बीड (प्रतिनिधी) : खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या बीडच्या केज शहरालगत एका जीप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
ही घटना आज (१५ जुलै) सायंकाळच्या दरम्यान केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या समोर घडली आहे. रामेश्वर घोडके रा. टाकळी ता. धारूर असं मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर गंभीर जखमी असलेल्या एकावर केज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment