Wednesday, January 29, 2025
मंत्री धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोला त. ईडी चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका!
प्रकरणाचा तपास थेट उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा आणि सक्तवसुली संचालनालयानेही समांतर तपास करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. योग्य तपास झाल्यास मंत्र्यावर मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते, असेही याचिकेत म्हटले आहे.
जरांगे पाटील उपोषण सोडण्याची शक्यता आता झक पक आंदोलन करणार समाजा शी बोलून निर्णय घेणार !
जालना (प्रतिनिधी) मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा उपोषणासाठी बसले होते. आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले होतं. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण चालू आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली असून आम्ही गेले पावणे दोन वर्षे आंदोलन केली. मात्र आता वेगळ्या मार्गाने झकपक म आंदोलन करणारअसा इशारा त्यांनी दिला आहे मात्र झकपक आंदोलन म्हणजे नेमके काय असेल हे त्यांनी स्पष्ट केले नाही.मनोज जरांगे पाटील हे गेल्या ५ दिवसांपासून उपोषणासाठी बसले आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ‘सगे सोयरे’ अंमलबजावणी तातडीने करा, शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, कक्ष सुरू करा, वंशावळ समिती गठीत करा, शिंदे समिती मनुष्यबळ वाढवा, संख्याबळ द्या,नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याबद्दल मोठे विधान केले. उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत उपोषण सोडण्याबद्दल मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे, असे ते म्हणाले.
“मी आता उपोषण करणार नाही. पण आता झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी बारा वाजता उपोषण सोडण्याबाबत मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे. आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार” अशी मोठी घोषणा त्यांनी केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरण मागे पडू देणार नाही
“आमचे डोळे उघडले आणि मराठा समाजाचे डोळे उघडले आहेत. खऱ्या आरक्षणाचा मारेकरी कोण हे सर्वांना माहित झालं आहे. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून काम करत नाही, हे मराठा समाजाला कळलं आहे. संतोष देशमुखांचा प्रकरण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. धनंजय देशमुख यांना सकाळी मी बोललो आहे की मी संतोष देशमुखांचे प्रकरण मागे पडू देणार नाही”.
“फडणवीस साहेब आता लय दिवस आनंद राहणार नाही”
मी समाजाशी बोलून थोड्या वेळात उपोषणाची भूमिका कळवतो. आज रात्री किंवा सकाळी बोलतो. त्यानंतर माझी भूमिका कळवतो. एवढे दिवस आम्हाला उपोषण करायची वेळ येईल हे अपेक्षितच नव्हतं. फडणवीस मराठ्यांशी गद्दारी करणार असं आम्हाला वाटत नव्हतं. मी उपोषणाला बसलो आणि सिद्ध झालं की देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. मराठा समाजाच्या मागणीची अंमलबजावणी होईल असा आम्हाला वाटत होतं. परंतु लक्षात आलं की मराठ्यांना काही द्यायचं नाही. आम्ही सकाळी सांगितलं होतं फडणवीसांना आमच्या मागण्या मान्य करायच्या का नाही, हे बोललं पाहिजे होतं. परंतु ते काही बोलले नाही. त्यामुळे सिद्ध झालं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मारेकरी कोण आहे?
फडणवीस साहेब, आता आनंद लय दिवस राहणार नाही, आनंदावर विरजन पडेल. ज्या दिवशी बोलायचं त्या दिवशी तुम्हाला सांगेल. खरी चूक कोणाची आहे हे मराठा समाजाला कळालं आहे. आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि आम्ही आता वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू. बेईमानी आणि गद्दारी फडणवीस यांच्याकडून होईल असे वाटले नव्हते. जे हक्काचे आहे ते आरक्षण देत नाहीत. आम्हाला उपोषण करायचे नव्हते. आम्हाला वाटले, दोन दिवसात मागण्या पूर्ण होतील. फडणवीस यांनी मात्र चुप्पी साधली. मराठा समाजाविषयी त्यांना किती द्वेष आणि आकस आहे हे दिसून आले. फडणवीस किती मराठाद्वेषी आहेत, हे उघडे पडले आहे. आंदोलन सोडल्यानंतर त्यांना सोडणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले.
आता झक पक आंदोलन करणार
“देवेंद्र फडणवीस गद्दारी करतील, असे स्वप्नात वाटले नव्हते. आज रात्री किंवा सकाळी मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार आहे. देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांचे मने जिंकायला पाहिजी होती, मी बोलायला सुरू करेल, तेव्हा तुम्हाला तिन्ही ताळात जागा राहणार नाही. मराठ्यांनी सावध व्हावे, मुला-बाळांचे वाटोळे होऊ देऊ नका. पावणे दोन वर्षे आंदोलन केली. आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहे. मराठा समाज उपोषण करणार नाही, पण आता झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी बारा वाजता उपोषण सोडण्याबाबत समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे”, असेही जरांगे पाटील म्हणाले.
एप्रिल मे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार?
मुंबई (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. एकीकडे ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. तर राज्यातील इतर पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
सर्वाच्च न्यायालयात आज 23 व्या नंबरवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पुन्हा एका तारीख पे तारीख. राज्य सरकारच्या वतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी नवी तारीख दिली असून पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यातच, आज न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात काही जणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला ओबीसी आरक्षण असो की नसो पण निवडणुका व्हाव्यात अशी मागणी या याचिकाकर्त्यांनी केली.
या प्रकरणी आज सुनावणी झाली असून न्यायालयाने 25 फेब्रुवारी ही नवी तारीख दिली आहे. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही काळ पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार, जर 25 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत स्थगिती उठल्यास एप्रिल-मे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं या निवडणुकांच्या भविष्यासाठी 25 फेब्रुवारी ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
राज्यातील 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारातच गोरक्षकाला बेदम मारहाण. मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी मागणीसाठी गाव बंद ठेवून आंदोलन.
बीड (प्रतिनिधी) कत्तलीसाठी गाई घेऊन जाणाऱ्यांना विरोध केल्याच्या कारणावरून गोरक्षकाला पोलीस ठाण्याच्या आवारातच बेदम मारहाण केल्याची घटना चकलांबा येथे घडली. मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी यासाठी गाव बंद ठेवून आंदोलन करण्यात आले.
चकलांबा येथील गोरक्षक गोपाल मधुकर उनवणे वय 24 वर्षे रा.चकलांबा यास दि. 27 जानेवारी रोजी रात्री 10 ते 15 समाजकंटकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे या तरुणाचा जीव वाचला. पोलीस आल्याचे पाहिल्यानंतर मारहाण करणारे तरुण तिथुन निघून गेले. गोपाळ उनवणे याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिहाण सय्यद, पिंटू सय्यद, अफसर चंदू शेख, असलम मेहबुब कादरी यांचसह 10 ते 15 जणांनी शिवीगाळ करत जबर मारहाण केली. रिहाण सय्यद याने खाली पडलेला दगड हातात धरुन डोक्यावर मारला. ओरडण्याचा आवाज ऐकुन लगेच पोलीस स्टेशन चकलांबा येथील पोलीस पळत आल्याने वरील लोक पोलीसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. उनवणे यांना डोळ्याजवळ मोठी जखम झाल्याने पोलिसांनी उपचारासाठी उनवणे यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.मारहाण करणाऱ्या वरील लोकांविरुध्द तक्रार दिली असून पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत. गोरक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे चकलांबा गावात आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी गावात कडकडीत पाळून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३०० कोटींचे सॉफ्ट लोण सवलतीच्या व्याजदराने द्या मंत्री धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांची अजितदादांना संयुक्त मागणी.
मुंबई (प्रतिनिधी) बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला कृषी व अकृषी असा दोन्ही प्रकारचा पत पुरवठा करून शेतकरी वर्गाला दिलासा देता यावा, यासाठी बीड जिल्हा बँकेस बुलढाणा जिल्ह्याच्या धर्तीवर राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून ३०० कोटींचे सॉफ्ट लोण सवलतीच्या व्याज दराने उपलब्ध करून देण्यात यावे. व्याजात सवलत देता येत नसल्यास विशेष बाब म्हणून अर्थ खात्याने अर्धे व्याज भरून बँकेला सहकार्य करावे, अशी मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात आयोजित बैठकीतून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे केली आहे. तर या मागणीस पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देखील समर्थन दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थ व नियोजन मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिक व बीड जिल्हा मध्यवर्ती बँकांना मदत करण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व पशू संवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री नरहरी झिरवळ यांसह संबंधित विभगांचे अधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रशासकीय मंडळाच्या माध्यमातून २०१९ पासून चांगले काम करून दाखवले. बँकेचा घासरलेला दर्जा व वसुलीमध्ये सुधारणा करून ब दर्जा मिळवला. आता बँकेच्या कृषी व अकृषी कर्जांच्या पुरवठ्यासाठी बाधा येऊ नये, यासाठी ३०० कोटी रुपयांचे सॉफ्ट लोण देण्यात यावे, अशी मागणी एकमुखाने करण्यात आली.
राज्य सहकारी बँकेने बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेला याच प्रकारे मदत केली होती, मात्र तिथे देण्यात आलेला व्याजदर हा बीड जिल्हा बँकेला परवडणारा नसून, त्यात सवलत द्यावी, किंवा अर्धा व्याजाचा भार अर्थ व नियोजन खात्याने उचलावा, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी प्रशासक मंडळाच्या वतीने केली.
यावेळी उपुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबतचा प्रस्ताव तातडीने मागवून घेत अर्थ खाते, राज्य सहकारी बँक व नाबार्ड शी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान बँकेच्या ५० शाखा असून, तिथले फर्निचर, संगणक आदी जुनाट झाले असून आधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक बाबींसाठी सक्षम नाही, त्यामुळे भौतिक, तांत्रिक सुविधा निर्मितीसाठी बँकेला १५ कोटी रुपये मदत राज्य सरकारने करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली असून, याबाबतचा प्रस्ताव पाठवावा, त्यावर निर्णय घेऊ, असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
पंजाबराव देशमुख कृषी सवलत योजनेप्रमाणे विविध योजनांच्या सवलतीच्या माध्यमातून बीड जिल्हा बँकेचे सुमारे ३२ कोटी रुपये राज्य शासनाने अदा करणे बाकी असून ही रक्कम शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली असता, सदर रक्कमा जिल्हा बँकेला ३१ मार्चच्या आधी उपलब्ध करून दिल्या जातील, असा निर्णयही अजितदादा पवार यांनी घेतला.
या बैठकीस अर्थ व नियोजन तसेच सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार आयुक्त, नाबार्डचे सी जी एम, त्याचबरोबर शिखर बँकेचे व राज्य सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी, बीड चे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, प्रशासकीय मंडळ आदी उपस्थित होते.
वसुली सह दर्जा उन्नती साठी कार्य करणाऱ्या जिल्हा बँकेच्या प्रशासक मंडळाचे अजितदादांनी यावेळी कौतुक केले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या मदतीला आता बँकेचा कारभार पाहण्यासाठी सहकार विभागाकडून एका तज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे..
मुंबई (प्रतिनिधी) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरिता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठित करण्यात आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
या समितीमध्ये संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) हे अध्यक्ष असतील. तसेच, आरोग्य संचालनालय (मुंबई) चे संचालक, आयुष संचालनालय (मुंबई) चे संचालक, सर ज.जी रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता, लोकमान्य टिळक स्मारक रुग्णालय (सायन) चे अधिष्ठाता, मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) चे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) यांचे माजी संचालक डॉ. तात्याराव लहाने, एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. रमाकांत देशपांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ( छत्रपती संभाजीनगर) चे सचिव डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, के.ई.एम रुग्णालय (मुंबई) चे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, टाटा मेमोरियल सेंटर (परळ, मुंबई ) चे संचालक अकॅडमी डॉ. श्रीपाद बनावली, कौशल्य धर्मादाय रुग्णालय (ठाणे) चे संचालक डॉ. संजय ओक, बॉम्बे हॉस्पिटल ( मुंबई), नेफरोलॉजी विभागचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. बिच्छू श्रीरंग, पी.डी. हिंदुजा रुग्णालय (मुंबई) चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. जॉय चक्रवर्ती, नायर हॉस्पिटल ( मुंबई) मधील ऋदयविकार विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. अजय चौरसिया, बॉम्बे हॉस्पिटल (मुंबई) च्या कन्सल्टंट फिजिशियन अँड इंटेसिविस्ट डॉ. गौतम भन्साळी, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (नागपूर) चे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (पुणे) यांच्या हॉस्पिटल मॅनेजमेंट कमिटीचे सचिव डॉ. माधव भट हे सदस्य म्हणून कार्यरत राहतील. तसेच, मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्ष अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळण्याकरिता सध्या अस्तित्वात असलेल्या २० आजारांपैकी इतर शासकीय योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांचे पुनर्विलोकन करणे तसेच सहाय्यता मिळण्याकरिता नवीन आजार समाविष्ट करणेबाबत शिफारस करणे, रस्ते अपघात वगळून इतर अपघात प्रकरणामध्ये घ्यावयाच्या कागदपत्रांची निश्चिती करणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळण्याकरिता आजारांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यांच्या रकमांचे पुनर्विलोकन ( समीक्षण) करुन अनुज्ञेय रक्कम (मंजूर रक्कम) नव्याने निर्धारित करण्याची शिफारस करणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता रुग्णालय संलग्नीकरणासाठी (Empaneled) रुग्णालयाच्या तपासणीचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, केंद्र-राज्य सरकारच्या वैद्यकीय उपचाराबाबत असलेल्या इतर योजनांच्या धर्तीवर निकष ठरविणेबाबत शिफारस करणे याकरिता ही समिती गठित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख श्री. नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने वैद्यकीय उपचाराबाबत वेळोवेळी विविध विषयांच्या अनुषंगाने विचारणा केल्यास ही समिती त्या विषयांबाबत शिफारस सादर करेल.
Tuesday, January 28, 2025
बीडचा पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावा - अजित पवार !आ.संदीप क्षीरसागर यांनी केला सातत्याने पाठपुरावा.
बीड (प्रतिनिधी) बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याचसंदर्भात मंगळवारी (दि.२८) रोजी ही आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली. यावर अजितदादांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
मुबलक प्रमाणाय पाणीसाठा उपलब्ध असून देखील बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. पंधरा-पंधरा दिवसांतून एकदा पाणी बीड शहरवासीयांना मिळत आहे. याचे कारण म्हणजे सध्या जी पाणीपुरवठ्याची योजना कार्यरत आहे ती अपुरी पडत आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार पुरेशी असणारी अमृत अटल योजना काम पूर्ण होऊन उपलब्ध देखील आहे. परंतु बीड नगरपालिकेकडे ३६ कोटी रूपयांचे वीजबिल थकलेले असल्याने महावितरण विभाग या नवीन पाणीपुरवठा योजनेला वीज कनेक्शन देत नाही. परिणामी पाणी आणि योजना हे दोन्ही उपलब्ध असताना बीडकरांना पाण्यासाठी पंधरा-पंधरा दिवस वाट पहावी लागते. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि तो आताही सुरूच आहे. आ.क्षीरसागर यांनी अनेक वेळा अधिवेशनात हा प्रश्न मांडला आहे. अनेकवेळा सरकारदरबारी मंत्री महोदयांकडे बैठका घेऊन हा प्रश्न लावण्यासाठी विनंती केली आहे. यासोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही याबाबतच्या बैठका घेऊन यात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शेवटी या विषयात आ.संदीप क्षीरसागर यांनी माजी आ.सय्यद सलीम यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केली होती.
आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न विधिमंडळ, मंत्रालय, प्रशासन आणि न्यायालय अशा सर्वच स्तरावर मांडला आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. आताही याच प्रश्नावर आ.संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली आहे. त्यावर ना.अजिदादांनीही लगेचच, बीड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करा, असे निर्देश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांना दिले आहेत. आता ना.अजित दादा पवार यांच्या माध्यमातून बीड शहराचा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेलच अशी अपेक्षा आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान याप्रसंगी ना.हसन मुश्रीफ तसेच वरिष्ठ स्तरावरील प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी खा.प्रा.रविंद्र पाटील चव्हाण यांची बिनविरोध निवड.
एस टी.ची भाडेवाढ विषम संख्येत या भाडे वाढी मुळे प्रवासी आणि वाहकात भांडण तंटे.!
मुंबई (प्रतिनिधी) एसटी महामंडळाने शनिवार मध्यरात्रीपासून १५ टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे खेडोपाड्यातील सर्वसामान्य जनतेचा प्रवास महागला आहे. एसटीची भाडेवाढ करताना ती पाचच्या पटीत करायला हवी होती. परंतूही भाडेवाढ विषम प्रमाणात झाल्याने आता ग्रामीण भागातील जनतेला तिकीट काढताना सुट्टे पैसे देताना अडचण होत आहे. नवीन भाडेवाढ करताना ती सम प्रमाणात न झाल्याने सुट्टे पैसे जर प्रवाशांकडे नसतील तर कंडक्टर आणि प्रवाशांत वाद होत आहेत. त्यामुळे ही भाडे वाढ एसटी प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात वाद करणारी ठरली आहे.
एसटी महामंडळाने भाडेवाढ करताना ती विषम संख्येत केलेली आहे. नव्या तिकीट दरानुसार आता फुल तिकीट ११, २१, ३१, ४१, ५१, ६१, ७१, ८१, ९१ या पटीत विषम संख्येत झाले आहे. तर हाफ तिकीट देखील ६, ११, १६, २१, २६, ३१, ३६, ४१, ४६, ५१,५६ असे विषम संख्येत झाले आहे. पूर्वी भाडेवाढ करताना पाच रुपयांच्या पटीत केली जात होती. परंतू नवीन भाडेवाढ मात्र एक रुपयांच्या पटीत केली आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना एक रुपया अतिरिक्त बाळगावा लागणार आहे. प्रवाशांनी १०,१५,२५,५० रुपये दिल्यानंतर प्रवाशांकडे एक रुपया नसल्यास कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी तिकीट दरात तात्काळ बदल करावा लागणार आहे. अन्यथा कंडक्टरच्या डोक्याला ताप होणार आहे.
तर सुट्ट्या पैशांवरुन तंटे होणार नाहीत
दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्यांनी एसटी महामंडळाच्या भाड्यात सम प्रमाणाच्या पटीत भाडेवाढ केली होती. त्यामुळे प्रवाशांना सुट्टे पैसे देताना कंडक्टर आणि प्रवाशांत काही वाद झाले नाहीत. मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६८ ( २) तरतुदी नुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. त्यांच्याकडे १४.९५ टक्के इतकी वाढ करावी असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिला होता. पण त्याला मंजुरी देताना सम प्रमाणात भाडेवाढ करण्याऐवजी विषम प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली आहे. तरी या संदर्भात प्राधिकरणाची पुन्हा बैठक घेऊन दुरुस्ती करण्यात यावी आणि सम प्रमाणात भाडेवाढ करावी, तरच वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशांवरुन कोणतेही तंटे होणार नाहीत असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.
प्रवाशाने तिकीट काढले नसल्याने कारवाई, निलंबित बस वाहकाने तणावात जीवन संपवलं
माजलगाव (प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले चिंचाळा येथील दत्ता अंबलकर या वाहकाने 26 जानेवारीच्या मध्यरात्री शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका वाहकाने तिकीट न काढल्याने केलेल्या कारवाईत वाहक अंबलकर यांना निलंबित करण्यात आले होते, या तणावातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, हा महामंडळाच्या चुकीच्या व्यवस्थेचा बळी आहे, असा आरोप अंबलकर यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
दत्ता आंबळकर हे गेल्या दहा वर्षापासून परिवहन महामंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. महिना भरापूर्वी एका प्रवाशाने तिकीट न घेता प्रवास केल्याचे उघडकीस आल्यानंतर वाहक अंबलकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे वाहक अंबलकर हे तणावात होते. यानंतर ते 12 जानेवारीपासून कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. अंबलकर यांच्या वडिलांनी माजलगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली होती.
दरम्यान, 26 जानेवारीच्या मध्यरात्री अंबलकर यांनी आपल्या शेतात येत शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी यांचे वडील शेतात गेल्यावर ही बाब उघडकीस आली. वडवणी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामाकरून शवविच्छेदनासाठी कुप्पा येथील आरोग्य केंद्रात पाठवले. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने दवाखान्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर माजलगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख कोळपकर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन नातेवाईकांची समजूत काढली. कुटुंबातील एका व्यक्तीला महामंडळात नोकरीला घेता येईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. चिंचाळा येथे दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले
चुकीच्या व्यवस्थेचा बळी.
महामंडळाच्या चुकीच्या नियमांमुळे माझ्या भावाने आत्महत्या केली. प्रवाशाने तिकीट न काढता प्रवास केला यास वाहकाला जबाबदार धरून निलंबित करणे ही चुकीची व्यवस्था आहे.- महादेव अंबलकर, मयत व्यक्तीचे भाऊ
विभागीय कारवाई होती.
सदरील वाहकावर कारवाई विभागीय कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली होती. यामुळे मला यामध्ये अधिकचे काही सांगता येणार नाही.- एस. डी. कोळपकर, आगार प्रमुख माजलगालं
बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीचं वाटोळं झालंय, १५ वर्षापासून एकच पोलीस अधिकारी'; या सह अनेक गोष्टी. सुरेश धसांनी सगळंच काढलं.
मुंबई (प्रतिनिधी ) : पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकील भाजपा आमदार सुरेश धस उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार धस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीचं वाटोळं झाल्याची प्रतिक्रिया दिली.
मंत्रालयातील बैठकीनंतर भाजपा आमदार सुरेश धस यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी आमदार धस म्हणाले,बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीची वाट लागली आहे. बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीची वाट का लागली याचे शोध मोहिम केले पाहिजे. हे कोणामुळे झाले, का झाले? याची माहिती काढली पाहिजे. आज एसपींनी आडनावाने बोलावू नका म्हणून आदेश काढला. उद्या ही वेळ जिल्हाअधिकारी यांच्यावर येईल, असंही धस म्हणाले.
"परळीमध्ये आजही राखेची वाहतूक होत आहे. फक्त ही वाहतूक रात्रीची सुरु आहे. अवैध राखेचे साठे जप्त करण्यात यावेत. गेल्या २० वर्षापासून परळीतील थर्मलमध्ये काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवर आहेत. बदली अधिनियम ३ वर्षाचा कार्यकाळ असतो. म्हणून मी परळी थर्मलमधील अधिकाऱ्यांना एवढ्या वर्षे एकाच ठिकाणी राहण्याची परवानगी कोणी दिली? यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिले आहे. राखेचे अवैध साठे कोणाचे आहेत. याबाबत मी उद्या नावे जाहीर करणार आहे. अनेक धक्कादायक नावे आहेत, असा गौप्यस्फोटही सुरेश धस यांनी केला.
"भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व्यापारी भगीरथ बियाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. त्या आत्महत्येची चौकशी व्हावी अशी मागणी मी केली आहे,असंही आमदार सुरेश धस म्हणाले. परळी शहरातील रस्स्त्यांवर सुद्धा असेच पैसे उचलले आहेत. एकदा आपण परळीतील रस्ते दाखवले पाहिजेत. करुना शर्मा यांच्या गाडीमध्ये जी बंदुक ठेवली होती. ती बंदुक एका पोलीस अधिकाऱ्यानेच ठेवली होती. ते अधिकारी आजही बीड पोलिसमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. भास्कर केंद्रे नावाचे एक पोलीस आहेत, त्यांचे राखेचे टीप्पर आहेत, असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवार निर्णय घेतील
धनंजय मुंडे यांच्या राजीनामा मागणीवर बोलताना धस म्हणाले, अजित पवार निर्णय घेतील. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही. त्यांच्या पक्षाचे काही आमदार राजीनामा घ्यायला पाहिजे असं सांगत आहेत. आम्ही भाजपामध्ये आहे, असंही धस म्हणाले.
Sunday, January 26, 2025
यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा प्राचार्य - प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.
केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा मनोहर जोशी यांना पद्मभूषण.यांच्यासह महाराष्ट्रातील 12 जणांना पद्मश्री.
नवी दिल्ली (प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार मिळाले आहेत.
यामध्ये महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार, तसेच प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चैत्राम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील गणेशशास्त्री द्रविड त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर व्यक्तिचित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
केंद्र सरकारनं आज पद्म पुसरस्करांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या इतरही भागातील वेगवेगळ्या क्षेत्रातअनोखे काम करणाऱ्यांच्या पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
2025 महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते
पद्मभूषण
मनोहर जोशी (मरणोत्तर)
पंकज उधास (मरणोत्तर)
शेखर कपूर
पद्मश्री
अच्युत पालव – कला
अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
अशोक सराफ – कला
अश्विनी भिडे देशपांडे – कला
चैतराम पवार – सामाजिक कार्य
जसपिंदर नरुला – कला
मारुती चितमपल्ली – साहित्य
रानेंद्र भानू मुजुमदार – कला
सुभाष खेतुलाल शर्मा – कृषी
वासुदेव कामत – कला
विलास डांगरे – वैद्यकीय
12 गणेश शास्त्री द्रविड (शिक्षण)
मारुती चित्तमपल्ली यांचे कार्य
मारुती चित्तमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली आहे. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती. 5 लाख किमी प्रवास. 13 भाषांचे ज्ञान. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत मिळवलेली माहिती. त्या माहितीची नोंद केलेल्या व 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली.
मी मराठी नवीन एक लाख शब्द दिले, पुरस्कार मिळाल्याचा आनंद
आज मला प्रचंड आनंद झाला असल्याचे मत पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर मारुती चित्तमपल्ली यांनी व्यक्त केले. मी मराठी नवीन एक लाख शब्द दिले आहेत. सध्या त्याच शब्दकोशावर मी काम करत असल्याचे चित्तमपल्ली म्हणाले. अपेक्षा होतीच पुरस्काराची मात्र आज पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद होत असल्याचे चित्तमपल्ली म्हणाले.
डॉ. विलास डांगरे यांची वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी ओळख
महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. संपूर्ण विदर्भात वैद्यकीय सेवेतले भीष्म पितामह अशी डॉ. डांगरे यांची ओळख आहे. गेल्या ५० वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांना बरं केलं.
वन्यजीव आणि पर्यावरण क्षेत्रात चैत्राम पवार यांचं उल्लेखनिय कार्य
चैत्राम पवार यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपलब्ध केले आहेत. असून धुळे जिल्ह्यात ते नियमितपणे अद्यावत केले जाते. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे. सिंचनासाठी भूजलाचा काटकसरीने वापर, मृद व जलसंधारणाची कामे, सौर ऊर्जेचा वापर, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक आदी माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने या सर्वोच्च पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे. चैत्राम पवार यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविले गेले असून यामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी-2023, भारत जैवविविधता पुरस्कार-2014, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा निधी कार्य पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार, आदिवासी अस्मिता पुरस्कार, नातू फौंडेशन सेवाव्रत कार्यकर्ता पुरस्कार, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, संस्कार कवच पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती नीरा गोपाल पुरस्कार आणि राज्य शासनाचा जलनायक पुरस्कार आदींचा समावेश आहे.
सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार
धुव्वूर नागेश्वर रेड्डी (वैद्यकीय)
न्यायमूर्ती (निवृत्त) जगदीश सिंह खेहार (सार्वजनिक व्यवहार)
कुमुदिनी रजनिकांत लाखिया (कला)
लक्ष्मीनारायणा सुब्रमणियम (कला)
एम टी वासुदेवन नायर (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)
ओसामू सुझीकी (मरणोत्तर) (व्यापार आणि उद्योग)
शारदा सिन्हा (मरणोत्तर) (कला)
19 जणांना पद्मविभूषण
सूर्य प्रकाश (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता
आनंत नाग (कला)
बिवेक देबरोय (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)
जतीन गोस्वामी (कला)
जोश चाको पेरियापूरम (वैद्यकीय)
कैलाश नाथ दीक्षित (पुरातत्त्व)
मनोहर जोशी (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)
नाल्ली छेट्टी (उद्योग, व्यापार)
नंदमुराई बलकृष्णा (कला
पी आर श्रीजेश (खेळ)
पंकज पटेल (उद्योग, व्यापार)
पंजक उधास (मरणोत्तर) (कला)
रामबहादुर राय (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
साध्वी ऋतंभरा (समाजकाय)
एस अजिथ कुमार (कला)
शेखर कपूर (कला)
शोबाना चंद्रकुमार (कला)
सुशीलकुमार मोदी (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यावरहार)
विनोद धाम (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
113 जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
अद्वैत चरण गडनायक (कला)
अच्यूत रामचंद्र पालव (कला)
अजय भट्ट (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
अनिल बोरो (साहित्य आणि शिक्षण)
अरिजित सिंह (कला)
अरुंधती भट्टाचार्या (व्यापार आणि उद्योग)
अरुणोदय साहा (साहित्य आणि शिक्षण)
अरविंद शर्मा (साहित्य आणि शिक्षण)
अशोक महापात्रा (वैद्यकीय)
अशोक सराफ (कला)
अशुतोष शर्मा (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
अश्विनी भिडे देशपांडे (कला)
बैजनाथ महाराज (अन्य)
बॅरी गॉडफ्रे जॉन (कला)
बेगम बाटोल (कला)
भारत गुप्त (कला)
भेरू सिंह चौहान (कला)
भीम सिंह भावेश (समाजकार्य)
भिमाव्वा शिल्लेकयाथारा (कला)
बुधेंद्रा कुमार जैन (वैद्यकीय)
सी एस वैद्यनाथ (सार्वजनिक व्यवहार)
चैतराम देवचंद पवार (समाजकार्य)
चंद्रकांत शेठ (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)
चंद्रकांत सोमपुरा (अन्य)
चेतन चिटणीस (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
डेव्हिड सैयामलीह (साहित्य आणि शिक्षण)
दुर्गा चरण रणबीर (कला)
फारुख अहमद मीर (कला)
गणेश्वर शास्त्री द्रविड (साहित्य आणि शिक्षण)
गीता उपाध्याय (साहित्य आणि शिक्षण)
गोकुळ चंद्र दास (कला)
गुरुयावूर देवराय (कला)
हरचंदन सिंह भट्ट (कला)
हिरामन शर्मा (अन्य-शेती)
हरजिंदर सिंह श्रीनगरवाले (कला)
हरविंदर सिंह (खेळ)
हसन राहू (कला)
हेमंत कुार (वैद्यकीय)
हृदय नारायण दीक्षित (साहित्य आणि शिक्षण)
ह्यूग अँड कोलने गँटझेर (मरणोत्तर, दोघांनाही) (साहित्य, पत्रकारिता, शिक्षण)
इनीवालाप्पील मिनी विजयन (खेळ)
जगदीश जोशिला (साहित्य आणि शिक्षण)
जपिंदर नारुला (कला)
जोनास मासेट्टी (अन्य- अध्यात्म)
जयोनाचंद्रम बथारी (कला)
जुमदे योमगम गॅमलीन (समाजकार्य)
के दामोदरन (अन्य)
के एल कृष्णा (साहित्य आणि शिक्षण)
के ओमानाकुट्टी अम्मा (कला)
किशोर कुणाल (मरणोत्तर) (प्रशासकीय सेवा)
एल हँगथिंग (अन्य- शेती)
लक्ष्मीपथे रामासु्ब्बेयेर (शिक्षण, पत्रकारिता, साहित्य)
ललित कुमार मांगोत्रा (साहित्य आणि शिक्षण)
लांबा लोबझांग (मरणोत्तर) (अन्य- अध्यात्म)
लिबिया लाबो सरदेसाई (समाजकार्य)
एम डी श्रीनिवास (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
मदुगुला नागपाणी शर्मा (कला)
महाबीर नायक (कला)
ममता शंकर (कला)
मंदा कृष्णा मडिगा (सार्वजनिक व्यवहार)
मूर्ती भूजंगराव चितमपल्ली (साहित्य आणि शिक्षण)
मिर्रियाला अप्पाराव (मरणोत्तर) (कला)
नागेंद्र नाथ रॉय (साहित्य आणि शिक्षण)
नारायण (भूलाई भाई) (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)
नरेन गुरुंग (कला)
नीरजा भाटला (वैद्यकीय)
नीर्मला देवी (कला)
नितीन नोहरिया (साहित्य आणि शिक्षण)
विनायक लोहाणी – सामाजिक कार्य
विलास डोंगरे – आरोग्य क्षेत्र
विजयलक्ष्मी देशमाने – आरोग्य क्षेत्र
विजय महाराज – अध्यात्मिक क्षेत्र
वेनकप्पा सुगतेकर – कला
वेनु असान – कला
वासुदेव कामथ – कला
वदिराज पंचमुखी- साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र
तुषार शुक्ला – साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र
थियम देवी – कला
तजेंद्र मुजुमदार – कला
सईद हसन – साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र
स्वामी कार्तिक महाराज – अध्यात्म
सुरेंद्र कुमार वसल – विज्ञान आणि अभियांत्रिकी
सोनिया नित्यानंद – आरोग्य
श्याम अग्रवाल – कला
सुरेश सोनी – सामाजिक कार्य
सुभाष शर्मा – कृषी
स्टीफन कानप – साहित्य आणि शिक्षण
शाईन निझाम – साहित्य आणि शिक्षण
शेख अली अल जाबेर – साहित्य आणि शिक्षण
सेथुरमन पंचनाथम -विज्ञान
सीनी वैश्वनाथन – विज्ञान
सत्यपाल सिंग – क्रीडा
संत राम देसवल – साहित्य आणि शिक्षण
सॅली होळकर – उद्योग
सज्जन भजंका – उद्योग
रिकी केज – कला
रबा महांता – कला
रतन परिमाऊ – कला
राजेंद्र मुजुमदार – कला
रामदर्श मिश्रा – साहित्य आणि शिक्षण
राधाकृष्णन – कला
राधा भट- सामाजिक कार्य
श्री चंद्रमोगन – उद्योग
आर अश्विन – क्रीडा
प्रतिभा सत्पथी – साहित्य शिक्षण
प्रशांत प्रकाश – उद्योग
परमार नागजीभाई – कला
राम महादेवी – कला
दत्ताचनमुर्ती – कला
ओंकार पाहावा – उद्योग
ज्ञानराधा मधील पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा! स्थावर संपत्तीच्या विक्रीला परवानगी मिळणार .
बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र सह इतर राज्यात तब्बल 53 शाखाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून वेळेवर परत न करता ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवी लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरेश कुटे यांच्या मालमत्ता विक्रीबाबत कारवाई ला परवानगी देण्याची मागणी केली असून ही परवानगी मिळाल्यास येत्या काही महिन्यात ठेवी परत मिळण्याची प्रक्रिया सुरु होऊ शकते.
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ईडी कडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर ज्ञानराधा मल्टीस्टेटचे मालमत्तांचा एमपीआयडीचा प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात आलाय. हा प्रस्ताव पुढे गृहमंत्रालयात गेल्यानंतर मालमत्ता विक्रीला मंजुरी मिळणार आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याल्या या पतसंस्थेतील गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. ज्ञानराधाच्या स्थावर मालमत्तांना विक्रीची मंजूरी मिळणार असल्याने ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन व्हॉइस चेअरमन आणि संचालक मंडळाच्या नावावर असलेल्या 80 स्थावर मालमत्तांचा एमपीआयडी अंतर्गत प्रस्ताव मुंबई येथे अप्पर पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला. गृह मंत्रालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर 80 मालमत्तांचा लिलाव करण्यासंदर्भात अधिसूचना निघेल. त्या अधिसूचनेमध्ये येणाऱ्या मालमत्ता जिल्हाधिकाऱ्यांना लिलावाद्वारे विकता येणार आहे. लिलावातून मिळणाऱ्या पैशातून ठेवेदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यास मदत होईल.
ज्ञानराधा मधील ठेवीदार यांच्या ठेवी परत देण्याबाबत आणि चौकशी बाबत जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जाधव यांनी जालना रोड शाखेमार्फत अर्ज घेण्यास सुरवात केली आहे. मात्र या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता ग्राहकांनी आणि ठेवीदारांनी मेलवर अर्ज पाठवावेत असे आवाहन जाधव यांनी केले आहे.
मराठवाड्यात लाखो ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत ज्ञानराधा मल्टीस्टेटने 636 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातील 23 शाखेतील स्थावर आणि जंगम मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. या मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ईडी कडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर व केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयानंतर बीड, छत्रपती संभाजी नगर पुणे व मुंबई या शाखांमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आता या जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ज्ञानराधाच्या 80 मालमत्तांचा एमपीआयडी प्रस्ताव मुंबईला पाठवण्यात आला असून स्थावर संपत्तीच्या विक्रीला परवानगी मिळणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर या संपत्तीच्या लिलावातून ठेवीदारांचे पैसे मिळण्यास मदत होणार आहे.
धक्कादायक घटना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न. अचानक झालेल्या घटनेमुळे प्रशासनाचा गोंधळ.
बीड(प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनानिमित्त बीडमध्ये मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला. 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बीडमध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलं.
बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्यासह प्रमुख अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती होती. पोलीस दलाच्या पथसंचालनाचे निरीक्षण दत्ता भरणे यांनी केले. यावेळी दत्ता भरणे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश दिला. कार्यक्रम आटोपून भरणे यांचा ताफा शासकीय विश्रामगृहाकडे जाताना एका तरूणाने त्यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करून बीडच्या शासकीय विश्रामगृहाकडे मंत्री दत्तात्रय भरणेयांचा ताफा जात असताना एका तरुणाने ताफ्यासमोर एका तरूणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नितीन मुजमुले असे या तरुणाचे नाव असून बीड नगरपालिका अंतर्गत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करा अशी मागणी या तरूणाने केली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पाडून दत्तात्रय भरणे शासकीय विश्रामगृहाकडे निघाले होते. त्यांचा ताफा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पर्यंत पोहोचताच या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने अचानक गोंधळ उडाला आहे.
Saturday, January 25, 2025
राष्ट्रीय मतदार दिना निमित्त यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात सामूहिक शपथ.भारत हा लोकशाही प्रधान देश आहे - व्यंकटेश मुंडे.
उद्या मलकापुर येथे लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.
जिल्हा परिषद सीईओ जिवने यांची कारवाई.जलजीवनचे 22 गुत्तेदार ब्लॅकलिस्ट!
बीड (प्रतिनिधी) जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या एकूण 1262 कामांपैकी 87 कामे समाधानकारक म्हणजे प्रगती 9 ते 25 टक्के प्रगती नाही आशा 33 कामे विहित कालावधीत काम प्रगतीपथावर नसल्याने वारंवार भेटी देऊन आणि सूचना देऊनही सुधारणा झाली नाही त्यामुळे 23 गुत्तेदरांना कारणे दाखवा नोटीस देऊन संबधीत कंत्राटदारांना काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये? याबाबत नोटीस बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी दि.23 रोजी दिली आहे. गुत्तेदारांना काळया यादीत टाकण्याबाबत नोटीस दिल्यामुळे खळबळ खाली आहे.
जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र शासनाचा कालबद्ध कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत तात्काळ विहित कालावधीत पूर्ण कराव्याची आहेत. मात्र 87 कामाची प्रगती 0 ते 25 टक्के एवढी कमी झालेली आहे. यातील 33 कामांसाठी 22 गुत्तेदार आहेत. या 22 कंत्राटदानादारांना यादीत का टाकण्यात येऊ नये? याबाबत नोटिसा देण्यात आले आहेत.
खालील 22 कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
मोहिनिराज कन्स्ट्रक्शन, तळेगाव घाट ता. अंबाजोगाई, अमोल बापूराव जाधव सनगाव, अंबाजोगाई, योगेश रामराव चव्हाण तेलंघाना, अंबाजोगाई, योगेश रामराव चव्हाण जळगाव ता. अंबाजोगाई, श्री जगदंबा कन्स्ट्रक्शन, भोपळा, परळी, विजय कन्स्ट्रक्शन रामेश्वरवाडी, केज, श्री विजय कन्स्ट्रक्शन दरडवाडी, केज श्री विजय कन्स्ट्रक्शन मुंढेवाडी केज, श्री विजय कन्स्ट्रक्शन, शिरूर घाट ता. केज, श्री विकास अर्जुन बांगर टोकवाडी वडवणी, श्री अजय सुदाम शिंदे, शिंगणवाडी तालुका धारूर, प्रगती कन्स्ट्रक्शन आगरनांदुर, गेवराई, प्रगती कन्स्ट्रक्शन काठोडा तांडा गेवराई निलेश अंबादास भवर गोगलगाव गेवराई, निलेश रामदास भवर गंगावाडी, गेवराई, राहुल रावसाहेब टेकाळे उखडपिंप्री, गेवराई, श्री विशाल वैजनाथ तांदळे आनंदवाडी ता. शिरूर (का.), राहुल रणजीत गरकळ श्रीपतवाडी, ता. शिरूर (का.), विवेक वात्री पाखरे, ढोकवड ता. शिरूर (का.), राहुल सिताराम घोडके माळेवाडी शिरूर (का.), राहुल सिताराम घोडके माळेवाडी ता.शिरूर (का.),
किशोर सुधाकर गायकवाड आनंदवाडी, माजलगाव, संकेत आबासाहेब धाये, कान्हापूर ता. माजलगाव, प्रगती कन्स्ट्रक्शन घलाटवाडी ता. माजलगाव, प्रगती कन्स्ट्रक्शन, हिंगणवाडी ता.माजलगाव, लुखेगाव, नाकलगाव, खतगव्हाण, ता.माजलगाव, संतोष विठ्ठल भालेराव बेदरवाडी, ता. पाटोदा, संभाजी भाऊसाहेब शिरसाट मांजरसुंबा ता. बीड, एम.टी. फड मांडवखेल, ता. बीड, स्वप्ना बाळू तुपे हिंगनी खुर्द ता. बीड, प्रतिक अरविंद मिसाळ, लमानतांडा ता.आष्टी, अक्षय अनंता शिरस्वाल, हनुमंतगाव, आष्टी या 33 कामे 22 कंत्राट दारा मार्फत सुरू आहेत. सदर 22 कंत्राटदारांना काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये? याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे.
लातूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचीे अवैध धंद्यावर कारवाई सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त.
लातूर (प्रतिनिधी) :- लातूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यावर कारवाई केली म्हणे..! ज्या लातूरमध्ये रोज कोट्यवधींचा गुटखा खुलेआम, ‘राज’ रोस विकला जातो, त्या शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 22 जानेवारीला फक्त 2 लाख 28 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केली. यामुळे पोलीस रेकॉर्डवर आणखी कारवाई व आणखी एक गुन्हा नोंदला गेला, हे मात्र खरे!
2 लाख 28 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त
राज्यामध्ये सर्वत्र गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीला बंदी आहे. मात्र लातूरमध्ये अगदी सहजरित्या गुटखा व सुगंधित तंबाखू कुणालाही उपलब्ध होते. लातूर शहरच नव्हे, तर लातूर जिल्ह्यामध्ये गावागावांमध्ये हा गुटखा व सुगंधी तंबाखू अगदी बिनदिक्कत, दिवसाढवळ्या राजरोस विकली जाते. इतकेच नव्हे, तर अगदी शासकीय-प्रशासकीय कार्यालयांच्या कानाकोपऱ्यांमध्येही या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या सेवनाचे पुरावे ठसले गेले आहेत. शासकीय कार्यालयांच्या आजूबाजूला अनेक पानटपऱ्यांमधून गुटखा विक्री अगदी जोमात होत आहे. या विक्रीला पाबंदी कुठेच दिसून येत नाही. मध्यंतरी नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षकपदी शहाजी उमाप हे रुजू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाची वाट न बघता पोलिसांनी गुटख्याबाबत वातावरण एकदम ‘टाइट’ केले होते.
लातूरचे पोलीस अधीक्षकच ‘अधूनमधून’ निर्देश देतात
मात्र ते वातावरण आता राहिले नाही. लातूरचे पोलीस अधीक्षकच ‘अधूनमधून’ निर्देश देतात अन् मग स्थानिक गुन्हे शाखा पथक ‘अशा’ अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबविते. 22 जानेवारीला लातूरच्या गुळ मार्केट ते सम्राट चौक या रस्त्यावरील श्रीयश ट्रेडर्स नावाच्या दुकानावर धाड टाकून सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने वेगवेगळ्या कंपनीचा 2 लाख 28 हजार 854 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व गुटखा करण्यात जप्त केला. तसेच सागर गोविंदराव दरेकर, (वय 29 वर्ष, राहणार अहिल्यानगर, लातूर) याच्याविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. या पथकात पोलीस अमलदार रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, राहुल कांबळे, नितीन कठारे, चालक पोलीस अमलदार चंद्रकांत केंद्रे यांनी कामगिरी नोंदवली. बाकी सर्वत्र गुटखा मात्र सर्रास विकला जातो, तो कुठून येतो? हा खरा सवाल आहे.
Friday, January 24, 2025
उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची राजकिशोर मोदी.अँड. विष्णुपंत सोळंके व.प्रकाश सोळंकी यांनी भेट घेऊन दिल्या शुभेच्छा.
राज्य परिवहन महामंडळाची तिकीट दरात मोठी वाढ. यामागील कारणांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला खुलासा.
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास सर्वसामान्यांसाठी महागला आहे. तिकीट दरात तब्बल १४.९७ टक्के इतकी वाढ करण्यात आली असून, शुक्रवारी (२४ जानेवारी) रात्रीपासून लागू होणार आहे. पण, इतकी मोठी भाडेवाड राज्य सरकारला का करावी लागली, याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "काल (२३ जानेवारी) प्राधिकरणाची बैठक पार पडली. त्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो. गृह खात्याचे प्रधान सचिव, परिवहन खात्याचे प्रधान सचिव आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव या तिघांच्या समितीची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय झाला आहे की, एसटीची भाडेवाढ अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, ती १४.९७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे."
'प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित, पण...', सरनाईकांनी दिली माहिती
"रिक्षा आणि टॅक्सी यांची दरवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे, ती ३ रुपये दरवाढ करण्यात आली आहे. दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत चालले आहेत. प्रत्येक वर्षी खरंतर ही भाडेवाढ अपेक्षित असते. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांपासून ही करण्यात आलेली नसल्या कारणाने ही एकत्रित १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ती आजपासून लागू होईल", अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
"एसटी महामंडळाची परिस्थिती आज काही चांगली नाहीये. एसटीचे उत्पन्न आहे, त्यापेक्षा खर्च अधिक आहे. त्यामुळे दिवसाला तीन कोटी रुपयांचं नुकसान एसटी महामंडळाला होतं. त्यामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य आहे. प्रवाशांना सुविधा द्यायच्या असतील, तर या गोष्टीची गरज असणार आहे. कारण दिवसेंदिवस डिझेल, सीएनजी आणि बसची दुरूस्तीचा खर्च वाढू लागला आहे", असेही सरनाईक म्हणाले.
मी बैठकीत दरवर्षी भाडेवाढीचं सूचना केली होती -सरनाईक
'मी जेव्हा परिवहन खात्याची बैठक घेतली. त्यावेळी हेच सूचवलं होतं की, एकत्रितपणे भाडेवाढ करण्याऐवजी जर दरवर्षाला ठराविक भाडेवाढ केली, तर सर्वसामान्य प्रवाशांना भुर्दंड पडणार नाही. प्रवाशांनाही ते अपेक्षित असेल. आता केलेल्या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाचं जे दररोज नुकसान होतं आहे, ते कमी होईल", अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.
एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पालकांची ७५ लाखाची फसवणूक. पोलिसात गुन्हा दाखल.
नागपूर (प्रतिनिधी) पॉंडेचेरीतील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका टोळीने दोन विद्यार्थ्यांच्या पालकांची ७५ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परीमल कोटपल्लीवार,पत्नी सोनम, मिलींद धवड आणि नितीन मल्लतवार अशी या आरोपींची नावे आहेत.
हिराबाई सिद्धार्थ सहारे (५२, उप्पलवाडी) यांच्या मुलीला नीटमध्ये कमी गुण असल्यामुळे तिला एमबीबीएसला प्रवेश मिळाला नव्हता. मात्र, तिला डॉक्टर व्हायचे होते. त्यामुळे तिच्या आईने पैसे भरुन महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याचे ठरविले. त्यांनी वृत्तपत्रातील जाहिरातीवरुन टेलीफोन एक्स्चेंज परीसरातील आर.के.एज्युकेशन कॉंऊंसलिंग सेंटरवर संपर्क केला. त्यांनी तेथे आरोपी परीमल कोटपल्लीवार याने व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी ८५ लाखांची मागणी केली.
सहारे यांनी पैसे देण्यास होकार देऊन ३० लाख ७५ हजार रुपये दिले. दरम्यान, याच टोळीने चंद्रशेखर बावणे यांच्या मुलीलासुद्धा एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली ८ ऑक्टोबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ या दरम्यान बावणे यांच्याकडून ४५ लाख रुपये घेतले. मात्र, दोघांच्याही मुलींना प्रवेश मिळवून दिला नाही. या टोळीने याप्रकारे अनेक पालकांची फसवणूक केली असून ती रक्कम कोट्यवधीमध्ये असल्याची माहिती आहे.
Wednesday, January 22, 2025
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम - शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते
बीड (प्रतिनिधी) शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यामध्ये विवीध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात येत आहे आसे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांनी सांगितले आहे..
शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ,शिवसेना नेते तथा शिवसेना सचिव विनायक राऊत,शिवसेना नेते सुनील प्रभू , शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , शिवसेनेचे मराठवाडा समन्वयक विश्वनाथजी नेरूळकर , बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुरामजी जाधव ,सह संपर्कप्रमुख बदामराव आबा पंडीत ,सह संपर्कप्रमुख डॉ.लक्षराज सानप साहेब,सह संपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात आष्टी व माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 23/1/2025 रोजी सकाळी ठीक दहा वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालय बार्शी रोड बीड येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व पदाधिकारी व शिवसैनिक त्यांना मानवंदना करतील व यानंतर
वडवणी येथील आनंद कॉम्प्लेक्स संभाजी महाराज चौक या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून, वडवणी तालुका प्रमुख विनायक बप्पा मुळे यांच्या आयोजना खाली ऊसतोड कामगार भगिनींना साडी वाटप, विविध प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळ वाटप, विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे..
उपजिल्हाप्रमुख आजिनाथजी खेडकर व शिरूर तालुका प्रमुख सोपान काका मोरे यांच्या आयोजित शिरूर येथे रांगोळी स्पर्धा व गोरगरीब महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन साड्या वाटप करण्यात येणार आहेत.
पाटोदा उपतालुकाप्रमुख अशोक तात्या पवार यांच्या आयोजित तालुका पाटोदा आंबेवाडी व हांडेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी अकरा वाजता शालेय साहित्य वाटप होणार आहे.
आष्टी तालुका प्रमुख सुभाषजी राऊत यांच्या आयोजित आष्टी येथे मुख व बधिर वस्तीगृहामधील सर्व विद्यार्थ्यांना सकाळी 11:30 वाजता अल्पउपहार देण्यात येणार आहे.
युवासेना माजलगाव जिल्हा युवाधिकारी प्रदीपजी तांबे यांच्या आयोजित माजलगाव येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना सकाळी 11 वाजता फळ वाटप.
धारूर तालुका प्रमुख बाबा सराफ यांच्या आयोजित धारूर येथील शासकीय रुग्णालयात सकाळी 11:30 वाजता रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.
युवासेना वडवणी तालुका युवाधिकारी नवनाथजी मोरे यांच्या आयोजित वडवणी मोरेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही पेन वाटप करण्यात येणार आहे.
शिवसेना जिल्हा संघटक रतन तात्या गुजर व शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बहिरवाळ सर यांच्या आयोजित बीड शहरातील भगवान विद्यालय शेजारी ध्येयपूर्ती गुरुकुल येथे 20 तारखेपासून सुरू असलेल्या वकृत्व स्पर्धा, रनिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,अशा अनेक स्पर्धांचे बक्षीस उद्या दिनांक 23 रोजी सायंकाळी 7 वाजता वितरण करून सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था केली आहे.
याबरोबरच बीड जिल्ह्यातील व आष्टी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,या सर्व कार्यक्रमाला शिवसेना,युवा सेना महिला आघाडी,किसान सेना,शिक्षक सेना सह सर्व अंगिकृत संघटनांच्या आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी केले आहे..!!
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
बीड (प्रतिनिधी) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला न्यायालयाने १४दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आमच्याकडून तपास पूर्ण झाला आहे, असे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले. बुधवारी विशेष न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक याआधी जवळपास २१ दिवस पोलीस कोठडीत होता.
बीडच्या मोका विशेष न्यायालयात बुधवारी साडेअकरा वाजता वाल्मिक कराड याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराड याला दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) हजर केले गेले. त्या अगोदर वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी केली गेली. वाल्मिक कराडला सर्दी, ताप, खोकला असल्याने वैद्यकीय पथकाने गोळ्या औषधे दिली, अशी माहिती डॉक्टर अमोल जोगदंड यांनी दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. खुनाच्या कटात संशयित म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच खंडणी प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातल्या दोन्ही गुन्ह्यात कराडला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. चौकशी पूर्ण झाल्याने सीआयडीने वाल्मिक कराडची कोठडी मागितलेली नाही.
वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने जामीनासाठी अर्ज करता येऊ शकतो. मात्र मकोकाचा गुन्हा दाखल असल्याने सहजासहजी जामीन मिळत नाही. साधारण सहा महिने जामीन मिळत नाही. वाल्मिक कराड याच्या वतीने त्याचे वकील जामिनासाठी अर्ज करू शकतात. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी वकील त्याला जामीन देऊ नये, असा प्रयत्न करतील.
केज तालुक्यातील मस्साजोग गावात आवादा कंपनीचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाकडे वाल्मिक आणि त्याच्या गँगने २ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यातील ५० लाख रुपये निवडणूक काळात दिले गेल्याचेही भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. तसेच उर्वरित रकमेची खंडणी मागण्याकरिता ज्यावेळी वाल्मिकची गँग गेली तिथेच सुरक्षारक्षकाशी बाचाबाची झाल्यानंतर संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली. आपल्या खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात ठेवून संतोषची हत्या झाल्याचे सांगितले जाते. खंडणी आणि खून प्रकरण एकमेकांशी संलग्न असल्याने दोन्ही प्रकरणांचा तपास सीआयडी आणि एसआयटीमार्फत केला जात आहे.
खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड तब्बल १५ दिवसांनी पोलिसा समोर आला. त्यानंतर १४ दिवसांच्या पोलीस तपासात खंडणी आणि खून प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला. त्यानंतर त्याच्यावर खुनाच्या कटात संशय असल्याचे कलम आणि मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.
Tuesday, January 21, 2025
प्रशासकीय कर्मचारी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमत परळी नगरपरिषदे ची क्रीडा क्षेत्रात झेप विभागात द्वितीय!
रानडुकरांसाठी कुंपण तारेत वीज प्रवाह सोडल.विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
बीड (प्रतिनिधी) रानडुकरांपासून पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी उभ्या पिकाला तारेचे कुंपण करून त्यामध्ये वीज प्रवाह सोडल्यामुळे विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना बीड तालुक्यातील सोनगाव येथे सोमवारी मध्यरात्री घडली.
आप्पासाहेब सगनाजी दिगे वय 36 वर्ष असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आप्पासाहेब दिघे हे सोमवारी रात्री शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. मात्र रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताला तारेचे कुंपण करून विद्युत प्रवाह सोडलेल्या तारेला त्याचा स्पर्श झाला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाने रान डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या. खंडणी प्रकरणी मोठा पुरावा वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले एकत्र, “त्या” दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
बीड (प्रतिनिधी) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कराड सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्या कडे दोन कोटी रुपयांची खंडणी ज्या दिवशी मागितली गेली, त्यादिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या फुटेज मध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे केज शहरातील आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयात एकत्र येताना दिसत आहेत. खंडणी प्रकरणी हा मोठा पुरावा असून आता काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागणार आहे.
वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनी 29 नोव्हेंबरला आवादा कंपनीला खंडणी मागितली होती. ही खंडणी ज्या दिवशी मागण्यात आली होती, त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. 29 नोव्हेंबरला वाल्मीक कराड हा विष्णू चाटे याच्या कार्यालयात आलेला दिसत आहे. यावेळी कराडसोबत सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विष्णू चाटे याच्या कार्यालयात आले होते. अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे आता मानले जात आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिकेत राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हे देखील वाल्मीक कराडसोबत विष्णू चाटे याच्या कार्यालयात येताना दिसत आहेत. त्यामुळे आता आवादा कंपनीकडून ज्या दिवशी खंडणी मागण्यात आली होती, त्यादिवशी पीएसआय राजेश पाटील हे वाल्मीक कराडला का भेटले असावेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कारण याआधी आवादा कंपनीमधील वॉचमेनला मारहाण झाली होती, त्याच्या एक दिवसानंतर राजेश पाटील एका हॉटेलमध्ये वाल्मीक कराडसोबत दिसले होते. यानंतर आता पुन्हा एकदा राजेश पाटील हे वाल्मीक कराडसोबत दिसून आल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता निलंबित पीएसआय राजेश पाटील याची देखील सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
बनावट चलनी नोटां प्रकरणी मनिष क्षीरसागर यास अटक.
परंतु पुणे येथे अशा प्रकारच्या बनावट चलनी नोटांमध्ये सहभागी असलेल्या मनीष क्षीरसागर याच्यासोबत अक्षय आठवले आणि ओंकार सवाई हे सुद्धा सोबत मिळून आले होते. तेव्हाच बीड शहर पोलिसांनी बनावट चलनी नोटांच्या गुन्हे तपासा संदर्भात सावध होऊन त्या दिशेने तपास करण्यात सुरुवात केली होती. यावरून आयत्या तावडीत सापडलेल्या मनीष क्षीरसागर याचा कोर्टामार्फत बीड शहर पोलिसांनी जेलमधून ताबा घेतला. पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर मनीष क्षीरसागर याने पोलिसांना सर्व माहिती दिली. अक्षय आठवले यांनी बनावट चलनी नोटा चलनात आणण्यासाठी पुणे येथे असलेल्या प्रविण गायकवाड यास पिस्टल पुरवले होते. तसेच पळून जाताना मनीष क्षीरसागर याला सोबत घेऊन जाऊन औरंगाबाद येथे लपवले होते. तसेच सनी आठवले यांनी सुद्धा यातील आरोपींना शरण देऊन अक्षय आठवले मार्फत संरक्षण पुरवले होते. या कामी पोलिसांना गुन्ह्यात वापरलेला मनीष क्षीरसागर याचा मोबाईल मिळाला आहे. या माध्यमातून आणखी पुरावे या गॅंगच्या विरुद्ध पोलिसांना मिळणार आहे.
या संपूर्ण प्रकरणांमध्ये पोलीस अधीक्षक श्री नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंबर गोलड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ , सहायक पोलिस निरीक्षक बाबा राठोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, जयसिंग वायकर, मनोज परजणे, सुषेंन पवार, सचिन अलगट, यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
विवाहितेचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा पसरवली अन् गावाने.वाळीत टाकले कुटुंबाची डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्या विरोधात तक्रार दाखल.
विवाहित मुलीचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी झाली, तसंच गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकलं. कुणीही भेटायला जवळ येत नाही. आमच्यासोबतचे व्यवहारही लोकांनी थांबवले आहेत’, अशी आपबिती पीडित कुटुंबाने सांगितली आहे.
तसंच या आरोपांमुळे घरातल्या महिलेने दोन वेळा जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, असा दावाही कुटुंबाने केला आहे.
डॉक्टर-पोलिसाविरोधात तक्रार
याप्रकरणी कुटुंबाने डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिपही दाखवली. ही ऑडिओ क्लिप पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे. तुमच्या मुलीला एचआयव्ही होता, तिच्या अंत्यविधीला जवळ ज्या व्यक्ती होत्या, त्यांची तपासणी करून घ्या, असं या ऑडिओ क्लिपमधली व्यक्ती म्हणत आहे. ही व्यक्ती पोलीस असल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.
मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशी अफवा पसरवल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. ‘आमची मुलगी गेली, पण जवळचे लोकही भेटायला आले नाहीत. या अफवेमुळे कुणीही आमच्याजवळ येत नाही. आरोग्य विभागाने खोटा अहवाल दिला आहे, सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून हे झालं आहे, आम्हाला न्याय द्या.’, अशी मागणी कुटुंबाने केली आहे.
या प्रकरणात पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे.
पीडित कुटुंबाच्या आरोपावर बोलताना आष्टी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर पोलिसांना याबाबत विचारलं असता डॉक्टरांनी जे सांगितलं त्यासंदर्भात आमच्या कर्मचाऱ्यांनी समजवून सांगण्यासाठी हे सांगितलं, दुसरा कोणताही हेतू नव्हता, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडला उशिरा धावती भेट.आणी सर्वात मोठी घडामोड.
बीड(प्रतिनिधी) परळी पॅटर्न, पीक विमा, हार्वेस्टर घोटाळ्यानंतर आता जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जात वैधता पत्र सादर न करणाऱ्या सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य यांच्या निवडी रद्द केल्या आहेत.निवडी रद्द केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.यापुढे नवे पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक यापेक्षा कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे सोमवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडला उशिरा धावती भेट दिली आहे.
सरपंचांसह सदस्यांना मोठा दणका
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील 13 सरपंच तर 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहेत. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचाचे सदस्य रद्द केले आहे.
मुदत उलटूनही जात प्रमाणपत्र सादर नाही
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांका पासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. परिणामी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचाचे सदस्य रद्द केले आहे.
32 जात वैधता समितींना अध्यक्षाची प्रतिक्षा
दरम्यान राज्यातील जात वैधता प्रमाणपत्र समित्या या विना अध्यक्षच गाडा हाकत असल्याचे समोर येत आहे. राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समितींना अध्यक्षचं नसल्याचा आरोप काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केला आहे. राज्यात केवळ 4 समित्यांवरच अध्यक्ष असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जखम डोक्याला आणि इलाज पायाला अशी अवस्था असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अनेक सरपंच हे या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
अंबाजोगाई तालुक्यातील 42 सरपंच व ग्रामपंचायत सदस्य जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याने अपात्र.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) सन 2020 नंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवून विजयी झालेल्या सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी एक वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असताना अंबाजोगाई तालुक्यातील तब्बल 42 सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सरपंच व सदस्यांना अपात्र करण्यासंदर्भात अंबाजोगाई तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव जाताच बीडचे जिल्हाधिकारी यांनी त्या 42 सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचंड खळबळ उडाली आहे अपात्र सरपंच व सदस्य पुढील काळात काय भूमिका घेतात येणारा काळच ठरवेल
अंबाजोगाई तालुक्यातील सरपंच व सदस्य कोणत्या गावचे अपात्र झाले त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत
1)अंजनपुर- इस्ताळकर छाया आप्पा 2)उजनी- आगळे केवळ ज्ञानोबा, राऊत सोनाली सावता, गायकवाड स्वर्णमाला संजय, मुंडे प्रदीप रामराव 3) कोपरा - भारती शारदा लाला (सरपंच), काटे ईश्वर दासू ,भारती चंद्रभागा युवराज कांबळे, शाहूबाई ग्यानदेव 4) खापरटोन -चाटे पारूबाई लक्ष्मण 5) गित्ता - कळसाईत रेखा तुकाराम 6)घाटनांदुर -कोकाटे सुषमा नितेश, कसबे स्वाती सचिन, कुसळे चंद्रकला शिवाजी 7)चोथेवाडी- गायकवाड पद्दमिन यशवंत, निळे विजूबाई श्रीपती 8)तट बोरगाव- गायकवाड छाया चंद्रकांत ,भोसले मीरानंद कुमार 9)तडोळा -कांबळे ज्ञानेश्वरी विष्णू (सरपंच) 10) तळेगाव घाट -कोमल शरद कटके 11)तेलघणा - केंद्रे मुद्रिका बाई शामसुंदर 12)देवळा -सोनवणे मोनिका भीमा, यशवंत कोमल बजरंग,13) नांदडी- शकुंतला भास्कर वेदपाठक 14)निरपणा - सुवर्णमाला श्रीराम वाघमारे 15) बर्दापूर -पुष्पा हरिश्चंद्र शिनगारे 16)बाभळगाव- भालेराव रूक्मीनबाई कुंडलिकराव 17) भतानवाडी- कांबळे कमल बळीराम 18) भारज -अविनाश पांडुरंग शाहीर 19)मगरवाडी /दस्तगीरवाडी- पार्वती महादेव राऊत, साळे भगवान कोंडीबा 20)माकेगाव- कांचन नंदकिशोर वाघमारे 21) राजेवाडी- पडुळे शारदा प्रल्हाद 22) वरवटी- चाटे अर्जुन जगन्नाथ 23) सनगाव- मुंडे आशा अश्रुबा 24) सेलूअंबा - कुडके उषाबाई राजाभाऊ, पल्लवी अशोक भडके,
25)सोनवळा - माळी बलभीम जनार्दन 26) हातोला- ओगले आनंद कचरू ,खतीले सुमन अर्जुन ,ओगले गीता दत्ता आदींचा अपात्रतेमध्ये समावेश आहे
Sunday, January 19, 2025
दुर्दैवी घटना! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने चिरडले.
बीड (प्रतिनिधी) पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घोडका राजुरी जवळ आज पहाटे घडली. या दुर्दैवी घटनेत तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रस्त्यावर अक्षरशः रक्त मांसाचा सडा पडला होता.
घोडका राजुरी येथील तरुण पोलीस भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी रनिंगची प्रॅक्टिस करत होते. याच वेळी बीडहून परभणी कडे भरधाव वेगाने जाणारी बीड परभणी गाडीने या मुलांना जोराची धडक दिली. या घटनेत तिघा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तर अन्य दोन जणांनी वेळीच रस्त्याच्या बाहेर असलेल्या खड्ड्यांमध्ये उडी मारून आपला जीव वाचवला. तिन्ही मयत मुलांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. यामध्ये सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे वय २० वर्ष , विराट बब्रूवान घोडके व 19 वर्ष तसेच ओम सुग्रीव घोडके वय 20 वर्ष यांचा मृत्यू झालेल्या मध्ये समावेश आहे.
Saturday, January 18, 2025
राज्य सरकारची पालकमंत्री पदाची घोषणा अजित पवार बीडचे पालकमंत्री, पंकजा मुंडे जालना!
मुंबई (प्रतिनिधी) राज्य सरकारने पालकमंत्री पदाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली तर अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असतील. पंकजा मुंडे यांच्यावर जालन्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर राज्यभर झालेल्या आंदोलनानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देऊ नये अशी मागणी समोर आली होती. दरम्यान सरकारने जाहिर केलेल्या यादीनुसार बीडचे पालकमंत्री अजित पवार असणार आहे. अजितदादांकडे बीड आणि पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आह
राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कोणत्या मंत्र्यांला कोणते खाते मिळणार हा ही विषय संपुष्टात आला तोच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न चर्चेला आला होता. महायुतीमध्ये खातेवाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
> ठाणे – एकनाथ शिंदे
> पुणे – अजित पवार
> बीड – अजित पवार
> सिंधुदुर्ग- नितेश राणे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
> सातारा -शंभुराजे देसाई
> छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
> जळगाव – गुलाबराव पाटील
> यवतमाळ – संजय राठोड
> कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
> अकोला – आकाश फुंडकर
> भंडारा – संजय सावकारे
> बुलढाणा – मंकरंद जाधव
> चंद्रपूर – अशोक ऊईके
> धाराशीव – प्रताप सरनाईक
> धुळे – जयकुमार रावल
> गोंदिया – बाबासाहेब पाटील
> हिंगोली – नरहरी झिरवळ
> लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
> मुंबई शहर – एकनाथ शिंदे
> मुंबई उपनगर –आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा/
> नांदेड – अतुल सावे
> नंदुरबार – मानिकराव कोकाटे
> नाशिक – गिरीश महाजन
> पालघर – गणेश नाईक
> परभणी – मेघना बोर्डीकर
> रायगड – अदिती तटकरे
> सिंधुदुर्ग- नितेश राणे
> रत्नागिरी – उदय सामंत
> सोलापूर – जयकुमार गोरे
> वर्धा – पंकज भोयर
> जालना – पंकजा मुंडे