य उपलब्ध करावे.  एम.आर.ई.जी.एस.(रोहयो) अंतर्गत कामे सुरू करण्यात यावीत. यासह विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश करण्यात आला.

तर कृषिमंत्री पदाचा राजीनामा द्या 

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात पायी ठेवून दिला जाणार नाही असा संतप्त इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. तसेच मोर्चात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत कृषिमंत्री पदाची जबाबदारी पार पाडता येत नसेल तर राजीनामा द्या अशी मागणी देखील करण्यात आली.

कधीकाळी हॉटेलमध्ये काम करणारा बीडचा भूमिपुत्र, अंतरवालीला देशात मिळवून दिली ओळख.

गेवराई (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणाची ४० वर्षांपूर्वीची मागणी आहे. या मागणीसाठी जगाला हेवा वाटावा असे शांततेतील मूकमोर्चे आणि ठोक मोर्चात समाजातील ४१ लोकांचे बलीदान जाऊनही समाजाच्या हाती काही पडले नाही. मात्र, मागच्या पाच वर्षांपासून मागे पडलेला मुद्दा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) देशाच्या नकाशावर ठळक आणि सध्या सर्व सत्तेचे लक्ष असलेले ठिकाण झाले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाने सरकार देखील हादरले आहे.
ही किमया करणारे मनोज जरांगे बीड जिल्ह्यातील भूमिपुत्र आहेत. त्यांचे गाव मातोरी (ता. शिरूर कासार) आहे. सासुरवाडीला स्थायीक झाल्यानंतर शिवबा संघटनेची स्थापना करून ते मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत.त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी कधीकाळी हॉटेलमध्येही काम केले. सामाजिक कार्याची आवड त्यांच्या रक्तातच आहे. बारावी उत्तीर्ण मनोज जरांगे यांच्या कुटुंबात पत्नी, चार मुले, तीन भाऊ व आई - वडील आहेत. मातोरी येथे शेतजमीन कमी असल्यामुळे मनोज जरांगे त्यांची सासरवाडी असलेल्या समर्थ कारखाना येथे वास्तव्यास गेले.तेथे त्यांना चार एकर जमीन होती. परंतु मराठा आरक्षणाचा ध्यास मनात असल्याने त्यांनी चळवळ उभी करत मराठा आरक्षणासाठी दोन एकर जमीन विकून टाकली. त्यांनी कधीकाळी जालनात काँग्रेसमध्येही काम केले. शिवबा संघटनेच्या माध्यमातून महानाट्याच्या निमित्ताने ते प्रकाशझोतात आले. २०१४ ला शाहगड ते मुंबई पायी फेरी व छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाही गाजला होता.
हळूहळू शिवबा संघटना आक्रमक होत गेली. कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले. यावेळी या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाबाहेर मारहाणही जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी केली होती. या मारहाण प्रकरणी बाबूराव वालेकर, राजेंद्र जर्हाड, अमोल कोल्हे, गणेश कोल्हे या चार युवकांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांनी २०२१ मध्ये अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे तब्बल तीन महिन्यांचे ठिय्या आंदोलनही केले.
सर्वांची नजर आता अंतरवालीवरअंबड तालुक्यातील पैठण फाटा येथे पुन्हा त्यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून जन आक्रोश मोर्चा काढला होता. त्यामध्ये सरकारकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने त्यांनी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठाट आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाची हाक दिली. आता राज्य सरकारचा हा सर्वात प्रमुख मुद्दा झाला असून सरकारही हादरले आहे. माध्यमांची आणि सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांची नजर आता अंतरवालीवरच आहे. मात्र, अंतरवाली नकाशावर आणणारे मनोज जरांगे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत.

अकोला-परळी पॅसेंजर पूर्णापर्यंतच धावणार; अकोला-परळी-अकोला रेल्वेगाडी अंशत: रद्द


परळी वैजनाथ : दक्षिण मध्य  रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे रुळाची दुरुस्ती काम करण्याकरिता रोलिंग कॉरिडॉर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणारी अकोला-परळी-अकोला पॅसेंजर अंशत: रद्द करण्यात आली आहे.

नांदेड रेल्वे विभागाने ४ ते १० सप्टेंबरपर्यंत विभाग अंतर्गत धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या आहेत. परळी-पूर्णा-अकोला ही गाडी उपरोक्त कालावधीत रद्द करण्यात आली आहे. तर अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणारी अकोला-परळी वैजनाथ-अकोला (अप-डाऊन) पॅसेंजर अंशत: रद्द करण्यात आली.

गाडी क्रमांक ०७७७४ अकिोला-परळी पॅसेंजर पुढील ९ सप्टेंबरपर्यंत पूर्णा रेल्वेस्थानकापर्यंतच धावणार आहे. ही गाडी पूर्णा-परळी दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक ०७६०० परळी -अकोला पॅसेंजर १० सप्टेंबरपर्यंत परळी-परभणी दरम्यान अंशत: रद्द असणार आहे. ही रेल्वे या कालावधीत परभणी ते अकोला दरम्यान धावेल.  परळी येथील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असते. अशावेळी वाशिमवरुन थेट परळी गाठणारी पॅसेंजर रेल्वेच अंशत: रद्द करण्यात आल्याने भाविकांना काहीसा अडचणींचा सामना करावा लागणार असून या कालावधीत इतर रेल्वे किंवा एसटीचा आधार घ्यावा लागणार आहे.

मसापचा आदर्श शिक्षक जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य अतुल दुबे यांचा अभय कुमार ठक्कर यांच्या वतीने सत्कार.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  मराठवाडा साहित्य परिषदेच्या  वतीने शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अतुल दुबे यांना जाहीर झाल्याबद्दल शिवसेना बीड जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते आज मंगळवारी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राचार्य अतुल दुबे सर यांना नुकताच जाहीर झाला आहे. त्याबद्दल स्टेशन रोड येथील मातोश्री मेडिकल येथे आज मंगळवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी शिवसेना नेते अभय कुमार ठक्कर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश जगताप माजी नगरसेवक संजय कुकडे, संतोष चौधरी संजय सोमाने यांच्यासह  शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीरशैव समाज परळीच्या वतीने भारतीय वायुदलातील फ्लाईंग ऑफिसर सर्वेश नावंदे याचा सत्कार संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर या पदावर रुजू झाल्याबद्दल परचुंडी तालुका परळी चा सर्वेश नावंदे याचा वीरशैव समाज परळी ,महाराष्ट्र वीरशैव सभा परळी,महाराष्ट्र विकास प्रतिष्ठान परळी ,शिवा संघटना परळी ,वसुंधरारत्न डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर  तपोनुष्ठान समिती परळी यांच्याकडून सर्वेशचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वीरशैव सभा बीडचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरुजी तर व्यासपीठावर डॉक्टर सुरेशचंद्र चौधरी ,सुभाष नावंदे माजी नगरसेवक अनिल अष्टेकर, चंद्रकांतआप्पा समशेटे, परळी समाचार चे संपादक आत्मलिंग शेटे, वीरशैव विकास प्रतिष्ठानचे सचिव सुधीर फुलारी सर माजी नगरसेवक चेतन सौंदळे सर, माजी नगरसेवक रमेश चौंडे,वैजनाथराव  बागवले उपस्थित होते .
सर्वेश सुभाष नावंदे याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार शाल,श्रीफळ पुष्पहार महात्मा बसवेश्वर प्रतिमा देऊन करण्यात आला यावेळी डॉक्टर सुरेश चौधरी,मा नगरसेवक अनिल अष्टेकर ,मा नगरसेवक चेतन सौंदळे सर यांनी मनोगत व्यक्त केले . सर्वेशच्या वडील सुभाष नावंदे यांनी पालकांनी मुलांवर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्याला शिकण्याची मोकळीक देणे आवश्यक आहे,असेच विद्यार्थी पुढे यश संपादन करू शकतात असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप श्री दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी करताना तरुण युवकांसाठी सर्वेशची निवड ही प्रेरणादायी असल्याचे सांगून त्याचा आदर्श तरुण युवकांनी घ्यावा असे आवाहन करून सर्वेशचा आम्हाला अभिमान वाटतो असे सांगितले.
 यावेळी सत्कारला उत्तर देताना सर्वेशने अतिशय जिद्दीने या परीक्षांना कसा सामोरे गेलो बर्‍याच वेळाअपयश आले परंतु खचलो नाही डगमगलो नाही ,त्याचबरोबर मला माझ्या आई वडिलांनी खूप मदत केली ,मला समजून घेतले त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो .राष्ट्रीय छात्र सेना  यात सर्व तरुण मुला मुलींनी सहभागी व्हावे यातून पुढे अशा प्रकारच्या बर्‍याच संधी आपणास मिळतात असे सांगितले व प्रभावीपणे विचार व्यक्त करून उपस्थित सर्वांची  मने जिंकली कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक नावंदे सर यांनी सूत्रसंचलन रंगनाथ खके गुरुजी यांनी तर आभार प्रकाश खोत यांनी मानले. कार्यक्रमास वीरशैव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरशैव  समाज परळी च्या समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Monday, September 4, 2023

प्रवाशांना दिलासा, बीड जिल्हा अंतर्गत एसटीची सेवा पूर्वपदावर.

*बीड विभागाच्या 5 बसेस जाळल्या गेल्या. त्यापैकी 3 शहागड परिसरात आणि 2 बीड जिल्ह्यात जाळण्यात आल्या हाेत्या.

बीड (प्रतिनिधी) : 
बीड जिल्हा अंतर्गत एसटी बस पूर्वपदावर आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यात 90 बसेस रस्त्यावर धावत आहेत. गेले दाेन दिवस बस बंद राहिल्याने बीड जिल्हा राज्य परिवहन महामंडळाचे 1 कोटी 30 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
जालना येथे मराठा आरक्षणा च्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलकांनी एसटी बस टार्गेट केली. त्यामुळं बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सर्वसामान्यांची लालपरी बंद होती.

दरम्यान सर्वसामान्यांची लालपरी जिल्हा अंतर्गत स्वरूपात सुरू झाली आहे. रात्री उशिरापासून ही लालपरी सुरू झाली आहे. आज जिल्ह्यातील रस्त्यांवर तब्बल 90 लालपरी धावत आहेत. दरम्यान गेली 2 दिवस एसटी बस बंद राहिल्याने, बीड विभागाचे तब्बल 1 कोटी 30 लाखाचं नुकसान झाले आहे अशी माहिती अजय मोरे (विभाग नियंत्रक, बीड) यांनी दिली.

आतापर्यंत बीड विभागाच्या 5 बसेस जाळल्या आहेत. त्यापैकी 3 शहागड परिसरात आणि 2 बीड जिल्ह्यात जाळण्यात आल्या आहेत.


मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे- अभयकुमार ठक्कर.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने परळी तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पूअण्णा ठक्कर यांनी यावेळी आंदोलन कर्ते शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे व राष्ट्रवादी तालुका प्रमुख लुगडे महाराज  यांना जाहीर पाठिंबा दिला असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असेही ठक्कर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परळी येथील तहसील कार्यालया समोर मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी शनिवारी (ता २) बेमुदत ठिय्या सुरुवात झाली आहे. ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता.4) शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभय कुमार ठक्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी  आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंदोलन करीत आहे. त्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला आहे. ही घटना निंदनीय आहे. शिवाय मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याची मागणी श्री अभयकुमार ठक्कर यांनी केली आहे.
यावेळी शिवसेनेचे माजी उप शहरप्रमुख सतीश जगताप,उप शहरप्रमुख किशन बुंदेले, माजी शहर संघटक संजय कुकडे युवासेना विधानसभा प्रमुख मोहन परदेशी आदि दिसत आहेत

श्री कृष्ण जन्माष्टमी विशेष.कृष्णाच्या लीलांमध्ये असलेला आध्यात्मिक संदेश. गुरुदेव श्री आशुतोष महाराज जीसंस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान.

हा त्या युगातील सर्वात गडद काळ होता जेव्हा पापाचार शिगेला पोहोचलेला होता. श्रीमद्भागवतातील एका रूपकानुसार त्या वेळी हजारो राक्षस राजांच्या रूपाने पृथ्वीवर आक्रमण करत होते. त्यांच्या भयानक अत्याचाराने पृथ्वी भयभीत झाली. ती गायीचे रूप घेऊन करुणामय आवाजात रडत होती. या दयनीय रडण्याकडे विश्वाचा निर्माता कसा दुर्लक्ष करू शकेल? त्यामुळे ती अनंत परम शक्ती मर्यादित मानवी शरीरात बंदिस्त होऊन या पृथ्वीवर अवतरली.  जणू ज्ञानाचा चंद्र अज्ञानाच्या अंधाराला छेदून द्वापर युगाच्या आकाशात उगवला. भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमीची मध्यरात्री ही अत्यंत शुभ मुहूर्त होती आणि हा अवतारी युगपुरुष होता – पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. भगवान श्री कृष्ण, एक अलौकिक व्यक्तिमत्व ज्याचे वर्णन कोणत्याही एका व्याख्येने करता येत नाही तेच आहेत. ज्यांनी एकीकडे गोप-गोपिकांच्या माध्यमातून प्रेम-भक्ती-विभक्तीचा प्रवाह जगात पसरवला आणि दुसरीकडे अर्जुनाच्या माध्यमाने सर्व उपनिषदांचे सार गीतेच्या रूपाने संपूर्ण मानव जातीला दिले. गोड प्रेम आणि धार्मिक ज्ञानाचा अद्भुत मिलाफ! हा श्रीकृष्ण आहे.
याच लीलाधराने आपल्या अवतारकाळात अनेक दैवी कार्ये केली. ब्रजच्या कुंज गल्ल्या, कंसाच्या अत्याचारांनी ग्रासलेली मथुरेची भूमी, कुरुक्षेत्राची महान लढाई - त्याच्या अलौकिक कार्याचा प्रकाश सर्व क्षेत्रांत चमकला. हे दैवी खेळ त्या काळी केवळ हेतूपुरतेच नव्हते, तर युगा-युगानंतरही ते आपल्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. सामान्य दिसत असूनही, ते असाधारण संदेशांचे वाहक आहेत. प्रत्येक लीलामध्ये खोल आध्यात्मिक रहस्ये संग्रहित केलेली आहेत. गोपाळांच्या मडक्यातील लोणी चोरून खाणे. नंदनंदन माखन चोरची ही लीला अतिशय प्रतीकात्मक आहे. हे जग द्वैत असल्याचे सूचित करते. त्यात लोण्याच्या स्वरूपात सार आणि ताक स्वरूपात असार दोन्ही आहे. लोणी चोरून भगवंत समजावून सांगत आहेत की, जगात परम सार म्हणजेच परमात्मा निवडा, अभौतिक माया नाही.
बाललीलांच्या या मालिकेत, विश्‍धर कालियाची मर्दन लीलाच घ्या ही बाललीला देखील कमी प्रतीकात्मक नाही. इथे विश्‍धर कालिया हे आपल्या विषारी मनाचे प्रतीक आहे. त्याचे हजारो विषारी कुंड हे आपल्यात उदभवणाऱ्या अगणित विकारांचे आणि दुर्बुद्धीचे प्रतीक आहेत. या वासनांध प्रवृत्तींमुळे आपल्या जीवनाची यमुनाही विषमय झाली आहे. जीवनातील गोडवा नाहीसा होऊन शांतता भंग पावत आहे. श्रीकृष्णाचे यमुना नदीत उतरणे हे आपल्या जीवनात पूर्ण गुरूच्या आगमनाचे प्रतीक आहे. गुरूंनी दिलेल्या अध्यात्मिक ज्ञानाने आत्म्यात प्रचलित असलेले प्रत्येक विकार कमी होऊ लागतात, मन हरवून जाते. जर व्यक्ती दुर्गुणांपासून पूर्णपणे मुक्त असेल आणि समर्पित असेल तर त्या परमात्म्याच्या दिव्य नृत्यासाठी एक योग्य व्यासपीठ तयार होऊ शकते.
महारास दिव्य लीला देखील स्वतःमध्ये खोल आध्यात्मिक रहस्ये जपून ठेवतात. रासलीला ही ती भावलीला आहे, ज्यामध्ये माया, शारीरिक आकर्षण आणि शोभा यांना स्थान नाही. देहबुद्धीचा एक अंशही नाही. हे शरीराचे नृत्य नाही तर आत्म्याचे नृत्य आहे. या दिव्य नृत्यात गोपी हे आत्मारूप होते आणि श्रीकृष्ण हे दिव्य स्वरूप होते! हे प्रत्येक आत्म्याचे त्याच्या स्त्रोताशी, परम आत्म्याचे आध्यात्मिक संघटन होते. पदमपुराणात असे वर्णन आहे की त्रेताचे सर्व ऋषी ज्यांना रामासोबत राहायचे होते ते गोप आणि गोपींच्या रूपात द्वापारमध्ये आले. ऋषी-आत्मा म्हणजेच गोपी अनेक जन्मापासून ब्रह्मरसाच्या तहानलेल्या होत्या. आणि म्हटल्याप्रमाणे - ब्रह्म हा परम रस आहे. श्रीकृष्णाच्या रूपातील परब्रह्मदेवाने रासलीलाच्या माध्यमातून गोपींवर हा परम रस वर्षाव केला. त्याची शाश्वत आध्यात्मिक तहान भागवली.
एकंदरीत, भगवान श्रीकृष्णाचे सर्व मनोरंजन दिव्य आणि दिव्य आहेत. त्याचे चरित्र अतिशय उदात्त आहे. तो शुद्ध-बुद्ध-मुक्त-चेतनस्वरूप आहे. त्याच्यात दडलेले अर्थ आणि त्याच्या मनोरंजनाचा ऐहिक बुद्धिमत्ता समजू शकत नाही. त्यांना समजून घेण्यासाठी ब्रह्मज्ञान ही एकमेव गुरुकिल्ली आहे. अंतःकरणाच्या खोलात जाऊन केवळ ब्रह्मज्ञानीच या मनोरंजनांचा अर्थ समजू शकतो. त्यांच्याकडून प्रेरित होऊन जीवनात आनंदाचा अनुभव घेता येतो. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या या पवित्र सणानिमित्त दिव्य ज्योती जागृति संस्थेचा सर्व भागवत प्रेमींना संदेश आहे की तुम्ही श्रीकृष्ण कन्हैयाची बाह्य झलक पाहण्यापुरते मर्यादित राहू नका. केवळ बाह्य इंद्रियांद्वारे त्याची स्तुती ऐकू नका. पण हा सण खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्यासाठी या अवतारी युगपुरुषाला ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून तत्वांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

दिव्य ज्योती जागृती संस्थेकडून सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त खूप खूप शुभेच्छा.

Sunday, September 3, 2023

मौजे परचुंडीच्या सर्वेश नावंदे यांची इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सत्कार.


*सोमवारी वीरशैव समाजाच्या वतीने सत्कार. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील रहिवासी सर्वेश सुभाष नावंदे याची इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाल्याबद्दल परळी वीरशैव समाज व महाराष्ट्र वीरशैव सभातर्फे श्री गुरुलिंग स्वामी मठ, बेलवाडी येथे दुपारी 12.30 वाजता उद्या सोमवारी सत्कार करण्यात येणार आहे.
सर्वेश सुभाष नावंदे राहणार परचुंडी तालुका परळी येथील विरशैव बांधव आहे.इ 1ली ते 12 वी पर्यंतचे शिक्षण व्हीं पी एम एस स्कूल, पुणे येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण मॉडर्न कॉलेज गणेश खिंड, पुणे येथे बी.एस.सी. मॅथ्स ने पदवी घेतली.  ते करत असतानाच त्याने पहिल्याच वर्षी एनसीसी हेडकॉटर, बालभारती समोर एस बी रोड, पुणे येथे एनसीसीसाठी प्रवेश घेतलस. बीएससी मॅथ्सच्या द्वितीय वर्षात असताना त्याची आर डी सी ( रिपब्लिक डे कॅम्प ) साठी महाराष्ट्राच्या संघामध्ये बेस्ट कॅडेट एअर विंग म्हणून निवड झाली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे तीन महिन्याचा प्री आर डी सी कॅम्प केला व दिल्लीमध्ये 26 जानेवारी २०१८ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राची संघ सहभागी झाला.
भारतातून आलेल्या सर्व राज्याच्या कॅडेट्स मधून त्याला राष्ट्रीय स्तरावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोल्ड मेडल बॅटन देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच भारताचे एनसीसी चे प्रमुख यांचे हस्ते बेस्ट कॅडेट ट्रॉफी ही देण्यात आली. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयामार्फत युथ एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत भारताची टीम रशिया येथील संरक्षण दलामध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. रशियाच्या डिफेन्समध्येही त्याने डिफेन्सच्या तंत्राचा सराव केला आणि तिथे गेल्यानंतर ही सर्वेशने बेस्ट कॅडेट ची ट्रॉफी मिळवली. त्यानंतर पदवीच्या शेवटच्या वर्षात तो एनसीसी C (सी) सर्टिफिकेट पास झाला.
बीएससी मॅथ्सची पदवी मिळवल्यानंतर त्याने पुणे विद्यापीठांमध्ये एक वर्षाचा डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आहे. हे करत असताना त्याने एअर फोर्स एपटीट्यूड टेस्ट आणि सीडीएस या यूपीएससी कडून घेण्यात येणाऱ्या परिक्षेत त्याने यश संपादन केले. 
तसेच एनसीसीचे सी सर्टिफिकेट पास झाल्याने त्याला डायरेक्ट एस एस बी ( सर्विस सिलेक्शन बोर्ड ) मध्ये संधी मिळाली या पाच दिवसाच्या मुलाखतीमध्येही त्याने यश संपादन केले.
या परीक्षांमध्ये यश मिळवून त्याची *इंडियन एअर फोर्स अकॅडमी दुंडीगल हैदराबाद येथे फ्लाईट कॅडेट म्हणून निवड झाली. दि. 17 डिसेंबरला २०२२ रोजी त्याची पासिंग आऊट परेड हैदराबाद येथील इंडियन एअर फोर्स अकॅडमी झालेली आहे. दोन जानेवारी 2022 रोजी त्याची *इंडियन एअर फोर्सचा फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली*.  त्याला विशेष ट्रेनिंग साठी हकीमपेठ, हैद्राबाद येथील एअर फोर्स स्टेशन मध्ये नियुक्ती देण्यात आली.
हैदराबाद हकीमपेठ येथील विशेष ट्रेनिंग संपून त्याला पहिली नियुक्ती उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील इंडियन एअर फोर्स विशेष केंद्रामध्ये नियुक्ती देण्यात आली. दिनांक एक सप्टेंबर 2023 रोजी तो प्रयागराज (उत्तर प्रदेश ) येथे रुजू झालेला आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व वीरशैव  समाजातील सर्व बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वीरशैव समाज परळी व महाराष्ट्र वीरशैव सभा यांच्या वतीने करण्यात आले आहे.