परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर सतत रहदारी जाम होत असल्याने व अपघातांची मालिका सुरूच असल्याने उड्डाणपुलाची दुरुस्ती व अंडरग्राउंड ब्रिज साठी जेष्ठ नेते भास्कर मामा चाटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. याबाबत न्यायालयात शपथपत्र दाखल करण्याकरिता उच्च न्यायालयाने रेल्वे विभागासह बीडचे जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आदेश दिले होते. परंतु या तीनही अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले म्हणून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 20 जून 2022 रोजी च्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी या तिघांचे वैयक्तिक पगारातून प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल करून सदरचा दंड व याचिकेबाबतची शपथपत्र दिनांक 1 जुलै 2022 पर्यंत दाखल करण्याचे आदेश दिले. यामुळे सदर अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल होणार असून हा दंड कोर्टात जमा होणार आहे. तसेच शिवाजी नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, नागसेन नगर,व सर्व परीसरातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने उड्डाणपुलाच्या अंडरग्राउंड व दुरुस्ती बाबत पुढील कामकाजाबाबत या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी व अंडरग्राउंड ब्रिज साठी रेल्वे विभागाचा यात सहभाग असणार आहे. वरील प्रमाणे दंड केल्यानंतर उपरोक्त अधिकारी जागे झाले असून सदरचे काम लवकर मार्गी लागेल अशी माहिती याचिकाकर्ते भास्कर मामा चाटे यांनी दिली आहे.
यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर परळीच्या मुख्याधिकारी यांनी उच्च न्यायालयाचा दंड भरुन शपथपत्र दाखल केले आहे.
No comments:
Post a Comment