Tuesday, July 5, 2022
कृषी दुकानदारांकडुन शेतकऱ्यांची लिंकिंग च्या नावाने लुट.कृषी अधिकार्याचे साफ दुर्लक्ष.
Monday, July 4, 2022
ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात शिवाजीराव (दादा) पंडित यांनी केला हरिनामाचा गजर.
बीड (प्रतिनिधी) माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांनी नातेपुते जवळील धर्मापुरी येथे ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात दर्शन घेऊन हरीनामाचा गजर केला. आपल्या वयाचा आणि प्रकृतिचा विचार न करता मोठ्या आनंदाने ते पालखी सोहळ्यात सहभागी झाले. पंडित परीवाराकडून सालाबादा प्रमाणे दिल्या जाणाऱ्या वारकरी पंगतीतही ते सहभागी झाले. यावेळी हरिनामात ते तल्लीन झाले.
धर्मापुरी येथे पालखी सोहळ्यातील श्री क्षेत्र संगमेश्वर संस्थानचे ह.भ.प.नामदेव महाराज यांच्या दिंडीला भेट दीली
यावेळी त्यांनी सर्व वारकऱ्यांना पंगत देऊन त्यांच्या सोबत दिंडीत सहभाग घेतला. यावेळी हरीनामाचा गजर करीत आनंदी जिवनासाठी हरीनामाचे पारायण करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांच्या सोबत प्रकाश सुसकर, बंडू मोहिते, रघुनाथ मोहळकर, श्री भोपळे आदी उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवत डॉक्टरने केला लैगिंक अत्याचार.
मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात एका 9 वर्षीय मुलीस खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवून वाईट उद्देशाने दवाखान्यात नेवून तीच्यावर बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी एका खाजगी डॉक्टरविरूध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी डॉक्टर हरिप्रसाद पत्की (रा.सलगर बु.) याला तात्काळ गजाआड केले आहे.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील 9 वर्षीय मुलगी दि.2 रोजी दुपारी 1.30 वा. खाजगी शिकवणीला जात असताना तीला बोलावू
खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवून दवाखान्यात नेवून जबरी संभाेग केला असल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या वडिलांनी पोलिसात दाखल केल्यावर डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी सलगर येथे जावून रातोरात आरोपीस गजाआड केले आहे. या घटनेने त्या डॉक्टरच्या कृत्याबाबत संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे
घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीस अद्दल घडविण्यासाठी चांगला चोप दिल्याचीही चर्चा आहे. आरोपीविरूध्द भा.दं.वि.376 अ,ब,बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण,व अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील या करीत आहेत.
पेट्रोल व डिजेलचे भाव कमी होणार ? नवनियुक्त मुख्यमंत्री यांची घोषणा.
नवनियुक्त मुख्यमंत्री यांनी विधानसभेत विशेष अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी मोठी घोषणा केलीय. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरकार बहुमत चाचणी मध्ये यशस्वी झालं. आणि या सरकारला बहुमत पडलं त्यानंतर हे सरकार आता इथून पुढे टिकणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली यामध्ये माजी उपमुख्यमंत्री असतील. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेप्रति असणाऱ्या एकनिष्ठतेबद्दल वक्तव्य केलं. यामध्ये ते भाऊक देखील झाले पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की, कशा पद्धतीने ते कारभार करणार आहेत कशा पद्धतीने ते या राज्याचे सेवा करणार आहेत.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बराच गोष्टींवरती नजर टाकली. ते बऱ्याच गोष्टींबद्दल बोलले त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सध्या मी मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्षा चालकाचे हे सरकार आहे असं म्हणून हिणवलं. मात्र व्यावसाय करणं हे चुकीचं नाहीये सुरुवातीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील चायवाला म्हणून हिणवलं जात होतं. त्यांच्या व्यवसायावरनं त्यांना डवचला जात होत. मात्र व्यवसाय करणं चुकीचं नाही असं त्यांनी म्हटले हे सरकार प्रत्येकाचा आहे हे सरकार सर्वसामान्य जनतेचा आहे हे सरकार तुमचं आमचं सर्वांचं आहे असं म्हणत त्यांनी सर्वसामान्यांना जसा निर्णय हवा आहे अशी घोषणा केली आहे. जेणेकरून सर्व सामान्यांना ही घोषणा दिलासादायक आहे सर्वसामान्यांना येत्या काळामध्ये याचा फायदा होणार आ
सध्या इंधनाचे दर हे गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे आणि सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री लागली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंधनावरती नजर टाकली या इंधनावरती त्यांनी बातचीत केली आहे. ते म्हणतात की तेलाच्या किमती वाढल्यावर देखील महाराष्ट्राने व्हॅट कमी केला नव्हता. तेव्हा त्यांनी कमी करू अशी घोषणा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्यास मदत होईल असा आशावाद आपल्याला व्यक्त करायला हरकत नाहीये. आत्ताचे सरकार येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारी इंधनाचे दर कमी करेल अशी आशा आता निर्माण झाली आहे.
स्मशानभूमीवर अतिक्रमण करणारावर गुन्हा दाखल करण्याचे तहसिलदारांचे आदेश.
प्रेम विवाह झालेल्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेस जीवे मारण्याचा प्रयत्न.
कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य .कसा जाईल आपला दिवस.
मेष
आपल्या मर्जी प्रमाणे दिवस घालवा. सामुदायिक गोष्टींवर भाष्य करू नका. कौटुंबिक सौख्य जपाल. मुलांची बाजू समजून घ्यावी. जन संपर्कातून काम होईल.
वृषभ
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आवडत्या गोष्टी तुमच्या समोर हजर राहतील. चैन करण्याकडे आपले अधिक लक्ष राहील. मौजमजेला प्राधान्य द्याल. मनातील काळजी दूर साराल.
मिथुन
मानसिक दोलायमानता जाणवेल. स्थिर विचार करावेत. कामात अति घाई करून चालणार नाही. क्षणिक आनंद उपभोगाल. शारीरिक थकव्या बरोबर वैचारिक थकवा जाणवेल.
कर्क
ऐषारामाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. दिवस आळसात घालवाल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक कामातील कागदपत्रे व्यवस्थित हाताळा. कामसौख्याचा आनंद घ्याल.
सिंह
अडचणीतून मार्ग निघेल. सामाजिक कामात मदतीचा हात पुढे कराल. सर्वांशी सहृदयतेने वागाल. तुमच्या मनाची विशालता दिसून येईल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर संभवते.
कन्या
कामात विचारपूर्वक पाऊले टाकावीत. भावंडांशी दुराग्रही वागू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. भागीदाराशी सलोखा वाढवावा लागेल. कामातील अडचण दूर होईल.
तूळ
जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. पोटाच्या समस्या जाणवतील. छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. हातातील कामात यश येईल.
वृश्चिक
मानसिक अस्वस्थता जाणवेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. नवीन ओळखी होतील. चुकीच्या संगतीत अडकू नका. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल.
धनू
अचानक धनलाभाची शक्यता. आवडते साहित्य वाचायला मिळेल. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांची बाजू समजून घ्यावी. जुन्या कामात वेळ जाईल.
मकर
केलेल्या कामातून समाधान मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. अगदीच गरज असेल तरच प्रवास करावा. चालू कामास गतीमानता येईल. घरातील कामात समाधानी असाल.
कुंभ
कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल. उगाच कोणाशीही वाद वाढवू नका. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. जवळचा प्रवास करावा लागेल. दिवस मजेत घालवाल.
मीन
दिवस कटकटीचा जाऊ शकतो. गोष्टी शांतपणे जाणून घ्याव्यात. रागावर नियंत्रण ठेवावे. घाई-घाईने कोणतीही कृती करायला जाऊ नये. करमणुकीचा आनंद घ्याल
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार 6 महिन्यात कोसळेल, मध्यवर्ती निवडणूकीला तयार राहा - शरद पवार
राज्यात सध्या आलेलं सरकार सहा महिन्यात कोसळू शकते, त्यामुळे मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिली आहे.शिंदे सरकारची सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.
आमदारांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळें तयारी आत्तापासून करा.
विरोधी पक्षनेते पदी अजित पवार ?
विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वनीय सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, हसन मुश्रीफ, अजित पवार, धनंजय मुंडे यांची बैठक झाली. यामध्ये अजित पवारांच्या नावावर एकमत झाल्याचं समजतेय. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवार यांच्यासोबतची बैठक काही वेळापूर्वी संपली. आमदारांकडून बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
Sunday, July 3, 2022
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत राहुल नार्वेकर विजयी !
मुंबई (प्रतिनीधी) विधानभवनात विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान झाले. यात भाजपच्या राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली आहे. त्यांना 164 आमदारांची मतं मिळाली. नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते
चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांनी 164 मतं मिळाली आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या राजन साळवींना 107 मतं मिळाली. निवड होताच भाजपकडून जय श्री रामाच्या घोषणा दिल्या. बंडखोर आमदारांकडून जय भवानी, जय शिवाजी..भारत माता की जय..अशा घोषणा देण्यात आल्या. राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मत मिळाली. या राजकीय गदारोळात अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे
राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिलं. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड झाली आहे. शिंदे सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं तर महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणाला राजन साळवी यांना मैदानात उतरवलं होतं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित होतं
२०१४ मध्ये शिवसेनेकडून राहुल नार्वेकर यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत २०१४ मध्येच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ लोकसभेतून निवडणूक लढवली. ते ३ वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य देखील राहिले आहेत. राहुल नार्वेकर पुढे या पक्षात थांबले नाही तर, 'ज्याचे 'पारडे' जड तिथे राहुल नार्वेकर' असे म्हणत त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. एकंदरीतच शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने राहुल नार्वेकर यांनी सुद्धा शिवसेनेसोबत गद्दारी केली. आता विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी माजी शिवसैनिक राहुल नार्वेकर आणि एकनिष्ठ शिवसैनिक राजन साळवी यांच्यात थेट लढत झाली. यात त्यांचा विजय झाला.
जगावर कोरोनानंतर मंकीपॉक्सचे संकट ! तब्बल ६७ देशांमध्ये पसरला मंकीपॉक्स व्हायरस!
नवी दिल्ली : कोरोनानंतर आता जगावर मंकीपॉक्सचे संकट वाढले आहे. युरोपमध्ये ३ पटीने रुग्णांची संख्या वाढली आहे. डब्लूएचओने युरोपमध्ये मंकीपॉक्सचा वाढता प्रसार थांबवण्याचे आव्हान केले आहे. गेल्या दोन आठवड्यात रुग्णसंख्या तिप्पट झाली आहे. १५ जूनपासून युरोपमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांत तिप्पटीने वाढ झाली आहे
६ मे रोजी ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा रुग्ण आढळला आहे, आतापर्यंत युरोपमध्ये ५,००० हून अधिक रुग्ण आढळली आहेत. इतके रुग्ण ओळखले आहेत. आतापर्यंत ६७ देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील ६,२२९ रुग्णांची टेस्ट झाली आहे. यातील ६,१७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर ५२ रुग्ण संशयास्पद आहेत
युरोपमध्ये मंकीपॉक्सचे ५,२६२, उत्तर अमेरिकेत ६९२, दक्षिण अमेरिकेत ९२, आशियामध्ये ६४, आफ्रिकेत ३५ आणि ओशनियामध्ये १२ रुग्ण आढळले आहेत. मंकीपॉक्सचा १० देशांमध्ये जास्त प्रसार झाला आहे. यामध्ये ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि बेल्जियम या देशांचा समावेश आहे
दरम्यान, या आजाराचा प्रसार रोखायचा असेल तर त्वरित आणि समन्वित उपाययोजना करणे आवश्यक आहे. मंकीपॉक्सचे रुग्ण हजारोपर्यंत पोहोचलेले बहुतेक देश युरोपमधील आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला मंकीपॉक्सचे रुग्ण वाढले आहेत या प्रसाराबद्दल चिंता वाटत असल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले.
परळी उड्डाणपूल याचिकेसंदर्भात बीडचे जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता व मुख्याधिकारी यांना दंड - उच्च न्यायालयाचा दणका.
Saturday, July 2, 2022
स्मशानभुमीची दुरावस्था मृत्युनंतर हेळसांड. उघड्यावर अंत्यसंस्काराची वेळ.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंडदान आंदोलन.
प्रा.शिवराज बांगर यांची एमपीडीएच्या गुन्ह्यातून हायकोर्टाकडून सुटका.
शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का ; आमदारांपाठोपाठ 14 खासदारही बंडाच्या पवित्र्यात.
एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि परिणामी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना अद्याप धक्क्यातून सावरलेली नाही . दरम्यान , पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसू शकतो . शिवसेनेच्या संसदीय पक्षात समांतर बंडखोरी होणार असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे . त्यासाठी राष्ट्रपतिपदाच्या मतदानाची वाट पाहा , असेही ते म्हणाले .
किमान 14 खासदार शिवसेनेविरोधात बंड करू शकतात . शिवसेनेचे खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासह आणखी काही खासदारांची शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता असून श्रीकांत यांनी यापूर्वीच आपल्या वडिलांच्या गटातून शिवसेनेतूनफारकत घेतली आहे . किमान 14 खासदार राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाच्या दिवश bjp उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करू शकतात . हे शिवसेनेच्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे . यासोबतच हे खासदार शिवसेनेपासून वेगळे होण्याची घोषणाही करू शकतात
आता शिवसेनेचे लोकसभेत 19 आणि राज्यसभेत 3 सदस्य आहेत , शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीनंतर फुटीचा परिणाम लोकसभेत दिसून येईल , असे मानले जात आहे . तसेच 14 खासदार शिवसेनेच्या विरोधात बंड करु शकतात .
कोयत्याने गंभीर वार केले प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर - ॲड. तेजस नेहरकर
रविवारी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवड.शिंदे गट भाजपमध्ये चालु मंथन.
मुंबई - एकनाथ शिंदे सरकारवर विश्वासदर्शक ठराव पारीत होण्याआधी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असून यासाठी भाजप आणि शिंदे गटात मंथन सुरू झाले आहे
राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. यात ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार असून ४ जुलै रोजी शिंदे सरकारवर विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. यातील सर्वात महत्वाचा घटक हा विधानसभाध्यक्षपद होय. या पदासाठी भाजपतर्फे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव या पदासाठी समोर आले आहे. तर शिंदे गटातर्फे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यातील आता कुणाची या पदावर वर्णी लागणार याचे उत्तर उद्याच मिळणार आहे
दरम्यान, आगामी काळात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद हे अनुभवी नेत्याकडेच असावे असे शिंदे गट आणि भाजप यांनी ठरविले आहे. या अनुषंगाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात येईल असे मानले जात आहे.
केवळ RSS भाजपच्या आदेशामुळे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं.- खा.शरदजी पवार
पुणे – कालचा दिवस हा केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपुर्ण देशासाठी महत्वाचा ठरला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जो सत्तासंघर्ष सुरू होता त्याला काल पूर्णविराम मिळाला
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी, महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच वर्षे नेतृत्व केलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर बसावं लागण हा मोठा धक्का असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. “फडणवीसांचा चेहरा सांगत होता, ते आनंदी दिसत नाहीत. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी आनंदी मनाने त्यांनी स्वीकारली नाही. RSS च्या संस्कारामुळे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं”, असं पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत हो
भाजपकडून आदेश आला की तो सर्वोच्च आदेश असतो. मग दिल्लीवरून असो अथवा नागपूरहून- तो पाळावाच लागतो. त्यामुळे फडणवीसांना तो पाळावा लागला. त्यांच्यासाठी तो मोठा झटका होता. एकनाथ शिंदे यांनी बंड करून आमदारांना आपल्या बाजूने केले हेच त्यांचं यश असल्याचे पवार म्हणाले आहेत. फडणवीस यांचा चेहराच नाराज असल्याचे सांगत होता. लोकांमधून निवडून आले असते तर फडणवीसांना शाबासकी दिली असती. भाजपने एकनाथ शिंदे यांना मदत करण्याची जी भूमिका आत्ता घेतली ती अडीच वर्षांपूर्वी घेतली असती तर गेल्या अडीच वर्षात घडले ते घडलेच नसते, असं पवार म्हणाले
पवारांचा फडणवीसांना टोला
नंबर दोनची जागा फडणवीसांनी आनंदाने स्वीकारली असं दिसत नाही. त्यांचा चेहरा सांगत होता, फडणवीस नाखुश होते. नागपूरमध्ये त्यांनी आरएसएसचे स्वयंसेवक म्हणून काम केलंय. तिथे जो आदेश येईल तो पाळावा लागतो. आरएसएसच्या संस्कारामुळे फडणवीसांनी हे स्वीकारलं, दुसरं काही कारण असू शकत नाही, असं पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे एखाद्यावर विश्वास टाकल्यावर त्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी द्यायची, अशा स्वभावाचे आहेत. उद्धव ठाकरेंनी संघटनेची, विधिमंडळाची जबाबदारी पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर दिली होती, त्याचा हा परिणाम आहे, असं शरद पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी ग्रेसफुली राजीनामा दिला. मोठया मनाने राजीनामा दिला. तसेच आमदारांना बाहेर नेणं हे पूर्व नियोजित असल्याचे पवार म्हणाले आहेत. शिवसेना संपुष्टात आली नाही आणि येणार नाही, असंही पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना अपमानित करण्यासाठी उपमुख्यमंत्री पद - प्रकशजी आंबेडकर.
विधिमंडळाचे कामकाज करण्याची अद्याप त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, राज्यपाल हे नवीन सरकारबाबत सकारात्मक आहे. राज्यपाल पद स्वयात्त असून त्यांना अधिकार आहे मात्र त्याचा वापर याेग्यप्रकारे झाला पाहिजे. शिवसेनेने सर्वाच्च न्यायालयात 16 आमदारांचे अपात्रेबाबत याचिका दाखल केली आहे. त्याबाबत 11 जुलै राेजीच निर्णय हाेणार. मात्र, शिवसेनेने त्यापूर्वी राज्यपाल, राष्ट्रपतींकडे जाऊन सांगितले पाहिजे की, बहुमत सिध्द झाल्यावरच इतर विधिमंडळाचे अधिकार मिळतील. बिचारे फडणवीस यांचा केंद्रीय नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला आहे.
फडणवीस जाहीरपणे सांगत हाेते की, मी काेणतेही पद स्विकारणार नाही. मात्र, काही वेळातच त्यांना वरिष्ठांकडून निराेप आल्यानंतर पद स्विकारावे लागले. यावरुन इतके दिवस सुरु असलेली त्यांची तानेशाही संपुष्टात येऊ लागल्याचे दिसून येते. त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत.
Friday, July 1, 2022
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्त्यात पुन्हा होणार ‘इतकी’ वाढ..?
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. सातव्या वेतन आयोगानुसार, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर हा ‘डीए’ 31 टक्क्यांवरून 34 टक्के झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत..
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ‘एआयसीपीआय’ निर्देशांकानुसार (AICPI Index) ठरवला जातो.. एप्रिलमध्ये ‘एआयसीपीआय’ निर्देशांक 127 अंकांवर गेला होता. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर 7.79 टक्के, म्हणजेच 8 वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे. याआधी जानेवारी व फेब्रुवारीमध्ये ‘एआयसीपीआय’ निर्देशांकांत घसरण झाली होती.
जानेवारीमध्ये ‘एआयसीपीआय’ निर्देशांक 125.1, तर फेब्रुवारीत 125 अंकावर होता. मार्चमध्ये त्यात एका अंकाने वाढ होऊन तो 126 वर पोहोचला. एप्रिलच्या आकड्यांनुसार, ‘एआयसीपीआय’ निर्देशांक आता 127.7 वर पोहोचला आहे. त्यात 1.35 टक्के वाढ झाली आहे.
मोदी सरकार आजच (ता. 1) केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 वरुन 39 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनात 34,000 रुपयांपेक्षा अधिक वाढ होणार असल्याचे सांगितले जाते..
किती पगार मिळणार..?
मोदी सरकारने ‘डीए’मध्ये 5 टक्के वाढ केल्यास, कर्मचाऱ्याचा मूळ पगार (Basic Salary) 56,900 रुपये असेल, तर महागाई भत्ता 22,191 रुपयांपर्यंत मिळेल. सध्या 34 टक्के दराने कर्मचाऱ्यांना 19,346 महागाई भत्ता मिळतो. त्यात 2,845 रुपयांची वाढ होईल. या हिशेबाने वार्षिक वेतनात 34,140 रुपयांची वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवून मिळतो.. काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ झाली होती. त्यामुळे ‘डीए’ 34 झाला होता.. आता त्यात 5 टक्के वाढ झाल्यास, ‘डीए’ 39 टक्क्यांवर जाणार आहे.. देशातील 50 लाखांपेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी व 65 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
शिंदे सरकारचा नवा धक्का राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या 12 सदस्यांची नवी यादी पाठविणार !
मुंबई (प्रतिनीधी) :- एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांनी शुक्रवारी राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या 12 सदस्यांची नवी यादी पाठवण्याचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चौसाळा जिल्हा परिषद गट जिंकेल-- विवेक कुचेकर
लिंबागणेश ग्रामपंचायतमार्फत "राष्ट्रीय डाॅक्टर्स दिन डाॕक्टरांची सन्मान करून "साजरा".
सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी श्रीमती दीपा मुधोळ - मुंडे यांची नियुक्ती.
महाविकास आघाडीचा नवा विरोधी पक्षनेता कोण ? आक्रमक चेहऱ्याची गरज !
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दिल्यानंतर , एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली . त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदं रिक्त झालं असून , सत्तापरिवर्तनानंतर महाविकास आघाडीकडून कोण नवा विरोधी पक्षनेता असेल याबाबत लागली आहे . उत्सुकता महाविकास आघाडीची सत्ता गेल्याने आता काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागणार आहे , हे निश्चित आहे . सध्याची राजकीय स्थिती पाहता महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे . विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे 51 आमदार आहेत .
तशी एकूण संख्या 53 असली तरी , दोन आमदार तुरुंगात असल्याने आकडा 51 आहेत . शिवसेनेकडे 55 आमदार असले तरी 39 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे वेगळा मार्ग स्वीकारला आहे . काही अन्य 16 आमदार जे उद्धव ठाकरेंकडे उरलेले आहेत , त्यातीलही काही शिंदे गटाकडे येऊ शकतात , त्यामुळे शिवसेना विरोधी पक्षात बसण्याच्या क्षमतेत असेल नसेल अशीच परिस्थिती विधिमंडळातील त्यांची असणार आहे
काँग्रेसकडे 44 आमदार आहेत . त्यामुळे सर्वाधिक 51 जागा असलेले विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यालाच जाणार , आता निश्चित हे आहे . मुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेता हे जयंत पाटील आहेत . असे असले तरी , पक्षात दबदबा हा अजित पवारांचाच आहे . उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद ही दोन्ही महत्त्वाची खाती अजित पवारांकडे होती . त्यामुळे अजित पवारांचा दबदबा पाहता त्यांचेही नाव चर्चेत आहे .
मात्र , ते स्वतः हे पद स्वीकारतात किंवा नाही , हा विषय त्यांचा ऐच्छिक आहे . अशा परिस्थितीत मग दुसरा पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जर दुसऱ्या नावाचा विचार करत असेल तरी , त्यात सर्वातअसेल तरी , त्यात सर्वात आघाडीवर जयंत पाटलांचे नाव असू शकते . मात्र , जयंत पाटील यांचा स्वभाव मवाळ असल्याने , पक्षनेता हा आक'मक असावा असा जर पक्षाचा विचार झालाच तर , अन्य दुसऱ्या कुठल्या नावावरही शिक्कामोर्तब होऊ शकते .
लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून.गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बहमत सिद्ध करण्याची शिंदे सरकारची शनिवारी अग्निपरीक्षा!
मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला . त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली . माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज शिंदे यांनी शपथ घेतली . बंड पुकारल्यानंतर शिंदे गोव्याहून मुंबईत दाखल झाले .
मुंबईत आल्यावर त्यांनी सागर निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेतली . त्यानंतर शिंदेआणि फडणवीस राजभवनात दाखल झाले . त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली . दरम्यान राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून आजच शिंदे यांनी शपथ घेतली आहे . तर उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी शपथ घेतली आहे .
या नव्या सरकारची शनिवारी अग्निपरीक्षा असणार आहे . राज्यपालांनी शिंदे सरकारला शनिवारी बहमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे आता बहुमत चाचणी कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे .



