Sunday, January 12, 2025

राष्ट्रमाता जिजाऊनी दोन छत्रपती घडवून स्वराज्य दिले तर देशाचा युवक बलाढ्य व बलवान असला पाहिजे.अंधश्रद्धा ही देशाला लागलेली किड आहे.असे स्वामी विवेकानंदांनी सांगितले.-प्रा.अतुल दुबे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. 
12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य  अतुल दुबे म्हणाले की राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या  जीवनात त्याग व संघर्ष आला त्यावेळी त्यांनी समाजाला विघातक अशा रूढी परंपरांना न जुमानता व अंधश्रद्धेला न मानता आलेल्या संघर्षासाचा धैर्याने सामना केला म्हणूनच त्यांचे आर्दश मातृत्व, निःस्वार्थ प्रेम, आणि असामान्य शौर्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे युगपुरुष स्वामी विवेकानंद यांनी देखील आपल्या ज्ञानाचा जोरावरती सकारात्मक विचारातून युवकांना जो संदेश दिला तो म्हणजे
तुम्ही जे विचार करता ते तुम्ही व्हाल. जर तुम्ही स्वत:ला कमकुवत समजत असाल तर तुम्ही दुर्बल असाल; जर तुम्ही स्वतःला बलवान समजत असाल तर तुम्ही बलवान व्हाल.” अशा प्रकारे आपण राजमाता जिजाऊ माँसाहेब  आणि युग पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की त्यांनी अंधश्रद्धेला कधीच थारा दिला नाही.
यावेळी महाविद्यालयाचे प्रा.यु.एन.फड , प्रा.ए.डी.शेख , प्रा.पी.पी.तिडके मॅडम , व्ही.एन.शिंदे , जी.व्ही. कांबळे , ए.बी.जगत कर , यु.बी.जगताप यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment