एकीकडे पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनसाठी अनेकांचे जीव गेले असतांना दुसरीकडे आजही गाव खेड्यात जादूटोण्यासारखी अंधश्रद्धा दिसून येत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा अंधश्रद्धा विषय ऐरणीवर येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात देखील हा प्रकार समोर आला आहे. यामुळे असा भोंदूपणा करणाऱ्या अंधश्रद्धाळू व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशीच मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
बीड जिल्ह्यातील लाखा गावातील ग्रामस्थ आज सकाळी झोपेतून उठल्यानंतर रस्त्यावरील हा प्रकार पाहिल्यानंतर धक्काच बसला. गावात अनेक ठिकाणी पूजा केल्याप्रमाणे चौकोन काढून त्यावर हळदी, कुंकू, गुलाल सुदृश्य दिसून असल्याने खळबळ उडाली आहे. तर सदरील हा प्रकार नेमका काय आहे? रात्रीतूनच हा प्रकार कुणी केला ? हे अद्याप समजले नसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:
Post a Comment