गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. २५ वर्षीय शेतकरी पुत्राने वडिलांकडे असलेल्या कर्जाच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली.
बीड जिल्ह्यातील केजच्या आंधळेवाडीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली. संतोष दैवान आंधळे असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. मयत संतोष याने घरी कुणी नसतांना राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. शेतकरी कुटुंबातील संतोष हा वडिलांवर असलेल्या कर्जामुळे निराश होता. कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतूनच त्याने गळफास घेतला असल्याचे बोलले जात आहे.
सलग दुसऱ्या दिवशी आत्महत्या
दरम्यान बीड जिल्ह्यात कालच शेतकरी यांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना, आज शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि कुटुंब नैराश्यात जगत असल्याचं समोर आले आहे.
No comments:
Post a Comment