Monday, July 3, 2023

विनानंबरच्या दुचाकीवरून येत रोडरोमिओं कडून छेडछाड.अंबाजोगाईतील धक्‍कादायक घटना.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील शिक्षणाचे पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाईत  तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड काढण्यात आली. याबाबत मुलीच्‍या तक्रारीवरून गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. 
अंबाजोगाई तालुक्यातील १७ वर्षीय पिडीता ही शिक्षणासाठी अंबाजोगाई शहरात राहते. यादरम्यान शहरातील नावाजलेल्या परिसरात दोन रोडरोमियोंनी पिडीतेचा विना नंबरच्या मोटारसायकलवर बसून पाठलाग केला. हॉर्न वाजवून तिची छेडछाड केली. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात आकाश नागोराव डोंगरे (वय २१) आणि वैभव नामदेव चाटे (वय २१) या दोघांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान यामुळे पुन्हा एकदा शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अंबाजोगाईत शिक्षणासाठी येत असणाऱ्या मुली असुरक्षित तर नाहीत ना? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment