परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी येथील वैद्यनाथ कॉलेजमधील गोपीनाथ मुंडे सभागृहात स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.एन.सी.सी. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्याकरता सिकंदराबाद येथून श्री. कॅप्टन अर्जुन मोठे सर आले होते त्यांनी एन .सी. सी. च्या विद्यार्थ्यांना व इतर विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलात ऑफिसर होण्या करिता मार्गदर्शन केले, भारतीय सैन्य दलात भरती, निवड प्रक्रिया बाबत,सैन्य दलात संधी कशी मिळते याबत मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या स्वतःचा अनुभव सांगितला .विशेष अथिती म्हणून उपस्थित
वैद्यनाथ कॉलेजचा विद्यार्थी श्री. गोविंद माणिक चाटे, नाशिक.हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेत राज्यातून 11 क्रमांक पटकावला व त्याची पी. एस .आय. (PSI)पदी नियुक्ती झाली.प्रशिक्षणार्थीअसलेले चाटे यांचे, त्याबद्दल कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थितांही यथोचित सन्मान करण्यात आला.श्री. गोविंद चाटे यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांचा अनुभव सांगितला ते पोलीस शिपाई पदावरून पी. एस .आय . ची झेप कशी घेतली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना एम. पी. एस. सी .बाबतचे मोलाचं मार्गदर्शन केले ,
प्रभारी प्राचार्य डॉ. आर .डी. राठोड यांनी सैनिकामधील कडक शिस्त व वक्तशीरपणा सांगुन, विद्यार्थ्यांना देश प्रेम ,राष्टीय एकात्मता याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. टी .आर. हुरगुळे यांनी केले व प्रमुख पाहुणे यांचा परिचय व कार्यक्रमची प्रस्तावनाही एन .सी. सी. विभाग प्रमुख कॅप्टन गणेश चव्हाण यांनी केली.तर आभार प्रा. रवी कराड सर यांनी केले . यावेळी साई अकादमी संचालक श्री. रमेश चव्हाण व अंबाजोगाई येथील महादेव आडे उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व एन सी सी कॅडेट्स यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment