Sunday, May 31, 2020

राज्यात खाजगी शिक्षण संस्थांनी वाढीव शुल्क आकारल्यास पालकांनी संंनियंत्रकाशी संपर्क साधावा ;- मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई, दि. ३१- (प्रतिनीधी ) राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून कसलेच वाढीव शुल्क आकारू नये. शुल्कवाढीच्या संबंधात काही तक्रारी असल्यास पालकांनी आपल्या जिल्ह्याच्या संनियंत्रक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. यासोबतच त्यांनी राज्यातील संनियंत्रक अधिकारी यांची विभाग/जिल्हानिहाय मोबाईल नंबरसह यादीही शेअर केली आहे. ही यादी येथ जोडली आहे.

ज्याच्यावर दारूबंदीची जबाबदारी तोच दारूच्या नशेत तर्रर्र !


* बोबडेवाडी येथे स्वतः सरपंचानेच दारू पिऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

केज(दि.३१)- गावात ज्यांनी दारू बंदी करायची जबाबदारी आहे. अशा सरपंच महोदयांनी स्वतः दारू पिवून मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी केज तालुक्यातील एका सरपंचावरच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे गावात आणि परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

गावात दारू बंदी, गुटखा बंदी आणि नशबंदी राबवून गाव तंबाखू मुक्त व नशबंदी सारखी विविध योजना राबवून गावाचा विकास करावा अशी अपेक्षा गावच्या सरपंचां कडून असते. तसेच जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासन यांच्या सूचना व आदेश यांचे गाव पातळीवर पर्यंत राबवून कार्यवाही करण्याचे काम करावे लागते. मात्र केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील संतोष क्षिरसागर या सरपंच महोदयांनी दिनांक ३० मे रोजी सायंकाळी ७:३० वाजता सुमारास बोबडेवाडी येथे महादेव मंदीराकडे जाणारा रोडवर कोरोना विषाणू रोगाचा संक्रमणाचा फैलाव होवु शकतो. हे माहीत असताना देखील विनाकारण दारुच्या नशेमध्ये रोडवर फिरुन मा. जिल्हा दंडाधीकारी बीड यांनी जारी केलेला संचारबदीचे उल्लंघन केले. तसेच सार्वजनिक सुरक्षततेच्या दृष्टीकोणातुन मानवी जीवीतास व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करुन संसर्ग पसरविण्याचे घातक कृती करुन कोरोना विषाणु पसरविण्यास पोषक वातावरण तयार केले. या मध्यधुंद सरपंचाच्या मर्कट लीलांची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविताच पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर पुरी यांच्या फिर्यादी वरून पोलीस स्टेशन केज गु.र.नं. २०३/२०२० भा.दं.वि. कलम १८८, ३६९, २७० सह  महाराष्ट्र पोलीस कायदा १७ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा २००५ चे कलम ५१(ब) व महाराष्ट्र कोवीड -१९ उपाय योजना २०२० चे ११ कलम व ८५ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.

दारू पिऊन झालेल्या वादात मोठ्या भावा कडून लहान भावाचा खुन .

माजलगाव :( प्रतिनीधी ) तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील पिंपळगाव ना. येथील गजानन दशरथ काळे व लक्ष्मण दशरथ काळे या दोन भावात दारू पिऊन झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात वार करून खून केला.
प्राथमिक माहितीनुसार लक्ष्मण दशरथ काळे वय २९ असे मृत युवकाचे नाव आहे तो अविवाहित आहे त्याला दारूचे व्यसन होते शनिवार रात्री दारूच्या नशेत लक्ष्मण व त्याच्या मोठ्या भाऊ गजानन यांच्यात वाद झाला याच वादात गजानन याने लक्ष्मणच्या डोक्यात कशानेतरी वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला
घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल गव्हाणकर व कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला मृत्यू युवकाचा आईनेच पोलिसांना याबाबत खबर दिल्याने पोलिसांना घटनेची माहिती मिळाली.

Saturday, May 30, 2020

डाॕ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील संशोधन केंद्राच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार,लवकर काम सुरू करण्याचे निर्देश.


* कोरोनाच्या भविष्यातील प्रसाराच्या अटकावाकरिता कोविड संशोधन केंद्र उपयुक्त;--पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद, दि. 30 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील कोविड-19 या विषाणुच्या प्रसाराला अटकाव करण्याकरिता यावर संशोधन होणे गरजेचे असल्याने या संशोधन कार्यात हे ‘कोविड-19 संशोधन केंद्र’ नक्कीच मोलाचे काम करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले. या संशोधन केंद्रात संशोधन करून संशोधन केंद्राच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याने लवकरात लवकर संशोधन केंद्राचे काम सुरू करण्याचे निर्देशही संबंधितांना यावेळी देसाई यांनी दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात कोविड-19 संशोधन केंद्र (Covid-19 Testing & Research Facility Center) ला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन इमारतीची पाहणी केली.
एमआयडीसीतील ऑरीक सिटी यांच्यामार्फत सीएसआर फंडातून हा 1 कोटी 23 लाख रुपयांचा निधी संचालक मंडळाकडून मंजूर करुन कोविड संशोधन केंद्र तातडीने उभे केल्याबद्दल समाधान व्यक्त करत देसाई म्हणाले की, भविष्यातील कोविड-19 चा प्रसार रोखण्याकरिता हे संशोधन केंद्र काम करणार असून या कोरोना युध्दात अनेक कोरोनायोध्दे जसे की, डॉक्टर, पोलीस आणि नर्स हे स्वत:च्या जीवावर उदार होऊन प्रतिकुल परिस्थितीत काम करित आहे. आणि या कोरोना योध्यांना काम करत असताना विषाणुचा संसर्ग होतो तेव्हा आपण हा संसर्ग कसा होतो? आणि त्याचा प्रसार होण्यास कसा अटकाव करता येईल या करिता या संशोधन केंद्रात संशोधन करून संशोधन केंद्राच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याने लवकरात लवकर संशोधन केंद्राचे काम सुरू करण्याचे निर्देशही संबंधितांना यावेळी देसाई यांनी दिले.
दररोज 1 हजार पर्यंत स्वॅब तपासणी करण्याचे उद्दिष्ट – कुलगुरू डॉ.प्रमोद येवले
सुरूवातीला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी संशोधन केंद्राच्या इमारती विषयी माहिती देताना सांगितले की, कोविड-19 विषाणुच्या संशोधनाकरिता हे केंद्र राज्यातील तिसरे केंद्र असून या संशोधन केंद्रांत सध्या 23 कर्मचाऱ्यांचा स्टाफ असून येथे दररोज 1 हजार पर्यंत स्वॅब तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. तसेच येथील मशीनरी अधिक अद्ययावत करण्याकरिता देखील प्रयत्न चालू आहे. तसेच उस्मानाबाद येथे चौथ्या संशोधन केंद्राचे काम प्रगतीपथावर असून त्याकरिता सिएसआर फंडातून निधी देखील मिळाला आहे. आवश्यक साधनसामुग्री लवकरच उपलब्ध करुन तेथेही काम सुरू होणार आहे. यानंतर डीएनए बारकोडींगचे संचालक डॉ.जी.एस.खेडकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे संशोधन केंद्रात होणाऱ्या संशोधनाची सविस्तर माहिती दिली.
यावेळी कुलगुरू डॉ.येवले यांनी पालकमंत्री देसाई यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 35 लाख रुपये व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीतील एकूण रक्कम 9 लाख 26 हजार 100 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
कार्यक्रमास माजी खासदार चंद्रकांत खैरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, डीएनए बारकोडींगचे संचालक डॉ.जी.एस.खेडकर आदींची उपस्थिती होती.

महिला व बालविकास विभागाचा अजब कारभार.पॕकेट मसुर दाळीचे आत निघाले हरभरे!


केज;-दि.30 (प्रतिनीधी ) महिला व बालविकास विभागाचा अजब कारभार पहायला मिळत असून पोषण आहाराच्या पॅकेटवर नाव एक आणि आत वेगळेच असा प्रकार पुढे येत आहे
केज तालुक्यात अंगणवाडीमध्ये बालक व गरोदर माता यांना देण्यात येत असलेल्या बंद पाकिटातील पोषण आहारात मसूर डाळ असे पाकिटावर लिहिले असले तरी पाकिट फोडताच आत मध्ये चक्क हरबरा निघाले आहेत. या बाबत सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात हे तक्रार करणार असून या प्रकारच्या फसवणुकीची आणि संबंधित पुरवठादार एजन्सीजची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू गुटखा पान खाऊन थुंकल्यास हजार रुपये दंड ;- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
कोरोना प्रतिबंधासाठी घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे अनेक संसर्गजन्य  व प्राणघातक आजारांचा फैलाव होतो. आता तर कोरोनासारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत दक्षता घेऊन जनतेच्या हितासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची अमंलबजावणी करण्यासाठी साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यामधील तरतुदींनुसार राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासन निर्णयातील आदेश राज्यात सर्वत्र लागू राहतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, धुम्रपान करणाऱ्यास मुंबई पोलिस अधिनियम नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या गुन्ह्यासाठी ३ हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या  गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड व ५ दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे. भारतीय दंड संहितनेनुसार  विविध कलमांनुसार सहा महिने, २ वर्ष शिक्षा व दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये किंवा धुम्रपान करू नये असे आवाहन देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Friday, May 29, 2020

यंदा आषाढी वारी परांपरा अखंडीत राहाणार .विमान, हेलीक्पटर,किंवा बसने पालखी सोहळा पोहचनार पंढरपूरला.


पुणे : अनेक वर्षाची परंपरा असलेल्या आषाढी पायी वारीची परंपरा या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडीत होणार असली तरी आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी आषाढीवारीसाठी  परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .त्यानुसार संस्थांनच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहोचविण्यात येणार आहे.
आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भात आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम,संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव, सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे,आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे-पाटील, राजाभाऊ चोपदार,विशाल मोरे, माणिक मोरे, सोपानदेव देवस्थान सासवडचे गोपाळ गोसावी आदी उपस्थित होते.आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे,वारीची ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व सबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थांनच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहोचविण्यात येईल. विमान तसेच हेलिकॉप्टर बाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्यसरकार राखून ठेवत आहे. याबाबतचा निर्णय घेताना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगी शिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नसल्याचे सांगतानाच राज्यातील वारकरी संप्रदायाच्या सकारात्मक भुमिकेबद्दल त्यांनी आभार मानले. दुरदर्शन तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरुन आषाढी वारीचा आनंद घरबसल्या अनुभवता येणार आहे. वारकरी संप्रदाय व सर्वांनी पांडुरंगाचे दर्शन घरातूनच घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्रा पवार यांनी केले आहे. पंधरा दिवसात पालखी मार्गक्रमण करीत असलेल्या पुणे, सातारा, सोलापूर, या तीनही जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली आहे. पुढील कालावधीत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पंढरपूर येथेही रुग्ण आढळले आहेत. एकुणच पुणे विभागात सांगली जिल्ह्याचा अपवाद वगळता चारही जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आहे.राज्यशासनाने जो निर्णय  घेतला आहे त्या निर्णयाचे वारकरी निश्चितपणे स्वागत करतील, असे  श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले. या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरूप, सहभागी वारकरी, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन,पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या  प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील  मान्यवर उपस्थित होते.

बीडमध्ये भर रस्त्यावर महिलेची निर्घुणपणे हात्या .

* आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात.

बीड : एका 37 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत निर्घृनपणे हत्या केल्याची घटना आज रात्री साडेसात वाजता शहरातील जालना रोडवरील हिना पेट्रोलपंपाच्या पाठीमागील परिसरात घडली आहे
महिलेला जिवंत मारल्यानंतर आरोपीने स्वत: पोलिस ठाण्यात हजर होत घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिना पेट्रोलपंपा च्या पाठीमागील परिसरामध्ये उर्मिला रमेश मस्के वय 37 रा, मंत्री गल्ली बीड या महिलेवर धारदार शस्त्राने वार करत तिचा खून करुन आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. पतीनेच ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती असून आरोपी पती स्वतः शहर पोलिस ठाण्यात हजर झाला त्यानंतर घटनास्थळी डीवायएसपी भास्कर सावंत, शहर पोलिस ठाण्याचे एपीआय गजानन जाधव यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी धाव घेत घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला.

बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधीत रुग्णावर पहिले डायलेसीस.


बीड ;-- कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा रोज वाढत असल्याने जिल्ह्यात चिंता व्यक्त होत असतांनाच जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना बाधीत रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात यश येत असून परवा दोन रुग्ण बरे होवून घरी परतल्यानंतर आज बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीत रुग्णावर पहिले डायलेसीस करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. सध्या बीड जिल्ह्यात सध्या 51 कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे कोरोना बाधीतांवर यशस्वी उपचार करण्यातही जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना यश येत आहे. परवा 2 रुग्ण बरे होवून घरी परतल्यानंतर आज प्रथमच जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना बाधीत रुग्णावर डायलेसीस करण्यात आले. सदरचा रुग्ण 32 वर्षांचा असून तो धारूर येथील आहे. डायलेसीस टेक्निशियन म्हणून किशोर दुनघव, डॉ.मनोज मुंडे, सिस्टर स्वाती गव्हाणे, सीआय आयव्ही म्हणून बलभीम माने यांनी काम पाहिले असल्याची माहिती डॉ.अशोक थोरात यांनी दिली.

बंधपत्रीत डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ ;-- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २९ –;  बंधपत्रीत (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करणयाचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे व त्यांचे मानधन समान करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जाहीर केला. यामुळे कोरोना लढाईला बळ मिळणार असून डॉक्टर्सनासुध्दा प्रोत्साहन मिळणार आहे.
वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजार ऐवजी ७५ हजार, आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार, इतर भागातील एम बी बी एस डॉक्टर्सना ५५ हजार ऐवजी ७० हजार, इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजार ऐवजी ८० हजार मानधन देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले आहे.

सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही ते स्वत:हून कोसळेल.;--विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस


मुंबई : राज्य सरकारमध्ये समन्वय नाही.या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर या सरकारची प्राथमिकता काय आहे, हे सहज लक्षात येईल.सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे.सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही.ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल.सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  लगावला आहे.
राज्य सरकारने धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट आहे. रूग्णसंख्या,मृत्यू यात मोठी वाढ होत आहे. आता चाचण्यांची संख्या सुद्धा अतिशय कमी करण्यात आली आहे. काल केवळ २९०० चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी ३२ टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधीजी यांचे आजचे विधान तर अतिशय गंभीर आहे. स्वत:च्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे. त्यांच्या विधानावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत.  राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर या सरकारची प्राथमिकता काय आहे, हे सहज लक्षात येईल. सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला २८ हजार १०४ कोटी रूपये मदत मिळाली आहे. केंद्राच्या पॅकेजमधून विविध क्षेत्रांचे जे प्राथमिक आकलन झाले,त्यातून ७८ हजार ५०० कोटी रूपये राज्याला मिळतील तसेच केंद्राच्या निर्णयांमुळे १ लाख ६५ हजार कोटी रूपये वित्त उभारणीचे सहाय्य राज्याला मिळणार असून,यामुळे एकूण २ लाख ७१ हजार ५०० कोटी रूपयांचा लाभ महाराष्ट्राला होईल,असे फडणवीस यांनी सांगितले.कोरोनाच्या काळात राज्याला भरीव केंद्र सरकारने दिली आहे. प्रधानमंत्री गरिब कल्याण याजनेत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या तीन महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिले. गव्हासाठी १७५० कोटी रूपये, तांदळासाठी २६२० कोटी रूपये, डाळीसाठी १०० कोटी रूपये, स्थलांतरित मजुरांसाठी  १२२ कोटी रूपये असे एकूण ४५९२ कोटी रूपये अन्नधान्यासाठी केंद्र सरकारने दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत १७२६ कोटी रूपये, जनधन योजनेच्या माध्यमातून १९५८ कोटी रूपये,विधवा,दिव्यांग,ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ११६ कोटी रूपये असे एकूण ३८०० कोटी रूपये केंद्र सरकारने दिले. उज्वला गॅस योजनेत ७३ लाख १६ हजार सिलेंडर, ६०० रेल्वेगाड्यांसाठी ३०० कोटी रूपये, बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण १००१ कोटी रूपये, एसडीआरएफमध्ये १६११ कोटी रूपये आणि आरोग्यासाठी ४४८ कोटी रूपये असे एकूण २०५९ कोटी रूपये दिले. डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून ५६४८ कोटी रूपये देण्यात आले. शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेल्या निधीत कापसासाठी ५६४७ कोटी रूपये, धानासाठी २३११ कोटी रूपये, तूरसाठी ५९३ कोटी रूपये, चणा आणि मक्यासाठी १२५ कोटी रूपये, तसेच पीकविम्यासाठी ४०३ कोटी रूपये असे एकूण ९०७९ कोटी रूपये देण्यात आले. हा संपूर्ण खर्च पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला या काळात २८ हजार १०४ कोटी रूपये दिलेले आहेत, असेही  फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राला आरोग्यासाठी सुद्धा मोठी मदत मिळाली. महाराष्ट्राला हायड्रोक्सिक्लोरोक्विन ४७ लाख २० हजार, प्रयोगशाळांना मान्यता  शासकीय ४१ ,खाजगी ३१, पीपीई किटस  ९.८८ लाख, एन ९५ मास्क १५.५९ लाख तसेच आरोग्यासाठी मदत ४६८ कोटी रूपये मदत देण्यात आली. केंद्र सरकारच्या पॅकेजमधून एमएसएमई, गृहनिर्माण, डिस्कॉम,नरेगा,आरआयडीएफ, कॅम्पा एम्पॉयमेंट, स्ट्रीट वेंडर्स, फार्मगेट इन्फ्रा, मायक्रो फूड एन्टरप्राईजेस, पशुसंवर्धन इत्यादींतून किमान ७८,५०० कोटी रूपये महाराष्ट्राला मिळतील. जे मिळाले ते २८ हजार कोटी रूपये, केंद्राच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला जो निधी उभारता येऊ शकतो, तो १ लाख ६५ हजार कोटी रूपये आणि केंद्राच्या पॅकेजमधील ७८ हजार कोटी रूपये असे एकूण २ लाख,७१ हजार ५०० कोटी रूपयांचा लाभ होऊ शकतो असेही त्यांनी शेवटी सांगितले.

ज्यांनी राज्य कर्जबाजारी केले त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये. ;-- ना.नवाब मलिक


मुंबई : गेल्या पाच वर्षात ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा उद्योग केला,त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत.त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलावी अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदतीवरून केंद्र सरकारला लक्ष केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला कर्ज काढण्याचा सल्ला दिला. या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी खरपूस समाचार घेतला आहे.केंद्राने महाराष्ट्राला २८ हजार कोटी रुपयांची मदत केल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. विविध योजनांसाठी पैसा द्यावा लागतो. ते देणे केंद्राला बंधनकारक असते. केंद्राने दिलेली मदत नवीन योजनेसाठी खर्च करता येत नाही.केंद्राने जाहीर केलेले पॅकेज हे चुकीचे आहे. त्याचा फायदा राज्य सरकारला झालेला नाही.बंधनकारक पैसे सरकारला आणि जनतेला दिले आहेत असे मलिक यांनी सांगितले. महाराष्ट्राने दीड लाख कोटीचे कर्ज काढले पाहिजे असा सल्ला  फडणवीस यांनी दिला आहे.सध्याच्या संकटात असल्याने राज्यात सर्व जण कर्ज काढण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने चालेल असा टोलाही  मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
आम्ही महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करणार नाही असे फडणवीस सांगत आहेत.परंतु महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होवू शकत नाही. तिन्ही पक्ष भक्कमपणे सरकार चालवत आहेत मात्र दिल्लीपासून गल्लीतील भाजपचे नेते राज्य सरकार पडणार असून,आम्ही सरकार स्थापन करणार असल्याचे सांगतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी अफवा पसरवण्याचे उद्योग हे करीत आहेत.राज्यातीस महाविकास आघाडीचे सरकार पुढील पाच वर्षे टिकणार आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकजुटीने काम करीत असल्याने भाजपने कितीही अफवा पसरविल्या तरी राज्यातील सरकार स्थिर राहील असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांचे आवाहन.


*मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको.

बीड दि. २९- लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीला मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचं, असं आवाहन  पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होईल, मात्र कार्यक्रम लाईव्ह असेल, कोणीही गडावर गर्दी करु नये, अशी सूचना पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.  ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, असं वाटत असल्याची फेसबुक पोस्ट पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. 
  ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव  मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. परंतु सध्या कोरोनामुळे राज्यासह बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. शिवाय गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. गोपीनाथ गडावर सध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथराव मुंडे यांची पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे लाईव्ह होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी येऊ नये, असा संदेश पंकजाताई मुंडे यांनी दिला.
   २ जून रोजी बाबा घरी पोटभर रस-पोळी खाऊन गेले होते. स्वतःच्या घरी तेच त्यांचं अखेरचं जेवण... ३ जून रोजी त्यांचे पार्थिव देखील घरी आणता आले नाही. त्यामुळे ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

पुण्यतिथीला कराल ना हे...
-------------------------
३ जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांचा फोटो समोर उभे रहा. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. आजी, सून, नात उजवीकडे तर आजोबा, मुलगा,नातू डावीकडे असं उभा राहून  दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही. हे दोन दिवे लावण्यास मी सांगितले ते स्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश देणारे आणि समानता जगणारे म्हणून लावायचे     असंही पंकजाताई मुंडे यांनी सांगितलं. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःला जपा, गर्दी करू नका, घरात रहा, तुमच्या जीवाची काळजी साहेबांच्या एवढीच मला आहे, कराल ना मग एवढं? मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी..असं आवाहनही त्यांनी केले आहे.

Thursday, May 28, 2020

परळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना मारहाण.

परळी वैजनाथ ; प्रशासन कोरोनासारख्या संकटाला तोंड देत असताना परळी तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परळी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या बाबु राव रुपनर यांना बेलंबा येथील काही जणांनी गुरुवारी दुपारी 4 वा च्या दरम्यान शिवीगाळ करत मारहाण केली आहे.
एकीकडे आपल्या जिवाची पर्वा न करता प्रशासन कोरोनाच्या संकटात काम करताना परळीत महसूल अधिकाऱ्यांवरच काही समाजकंटकांनी हल्ला केला आहे. आपले काम राहिल्याचे कारण देत कक्षात घुसून त्यांना मारहाण झाली आहे. फेरफारिच्या मागणीवरून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याचा तपास पोलीस करत आहेत.

मराठवाड्यात 30 मे पर्यत उष्णतेची लाट कायम .


 पुणे:मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी राज्यात आगामी आठवड्यात तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. देशभरात अनेक भागांत कमाल तापमान चढे राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

मराठवाड्यात ३० मेपर्यंत उष्णतेची 
मराठवाड्यात येत्या  ३० मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी जास्त राहील. चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

विदर्भ, मराठवाडातील शहरांतील तापमान :
औरंगाबाद ४१.७, नगर ४२.६, अकोला ४४.६, चंद्रपूर ४६.४, अमरावती ४५, नागपूर ४६, सोलापूर ४१.४, जळगाव ४३, उस्मानाबाद ४१.४, परभणी ४४, मालेगाव ४३.६ अंश सेल्सियस.

मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट, त्यासाठी महिलांनी स्वतःला अपराधी मानू नये.

* जि. प. लाईव्ह संवाद कार्यक्रमात आर विमला यांचे प्रतिपादन.

पालघर: - ( प्रतिनीधी ) मासिक पाळी ही स्त्रियांना लाभलेली नैसर्गिक क्रिया असून त्यासाठी स्त्रियांनी स्वतःला  अपराधी मानू नये,असे    आवाहन.   महाराष्ट्र      ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला     यांनी केले   आहे. गुरुवारी (28 मे) जागतिक   मासिक पाळी दिनानिमित्त पालघर जिल्हा परिषदेच्यावतीने मासिक पाळी व्यवस्थापन माहिती, प्रचार-प्रसार व उपक्रमाची माहिती.  देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी फेसबुकवर लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. मासिक पाळी हा रोग अथवा आजार नसून ती एक स्त्रियांमध्ये घडणारी नैसर्गिक क्रिया असून या काळात स्त्रियांनी वैयक्तिक स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
 तर मासिक पाळीबद्दल समाजात असलेले समज-गैरसमज दूर होऊन जनजागृती होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा भारती      कामडी यांनी    यावेळी बोलताना केले.    तसेच आरोग्य    समिती सभापती म्हणून खेड्यापाड्यातील महिलांना या बाबतीत काही अडचणी येणार नाहीत तसेच शिक्षण     समिती सभापती.   म्हणून शिक्षण विभागाकडून      देखील   मासिक पाळीबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न केले जातील असे     प्रतिपादन   यावेळी जि.प उपाध्यक्ष   निलेश सांबरे यांनी केले.  
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी संवादात सहभागी होऊन    मासिक पाळी बद्दल        जनजागृती.   करायची असेल तर लोकशिक्षणाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त करून जिल्हा परिषदने असा स्तुत्य उपक्रम राबविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. महिला व बालकल्याण विभाग या प्रश्नासाठी जिल्ह्यातील महिलांना काही    अडचणी     असल्यास    नेहमीच प्रयत्नशील   राहील अशी.  ग्वाही   यावेळी महिला व बालकल्याण सभापती अनुष्का ठाकरे यांनी दिली. 
 या लाईव्ह संवाद कार्यक्रमात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे     प्रकल्प संचालक माणिक दिवे,    अतिरिक्त   मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे,  राजेंद्र पाटील, तुषार माळी, तज्ञ वक्त्या म्हणून लाभलेल्या प्रभा तिरमारे    यांनी या संवादात   सहभाग घेतला. तर या    लाईव्ह संवाद    कार्यक्रमात जिल्हाभरातील.   अंगणवाडी    कार्यकर्त्या, आशा वर्कर व    अन्य महिलांनी      मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

दुचाकी स्कुटीला अडकवलेली २० लाखाची बॅग चोरट्यांनी पळवली.


* अंबाजोगाई न्यायालयासमोर आज सकाळी घडलेली घटना.

अंबाजोगाई;- (प्रतिनीधी )  आर्थिक व्यवहारातून आलेल्या पैशाची बॅग स्कुटीला अडकून न्यायालयात स्टॅम्प तिकिट घेण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने सदरची बॅग पळवल्याची घटना आज सकाळी अंबाजोगाई न्यायालयासमोर घडली. सदरच्या बॅगमध्ये २० लाख रूपये असल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले असून अंबाजोगाई शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अंबाजोगाई येथील बांधकाम व्यवसायिक बालासाहेब गोरे यांच्याकडे आज आर्थिक व्यवहारातून २० लाखाची रक्कम आली होती. त्या रक्कमेची बॅग त्यांनी आपल्या स्कुटीला अडकवली आणि बालासाहेब गोरे हे अंबाजोगाई न्यायालयासमोर आले. त्याठिकाणी गाडी उभा करून ते स्टॅम्प तिकिट घेण्यासाठी गेले असता तेवढ्या वेळात अज्ञात चोरट्याने स्कुटीला अडकवलेली २० लाखाची बॅग चोरून नेली. सदरची घटना ही सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. गोरे जेंव्हा गाडीजवळ आले तेंव्हा पैशाची बॅग चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गोरे यांनी या घटनेची माहिती अंबाजोगाई शहर पोलीसांना दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत.

खरीप पीक विमा बाबत उद्या उघडणार बीड जिल्ह्याचे टेंडर-; वसंतराव मुंडे


परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्रात खरीप पिक विमा योजनेत खास बाब म्हणून बीड जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी उद्या टेंडर पुणे कृषी आयुक्त कार्यालयात उघडणार अशी माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी माहिती दिली खरीप व रब्बी पिक विमा योजनेत सन 2019 ते 2020 मध्ये दहा जिल्हे वगळण्यात आले होते त्यामध्ये ते बीड रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर सोलापूर लातूर हिंगोली वाशिम भंडारा या जिल्ह्यांचा पिक विमा समन्वय समिती मध्ये फेररचना करणेबाबत पिक विमा संदर्भात चर्चा घडवून आणण्यासाठी दि 5/ 12/ 2019 व व 26/ 12/ 2019 ला शासनाकडे निवेदनाद्वारे बीड जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून पीक विम्याचा सामाविष्ट करण्याबाबत विनंती करण्यात आली होती त्यावर महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारकडून 26 नोव्हेंबर 2019 ला जिल्हा समूह पर्यायास अंतिम मान्यता देण्याबाबत केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला केंद्र शासनाकडून 3 डिसेंबर 2019 ला सूचना प्राप्त झाल्या त्यामध्ये जिल्हा समूहाचे फेररचना करून आपल्या स्तरावर योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले तरीही 4 नोव्हेंबर 2019 निविदा प्रसिद्ध करून 9 डिसेंबरला उघडण्यात निविदा आल्या एकही कंपनीचा बीड जिल्हा संदर्भात सहभाग आढळून आलेला नाही त्यामुळे बीड जिल्हा पीक विमा योजनेतून कायमचाच वगळण्यास संदर्भात विमा कंपनी व शासन स्तरावरून अन्याय जिल्ह्यावर केला जातो की काय असा प्रश्न उपस्थित काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी उपस्थित केला आहे राज्य सरकारकडून कृषी विभागाला अनेक वेळेस मार्गदर्शक सूचना पिक विमा संदर्भात देण्यात आल्या परंतु बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी बोगस कागदपत्रे तयार करून बोगस क्षेत्र वाढवून बोगस पिकाचे नोंदी करून करोडो रुपयाचा पिक विमा मधील घोटाळे केल्यामुळे शासन स्तरावर चौकशी मध्ये आधार लिंक केल्यामुळे उघडकीस आलेले आहेत शासनाकडून केस पण दाखल शेतकऱ्यावर केल्या जात आहेत महाराष्ट्र शासन स्तरावर सर्व बाजूने पत्रव्यवहार करून खरीप योजनेत विशेष बाब म्हणून बीड जिल्हा समाविष्ट करण्यासंदर्भात शासन स्तरावर हालचाली करण्यास काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी प्रयत्न केले त्यामुळे यावेळेस बीड जिल्ह्याचा विशेष बाब म्हणून समाविष्ट करून उद्या टेंडर पिक विमा संदर्भात कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे उघडणार आहे या योजनेमध्ये कृषी विभाग महसूल विभाग व बँकेचे कर्मचारी यांच्या चौकशी करण्यात येणार असल्याचे शासन स्तरावर बोलले जात आहे त्यामुळे इमानदार शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहत आहे व बीड जिल्ह्याची सर्व स्तरावर पिक विमा बाबत बदनामी झाली आहे निसर्गाच्या अवकाळी पावसामुळे गारपीटमुळे खरीप व रब्बी दोन्ही पिकाचे खुप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे तरीही शेतकरी प्रत्येक संकटाला तोंड देतो परंतु शासन स्तरावर मदतीचे पंचनामा करून विनंती केली जाते तरीही शासन स्तरावर दिनांक 30 जानेवारी 2020 ला मंत्री उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे अशी माहिती कृषी विभागाचे एकनाथ डवले प्रधान सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई दि 12/3/2020 पत्राद्वारे विनंती करून विशेष बाब म्हणून बीड जिल्ह्याचे पिक विमा योजना संदर्भात खरीप पिकासाठी उद्या निवेदन निवडणार असल्याची माहिती काँग्रेस नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी दिली

यावर्षी जूनच्या पहिल्या दिवसा पासूनच वरूनराजा बरसणार ;-हवामानखात्याचा अंदाज.

मुंबई : राज्यात सर्वत्र मोसमीपूर्व पाऊस १ आणि २ जूनला कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यात पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक असेल. यावर्षी सर्वसाधारणपणे राज्यात ११ जूनला पावसाची सुरुवात होईल.
त्याचा परतीचा प्रवास नेहमीपेक्षा थोडा रेंगाळून ८ ऑक्टोबरला सुरु होण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव पावसावर पडणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. यावर्षी मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शासकीय वस्तीगृहात स्वाधार योजनेचा लाभ आता तालुकास्तरावर ;- ना. धनंजय मुंडे


*शहरापासून 5 किमी हद्दीची मर्यादाही 10 किमी पर्यंत वाढवणार !

*अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना होणार मोठा लाभ.

मुंबई (दि. 28) —- : शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या 11 वी व त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वाधार योजना मोठी शहरे, महानगरपालिका, जिल्ह्याचे ठिकाण यापूरती मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

तसेच पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे शहरापासून 5 किमी हद्दीपर्यंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेतील सवलती लागू होत्या, ही मर्यादा आता 10 किमी पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचेही ना. मुंडे म्हणाले.

मंत्रालयात बुधवारी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या संदर्भात घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला विभागाचे मुख्य सचिव पराग जैन, सहसचिव दिनेश डिंगळे, समाज कल्याण आयुक्त प्रवीण दराडे, अवर सचिव अनिल अहिरे, आदिवासी विभागाचे उपसचिव शिंदे, कक्ष अधिकारी सरदार आदी उपस्थित होते.

या योजनेचा विस्तार केल्याने तालुका स्तरावरील हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

11 वी – 12 वी व त्यापुढील व्यावसायिक व बिगर व्यवसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या, शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र परंतु प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई, ठाणे आदी मोठ्या शहरांमध्ये वार्षिक रु. 60 हजार, इतर महसुली विभाग, क वर्ग महानगरपालिका आदी ठिकाणी वार्षिक रु. 51 हजार, तर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी वार्षिक रु. 43 हजार इतकी रक्कम या योजनेअंतर्गत देण्यात येते.

ही योजना लागू असलेल्या शहर किंवा महानगरपालिकेपासून 5 किमी हद्दीपर्यंत असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकत होता, या अंतराची मर्यादाही आता 10 किमी पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ना. मुंडे यांच्या या निर्णयानुसार मोठी शहरे, महानगरपालिका तसेच जिल्हा स्तरावरुन आता तालुका स्तरावर विविध महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कोराना लागण रुग्णाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क. बीड शहर व काही ग्रामीण भागातील गावात संपूर्ण संचारबंदी लागू–जिल्हाधिकारी राहुल रेखावार


बीड – कोरोना विषाणूचे लागण (COVID-१९ Positive)झालेल्या रुग्णाचा बीड शहर व ग्रामीण भागातील विविध गावात अनेकांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क खूप मोठया प्रमाणात व आला असल्याचे दिसून आले आहे. त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या सर्व संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार ०८ दिवसांसाठी ४ जुन २०२० रोजी रात्री १२.०० वा पर्यंत संपूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .
कारेगांव ता. पाटोदा येथील रुग्ण हा कोरोना विषाणूची लागण झालेला आढळलेला असून बीड शहरातील त्याचे तपास करत असतांना त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क बीड शहरात खूप मोठया प्रमाणात व काही ग्रामीण भागात आला असल्याचेयाबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण बीड शहरात व बीड तालूक्यातील खंडाळा, च-हाटा, पालवण व इट , पाटोदा तालूक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही, वडवणी तालूक्यातील देवडी, गेवराई तालूक्यातील खांडवी, मादळमोही व धारवंटा, केज तालूक्यातील खरमाटा व धारुर तालूक्यातील पारगांव या गांवामध्ये ०८ दिवसांसाठी संपूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .
तसेच या ८ दिवसांमध्ये ४ जुन २०२० रोजी रात्री १२.०० वा पर्यंत संपूर्ण संचारबंदी कालावधीत घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.*

१.वैद्यकीय सेवा , वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा २४ तास सुरु राहतील.
२. बीड शहरात व वरील गावांमध्ये विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही व शहरा बाहेरही जाता येणार नाही.
३. अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळता (महसूल, ग्रामविकास व आरोग्य बीड शहरातील सर्व आस्थापना (शासकीय, खाजगी व बैंका इ.) बंद राहतील, परंतू बीड शहरातील शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुखांना व बँक यांना अतिशय आवश्यकता भासल्यास उपजिल्हाधिकारी रोहयो, बीड यांचेशी संपर्क साधून अत्यावश्यक बाब म्हणून कार्यालय उघडण्याची व अतिशय मर्यादीत कर्मचाऱ्यांनाच बोलविण्याची परवानगी घ्यावी.
४. बीड शहरातील व वरील गावांतील नागरिकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही, पंरतू मेडीकल Emergencey मधील पाससाठी बीड शहरातील नागरिकांनी ऑनलाईन अर्ज Www. Covid19.Mhpolice. In या वेबसाईटवर भरुन पास प्राप्त करुन घ्यावा.
५. बीड शहरातील व वरील गावांमधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप तात्काळ डाऊनलोड करुन वापरणे बंधनकारक राहील, कोरोना विषाणूचे अनुषंगाने (ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे
आढळून आल्यास सदरील अॅप मध्ये Self Assessment या सदराखाली आपली माहिती तात्काळ भरावी.
६. बीड शहर व वरील गांवे वगळता जिल्हयातील इतर सर्व भागांमध्ये या आधी दिलेले आदेशच कायम राहतील
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वीचे या कार्यालयाचे आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

राज्यात कापूस खरेदी सुरू 15 जून पर्यंत पूर्ण करणार .


मुंबई - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्या सर्व दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही कापूस खरेदी दि. 15 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील कापूस खरेदीबाबत त्यांनी आज मंत्रालयातून जिल्हाधिकारी, डीडीआर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे आढावा घेऊन संवाद साधला. यावेळी सहकारमंत्री पाटील यांनी वरील आदेश दिले. पाटील म्हणाले, कापूस खरेदीला गती द्यावी त्यासाठी गाड्यांची मर्यादा वाढवावी, शेतकरी ऑनलाईन नोंदणीच्या याद्या अद्ययावत कराव्यात, कापूस खरेदीसाठी दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची कापूस खरेदी त्या-त्या दिवशीच पूर्ण करण्यात यावी.
सर्व खरेदी विक्री व्यवहारादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, इतर राज्यातील कापूस खरेदी संपुष्टात आल्याने सीसीआय ने आपले ग्रेडर राज्यातील केंद्रांवर तातडीने उपलब्ध करुन द्यावेत.
सीमेलगतच्या जिल्ह्यात परराज्यातून अवैध मार्गाने येणाऱ्या कापसाच्या खरेदीची शक्‍यता असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या हद्दींवर चेक पोस्टद्वारे त्यावर नियंत्रण ठेवावे.
वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी,कापूस खरेदी केंद्रावरील तयार गाठींच्या संकलनासाठी गोदामे कमी पडणार नाहीत. त्यामुळे कापूस खरेदीला गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालय अंबेजोगाईत कोरोना चाचणी प्रयोगशाळा 8दिवसांच्या आत होणार सुरु;- ना. धनंजय मुंडे


बीड (प्रतिनिधी) अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळेस मागील काही दिवसांपूर्वी ना. मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली होती, जिल्ह्यातील स्वॕब तपासनी चा आलेख व वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, येत्या ८ दिवसांच्या आत ही प्रयोगशाळा प्रत्यक्ष सुरू होणार असून, अंबेजोगाई येथेच आता कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे असे ना. मुंडे म्हणाले. मागील आठवड्यात ना.मुंडे यांनी स्वाराती रुग्णालयात भेट देऊन तेथील एमआरआय मशीनची अनेक दिवसांची मागणी पूर्ण केली होती.

Wednesday, May 27, 2020

राज्यात ९४० पोलीस आणि १५५ पोलीस अधिका-यांना कोरोनाची लागण.


मुंबई : राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटापासून जनतेचे संरक्षण करणारे पोलीस आणि पोलीस अधिकारी या आजाराच्या विळख्यात सापल्याचे चित्र राज्यात आहे.राज्यात सध्या १५५ पोलीस अधिकारी व ९४० पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह  असून त्यांच्यावर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्याच्या विविध भागात पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी स्वत: च्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत.मात्र जनतेचे संरक्षण करता करता या भयंकर आजाराची बाधा त्यांना झाली आहे.राज्यात सध्या १५५ पोलीस अधिकारी व ९४० पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली असून,सध्या विविध रूग्णालयात  त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ११ पोलिस व १ अधिकारी असे एकूण  १२, पुणे २,सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण २, ए.टी.एस.१ ठाणे शहर १ व  अशा २० पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला.
 लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २५४ घटना घडल्या. त्यात ८३३ व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. तर कलम १८८ नुसार  १ लाख १५ हजार ७२३ गुन्हे नोंद झाले असून २३ हजार २१७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ५१ लाख ७२हजार ५४५ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ७०० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६ लाख २ हजार ८२२ व्यक्ती क्वारंटाईन आहेत.आजपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ४,३१,८२७ पास देण्यात आले आहेत.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२३वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७२ हजार ७५५ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.राज्यात एकूण १२२६ रिलिफ कँम्प आहेत. तर जवळपास ७६,०४५  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विधान परिषदेचे पुढील आठवड्यात १२ आमदार निवृत्त होणार.इच्छुकांची पक्षश्रेष्टीकडे फिल्डिंग लावायला गर्दी .

मुंबई : येत्या आठवड्यात विधानपरिषदेतील तब्बल १२ राज्यपाल नामनियुक्त सदस्य निवृत्त होणार आहेत.या रिक्त होणा-या जागेवर संधी मिळावी यासाठी आत्तापासून इच्छूकांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी झालेली निवडणूक चांगलीच गाजली असतानाच आता पुढील आठवड्यात राज्यपाल नामनियुक्त १२ विधानपरिषदेतील सदस्यांची मुदत संपत असून,यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे.या यादीत काँग्रेसचे ५ राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ तर घटक पक्षांच्या एका आमदाराचा समावेश आहे.विधान परिषदेत असणारे राज्यपाल नामनियुक्त सदस्य हुस्नबानू खलिफे,जनार्दन चांदूरकर,आनंदराव पाटील,रामहरी रूपनवर हे काँग्रेसचे ४ तर प्रकाश गजभिये,विद्या चव्हाण,राहुल नार्वेकर,ख्वाजा बेग,रामराव वडकुते,जगन्नाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आमदार येत्या ६ जून रोजी निवृत्त होत आहेत. तर काँग्रेसचे अनंत गाडगीळ आणि घटक पक्षाचे ( पीपल्स रिपब्लीकन पार्टी ) प्रा.जोगेंद्र कवाडे यांची मुदत येत्या १५ जून रोजी संपत आहे. असे एकूण १२ आमदार निवृत्त होत आहेत.त्यापैकी राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर,रामराव वडकुते यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजीनामा दिल्या कारणाने या दोन जागा रिक्त होत्या. या दोन रिक्त जागेवर सदस्यांची नियुक्ती करावी अशी शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती.मात्र राज्यपालांनी या रिक्त जागेवर नियुक्त्या केल्या नव्हत्या.
कला, क्रीडा विज्ञान आदी क्षेत्राशी संबंधित अथवा यात उल्लेखनीय योगदान देणा-या व्यक्तींची विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येते. मात्र यापुर्वीचा इतिहास पाहता या नियुक्त्या करताना राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याची उदाहरणे आहेत.त्यामुळे या नियुक्त्यांवरून पुन्हा एकदा राज्यपाल विरूद्ध राज्य सरकार असा सामना रंगण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यापूर्वीच्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात तज्ञ व्यक्तींना डावलून राजकीय व्यक्तींची नेमणूक केल्याने तत्कालीन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आक्षेप घेतला होता.तर दुसरीकडे रिक्त होणा-या या जागेवर संधी मिळावी यासाठी आत्तापासून इच्छूकांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.

दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा.भूगोलच्या पेपरचे गुण या पद्धतीने देणार.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-२ म्हणजेच भूगोल व दिव्यांग कार्यशिक्षण या विषयाचे पेपर रद्द करण्यात आले होते. या विषयांना गुण देणेसंदर्भात शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे.याबाबत शिक्षण मंडळाने पत्रक काढले आहे.रद्द करण्यात आलेल्या दोन्ही विषयासाठी गुण देण्यात येवून निकाल जाहीर केले जाणार असल्याचे, राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २३ मार्च रोजी घेण्यात येणारा  दहावीच्या भूगोल आणि दिव्यांग कार्यशिक्षण या विषयाचे पेपर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले होते,या विषयाला गुण देण्याचा  निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.या विषयांच्या परिक्षेसाठी गुण देण्यात येवून दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे,राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी या पत्रकाद्वारे  कळवले आहे. दहावीच्या भूगोल या विषयाचा पेपर २३ मार्च रोजी घेण्यात येणार होता.यासाठी १७ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार होती. मात्र राज्यात कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.या रद्द करण्यात आलेल्या पेपरला गुण कसे द्यावे याबाबत शालेय शिक्षण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.भूगोलच्या पेपरला गुण देण्यासंदर्भातील विविध पर्यायांचा एक अहवाल मंडळाने मंत्रालयाला सादर केला होता.
सामाजिक शास्त्र पेपर-२ म्हणजेच भूगोल या विषयाचे गुण हे विद्यार्थ्याने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून,त्याचे रुपांतर परीक्षा रद्द करण्यात आलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुण हे त्याने अन्य विषयांच्या लेखी,तोंडी,प्रात्यक्षिक,अंतर्गत मूल्यमापन परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून,त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये किती गुण मिळतात त्या गुणांची सरासरी लक्षात घेऊन भूगोलच्या पेपरला गुण दिले जाणार आहेत.यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर  इतर कोणताही शेरा नसेल, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.या विषयांच्या परिक्षेसाठी गुण देण्यात येवून निकाल जाहीर केले जाणार असल्याचे, राज्य मंडळाने पत्रकात म्हटले आहे.

सरकारवर टीका कराल तर सहा महिन्यांपर्यंत जेल. मुंबई पोलिसांचा १४४ कलमाखाली आदेश.

मुंबई : ( प्रतिनीधी ) कोरोना संकटाच्या काळात सरकारी, प्रशासकीय पदाधिकारी, अधिकारी यांच्या कृतीवर सोशल मीडियात खालच्या थरावर जाऊन बदनामीकारक टीका – टिपण्णी केली तर सोशल मीडिया अकाउंटच्या admin ला जबाबदार धरून १४४ कलमाखाली कारवाई करण्यात येईल, असा इशारा बृह्नमुंबई पोलिस उपायुक्त प्रणया अशोक यांनी काढलेल्या आदेशात दिला आहे.
२५ मे ते ८ जून २०२० पर्यंत हा आदेश लागू राहील. कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अफवा अथवा समाजात तेढ पसरू नये, नागरिकांची असुविधा होऊ नये, या हेतूने संबंधित आदेश काढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, यामध्ये सोशल मीडिया फेसबुक, ट्विटर, वॉट्स अप, इन्स्टाग्राम, टिक टॉक आदी सर्व प्रकारांमधील admin ला जबाबदार धरण्याचा अजब प्रकार समाविष्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर कोणीही सरकारवर टीका टिपण्णी करणारी कॉमेन्ट केली, कोरोनाविषयी गैरसमज, दोन समाजात तेढ पसरविणारी प्रतिक्रिया व्यक्त केली तर कॉमेन्ट करणाऱ्या व्यक्तीबरोबरच संबंधित ग्रुपच्या admin ला जबाबदार धरून फौजदारी कायद्याच्या १४४ कलमानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
या आदेशावरून सोशल मीडियातून व प्रसार माध्यमांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारी कारभार झाकण्याचा हा प्रकार असल्याची टीका होत आहे.

एकाच न्यूज चॅनेलच्या ३६ कर्मचाऱ्यांना करोना.संपूर्ण बिल्डींग केली सील.

दिल्ली : पोलीस आणि पत्रकारांमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्याने अगोदरच चिंता वाढलेली असताना आता एकाच न्यूज चॅनेलच्या ३६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नोयडा येथील सेक्टर १६ ए मधील एका इमारतीत चालू असलेल्या चॅनेलच्या ३६ कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची माहिती सुनील दोहरे या अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबत अधिकृत माहिती हाती आल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्याचवेळी या चॅनेलमध्ये एकत्रित काम करणाऱ्या सर्वांनाच कोविड १९ झालेला नाही.५१ लोकांच्या चाचण्या केल्यावर त्यापैकी २८ जणांना करोनाची लागण झालेली आढळली आहे. तत्पूर्वी याच चॅनेलच्या आठ जणांना करोनाची लागन  झाल्याचे आढळले होते.

कोरोना ची संख्या कमी नाही झाली तर देशातील लॉकडाऊन १५ जून पर्यंत वाढणार ?


नवी दिल्ली :देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभुमीवर 'लॉकडाऊन ४' हा ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण ही आकडेवारी काही कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. त्यामुळे देशातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भातील कोणतेही अधिकृत विधान केंद्राकडून आले नाही. आतापर्यंतची कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि ४ लॉकडाऊन पाहता लॉकडाऊन ५ हा १५ जूनपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.केंद्र आणि राज्य सरकार मिळून लॉकडाऊन ४ चे परिक्षण करत आहेत.
गृह मंत्रालय देखील राज्य सरकारांसोबत ताळमेळ राखत यावर लक्ष ठेवून आहे. सर्व राज्यांकडून लॉकडाऊन ४ संदर्भातील अहवाल मागितला जाणार आहे. या अहवालानंतर केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते.लॉकडाऊनमध्ये देश रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागला गेलाय. रेड झोनमधल्या नागरिकांसाठी सवलती नसल्या तरी ग्रीन झोनमध्ये सरकारने शिथीलता दिली आहे. त्यामुळे इथे दुकान, ग्रीन झोन अंतर्गत प्रवासास मुभा आहे. देशात विमान सेवा देखील सुरु झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन ५ सुरु झालं तरी जनतेचा आत्मविश्वास कसा वाढेल ? याकडे सरकारचे लक्ष असणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा .

जिनिव्हा : जागतिक आरोग्य संघटनेने ज्या देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे तेथे कोरोनाच्या उद्रेकाची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे.जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक माईक रेयान यांनी माध्यामांशी संवाद साधला. 
सीएनएन वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक रायन म्हणाले, 'जागतिक स्तरावर आपण सध्या कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या मध्यावर आहोत. पहिल्या लाटेतील कोरोनाचा कहर अजून वाढताच आहे.' तसेच ते म्हणाले की महामारी कायम लाटेच्या स्वरुपात येते. त्यामुळे कोरोनाचा पहिला उद्रेक संपत असतानाच दुसरा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे जरी कोरोनाची पहिली लाट लवकर आटोक्यात आली तरी कोरोनाची लागण होण्याचा दर पुन्हा एकदा मोठ्याने वाढू शकतो.
रायन म्हणतात, 'आपण कोरोना महामारी कोणत्याही क्षणी पुन्हा उसळी घेऊ शकते ही बाब लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे आपण आता कोरोनाचा कहर ओसरत आहे असे समजून त्याचा आलेख आता कायम खाली जाईल असे गृहीत धरणे चुकीचे आहे. जर आपण काळजीपूर्वक स्थिती हाताळली नाही तर कोरोनाचा दुसरी लाटही येऊ शकते.' रायन यांनी ही दुसरी लाट साथीच्या रोगाच्या मोसमावेळी येऊ शकते त्यावेळी ही लाट थोपवणे फार कठीण जाण्याची शक्याता आहे असेही सांगितले.
त्यामुळेच युरोप आणि उत्तर अमेरिकेने सार्वजनिक आरोग्यविषयक घेतलेली सामाजिक खबरदारी, ट्रेसिंग व्यवस्था, चाचण्या शिथील न करता कोरोनाचा आलेख खालीच कसा राहील आणि लगेचच दुसरी लाट येणार नाही याच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. असे रायन यांनी सांगितले.  
गेल्या काही आठवड्यात युरोपातील आणि अमेरिकेतील बऱ्याच राज्यांनी कोरोनाचा कहर ओसरु लागल्यानंतर लॉकडाऊन शिथील केले आहे जेणेकरुन अर्थव्यवस्थेला नव्याने उभारी देता येईल.  
जागतिक आरोग्य संघटनेच्या साथरोग तज्ज्ञ मारिया वेन केरकोव्ह यांनी 'सर्व देशांनी हाय अलर्टवर राहिले पाहिजे. सर्व देशांनी लवकरात लवकर कोरोना केसेस शोधण्यासाठी तयार असल पाहिजे, ज्यांनी आता कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे त्यांनीही ही खबरदारी घेण्याची गरज आहे. जर आपण संधी दिली तर या विषाणूचा उद्रेक पुन्हा होऊ शकतो. 
त्या म्हणाल्या 'कोरोनाचा एक विशेष गुणधर्म आहे की त्याचा प्रादुर्भाव झापाट्याने होतो. आपण सध्या हेच पाहत आहोत की संधी मिळाली की या विषाणूचा वेगाने प्रसार होत आहे.'

मातोश्रीवरील बैठकीत काय चर्चा झाली;- शरद पवारांनी केला खुलासा विविध चर्चेला विराम.

मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर काल रात्री उशीरा मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.कालच्या सर्व घडामोडी पाहता राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे बोलले जात होते.मात्र खुद्द शरद पवार यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावत राजकीय भूकंपाचे खंडन केले आहे.तीन नेत्यांच्या गुप्त बैठकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर पवार यांनी मातोश्रीवरील भेटीबाबत खुलासा केला आहे.
पवार,मुख्यमंत्री आणि राऊत यांच्या मातोश्रीवरील बैठकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार अशा चर्चा सुरू असतानाच या सर्व शक्यता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावल्या आहेत.कालच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत असतानाच शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र काम करत सरकार चांगले चालवत आहेत, असे  पवार यांनी सांगितले. राज्यात कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे.या कोरोनाच्या रोगराईतून राज्याला कसे बाहेर काढाता येईल यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.यावर आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका एकच आहे.काल रात्री मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा आम्ही घेतला. राज्यातील रुग्णांची संख्या तसेच आरोग्य सुविधांबरोबरच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घ्यावी, यावर या बैठकीत चर्चा झाली असे पवार यांनी स्पष्ट केले.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी  दोन वेळा चहाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे काल राज्यपालांची भेट घेतली असा खुलासा त्यांनी केला.

राज्यात अफरातफरीचे वातावरण पसरावे यासाठी मोठं षडयंत्र, ‘त्या’ खोट्या मॅसेजचा सायबर क्राईमकडे तपास ;- सचिन सावंत

मुंबई, दि. २७ – राज्यात अफरातफरीचे वातावरण पसरावे याकरिता अशा त-हेचे सोशल मीडियावर मॅसेज तयार करून पसरवले जात आहेत. यासाठी मोठं षडयंत्र आहे. यात विरोधी पक्षाचा डाव असू शकतो, असा आरोप कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. सोशल मीडियावर अफवा पसरवणारा तो खोटा मॅसेजही सचिन सावंत यांनी शेअर केला आहे. माझं व गृहमंत्री अनिल देशमुख यांचे याबाबत बोलणं झालं आहे. सायबर क्राईमकडे तपास सोपवला असल्याची माहितीही सावंत यांनी दिली. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
* काय आहे तो खोटा मॅसेज.
दरम्यान, मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून १० दिवसांसाठी पूर्णत: लॉकडाऊनमध्ये असणार असा मॅसेज व्हॉट्सएप ग्रुपमध्ये फिरत आहे. महाराष्ट्र सरकारची एक बैठक सुरू असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल, असे या मॅसेजमध्ये नमूद केले आहे. सदरचा हा मॅसेज पूर्णपणे खोडसाळ आहे. अफवा पसरविण्याच्या उद्देशाने तो मॅसेज टाकला जात असल्याचे स्पष्टीकरण शासनातर्फे देण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यातील १८ गावे लॉक.

बीड : जिल्ह्यातील शिरूर का., पाटोदा आणि परळी या तीन तालुक्यात आज कोरोनाचे नवीन सहा रुग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या तीन तालुक्यातील एकूण १८ गावांच्या परिसरात परिसरात कंटेनमेंट झोन घोषित केला आहे.


कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलेली गावे
 
*शिरूर का. तालुका -* बारगजवाडी, बडेवाडी, शेरेवाडी, उंबरमुळी, उखळवाडी, मोरजळवाडी व येवलवाडीनाथ (जानपीर)
 
*पाटोदा तालुका -* कारेगाव, कारेगाव भोसलेवस्ती, कठाळवाडी, जन्नेवाडी व नाळवंडी
 
*परळी तालुका -* हाळंब, येळंब, खोडवा सावरगाव, भोजनकवाडी, दैठणा घाट, खोडवा सावरगाव तांडा
 
ही सर्व १८ गावे अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Tuesday, May 26, 2020

पालकमंत्री धनंजय मुंडे यांची कोरोना उपाययोजना काळात जिल्ह्यात 8 वी बैठक!आरोग्यविषयक उपाययोजनांसह सर्व विभागांचा घेतला आढावा.

* लॉकडाऊन शिथिलता काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्ससह नियमांचे पालन करावे - ना. धनंजय मुंडे

बीड (प्रतिनिधि) - : जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी कोरोना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह महत्वपूर्ण बैठक घेतली. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून ही 8 वी बैठक होती.
या बैठकीदरम्यान ना. मुंडे यांनी जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. जिल्ह्यातील कोरोना रुग्णालये, खाटा, व्हेंटिलेटर्स, औषध साठा यासह विविध सुविधांचा आढावा घेतला. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना परवानगी देण्यात आली, त्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत 41 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
ना. मुंडे यांनी या आढावा बैठकीत जिल्ह्यात आणखी वेगाने सुरू झालेली कापूस खरेदी, बी बियाणांची उपलब्धता आदी विषयांकडेही लक्ष वेधले.
बीड जिल्ह्यात वार्षिक विकास योजनेतून मार्च 2020 अखेर पर्यंत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा व त्यासाठी खर्च करण्यात आलेल्या निधीचा समग्र आढावा यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर करण्यात आला. 
यावेळी ना. मुंडे यांच्यासह आ. प्रकाशदादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, माजी आ. अमरसिंह पंडित, शिवाजी शिरसाट, वाल्मिक अण्णा कराड, अजय मुंडे तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात,  जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आगवणे यांसह आदी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक विकास योजनेतून आतापर्यंत आरोग्य विभागाला वितरित केलेल्या 11 कोटी रुपये निधीतून खरेदी केलेल्या आरोग्यविषयक सामग्रीचाही यावेळी व्यापक आढावा घेण्यात आला. तसेच तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांसाठी ना. मुंडेंनी यावेळी संबंधितांना सूचना दिल्या.

*नागरिकांना आवाहन...*

दरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात आजपासून शिथिलता कालावधी दररोज 11 तासांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ना. धनंजय मुंडे यांनी नागरिकांना जीवनावश्यक खरेदीसह सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी, क्वारंटाईन राहण्यासह आवश्यक खबरदारी घ्यावी, इतरांशी संपर्क टाळावा; तसेच कोणत्याच परिस्थितीत माहिती लपवून स्वतःचे व आपल्या निकटवर्तीयांचे आरोग्य धोक्यात टाकू नये असे आवाहन केले आहे.

*स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा 8 दिवसांच्या आत होणार सुरू*

अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळेस मागील काही दिवसांपूर्वी ना. मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली होती, जिल्ह्यातील स्वॅब तपासणीचा आलेख व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, येत्या 8 दिवसांच्या आत ही प्रयोगशाळा प्रत्यक्ष सुरू होणार असून, अंबेजोगाई येथेच आता कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे असे ना. मुंडे म्हणाले.
मागील आठवड्यात ना. मुंडे यांनी स्वाराती रुग्णालयात भेट देऊन तेथील एमआरआय मशीनची अनेक दिवसांची मागणी पूर्ण केली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात हाफकीन महामंडळामार्फत 7 व्हेंटलेटर्स देखील मिळवून दिले होते.

मुंबईतील केईएम रुग्णालयाचे शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ.

मुंबई : कोरोनाचे महामारीचे संकट दिवसें दिवस वाढत चाललं आहे. मुंबईतील कोरोनाचा गुणाकार हा कमी झाला असला तरी रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत कोरोनाची स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांनी केईएम रुग्णालयातील शवागृह भरले आहे. धक्कादाक बाब म्हणजे शवागृहात मृतदेह ठेवण्यास जागा नसल्याने बाहेरच्या कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ, रुग्णालय प्रशासनावर आली आहे.
मुंबईतील महत्वाच्या रुग्णालयां पैकी केईएम रुग्णालय आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेतला येथे कोरोना बाधित रुग्ण जास्त येत आहेत. तसेच कोरोनाच्या विषाणूमुळे मृत्यू झाल्यांची संख्याही जास्त असल्याचे दिसून येत आहे.  २७ मृतदेह ठेवण्याची शवागृहाची क्षमता संपल्याने १० मृतदेह कॉरीडोरमध्ये ठेवण्याची वेळ मुंबई पालिकेच्या रुग्णालय प्रशासनावर आली आहे.
केईएम रुग्णालयात सध्या एकूण ३७ मृतदेह आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांत शवागृहातील सात कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शवागृहात आता कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. शवागृहात जागा कमी, रुग्णालयात कर्मचारी कमी या कात्रीत प्रशासन सापडल्याचे दिसून येत आहे.

कोरोना रुग्णाचे उपचार वाऱ्यावर सोडुन कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलना.

*मुंबईतल्या केईएममधला गंभीर प्रकार.

मुंबई, 26 मे : राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात मुंबईच्या केईएम रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी कर्मचारी काम करत नाहीत, फुकटचा पगार घेतात, त्यांना कामावरून काढून टाकलं पाहिजे असा वक्तव्य केलं असल्याचं कामगारांचा आरोप आहे. त्यावरून त्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
 रुग्णालयाच्या अधिष्ठांनी केलेल्या वक्तव्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे. कालच या रुग्णालयात रोजदारी काम करणाऱ्या एका 32 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. प्रशासन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याचही कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास या कामगारांनी आंदोलनासाठी सुरूवात केली.

Monday, May 25, 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. बाबाजानी दुर्रानी यांच्यासह शंभर जणांवर गुन्हा दाखल.


* संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन!

परभणी, दि. २५ – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना व जिल्हाधिकार्यांचे निर्देश असतानाही सामुदायिक नमाज पठन केल्यामुळे राष्ट्रावादी कॉंग्रेसचे आ. बाबाजानी दुर्रानी यांच्यासह १०० ते १२५ जणांवर पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी, तबरेज खान रहेमान खान दुर्रानी, तारेख खान आब्दुल्ला खान दुर्रानी, हरुन मौलाना सारोलवी, शेख जमील, शेख रशीद, शेख मतीन कडेवाला, मुस्तफा टेलर, शेख खयुम शेख नन्नु, अजहर शेख, फेरोज खान, रज्जाक सय्यद, सलिम सय्यद, पाशाभाई फैजु, मोईज अन्सारी यांच्यासह १०० ते १२५ जण हे सामुदायिकरित्या नमाज पठन करत असताना पोलिसांना आढळून आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी, जमावबंदीचे उल्लंघन त्यांनी केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नमाज पठण घरासमोरील मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करण्यास मनाई असताना त्यांनी हे कृत्य केले आहे. अन्य जणांची नावे निप्पन्न करण्याची कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या पर्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक सेवे शिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन करतानाच घराबाहेर विनाकारण फिरनार्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी कळवले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारीं सोबत ज्येष्ठ नेते शरद पवारांचे चहापान, सोबतीला खासदार प्रफुल्ल पटेल !

मुंबई, दि. २५ – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार व ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांना आज चहापानासाठी निमंत्रित केले होते. यावेळी राज्यपालांची सौजन्यभेट घेऊन राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत काय चर्चा झाली याचा अधिकृत तपशील बाहेर येऊ शकला नाही.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत राज्यपालांनी नुकतीच राज्यसरकारवर नाराजी व्यक्त केलेली आहे. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्यसरकारवर अलिकडच्या काळात सातत्याने टीका होत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कामगारांना मिळत असलेल्या अमानवीय व्यवहाराबद्दल टीका करून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले आहे. यावर महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी पलटवारही केला. एकंदरीत कोरोना उपाययोजना, राजकीय अस्थिरतासंदर्भात तर्क वितर्क लावले जात आहे.

बीड जिल्हात मद्यविक्रीला परवानगी या वेळेत सुरू राहाणार विक्री .

.

बीड ; बीड जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्याच्या हालचाली वेगात असून आता मद्यविक्रीला देखील परवानगी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात कँनटेन्मेन्ट व बफर झोन वगळून इतरत्र सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मद्यविक्री करता येणार आहे. तसेच विदेशी मद्याची घरपोच विक्री करता येणार आहे. हि मद्यविक्री सीलबंद स्वरूपातच करता येणार असून दुकानासमोर ५ पेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले असून हे आदेश २६ मे पासून लागू राहणार आहेत.

उद्या पासुन संचारबंदीत ११ तास शिथिलता.

* आस्थापना दररोज सकाळी 7-30 ते सायंकाळी 6-30 पर्यंत

बीड-बीड जिल्ह्यात संचारबंदी काळात आतापर्यंत एकदिवसाआड ७ तास सवलत देण्यात येत होती, मात्र आता रोज ११ तास संचारबंदीतून शिथिलता असणार आहे. ज्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे अशा सेवा वगळून सर्व आस्थापना आता रोज सकाळी ७:३० ते सायंकाळी ६; ३० पर्यंत सुरु राहणार असून सायंकाळी ७ ते सकाळी ७ यावेळेत कडक संचारबंदी लागू राहील.याकाळात केवळ अत्यावश्यक सेवा पास असणारेच प्रवास करू शकतील. असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.
उद्यापासून बीड जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, हॉटेल, सिनेमागृह,व्यायामशाळा,प्रार्थनास्थळे, राजकीय सामाजिक कार्यक्रम, वगळता सर्व आस्थापना सुरु राहतील. तसेच सलून आणि केशकर्तनालये, पार्लर यांनाही सुरक्षा उपाययोजना करून परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये मात्र या सेवा सुरु नसतील. दारू दुकानांसाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. आता रोज ११ तास संचारबंदी शिथिल असल्याने लोकांनी गर्दी करू नये, गर्दी झाल्यास बाजारपेठ बंद करण्याचे आदेश देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.

Sunday, May 24, 2020

रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा वैयक्तिक आंतर पाळून सण साजरा करण्याचे आवाहन.


परळी वैजनाथ ;-  (प्रतिनिधी) 
जय महाराष्ट्र महीला संघटनाच्या अध्यक्षा व कांतीकारी साथी च्या मुख्यसंपादक सौ.वर्षा हनुमंत मगर यांनी सोमवारी साजऱ्या होत असलेल्या रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोविड१९ आणि लॉकडाऊनच्यवैजेनाथ पार्श्वभूमीवर सर्वांनी हा सण वैयक्तिक आंतर पाळून साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
 सौ.वर्षा मगर  यांनी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देताना  म्हंटले आहे , यावर्षी रमजान च्या पवित्र महिन्यात कोविड१९ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दिल्या गेलेल्या सूचनांचे मुस्लिम बांधवांनी तंतोतंत पालन केले आहे. या काळात सर्वांनी मज्जितमध्‍ये एकत्र न जाता घरीच नमाज अदा केली आहे. रमजान ईद ची नमाज ही अशाच पद्धतीने अदा केली जाणार आहे.
उद्योग-व्यवसाय आणि बाजारपेठा बंद असल्यामुळे बऱ्याच जणांना रमजान ईदची खरेदीही करता आलेले नाही. या परिस्थितीत हा सण साध्या पद्धतीने साजरा करावा आपल्या गोरगरीब बांधवाना मदत करावी असे आवाहनही सो.वर्षा मगर  यांनी केले आहे.