Wednesday, January 22, 2025

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम - शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते


बीड (प्रतिनिधी)  शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यामध्ये विवीध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात येत आहे आसे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांनी सांगितले आहे..

शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे  यांच्या आदेशाने व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ,शिवसेना नेते तथा शिवसेना सचिव विनायक राऊत,शिवसेना नेते सुनील प्रभू , शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , शिवसेनेचे मराठवाडा समन्वयक विश्वनाथजी नेरूळकर , बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुरामजी जाधव ,सह संपर्कप्रमुख बदामराव आबा पंडीत ,सह संपर्कप्रमुख डॉ.लक्षराज सानप साहेब,सह संपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात आष्टी व माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दिनांक 23/1/2025 रोजी सकाळी ठीक दहा वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालय बार्शी रोड बीड येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व पदाधिकारी व शिवसैनिक त्यांना मानवंदना करतील व यानंतर

वडवणी येथील आनंद कॉम्प्लेक्स संभाजी महाराज चौक या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून, वडवणी तालुका प्रमुख विनायक बप्पा मुळे यांच्या आयोजना खाली ऊसतोड कामगार भगिनींना साडी वाटप, विविध प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळ वाटप, विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे..

उपजिल्हाप्रमुख आजिनाथजी खेडकर व शिरूर तालुका प्रमुख सोपान काका मोरे यांच्या आयोजित शिरूर येथे रांगोळी स्पर्धा व गोरगरीब महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन साड्या वाटप करण्यात येणार आहेत.

 पाटोदा उपतालुकाप्रमुख अशोक तात्या पवार यांच्या आयोजित तालुका पाटोदा आंबेवाडी व हांडेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी अकरा वाजता शालेय साहित्य वाटप होणार आहे.

 आष्टी तालुका प्रमुख सुभाषजी राऊत यांच्या आयोजित आष्टी येथे मुख व बधिर वस्तीगृहामधील सर्व विद्यार्थ्यांना सकाळी 11:30 वाजता अल्पउपहार देण्यात येणार आहे.

 युवासेना माजलगाव जिल्हा युवाधिकारी प्रदीपजी तांबे यांच्या आयोजित माजलगाव येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना सकाळी 11 वाजता फळ वाटप.

 धारूर तालुका प्रमुख बाबा सराफ यांच्या आयोजित धारूर येथील शासकीय रुग्णालयात सकाळी 11:30 वाजता रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.

 युवासेना वडवणी तालुका युवाधिकारी नवनाथजी मोरे यांच्या आयोजित वडवणी मोरेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही पेन वाटप‌ करण्यात येणार आहे.

 शिवसेना जिल्हा संघटक रतन तात्या गुजर व शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बहिरवाळ सर यांच्या आयोजित बीड शहरातील भगवान विद्यालय शेजारी ध्येयपूर्ती गुरुकुल येथे 20 तारखेपासून सुरू असलेल्या वकृत्व स्पर्धा, रनिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,अशा अनेक स्पर्धांचे बक्षीस उद्या दिनांक 23 रोजी सायंकाळी 7 वाजता वितरण करून सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था केली आहे.

याबरोबरच बीड जिल्ह्यातील व आष्टी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,या सर्व कार्यक्रमाला शिवसेना,युवा सेना महिला आघाडी,किसान सेना,शिक्षक सेना सह सर्व अंगिकृत संघटनांच्या आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी केले आहे..!!

No comments:

Post a Comment