Monday, July 31, 2023
जालन्यात दोन कंपन्यांची व्यापऱ्यांकडून साडेतीन कोटीची फसवणूक.
मैत्रिणीसाठी बहिणीने घरात ठेवलेले भावाचे ६ लाख केले लंपास. कुटुंबीयांनी पैश्यांची मदत करण्यास दिला होता नकार.
अंबाजोगाई (प्रतिनिधी): मैत्रिणीला नोकरीसाठी पैशांची गरज होती. घरच्यांना उसने पैसे मागितले तर देणार नाहीत. म्हणून मैत्रिणीला सोबत घेऊन भावाने कपाटात ठेवलेल्या ६ लाख रुपयांवरच डल्ला मारला. हा चोरीचा प्रकार तब्बल दोन महिन्यांनंतर उघडकीस आला असून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील मोंढा मार्केट परिसरातील रहिवासी सर्वेश विजयकुमार लोहिया यांनी व्यापाराचे ६ लाख रुपये कपाटात ठेवलेले होते. पुणे येथे एका कंपनीमध्ये फॅशन डिझायनर म्हणून नोकरीला असलेली त्यांची बहीण निकिता लोहिया ३१ मे २०२३ रोजी घरी आली होती. दरम्यान, ११ जून रोजी निकिताची मैत्रीण नंदिनी बॅनर्जी निकिताला भेटण्यासाठी अंबाजोगाईत आली. नंदिनीला नोकरीची ऑर्डर आल्यामुळे तिला १० लाख रुपयांची गरज होती. निकिताने ही बाब कुटुंबीयांना सांगितली होती.
परंतु कुटुंबीयांनी निकिताला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे निकिताने मैत्रीण नंदिनीला सोबत घेत भावाने कपाटात ठेवलेले ६ लाख रुपये चोरले. त्यानंतर त्या दोघीही पुण्याला निघून गेल्या. दोन महिन्यानंतर लोहिया यांना कपाटात ठेवलेले पैसे सापडत नसल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सर्वेश लोहिया यांनी बहीण निकिता व तिची मैत्रीण नंदिनी या दोघींविरोधात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विनोद घोळवे करीत आहेत.
पेट्रोल पंपावर पहाटेच्या दरम्यान चोरी; सीसीटीव्ही बंद करत गल्यातील ४ लाख लंपास. चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल.
अंभोरा (प्रतिनिधी) - सीसीटीव्ही सिस्टम बंद करून चोरट्यांनी पेट्रोल पंपाच्या गल्यातील ३ लाख ९५ हजार रूपयांवर डल्ला मारल्याची घटना उंदरखेल येथे आज पहाटेच्या दरम्यान घडली. घटनास्थळी अंभोरा पोलिसांनी भेट दिली असून चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील सागर चंद्रकांत शेकडे यांचा बीड नगर राज्य महामार्गावर उंदरखेल शिवारात एच.पी.चा पेट्रोल पंप आहे. सोमवारी पहाटे २ ते ४ च्या दरम्यान चोरट्यांनी पंपावरील सीसीटीव्ही सिस्टम बंद करून कॅबीनमध्ये प्रवेश केला. कॅबीनमध्ये शनिवार, रविवार दोन दिवसांचा ३ लाख ९५ रूपये असा गल्ला होता. चोरट्यांनी सर्व रक्कम लंपास केली.
घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, सतिश पैठणे यांनी भेट दिली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात पेट्रोल पंप मालक सागर चंद्रकांत शेकडे याच्या फिर्यादीवरून चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंभोरा पोलिस करीत आहेत.
धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मनसेचा रास्ता रोको; शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी आंदोलन.
महामार्गावरील वाहतूक खोळंबली
या आंदोलनामुळे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. आगामी काळात सदरील प्रश्न मार्गी लावला नाही; तर मात्र मनसे स्टाईल आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला
बीडच्या लिंबागणेश परिसरात भरदिवसा एकाच दिवशी 2 ठिकाणी घरफोडी. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास.
सायंकाळी 5 वाजता घरी आल्या असता घराचे कुलूप तुटलेले व दार उघडे दिसले.घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तर यादरम्यान घरातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली आहे..
तर दुसरी घटना परिसरातील मुळूकवाडी येथे घडलीय. गावातील दासु भिमराव ढास हे शेतात काम करून सायंकाळी 7 वाजता घरी आले असता घराचे कुलूप तोडल्याचे दिसुन आले. यादरम्यान घरातील रोख 50 हजारासह व काही सोने चोरीला गेल्याचे दासु ढास व मंडुबाई ढास यांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान या दोन्ही चोरीच्या घटनानंतर नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्यासह टीम घटनास्थळी दाखल झाली होते. सदरील घटनेचा पंचनामा नेकनूर पोलिसांनी केला असून याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे
अवैध वाळूच्या डंपरची दुचाकीला धडक ३० वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू. डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल.
Sunday, July 30, 2023
परळीच्या शैक्षणीक क्षेत्राबद्दल तळमळ असणारे पत्रकार प्रशांत जोशी यांच्या निधनामुळे मोठी हानी- किरण गित्ते
धक्कादायक घटना! आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन.कुटुंबावर शोककळा.
शेतकरी दत्ता पाटोळे यांना केवळ दीड एकर शेती आहे. शेतीवरच त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र अस्मानी संकटांने दत्ता पाटोळे हे मानसिक तणावत होते.
या आर्थिक संकटाच्या विवंचनेतून मानसिक तणावाखाली आलेल्या दत्ता पाटोळे यांनी त्यांच्या राहत्या घरी पत्राच्या शेडमध्ये जीवन संपवलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी बीडच्या वडवणी पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली आहे
कोटा ते कोसरसार रस्त्यातील पुलावर भगदाड.लोकांचा जीव धोक्यात.बांधकाम विभाग झोपेत ;- अभिजित कुडे
विद्दुतीकरण झाले, रेल्वे कधी धावणार? पोखरणी ते नांदेड विद्युतीकरण प्रतिक्षा.
*२६९ कि.मी.चा रेल्वे मार्ग पूर्ण, दक्षिण मध्य रेल्वेने चार टप्प्यात विकाराबाद ते कोहिर, कोहिर ते खानापूर, खानापूर ते लातूर रोड व लातूर रोड ते परळीपर्यंत विद्दुतीकरण करिता सर्व यंत्रणा उभी केली.
उदगीर (कांतीकारी साथी न्यूज रिपोर्ट) : दक्षिण मध्य रेल्वे विभागातील रेल्वेचा २६९ किलोमीटरचा लोहमार्ग विद्युतीकरण होऊन तयार आहे. मात्र या मार्गावर विद्युत इंजिनवर रेल्वे धावण्याची अद्यापही प्रतिक्षा आहे. त्यामुळे याबाबत कधी निर्णय होणार याची प्रतिक्षा लागली आहे.दक्षिण मध्य रेल्वे विभागातील २६९ कि.मी. अंतराचे विद्युतीकरण पुर्ण झाले. या मार्गाची टेस्टिंग यशस्वी झाली आहे. मात्र या मार्गावर अद्याप एकही रेल्वे विद्युत इंजिनावर धावली नाही.
दरम्यान, उदगीरहून हैदराबाद व मुंबईच्या दिशेचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे बिदर-मुंबई, हैदराबाद-हडपसर, लातूर-यशवंतपूर व सोलापूर-मुंबई यासह मालगाड्या विद्युत इंजिनवर धावण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे विभागाने डिझेल इंजिन हद्दपार करून विद्दुतवर चालणारे इंजिन वापरण्यावर भर दिला आहे. यातुन पर्यावरण रक्षण, इंधन बचत व खर्च कपात असे उद्देश समोर ठेवण्यात आले आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेने चार टप्प्यात विकाराबाद ते कोहिर, कोहिर ते खानापूर, खानापूर ते लातूर रोड व लातूर रोड ते परळीपर्यंत विद्दुतीकरण करिता सर्व यंत्रणा उभी केली. परळी रेल्वेस्थानक ते परभणी रेल्वे स्थानक दरम्यान पोखरणीपर्यंतही मार्ग विस्तारीत झाला. मात्र पोखरणी ते नांदेड मार्गावरील विद्दुतीकरण अद्याप प्रलंबित असल्यामुळे नांदेड-बंगळुरू, नांदेड-तिरुपती व पूर्णा-हैदराबाद रेल्वे अद्याप विद्दुत इंजिनवर धावू शकत नाही. शिवाय, परभणी ते औरंगाबाद लोहमार्ग विद्दुतीकरण प्रलंबित असल्यामुळे औरंगाबाद-तिरुपती, औरंगाबाद-हैदराबाद, शिर्डी-तिरुपती, जालना-तिरुपती, काकीनाडा-शिर्डी, सिकंदराबाद-शिर्डी गाड्या विद्दुत इंजिनवर धावू शकत नाही. सध्या २६९ कि.मी. विद्दुतीकरण झालेला मार्ग गाडी धावण्याच्या प्रतीक्षेत आहे.
रेल्वे संघर्ष समितीचा पाठपुरावा सुरु...
पोखरणी ते नांदेड या लोहमार्गावर लवकर विद्दुतीकरण पूर्ण होऊन उदगीरमार्गे धावणाऱ्या सर्व गाड्या विद्दुत इंजिनवर धावू शकतील. यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समिती पाठपुरावा करीत आहे. परळी ते विकाराबाद मार्गावर परळीहुन सुटणारी किंवा विकाराबादहुन सुटणारी एकही गाडी नसल्याने हा मार्ग विद्दुतीकरण होऊनही गाडीच्या प्रतीक्षेत आहे. असे दक्षिण मध्य रेल्वे उपभोगता सल्लागार समिती सदस्य मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले.
बीडमध्ये केमिकल पावडर घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पलटी. एक जण जखमी.
दरम्यान, घटनेची माहिती कळताच महामार्ग रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेत विशाल डोंगर, यशवंत शिंदे यांनी प्रथमोपचार केले. तर यावेळी प्रतिक कदम, अंबादास जाधव, महादेव पवार, आकाश फुलझळके, मारुती चित्रे यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
६ तास रांगेत थांबले पण दर्शन घेतलेच १ लाख भाविक एकादशी निमित्त पुरुषोत्तम चरणी लीन.
माजलगाव (प्रतिनिधी) : सध्या अधिकमास सुरू असल्याने व शनिवारी कमला एकादशी आल्याने पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी पुरुषोत्तम पुरी या ठिकाणी एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी भाविकांना दर्शनासाठी ६-६ तास वेळ लागला. यावेळी अनेक सामाजिक संघटनेने भाविकांच्या फराळाची सोय केली होती.
दर तीन वर्षांनी येत असलेल्या अधिक मासानिमित्त माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथील पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे. शनिवारी अधिक मासातील एकादशी आल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
एकादशीचे औचित्य साधून भाविकांनी कमला एकादशीचे गोदावरी नदीपात्रात स्नान करून दर्शन घेतले. आजचा योग हा दर्शनासाठी चांगला मानला जात असल्याची भावना यावेळी भाविकांमधून बोलली जाऊ लागली होती.शनिवारी एकादशी व मोहरम निमित्त सुट्टी आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. भाविकांना ५ ते ६ तास दर्शनासाठी रांगेत उभा राहावे लागले. दोन दिवसापासून पाऊस नसल्यामुळे भाविकांना आनंदात दर्शन घेता आले. यावेळी अनेक सामाजिक संघटनेने भाविकांच्या फराळ, पाण्याची सोय केली होती. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. प्रशिक्षणार्थ उपविभागीय पोलीस अधिकारी श्वेता खाडे या ठिकाणी दिवसभर उपस्थित होत्या. यावेळी पोलिसांनी अनेक भाविकांसोबत हुज्जत घातल्याचे प्रकार देखील यावेळी पहावयास मिळाले.
१० महिन्यांत दाम दुप्पटचा फंडा ५४ लाखांची फसवणूक.रिद्धीसिद्धी फायनान्स ने गाशा गुंडाळला.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : सुरुवातीला काही लोकांना गुंतवणुक केल्यास १० महिन्यात पैसे डबल होण्याची स्कीम सांगितली. त्यानंतर त्यांना ठरल्याप्रमाणे परतावाही दिला. यावर विश्वास बसल्याने परतावा मिळालेल्या गुंतवणुकदारांनी स्वतः मित्र, नातेवाईक आदींना स्कीमबद्दल माहिती दिली. कुठलीही जाहिरात न करता दहा वीस गुंतवणुकदारांचा आकडा काही काळातच चारशे ते पाचशेवर जावून पोहचला. लाखों रुपये जमा झाल्यानंतर रिद्धीसिद्धी फायनान्स कंपनीने आपला गाशा गुंडाळत सर्वांनाच मोठा झटका दिला. आज-उद्या पैसे मिळतील या अपेक्षेने गुंतवणुकदारांनी वाट पाहिली मात्र फसवणुकच झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसात धाव घेतली. या प्रकरणी रिद्धी सिद्धीच्या सर्व संचालकांवर अंबाजोगाई शहर पोलीसात गुरुवारी ५३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कांचन राहुल वाघमारे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रामेश्वर ओंकार कुरुळे (रा.लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई) यांनी शॉपवर सतत येवून ओळख केली. त्यानंतर रिध्दी सिध्दी फायनानशियल सर्व्हिसेसचा व्यवसाय आहे. यामध्ये माझे साथीदार प्रभाकर श्रीकृष्ण हजारे, नम्रता खरात मिळून ट्रेडींग, पोल्ट्री फार्म, गोठ फार्म, मच्छी व्यवसाय, मैत्रीचा चहा, माऊली वडेवाले याचबरोबर जमिनीची खरेदी विक्री असे व्यवसाय करतो. यात तुम्ही १० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा महिन्यात डबल देऊ शकतो. यासाठी तुम्ही एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास २० हजार रुपये महिन्याप्रमाणे दहा महिन्यात तुमच्या खात्यात किंवा रोखीने पैसे देईल, असे अमिष दाखवले. त्यानंतर ५० हजार रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
गुंतवणूक करण्याचे ठरल्यानंतर अॅड. शिवाजी ज्ञानोबा जोगदंड यांच्याकडे १०० रुपयांच्या बाँडवर रक्कम व व्यवहाराचा उल्लेख करुन रोख ५० हजार रुपये साक्षीदार प्रभाकर हजारे यांच्याकडे दिले. त्यांनी पुढील दहामहिन्यानंतरच्या तारखेचा एक लाख रुपयांचा एचडीएफसी बँकेचा धनादेश दिला. त्यांनी बोलल्याप्रमाणे १० महीने खात्यावर ९ हजार ५०० रुपये प्रमाणे पुर्ण रक्कम मिळाली. विश्वास बसल्याने या स्कीमबद्दल मैत्रीणीला सांगितले. तिनेही गुंतवणूक केली. तसेच पुन्हा रोख ३ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र त्यानंतर कुठलाही परतावा मिळाला नाही. वारंवार परतावा देण्याच्या तारखा दिल्या, मात्र रक्कम मिळाली नाही. अशा पद्धतीने अनेकांची ५३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीत यांची नावे.
या आर्थिक घोटाळ्यात रामेश्वर ओंकार करुळे, मिना ओंकार कुरुळे, ओंकार कुरुळे, शिवप्रसाद कुरुळे, नम्रता खरात (सर्व रा. लोखंडी सावरगाव, ता.अंबाजोगाई) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व फरार असून अधिक तपास निरीक्षक विनोद घोळवे करत आहेत.
गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे होणार वर्ग.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातीलच गुंतवणूकदारांची मोठी संख्या आहे. त्यामुळे प्राथमिक तपास करुन हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला. तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू .
आष्टी (प्रतिनिधी) - घरासमोर असलेल्या विद्युत खांबाच्या ताणाला अचानक विद्युत प्रवाह उतरला. जनावरांना चारा पाणी करणाऱ्या शेतकऱ्याचा स्पर्श खांबाला झाल्याने विजेच्या धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. शशिकांत सुभाष परकाळे (२४) असे शेतकर्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील शशिकांत परकाळे (२४) आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घरासमोर बांधलेल्या जनावरांना चारापाणी देण्याचे काम करत होता. दरम्यान, तेथे असलेल्या विद्युत पोलच्या ताणाला शशिकांतचा स्पर्श झाला. या पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने शशिकांतच जागीच मृत्यू झाला. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याच्या पाश्यात आई,वडिल, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.
एकुलता एक मुलगा हिरावला.
सुभाष परकाळे यांना शशिकांत हा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे दुर्दैवी निधन झाल्याने एकुलता एक मुलगा हिरावला गेल्याने कुटुंब दुखात बुडाले आहे.
ओव्हरटेक करताना मिनीबसला अपघात; देवदर्शनासाठी जाणारे आठ भाविक जखमी. रापमच्या बसला पाठीमागून दिली धडक चालकाच्या अतिघाईमुळे अपघात.
बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी पुन्हा एक अपघात झाला. पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मिनीबसने ओव्हरटेक करताना रापमच्या बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात चार गंभीर, तर चार किरकोळ जखमी झाले. हा अपघात बीड तालुक्यातील रौळसगावजवळ शनिवारी सकाळी झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व जखमी भाविक हे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील कोळी कुटुंब व त्यांचे नातेवाईक पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. त्यांच्या मिनीबसमध्ये (एमएच १९ वाय ६१०२) जवळपास १७ प्रवासी होते. याच मिनीबसने सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील रौळसगावजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला (एमएच १४ डीटी १९२९) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पाठीमागून धडक दिल्याने मिनीबस रस्त्याच्या खाली गेली. तसेच समोरील भागही चेपला गेला. यात बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघात होताच रापमची बस बाजूला जाऊन थांबली, तर परिसरातील लोकांनी लगेच धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच महामार्ग पोलिस, नेकनूर पोलिस आणि रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचली. त्यांनी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविले. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असून, चौघांची स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अपघातानंतर उपनिरीक्षक यशवंत घोडके, संजय खताळ, अनिल तांदळे, विलास ठोंबरे, सांगळे, जालिंदर सुरवसे, पह्राट यांच्यासह नेकनूर पोलिसांनी जखमींना मदत केली. तसेच वाहतूकही सुरळीत केली.
अशी आहेत जखमींची नावे.
नर्मदा एकनाथ कोळी (वय ६०), कैलास बोधवडे (चालक), अश्विनी सपकाळे (वय २५), राजर्षी कोळी (१६) हे गंभीर जखमी आहेत, तर आशा कोळी (५०), सुरेखा कोळी (४०), मनीषा कोळी (४०), राहुल कोळी (३२) हे किरकोळ जखमी आहेत. हे सर्व जखमी भाविक जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या बीड व परिसरातील नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
जि.प.शाळेत खिचडी शिजवणारी महिला अन् शिक्षिकेमध्ये भांडण व मारहाण. घटनेचा व्हिडिओ व्हायरल .
धारूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील जोड हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये खिचडी शिजवण्याचं काम करणारी महिला आणि त्याच शाळेतील एका शिक्षिकेमध्ये वाद झाला. यातून दोघींनी शाळेच्या प्रांगणात अक्षरशः एकमेकींचे केस ओढत मारहाण केली. ही घटना आज शाळेच्या आवारातच घडली असून या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पतीसह शाळेत येऊन शिक्षिकेबरोबर झटापट केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसून येत.
तालुक्यातील जोड हिंगणी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथी वर्गामध्ये जवळपास 60 विद्यार्थी शिक्षण घेतात. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खिचडी शिवणाऱ्या महिलेकडून दर्जदार आहार न देणे, अल्प प्रमाणात खिचडी, बिस्किट देण्याचे प्रकार सातत्याने होतात. यामुळे शाळेतील एका शिक्षिकेने या महिलेस विद्यार्थ्यांना पोट भरून पोषण आहार देण्यास सांगितले.
दरम्यान, त्यानंतर खिचडी शिजवणारी महिला त्या शिक्षिके बाबत उलटसुलट चर्चा करत चुकीचे वक्तव्य करत होती. यातच खिचडी शिजवणाऱ्या महिलेचा पती शाळेच्या आवारात लघुशंका करत असल्याबाबत ही महिलेने पतीला समज द्यावी असं सांगण्यात आल होत. परंतु सगळा गाव ईथे येऊन तेच करतो ? मग माझ्या पतीमुळे तुला काय त्रास आहे, अस म्हणत शिक्षिकेवरच महिलेने आकस दाखवला होता.
महिला आणि शिक्षिका भिडल्या
दरम्यान, आज खिचडी शिजविणाऱ्या महिलेने या शिक्षिकेसोबत हुज्जत घातली. यावेळी शिक्षकेने ही त्या महिलेस तू विद्यार्थ्यांना पुरेसा आहार देत जा असे सांगितले. विद्यार्थ्यांना पुरेसं अन्न देण्याची पुन्हा मागणी केल्याने महिलेने पतीसह शाळे येत शिक्षिकेसोबत वाद घालत मारहाण केली. यावेळी खिचडी शिजवणाऱ्या महिलेचा पती शाळेमध्ये होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
मुख्याध्यापिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.
या प्रकारास मुख्याध्यापक जबाबदार असल्याचे सांगितलं जात आहे. खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पुरेस अन्न विद्यार्थ्यांना देणे आणि यावर नियंत्रण ठेवणे हे मुख्याध्यापिकेचे काम आहे. मुख्याध्यापिका सुद्धा खिचडीमध्ये हात ओले करून घेत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे.
बीड बस स्थानकातून प्रवाशाचे लाख रूपये लंपास करणाऱ्या चोरट्याला बेड्या. रोख एक लाख रूपयेही हस्तगत.
बीड (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील एक प्रवासी बीड बसस्थानकातून बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्याच्या खिशातील रोख एक लाख रूपये लंपास झाले होते. ही घटना २७ जुलै रोजी घडली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास लावत चोरट्याला बेड्या ठोकल्या. तसेच त्याच्याकडून रोख एक लाख रूपयेही हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई शनिवारी सकाळी ८ वाजता करण्यात आली.
सुभाष अर्जून गायकवाड (रा.शिरापूर जि.बीड ह.मु.बीड) असे चोरट्याचे नाव आहे. भास्कर नेमिनाथ जाधव (रा.अंबड जि.जालना) हे बीडमधील भाचे जावयाकडून एक लाख रूपये उसणे घेऊन अंबडला जात होते. बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या डाव्या खिशात ठेवलेले रोख एक लाख रूपये घेऊन धुम ठोकली. बसमध्ये बसल्यावर जाधव यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी लगेच खाली उतरत इकडे तिकडे चोरट्याचा शोध घेतला, परंतू कोणीही मिळून आले नाहीत.
अखेर शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांनी आपल्या पथकामार्फत बसस्थानकातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना सुभाषने चोरी केल्याचे दिसले. शनिवारी सकाळीच तो चहा पिण्यासाठी अंबीका चौकात येताच त्याला बेड्या ठाेकल्या. तसेच त्याची अंगझडती घेतली असता खिशातून लाख रूपये हस्तगत करण्यात आले. चोरट्याला आता शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, सचिन आंधळे, विकी सुरवसे, अशोक कदम आदींनी केली.
बसस्थानकातील पोलिस करतात काय?
चोरीसह इतर गुन्हे टाळण्यासाठी बीड बसस्थानकात पोलिस कर्मचाऱ्यांची नियूक्ती केलेली आहे. परंतू ते चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यातही शिवाजीनगर पोलिसांना फारसे यश आलेले नाही. येथील कर्मचाऱ्यांबद्दलच आता संशय व्यक्त केला जात असून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
निर्भीड सडेतोड पत्रकारितेतील हीरा निखळला.ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांचे दुखःद निधन.
Friday, July 28, 2023
बीड स्थानिक गुन्हे शाखाची मोठी कारवाई अंबाजोगाई करांची झोप उडवणाऱ्या टोळी चा पर्दाफाश तब्बल आठ घरं फोडल्याची कबुली.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शहरात पाळत ठेवून बाहेरुन बंद असलेले घरफोडून आतील रोख रक्कम, दागिने सह विविध वस्तू चोरुन नेहणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत बीड स्थानिक गुन्हे शाखा ने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरलेले दागिने, रोख रक्कम आदि मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांनी शहरात तब्बल 8 घरफोड्या केल्याचे कबुल केले. दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
अंबाजोगाई शहरात दिवसा असो की, रात्री पाळत ठेवून जो घर बाहेरुन बंद आहे तो घर फुटलेच समजा. या घटनांनी शहरवासीयांमध्ये एकप्रकारे दहशत निर्माण झाली. हे चोरटे इतके चालाक आहेत की, ज्या घरात कोणीच नाही, जो बाहेरुन बंद आहे त्याच घरांना टार्गेट करत असे. यामुळे काही पुरावाच मिळत नव्हता पण पोलीस के हात लंब्बे होते है उगाच म्हणत नाहीत. या गुन्ह्याचा तपास करत असताना बीड स्थानिक गुन्हे शाखा ला गुप्त माहिती मिळाली असता त्यावरुन Beed Lcb ने अझर अब्दुल पठाण रा. पेंनशनपुरा ( अंबाजोगाई ), जीवन प्रभाकर साळुंखे रा. क्रांतीनगर ( अंबाजोगाई ) या दोघांना ताब्यात घेतले. यांच्याकडून दागिने, रोख रक्कम, टिव्ही, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे चौकशी केली असता या दोघांनी व दुसरे दोघे असे चौघांनी मागील 7 महिन्यात साकुडरोड, भिमाई नगर, जोगाईवाडी शिवार, खडकपूर, राजीव गांधी चौक, सह्याद्री नगर, मोरेवाडी, भगवान बाबा चौक, अशोकनगर शहरातील या भागात तब्बल 8 घरफोड्या केल्याचे सांगितले. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी अविनाश शंकर देवकर रा. वडारवाडा ( अंबाजोगाई ), राहुल प्रल्हाद बनसोडे रा. मुकुंदराज कॉलनी ( अंबाजोगाई ) हे सहभागी होते अशी माहिती दिली. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
बीड शहरातील घरफोड्या उघडकीस
बीड शहरातील घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, बीड राम बन्सी नवले रा. आहेर धानोरा ( ता.बीड ) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याकडे चौकशी केली असता त्यानें बीड शहरात आठ ते दहा घरफोड्या केल्याचे कबुल केले. चोरलेले दागिने हे शहरातील सराफा कडे दिल्याचे सांगितले आहे. या दोन्ही कारवाया वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केल्या आहेत.
परळीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रच्या वतिने मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबीराचे आयोजन.गरजुनी लाभ घ्यावा.
जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या दोघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
लातूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ ! जमीन खरवडून गेल्याने बळीराजा संकटात सलग पाचव्या दिवशीहीसूर्यदर्शन नाही.
लातुर (कांतीकारी साथी न्यूज रिपोर्ट) लातूर जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. दिवसातून अनेक वेळा पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी पडून जात आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र बुधवारी मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्व दूर पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला होता.
लातूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ
लातूर, लातूर ग्रामीण, रेणापूर, उदगीर औसा, किल्लारी, लामजना, निलंगा, औराद शहाजानी, अंबुलगा, उदगीर, जळकोट, अहमदपूर या भागात पावसाने चांगलाच जोर धरला होता. जळकोट तालुक्यात दुपारनंतर तुफान पाऊस बरसला आहे. या भागातील पुढे नाले दुथडी धरून वाहत आहेत. ठिकठिकाणी पाणी साचलं आहे.
पाच दिवसापासून ढगाळ वातावरण सूर्यदर्शन नाही
मागील पाच दिवसापासून लातूर जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण पाहावयला मिळत आहे. सततच्या पावसामुळे सूर्यदर्शन होत नाही. सोयाबीन आणि इतर कोवळी पिके पावसामुळे कोमजून गेली आहेत. सातत्याने होणारा पाऊस, उन्हाचा अभाव यामुळे ही पिके आता रोगाला बळी पडत आहेत. त्यातच गुरुवारी मध्यरात्रीपासून संध्याकाळपर्यंत पावसाची सारखी रिपरिप सुरू होती. सतत होणाऱ्या पावसामुळे शेतात जर, पाणी थांबलं तर कोवळ्या पिकांना यामुळे मोठे नुकसान होणार आहे.
तुफान पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान
मागील दोन दिवसापासून तुफान पाऊस झाल्यामुळे जळकोट तालुक्यातील 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची 400 एकर पेक्षा जास्त जमीन अक्षरशा खरवडून गेली. कमी कालावधीमध्ये जास्त झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाने शेतीचे नुकसान झालेले शेतकरी एक वेळ सहन करू शकेल मात्र, जमीनच खरवडून गेल्यानंतर काय करावं, असा प्रश्न आता शेतकऱ्यासमोर उभा आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीसाठी प्रशासनाला निवेदन दिलं आहे.
शेतीचा प्रश्न मिटला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जैसे थे च.
मागील पाच दिवसात सातत्याने होणारा पाऊस असला तरी, तो हलक्या स्वरूपाचा आहे. काही भागात पावसाची तुफान बॅटिंग पहायला मिळत आहे. मात्र, जिल्ह्याभरात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. या पावसाचा फायदा फक्त शेतीला होताना दिसून येत आहे. मात्र, जिल्हाभरातील प्रकल्पामध्ये पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे मोठ्या पावसाची अपेक्षा अद्यापही कायम आहे.
मागील 24 तासात जिल्हाभरातील पावसाची आकडेवारी
जिल्ह्यामध्ये आजतोपात 235.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, ही सरासरीच्या 98 टक्के इतकी आहे. मागील 24 तासात जिल्ह्यामध्ये सरासरी 8.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस देऊनी तालुक्यामध्ये 16.7 मिलिमीटर आहे.
- लातूर 4.4 मिलिमीटर
- औसा 7.6 मिलिमीटर
- उदगीर 12.6 मिलिमीटर
- चाकूर 8.9 मिलीमीटर
- शिरूर अनंतपाळ 13.3 मिलीमीटर
- जळकोट 8.3 मिलिमीटर
- अहमदपूर 9.2 मिलिमीटर
- निलंगा 11.4 मिलिमीटर
- रेनापुर 2.8 मीटर
- देवणी 16.7 मीटर
डोळे येण्याची साथ आल्यानं टेंशन आलं आहे? डॉक्टर सांगतात २ गोष्टी, मुलांसह स्वत:चेही डोळे सांभाळा.
पुणे (प्रतिनिधी) पुण्यात आणि पुण्याच्या जवळपासच्या काही जिल्ह्यांमध्ये तसेच राज्याच्या इतर काही शहरांमध्ये ही डोळ्यांची साथ आली आहे. लहान मुले तसेच मोठ्यांमध्येही ही साथ वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे. सर्दी-तापाची किंवा व्हायरल साथ ज्याप्रमाणे पसरते तशीच डोळे येण्याची साथही पसरते. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार असून डोळे आलेल्या रुग्णांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा काही दिवसांत या समस्येच्या रुग्णांची संख्या दुप्पट आणि तिप्पट झाल्याचे पाहायला मिळते. डोळा लाल होणे, सुजणे, डोळ्यातून पाणी किंवा चिकट स्त्राव येणे अशा समस्या या काळात उद्भवतात. हा आजार वेगाने पसरु नये यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते
याविषयी जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे सांगतात...
अनेकदा कोणाला डोळे आले की आपण त्यांच्यापासून दूर राहतो किंवा त्या व्यक्तीला गॉगल नाहीतर चष्मा घालण्यास सांगतो. एकमेकांकडे पाहिल्याने डोळयांचा ससर्ग होतो असा आपला समज असतो. मात्र आपले हात डोळ्यांना लागतात आणि हेच हात दुसऱ्या व्यक्तीला लागले तर हा संसर्ग पसरतो. यासाठी सतत डोळे आणि हात स्वच्छ धुणे हा एकमेव उपाय असतो. डोळे आलेल्या व्यक्तीने हात स्वच्छ ठेवावेत. तसेच हात डोळ्यांना अजिबात लावू नयेत. चुकून लागल्यास पुन्हा पुन्हा हात साबणाने धुवत राहावेत. यामुळे हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. योग्य ती स्वच्छतेची काळजी हाच यावरील एकमेव उपाय आहे हे लक्षात घ्यायला हवेत. तसेच घरगुती उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार करणे आवश्यक असते.
डोळ्यांची साथ येण्याचे कारण -पावसाळ्यात हवेतील दमटपणा आणि ओलावा वाढतो. यामध्ये विविध प्रकारच्या विषाणूंची वाढ होण्यास पोषक वातावरण असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत साधारणपणे डोळ्यांची साथ वाढते. डोळ्यात सतत खुपल्यासारखे होणे, डोळे जड वाटून खाज येणे, डोळ्यातून चिकट स्त्राव येणे अशा समस्या निर्माण होतात. हा संसर्ग जास्त असल्यास आणि वेळेत आटोक्यात न आल्यास तापही येण्याची शक्यता असते. मात्र हा संसर्ग वाढू नये आणि पसरु नये म्हणून डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा वापर करणे, डोळे वारंवार स्वच्छ पाण्याने धुवत राहणे, सतत डोळ्यांना हात न लावणे हे उपाय अवश्य करायला हवेत.
अवैध गावठी दारू विक्री संदर्भात आमदारांची तक्रार मंत्र्यांची झाडाझडती, 24 तासांत 26 जणांना अटक, 27 गुन्हे दाखल.
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला होता. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण हे देखील उपस्थित होते. या बैठकीत मंगेश चव्हाण यांनी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांची तक्रार केली होती. अवैधपणे बनावट दारु विकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. उलट काही अधिकाऱ्यांकडून हप्ता घेतला जातो. त्यामुळे आरोपी हे आणखी फोफावत असल्याची तक्रार मंगेश चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी भर बैठकीत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं होतं.
26 जणांना अटक, 27 गुन्हे दाखल
संबंधित बैठक पार पडल्यानंतर वरिष्ठ पातळीवर हालचाली घडल्यानंतर त्यानंतर 24 तासात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. यातून 26 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच 27 गुन्हे दाखल करण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांनी यासंदर्भात माहिती दिली. एप्रिल महिन्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात गावठी दारू विक्रीचे 607 गुन्हे दाखल करून साडेतीन लाख लीटर गावठी दारू जप्त केल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, जिल्हाभरात हायवे आणि रस्त्यावर असलेल्या ज्या हॉटेल्स, ढाब्यावर अवैध दारू विक्री केली जात असेल, अशा ठिकाणी कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय.
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये कारगील विजय दिवसाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन.
बीड (प्रतिनिधी) : जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. या ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून मागील रब्बी हंगामामध्ये बीड जिल्हयातील शेतकऱ्यांनी 100 टक्के ई-पीक पाहणी करुन आपल्या पीकाची नोंदणी करुन शासनाच्या विविधि योजनांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सुरु असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी देखील आपल्याला 100 टक्के पुर्ण करावयाची आहे.
खरीप हंगाम 2023 पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे 2.0.11 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी 1 जुलै 2023 पासून सुरु करण्यात आलेली आहे. बीड जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनीं, गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी , ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, बचत गट प्रतिनिधी, सहकारी संस्थाचे अध्यक्ष व सचिव, अध्यक्ष- शेतकरी दुध उत्पादक संघ, पाणी फाउंडेशन गट, पोकरा प्रतिनिधी, ग्रामरोजगार सेवक, तांत्रीक सहाय्यक, बॅंक प्रतिनिधी, शाळा व कॉलज विद्यार्थी, प्रगतशिल शेतकरी, सर्व ग्रामपंचायत समिती, पंचायत समिती व जिल्हा परिषदचे सदस्य, मिडिया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी देखील शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पात सहभाग घेवून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी प्रोत्साहीत करावे.
तरी बीड जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना अवाहन करण्यात येते कि त्यांनी खरीप हंगाम 2023 साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजना, पिक विमा, पिक कर्ज, शासकीय अनुदान ई. विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. आपले संबंधित तालुकानिहाय हेल्पडेस्कच्या माध्यमातून सकाळी 08.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यत ई-पिक पाहणी करतांना शंका व अडचणी आल्यास खालील क्रमांकावर संपर्क करुन आपल्या अडचणीचे निरसन करावे.
तालुका हेल्प डेस्क क्रमांक तालुका हेल्प डेस्क क्रमांक
बीड 8805247773, गेवराई व शिरुर 9763498955,
परळी 9623004589,पाटोदा व आष्टी 8766775452,
माजलगाव, धारुर व वडवणी 9890456062, अंबाजोगाई 9096591991बीड जिल्हयात सध्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी 100 टक्के पुर्ण करण्यासाठी विविध घटकांनी सहभाग घ्यावा तसेच व्हॉटस ॲप ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी ई-पीक पाहणी कामी योगदान द्यावे, असे आवाहन बीड जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती. दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे
Wednesday, July 26, 2023
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे नवं संकट सोयाबीनवर शंखी गोगलगाय तर कापसा वर ढब्बू पैशाची कीड.
बीड (कांतीकारी साथी न्यूज रिपोर्ट) तिबार पेरणीचं संकट घोंगावणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे आता नवं संकट उभा ठाकलाय. सोयाबीनवर शंखी गोगलगाय तर कापसावर ढब्बू पैशाची कीड लागल्याने उभी पिकं नेस्तनाबूत होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसानं हाहाकार घातला आहे. या पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर तिकडे बीड जिल्ह्यामध्ये मात्र जुलै महिना संपत आला तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या तरी उगवून आलेलं सोयाबीन आणि कापसावर मोठ्या प्रमाणात गोगलगाय आणि ढब्बूपैसा किडीचा प्रादुर्भाव झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर एक नव संकट उभा राहिलं आहे.
बीडच्या परळी, केज, अंबाजोगाई बीड धारूर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात गोगलगायचा सडा पडला आहे. उगवूण आलेलं पीक मोठं होण्याच्या आतच गोगलगाय फस्त करून टाकत आहेत. त्यामुळं दररोज सकाळी शेतकऱ्यांना शेतामध्ये गोगलगाय वेचून काढाव्या लागत आहेत. तर गेल्या वर्षी देखील याच गोगलगायीमुळं अंबाजोगाई, परळी, केज तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील कापूस आणि सोयाबीन पीक पूर्णपणे वाया गेलं होतं.
बीडच्या परळी तालुक्यात असणाऱ्या वाघबेट, बेलांबा गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये पिकांवर गोगलगाईचा प्रादुर्भाव झाला आहे. अगोदरचं अस्मानी संकटात शेतकरी उध्वस्त झालाय. त्यात गोगलगायचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. पीकविमा नाही, अतिवृष्टीचे अनुदान नाही. त्यामुळं आता पेरणी करायची तर कुठून करावी ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. त्यामुळं मायबाप सरकारने मदत द्यावी अशी मागणी शेतकाऱ्यांमधून होत आहे.
तर दुसरीकडे धारूरच्या फकीर जवळा परिसरातील सोयाबीन व कापूस पिकावरील ढबु पैशा ह्या किडीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. ढबु पैशाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने सोयाबीन, कापूस पिके धोक्यात आली आहेत.
एक तर सुरुवातीला दीड महिना पावसाने दडी मारली त्यात कशिबशी पेरणी झाली. कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने कापूस व सोयाबीनची प्रचंड तुटाळ होत आहे. ही तुटाळ भरून काढत असतानाच ढबू पैशाच्या आक्रमणाने शेतकरी चांगलाच वैतागला आहे.त्यामुळं कृषी विभागाने याची पहाणी करून मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
विशेष म्हणजे या आसमानी संकटाच्या खाईत होरपळलेला बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याकडे वळत आहे. गेल्या सहा महिन्यात बीड जिल्ह्यात तब्बल 146 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
दरम्यान एकीकडे ओला दुष्काळ पडत असताना दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या खाईत होरपळला जात आहे. मात्र लोकप्रतिनिधी आपली सत्ता टिकवण्यासाठी जोर लावत आहेत. त्यामुळे जर आपली सत्ता टिकवून झालं असेल तर या अस्मानी आणि सुलतानीच्या संकटाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना हे सरकार आधार देणार का ? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काशी जगद्गुरू डॉ.श्री.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे परळीत सामूहिक ईष्टलिंग महापूजा व अध्यात्मिक आशिर्वचन.
Tuesday, July 25, 2023
आष्टी नगराध्यक्ष निवड बिनविराेध भाजप च्या जिया बेग नगराध्यक्षपदी कार्यकर्त्यांचा जल्लाेष.
तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करा. तहसीलदारांना निवेदन.
लातुरात पाेलिसांचे कोम्बिंग ऑपेरशन; १५८ जणांवर गुन्हे. विनाकारण फिरणे तरुणांना पडले महागात...
लातूर (प्रतिनीधी) : शहरातील उद्याेगभवन, सिग्नल कॅम्प आणि सूतमील राेड परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांची झाडाझडती घेतली असून, त्यांच्याविराेधात पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण फिरणे २४ तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. क्लाेस परिसरात पाेलिसांकडून गस्त घातली जात असून, वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, ही कारवाई करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, क्लाेस परिसर, उद्याेग भवन परिसर, सिग्नल कॅम्प आणि सूतमील राेड परिसरात पाेलिसांकडून सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास गस्त घातली जात आहे. या भागात माेठ्या प्रमाणावर पहाटेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यांच्या सुरक्षेसाठी पाेलिसांनी आपली गस्त वाढविली आहे. शिवाय, दामिनी पथक कायम फिरत असून, ठिकठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या तरुणांची चाैकशी केली जात आहे. शिवाय, वाहनांची तपासणीही केली जात आहे. यामध्ये विनाकारण फिरणारे २४ तरुण आढळून आले आहेत. त्यांच्याविराेधात कारवाई करण्यात आली आहे.
कोम्बिंग ऑपेरशन; १५८ खटले दाखल...लातुरातील चार ठाण्यांचे पोलिस अधिकारी, १३ अंमलदार, वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी, ८ अंमलदार आणि आरसीपीचे १९ पोलिस कर्मचाऱ्यांनी एकाचवेळी उद्याेग भवन परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये तब्बल १५८ खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांना १ लाख १० हजार ६०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. काेप्ता कायद्यानुसार १३ जणांविराेधात कारवाई केली आहे. त्यांना ५ हजार ९०० रुपयांचा दंड केला आहे.
फ्लेक्सचा अडथळा; महापालिकेची कारवाई...उद्याेग भवन परिसरात माेठ्या प्रमाणावर फलक, फ्लेक्स लावण्यात आले असून, याचा रहदारीला, वाहतुकीला अडथळा हाेत आहे. याविराेधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. असे फलक, फ्लेक्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत 1 कोटी 96 लाखांचा अपहार; 76 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नोटिस.
परभणी जिल्हा बँके अंतर्गत असलेल्या तत्कालीन अधिकारी, कर्मचारी, तालुका तपासणीस आणि अंतर्गत तपासणीस यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळ बँकेच्या एकूण 1 कोटी 96 लाख 90 हजार 444 रुपयांचा अपहार झाल्याचे विशेष लेखापरीक्षणात आढळून आले आहे. या रक्कमेबाबत नियमबाह्य कामकाज करुन केलेल्या व्यवहाराची वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी विभागीय सहनिबंधक औरंगाबाद यांच्या कार्यालयाने तत्कालीन सहाय्यक निबंधक नानासाहेब कदम यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. कदम हे प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर सेलूतील सहाय्यक निबंधक एम.यू. यादव यांची प्राधीकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यादव यांनी केलेल्या चौकशीतून बँकेचे तत्कालीन अधिकारी व कर्मचार्यांनी बँकेचे व्यवहार चालवितांना बँकेच्या निधीचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.
लेखापरीक्षणात नेमकं काय आढळून आले?
- खातेदारांच्या बचत खात्यातील जमा बाकी पेक्षा जादा रक्कमा काढण्यात आले.
- वैयक्तिक बचत खाते हे जनरल लेझरशी जुळलेच नाही.
- बँकेद्वारे बाकी जुवळणीसुध्दा प्रलंबित ठेवण्यात आली.
- बँकेमार्फत शाखांची तालुका तपासणीस, अंतर्गत तपासणीस योग्य पद्धतीने झाली नाही.
- शाखांची नियमित तपासणी झाली नाही, बँक शाखेच्या बॅलेन्सची नियमितपणे पडताळणी करण्यात आली नाही, काही शाखांमध्ये खातेदारांचे सहीचे नमूने उपलब्ध नसतांना देखील इतर बाबींद्वारे रक्कमेचा अपहार करण्यात आला.
- गैरव्यवहार झाला असून, अधिकारी, कर्मचार्यांच्या नियमबाह्य वर्तनामुळेच बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे निष्पन्न होत आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल 1 कोटी 96 लाख 90 हजार 444 रुपयांचा अपहार झाल्याने खळबळ उडाली. बँकेच्या लेखापरीक्षणातून ही बाब समोर आली आहे. दरम्यान बँक प्रशासनाने या घटनेला गंभीरपणे घेत याची चौकशी सुरु केली आहे. ज्यात एकूण 73 सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांची प्रत्यक्षात चौकशी देखील केली जाण्याची शक्यता आहे
पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची; आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश.
*पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाला आहे. उच्चभ्रू घरातल्या तरुणांना नशेची सवय लावणारं रॅकेट उघड झाले आहे. संभाजीनगरमधून ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) संभाजीनगर पोलिसांनी अमली पदार्थांचं मोठं रॅकेट उघडकीस आणले आहे. उच्चभ्रू घरातील तरुणांना नशेची सवय लावणा-या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. संभाजीनगर पोलिसांनी पुंडलिक नगर भागात तब्बल चार ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी साडे 3 किलो गांजा, एमडी, चरस असा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. पुण्यात शिकणारी मुलं संभाजीनगरहून ड्रग्ज घेऊन जायची आणि तिथं मित्रांसह ड्रग्ज पार्ट्या करायची, अशी माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. अशा पार्ट्यांचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
आधी तरुणांना ड्रग्ज फुकट दिले
अल्पवयीन मुलांना नशेच्या जाळ्यात ओढणारे एक रॅकेटस आता संभाजीनगर पोलिसांनी उघडं केलेला आहे ही सगळी घर मुलं उच्चभ्रू घरातील आहेत. बहुतांश मुलं,संभाजी नगर पुणे आणि मुंबईची आहेत. पुणे जिल्ह्यातील एक नामांकित संस्थेत हे शिकतात, त्यांच्या फ्लॅट वर ड्रग्ज पार्ट्या चालायच्या. याची सुरूवात संभाजी नगरहुन झाली. पूल टेबल वर खेळायला जाणारे, व्हीडिओ गेम वर खेळायला जाणाऱ्या चांगल्या घरातील मुलांना या ड्रग रॅकेटची लोक हेरायची आणि त्यांचा सोबत गोडी गुलाबीने बोलून त्यांना नशेच्या धंद्यात ओढायची. सुरुवातीला कोकेन असो वा चरस हे या मुलांना फुकट दिले आणि नंतर जशी सवय लागली तशी तुझ्या मित्रांना सवय लाव तुला मोफत या पद्धतीने मुलांना नादी लावले, अगदी मार्केट मध्ये एम एल एम म्हणजे मल्टि लेव्हल मार्केटिंग पद्धत असते ताशा पद्धतीने या अंमली पदार्थांची विक्री या तस्करणी मुलांना हाताशी घेऊन केली. मोठ्या रकमेने त्यांनी विक्री सुरू केली. या संभाजी नगरच्या मुलांनी संभाजी नगर हुन नेलेल्या ड्रग मधून पुण्यात एक पार्टी केली आणि त्याचे व्हीडिओ सुद्धा काढले मात्र एक पालकांने आपल्या मुलाच्या मोबाईल मध्ये हे व्हीडिओ पाहिले आणि हा प्रकार पुढं आला. नंतर अशा तब्बल 25 वर मुलांच्या चौकशीतून काही नाव पुढं आली आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली. मंगळवारी 4 ठिकाणी छापे टाकले, त्यात 1 जणांकडून 3.5 किलो गांजा, 1.2 ग्राम एमडी आणि .4.5 ग्राम चरस जप्त केली, मात्र ही साखळी मोठी आहे आणि त्यातून अनेक नाव पुढं येणार आहे प्राथमिक अंदाजानुसार मोठया संख्येने मुलं मुली यात अडकली असण्याची शक्यता आहे.
भाजपा नेते प्रमोद राठोड यांच्यामुळे उघड झाला प्रकार
संभाजीनगरचा हा प्रकार उघड झाला आहे तो भाजपा नेते प्रमोद राठोड यांच्यामुळे काही पालक त्यांना भेटायला आले आणि त्यांनी आपली मुलं अशा पद्धतीने वाया गेली असल्यास त्यांना सांगितलं त्यानंतर पालक काही डॉक्टर्स आणि ही सगळी मंडळी एकत्र बसली आणि मुलांकडून त्यांनी सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. चांगल्या घरच्या मुलांना हेरून हा प्रकार सुरू असल्याचा प्रमोद राठोड यांनी सांगितलं त्यामुळे आता पालकांनी काळजी घेण्याचा आवाहनही त्यांनी केले.
Monday, July 24, 2023
मा.आ.हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकारा चा झटका. दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरु.
दिल्ली (प्रतिनिधी) बीआरएस पक्षाचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. दिल्लीत गेले असताना हर्षवर्धन जाधव यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना, मनसे या पक्षांमध्ये काम केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी हल्लीच तेलंगाणातील के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, काही कामानिमित्त हर्षवर्धन जाधव हे दिल्लीला गेले होते. तिथे ते नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी गेले असताना, नितीन गडकरी यांच्या निवास्थानीच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणी केल्यावर हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे समोर आले. हर्षवर्धज जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रकृतीची माहिती दिली आहे. त्यात ते म्हणाले की, मला बहुतेक हृदयविकाराचा झटका आला आहे. नितीन गडकरी यांच्या घरी असताना मला हृदयविकाराचा झटका आला. आता मला रुग्णालयात घेऊन जात आहेत. माझी आधी अँजियोप्लास्टी झालेली आहे. भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या. कन्नड मतदारसंघाची काळजी घ्या. वाचलो तर पुन्हा भेटू, असं आवाहन त्यांनी या व्हिडीओतून केलं आहे.
धक्कादायक! बीड जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 147 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन.59 आत्महत्येची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र.
कधी शेतीच्या समस्या तर कधी कर्जबाजारीपणा ही आत्महत्येची प्रमुख कारणे असल्याचं समोर आलंय. याबरोबरच पाण्याचे संकट अन् त्यामुळे शेतीतून न मिळालेले उत्पन्न अशा स्थितीत हवालदिल झालेला बळीराजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो आहे.
कोणी गळफास घेत आहे तर कोणी विषारी द्रव प्राशन करत आहे. शासन दरबारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना 1 लाखांची मदत दिली जातेय. मात्र मदत देण्यापेक्षा आमच्या मालाला हमीभाव द्या. अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
टोमॅटोच्या एका कॅरेटला 2 हजाराचा दर; बीडच्या शेतकऱ्याचा तोफा वाजवून जल्लोष.
अन् शेतकऱ्याने तोफा वाजवल्या
बीडचा एक शेतकरीही शनिवारी या मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन आला होता. त्याच्या टोमॅटोच्या 22 किलोच्या कॅरेटला चक्क 2 हजार रुपयांचा भाव मिळाला. हातात रोखीने पैसे आले. त्यामुळे या शेतकऱ्याला प्रचंड आनंद झाला. या आनंदाच्या भरातच त्याने थेट मार्केटमध्येच तोफा वाजवून आनंद व्यक्त केला. प्रचंड जल्लोष साजरा केला. या शेतकऱ्याला आनंदित झालेलं पाहून इतर शेतकरीही त्याच्या आनंदात सहभागी झाले. त्यांनीही नाचून आपला आनंद व्यक्त केला.
भाव काय?
सध्या बीडच्या बाजारामंमध्ये 130 ते 140 रुपये किलोने टोमॅटोविकले जात आहेत. पुण्या मुंबईच्या ठिकाणीही टोमॅटो 140 ते 150 रुपये किलोने विकले जात आहेत.
आवक घटली
दरम्यान, धुळे तालुक्यात टोमॅटोची आवक होत नसल्याने तसेच बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे नारायणगाव, पिंपळगाव, पुणे तसेच इतर परिसरातून होत असलेल्या टोमॅटोची आवक हव्या तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने सध्या टोमॅटोचे भाव वाढले आहेत. साधारणपणे 40 रुपये 50 रुपये दराने उपलब्ध होत असलेला टोमॅटो हा सध्या 80 रुपये ते शंभर रुपये प्रति किलो दराने बाजारात मिळत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली आहे .
दीड महिन्यात दर कमी होणार
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येत्या काही महिन्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटोची आवक सुरू होईल. त्यानंतर टोमॅटो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत, असं व्यापारी तसेच विक्रेत्यांचे म्हणणे आहे. परंतु सध्या मात्र बाजारात उपलब्ध असलेला टोमॅटो हा जास्त दराने खरेदी करावा लागत आहे. त्याबरोबरच हिरव्या मिरचीची किंमत देखील वधारलेली असून फक्त पताकोबी कमी दरात उपलब्ध होत आहे.
इतरही सर्व भाज्यांचे दर आवक कमी राहिल्याने किलोमागे 10 ते 20 रुपये वाढलेले आहेत. आगामी एक ते दीड महिना आणखी सर्वसामान्य नागरिकांना जास्त दराने भाजीपाला खरेदी करावा लागणार आहे. त्यानंतर मात्र आवक सुरळीत झाल्यावर दर कमी होतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्तीने व्यक्त केली आहे.
बहिणीला भेटून घरी परताना इंजिनिअर तरुणाचा अपघातात मृत्यू.
करमाड (प्रतिनिधी) : जालना रोडवरील एका हॉटेलजवळ रविवारी रात्री ८ वाजता दोन दुचाकीच्या धडकेत अभियंता तरुण जागीच ठार झाला. आकाश बापूराव शिंदे ( 23, रा दुधनवाडी ता. बदनापूर जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील बहिणीला भेटून आकाश शिंदे रविवारी रात्री गावाकडे परतत होता. जालना रोडवरील एका हॉटेलजवळ त्याच्या दुचाकीचा अन्य दुचाकीसोबत अपघात झाला. रस्त्यावर पडल्याने आकाशच्या डोक्याला जबर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून आकाशला मृत घोषित केले.
दोन महिन्यानंतर होणार होते लग्न .
आकाशला दोन मोठ्या बहिणी होत्या. तो पुणे येथे इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. मात्र, त्याला दोन महिन्यांपूर्वी हृदयरोगाचा त्रास झाला. त्यामुळे आरामासाठी सध्या मूळगाव दुधनवाडी ( बदनापूर) येथे तो आला होता. दरम्यान, आकाशचे लग्न ठरले होते. दोन महिन्यानंतर लग्नाची तारीख काढण्यात आली होती. मात्र अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
धक्कादायक! पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या.मग ACP ने स्वतःलाही संपवले्
पुणे (प्रतिनिधी) पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर आली आहे.. राज्याच्या पोलिस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याची गोळी झाडून हत्या केली.. त्यानंतर स्वतःही गोळी झाडून जीवन संपवले.. पुणे शहरातील बालेवाडी परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली..
भारत शेखा गायकवाड असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.. तर पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यांची गोळ्या झाडून या पोलीस अधिकाऱ्याने हत्या केली.. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांची कुटुंब पुण्यातील बालेवाडी परिसरात राहत होते..
दरम्यान भारत गायकवाड शनिवारी सुट्टीवर पुण्यात आले होते.. त्यानंतर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली.. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेत आयुष्य संपवले.. परवाना असलेल्या त्यांच्या खाजगी पिस्तुलातून त्यांनी गोळ्या झाडल्या आहेत..
दरम्यान भारत गायकवाड यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे..
Sunday, July 23, 2023
७४ जणांना लागली 'आरटीई'ची लॉटरी; किती जण घेणार लाभ?आरटीईअंतर्गत नामांकित शाळेत विनाशुल्क प्रवेश.
लातूर (कांतीकारी साथी न्यूज रिपोर्ट) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाच्या वतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. आतापर्यंतच्या तीन फेऱ्याअंतर्गत लॉटरी पद्धतीने १ हजार ३९९ मुलांचा प्रवेश झाला आहे. दरम्यान, राज्यस्तरावरून निघालेली चौथी लाॅटरी ७४ बालकांना लागली आहे. त्याचा किती जण लाभ घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार राज्यात दरवर्षी २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. याअंतर्गत जिल्ह्यातील २०० शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली होती. त्यानंतर राज्यस्तरावर निघालेल्या पहिल्या ऑनलाइन सोडतीत १ हजार ६४८ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील १ हजार ३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या फेरीत २७९ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला होता. तिसऱ्या फेरीत ८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
दरम्यान, राज्यातील विविध शाळांतील काही जागा रिक्त राहिल्याने पुन्हा चौथी लाॅटरी बुधवारी काढण्यात आली आहे. ती जिल्ह्यातील ७४ मुलांना लागली असून, पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा म्हणून संदेशही पाठविण्यात आले आहेत. प्रवेशाची अंतिम मुदत ही २८ जुलैपर्यंत आहे. दरम्यान, तिसऱ्या फेरीअखेरपर्यंत एकूण १ हजार ३९९ मुलांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
अपेक्षित शाळा न मिळाल्याने काहींनी नाकारला प्रवेश...
आरटीईअंतर्गत जिल्ह्यात एकूण २०० शाळांचा समावेश आहे. त्यातील १ हजार ६४८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांचा अपेक्षित शाळेत नंबर लागला नाही. तसेच शाळा घरापासून दूर असल्याने काही पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. आता चौथ्या फेरीसाठी ऑनलाइन लॉटरी निघाली आहे.
पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा..
जिल्ह्यातील १ हजार ६४८ जागांपैकी आतापर्यंत एकूण १ हजार ३९९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. काही जागा उर्वरित राहिल्या आहेत. त्यामुळे चौथी लॉटरी काढण्यात आली आहे. त्यात ७४ मुलांचा समावेश आहे. या मुलांचा पालकांनी प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
लातुरातील ८०२ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश...लातूर - ८०२अहमदपूर - ७३औसा - ७३चाकूर - ५२देवणी - ४१जळकोट - ०७निलंगा - १३८रेणापूर - २३शिरुर अनंतपाळ - ९उदगीर - १८१
कामे करायचीच नसतील तर स्वेच्छानिवृत्ती घ्या. ‘सीईओ’ मीना यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांना ताकीद.
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) कामे करायचीच नसतील, तर तुम्ही सरळ स्वेच्छानिवृत्ती घेऊन नोकरी सोडू शकता. उगीच वेळ घालवून ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळू नका, या शब्दांत मुख्य कार्यकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या ठिकाणी गैरहजर आढळून आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुरुवारी चांगलीच खरडपट्टी काढली.
वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही काही सरपंचांच्या याच तक्रारी होत्या. त्यामुळे तथ्यशोधनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी पथके स्थापन करून त्यामार्फत अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांंना भेटी देऊन रात्रीच्यावेळी पाहणी केली. त्यानंतर स्वत: विकास मीना यांनी काही अधिकाऱ्यांसोबत आरोग्य केंद्रांना भेट दिली. तेव्हा अनेक वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी गैरहजर आढळून आले.
त्यासंदर्भात गुरुवारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवकांची संयुक्त बैठक घेतली.बैठकीत प्रामुख्याने वरुडकाझी, लाडसावंगी, देवगाव रंगारी, लाडगाव, सिद्धनाथ वडगाव, बिडकीन, निलजगाव, जिकठाण, वाळूज, आदींसह १८ आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवकांची झाडाझडती घेतली. या बैठकीत आरोग्य केंद्रातील औषधांची उपलब्धता, सोयीसुविधा, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, गरोदर मातांची नोंदणी, तपासणी, संस्थेतील प्रसूती, बालकांचे लसीकरण, बाह्यरुग्ण तपासणी, आंतररुग्ण नोंदणी, पोस्टमार्टम, बायोमेट्रिक हजेरी, जन्म-मृत्यू नोंदणी, क्षयरुणांचे उपचार, असंसर्गिक आजारांची तपासणी व उपचारासाठी आलेल्या रुग्णांची माहिती, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्र भेटीचा आढावाही घेण्यात आला.
ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळू नका.
ग्रामसेवक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तुम्ही एकमेकांना ओळखता का, तुमचा एकमेकाशी संवाद होतो का, असा प्रश्न करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची उलट तपासणी सुरू केली. मुख्यालयी राहिल्यास गावातील लोकांचा तुम्हाला त्रास आहे का, कोणाला काही अडचण असेल तर ते आताच सांगा, कामेच करायची नसतील, तर खुशाल ‘व्हीआरएस’ घेऊन नोकरी सोडू शकता. उगीच ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पहिल्यांदाच संतप्त रूप पाहून उपस्थित सर्वांच्याच पायाखालची जमीनच सरकली.