नेकनूर (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका २० वर्षीय तरुणाने श्रध्दांजलीचे स्टेटस ठेवत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड (Beed) जिल्ह्यातील आत्महत्येचं ग्रहण सुटायचे नाव घेत नाही. अशीच एक धक्कादायक घटना बीडच्या अंधापुरीघाट गावातून समोर आली आहे. अंधापुरीघाट गावात एका 20 वर्षीय तरुणाने स्वतःच्या मोबाईलवर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभम बाळासाहेब जगताप वय 20 असे त्या तरुणाचे नाव आहे.
या घटनेची माहिती कळताच नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सदरील घटनेचा पंचनामा नेकनूर पोलिसांनी केला असून शुभम जगताप याने नेमकी आत्महत्या का केली? हे अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली आहे
*दुसरी घटना*
सीईटी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे २० वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य...
दरम्यान, परभणीमधूनही अशीच एक दुर्देवी घटना समोर आली आहे. अभियंता होण्याच स्वप्न भंग झाल्याने वीस वर्षीय तरुणीने आयुष्य संपवल्याची दुर्देवी घटना परभणीमध्ये घडली आहे. सीईटी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तरुणीने रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केली. श्रुती शिवाजी मुजमुले (वय 20) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment