स्कूल बसमध्ये मेंढरं कोंडल्यासारखे लहान मुलांना बसवून शाळेसाठी वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या तेलगाव येथील जिजामाता प्राथमिक विद्यालय उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ड्रायव्हरच्या केबिनमध्ये देखील विद्यार्थ्यांना बसवले जात असून त्यांच्या सुरक्षेचं काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्कूल बसचे नियम धाब्यावर बसवून एका स्कूल बसमध्ये 70 ते 80 विद्यार्थी बसवत आहेत. 10 ते 15 विद्यार्थी बसच्या केबिनमध्ये बसवले जातात. तर काही ड्रायव्हरच्या बाजूला उभे केले जातात. तसेच एका सिटवरती तीन ते चार विद्यार्थी बसवले जातात.
अनेक विद्यार्थी हे उभा राहून प्रवास करत आहेत. यामुळे अवैध विद्यार्थी प्रवास वाहतूक थांबवावी अशी मागणी केली जात आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी देखील मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment