Friday, July 28, 2023

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये कारगील विजय दिवसाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी 1999 च्या युद्धातील सैनिकांच्या शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी कारगील विजय दिवस साजरा केला गेला. कारगील विजय दिवसाचे औचित्य साधुन दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,ज्यासाठी महाराष्ट्रतील  सुप्रसिद्ध गायक श्री. सुभाष शेप व श्री. नारायण चाटे यांनी उपस्थिती लावली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाची सुरुवातीस कारगील युद्धातील शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली व सदर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे  स्वागत प्रशालेचे प्राचार्य श्री. विठ्ठल तुपे हस्ते करण्यात आले, त्यानंतर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी  व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.सुभाष शेप यांनी मनमोहन देशभक्तीपर गीते सादर करत भारतीय सैनिकांनी देशाप्रती केलेल्या शौर्याचे व त्यांचे बलीदान महत्त्व किती श्रेष्ठ आहे हे त्यांच्या गीतातून दाखवून दिले.
त्यानंतर वैयक्तिक गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना प्रशालेचे प्राचार्य श्री. विठ्ठल तुपे व  मान्यवरांच्या  हस्ते पारितोषिके देण्यात आली.
या  कार्यक्रमासाठी विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा गित्ते मॅडम तसेच प्रशालेचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक मा. श्री. किरण गित्ते साहेब (सचिव ,नगरविकास, सार्वजनिक बांधकाम ,उद्योग, पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार) त्याचबरोबर प्रशालेचे प्राचार्य श्री.विठ्ठल तुपे यांचे मार्गदर्शन व पाठिंबा लाभला.

No comments:

Post a Comment